ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, यमाजी मालकर, स्तंभलेखक » भारतीय समाजाच्या हरवलेल्या आनंदाचा शोध

भारतीय समाजाच्या हरवलेल्या आनंदाचा शोध

॥ अर्थपूर्ण : यमाजी मालकर |

People In India Map Form Population Of India

People In India Map Form Population Of India

‘सर्वाना आनंदाच्या कवेत घेईल, असा एक सण होऊ दे,’ अशी प्रार्थना बाबा आमटे यांनी केली आहे. यातील ‘सर्वांना’ हा शब्द फार महत्त्वाचा आहे. असा आनंद सर्वांपर्यंत पोहोचवायचा असेल तर भारतासारख्या सुमारे १३५ कोटी लोकसंख्येच्या महाकाय देशात धोरणात्मक बदलांना पर्याय नाही. धोरणात्मक बदल याचा अर्थ असा बदल जो सर्वसमावेशक तर आहेच, पण तो समाजाला भेदभावमुक्त करण्याच्या दिशेने जातो. प्रत्यक्षात मात्र असे होते आहे की अशा दिशा बदलाचा रेटा वाढविण्याऐवजी जे सरकारने केले पाहिजे, ते काही संस्था संघटना अर्धवट करताना दिसत आहेत. त्यातून काही नागरिकांना समाधान तेवढे मिळते, पण प्रत्यक्षात बदलत काहीच नाही.
पण गेल्या वर्षभरात एक अनोखा अनुभव येतो आहे. देशात आता अमूलाग्र आणि धोरणात्मक बदलांची गरज आहे, अशी मांडणी करणार्‍या अर्थक्रांतीच्या पुण्यातील कार्यालयात देशभरातून येणार्‍या नागरिकांची रीघ लागली आहे. आपल्या देशात आता वरवरचे बदल होऊन काहीच उपयोग नाही, मुळातून काही बदलले पाहिजे, असे ज्यांच्या लक्षात येऊ लागले आहे, असे नागरिक अर्थक्रांतीच्या शोधात या कार्यालयात आपसूक येऊन पोचतात. त्यांना खूप काही सांगायचे असते आणि खूप काहीतरी करायचे असते. पण काही सुचत नाही, तेव्हा ते अर्थक्रांती समजून घेण्याचा प्रयत्न करतात. आपल्या गावात, संस्थेत अर्थक्रांतीचे सादरीकरण ठेवतात. या सादरीकरणाला जेव्हा सर्वसामान्य नागरिक गर्दी करतात, तेव्हा त्यांना त्याचे खूप समाधान मिळते. भारतीय माणूस चुकला नाही, देशाची धोरणे चुकली आहेत, व्यवस्था चुकली, असे शब्द कानावर पडेपर्यंत आपण जगण्याच्या शर्यतीत करत असलेल्या तडजोडी म्हणजे किती पाप करत आहोत, या अपराधाच्या भावनेतून ती बाहेर पडू लागतात. आपला देश किती समृद्ध आहे, हे समजून घेतात आणि या समृद्ध देशातील दारिद्र्याचे खरे कारणही आता त्यांना कळलेले असते. पैसा हे विनिमयाचे माध्यम आहे, ती वस्तू नव्हे, यासारख्या अनेक मूलभूत गोष्टी सोप्या शब्दांत ऐकून ते अवाक् होतात आणि आपल्याला हे आतापर्यंत आपल्या पुस्तकांनी किंवा शिक्षणाने का नाही सांगितले, असे प्रश्‍न त्यांच्या मनात तयार होतात. सरकार नव्हे आपणच या देशाचे मालक आहोत, त्यामुळे दररोजच्या घटनांविषयी वितंडवाद करण्यापेक्षा भेदभावमुक्त व्यवस्था आणि धोरणात्मक बदलाविषयी बोलले पाहिजे, हा संकल्प करूनच हजारो नागरिक अर्थक्रांतीशी जोडले जात आहेत, ही फार आनंद आणि समाधानाची गोष्ट आहे. अर्थक्रांतीच्या प्रसाराचे देशभरकाम करत असलेले हजारो कार्यकर्ते आणि व्यवस्थेत करेक्शनचा बदल दोन वर्षांपूर्वी नोटबंदीपर्यंत पोचला, त्याचा हा परिणाम आहे.
पण एवढ्यावर थांबून कसे चालेल? शेतकर्‍यांच्या आत्महत्या अजून थांबलेल्या नाहीत, सर्वाना आरोग्य आणि शिक्षण अजून मिळत नाहीए. रोजगारसंधी अभावी आपल्या नशिबाला दोष देऊन तरुण खुडून चालले आहेत. नव्या जगात आपले काही अस्तित्वच नाही, या जाणीवेने ज्येष्ठ नागरिक केविलवाणे झाले आहेत. प्रामाणिक नागरिकांची जगतानाची कोंडी अजून थांबलेली नाही. सर्व काही आहे, असे वाटत असतानाच सर्व समाज अस्वस्थ आहे. त्यातील अनेक जण भौतिक सुखही अनुभवत आहेत, पण आनंदी फार कमी. जणू जगण्यातले चैतन्य हरवले आहे. ही भावना अनेकदा प्रबळ का होऊ लागली आहे? त्याचे कारण काहीतरी हरवले आहे. उपजीविकीच्या शर्यतीत काहींचे कुटुंब, काहींचे गाव, काहींचे सणवार. काहींनी उराशी जपून ठेवलेला भूतकाळ. या एकेकट्याने सापडणार्‍या गोष्टी नाहीत त्यामुळे त्याचा जे शोध घेत आहेत, त्यांना आताधोरणात्मक बदलासाठीच प्रयत्न केले पाहिजेत, हे वेगळे सांगण्याची गरज राहिलेली नाही. अर्थक्रांतीशी जोडल्या जाणार्‍या नागरिकांचे प्रमाण वाढण्याचे हे खरे कारण आहे.
मानवतेची कास धरणारा असा बिनचेहर्‍याचा पण मनाने जोडलेला समूह दिवाळीच्या निमित्ताने एकत्र येऊ दे. त्याचा भारतीय नावाचा महासमूह होऊ दे. रोमांचकारी, अद्भुत मानवी जीवनातून जे जे म्हणून हरवले आहे, ते सापडू दे. या समूहात सामील होण्याचे वेगळे बोलावणे आपल्याला करायला हवे?
असे आहेत अर्थक्रांतीचे ते चार प्रस्ताव
भारतीय नागरिक म्हणून जे हरवले आहे, ते अर्थक्रांतीने एक मूळ प्रस्ताव आणि तीन पुरवणी प्रस्तावाच्या मार्गाने शोधण्याचा प्रयत्न केला आहे. ते असे आहेत-
१. भारतातील अनेक गंभीर सामाजिक समस्यांचे मूळ भारताच्या चुकीच्या आर्थिक रचनेत आहे. त्यास कारणीभूत आहे आपली दोषपूर्ण करप्रणाली आणि दुबळी बँकिंग व्यवस्था. त्यामध्ये कोणते बदल केले असता आपल्या अर्थव्यवस्थेपुढील सर्व प्रश्‍न नि:संशयपणे आणि मुळातून सुटू शकतील, याची सूत्रबद्ध मांडणी म्हणजे अर्थक्रांतीचा हा पाच कलमी प्रस्ताव. आनंदी भारतीय समाजासाठी गेले १८ वर्षे अर्थक्रांती त्याची मांडणी करत असून नोटबंदी आणि सर्वांसाठी बँकिंग या दोन बदलांनी त्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. केवळ भारतच नव्हे, तर जगाच्या व्यासपीठांवर मंथन होत असलेला अर्थक्रांतीचा हा मूळ प्रस्ताव.
२. अर्थक्रांतीने बेरोगारीच्या गंभीर प्रश्‍नावर पुरवणी प्रस्तावाची मांडणी केली आहे. रोजगारवाढीसाठी आणि देशाचा आनंदांक वाढण्यासाठी सध्याच्या आठ तासांऐवजी सहा तासांची शिफ्ट असावी, देशातील संघटीत क्षेत्रापासून याची सुरुवात व्हावी, असा हा प्रस्ताव आहे. उपजीविका करतानाचा जो दबाव आणि क्षोभ वाढला आहे, त्यामुळे नागरिकांना दैनंदिन जीवन हे निरस वाटू लागले आहे. दबाव आणि क्षोभातून मुक्ती मिळाल्याशिवाय निखळ आनंद मिळू शकत नाही. या बदलामुळे भारतीयांचा आनंद तर वाढणार आहेच, पण अर्थव्यवस्थेत संघटीत क्षेत्र वाढल्याने समाज एकसंघ होण्यास चालना मिळणार आहे.
३. माणसासाठी अटळ असणार्‍या वृद्धावस्थेचा सन्मान करणारी प्रभावी अशी सामाजिक व्यवस्था असू शकते काय? ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्तीचा दर्जा देणे, असा ज्येष्ठत्वाच्या सन्मानाचा नवा पुरवणी प्रस्ताव अर्थक्रांती देशासमोर ठेवत आहे. कुटुंब आणि कुटुंबाचा आनंद हेच सर्वस्व मानणारा भारतीय तरुण आज – पालकांची दवाई की पाल्यांची पढाई या भावनिक जीवघेण्या संघर्षात अडकला आहे. त्यामुळे आजचे वृद्धत्व केविलवाणे होते आहे. त्याची जागा सन्माननीय ज्येष्ठत्वाला देण्यासाठी या प्रस्तावावर देशव्यापी विस्तृत आणि सखोल मंथन अपेक्षित आहे. (ज्यात पेन्शन न मिळणार्‍या ६० वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगता यावे, यासाठी १० हजार रुपये दरमहा मानधन देण्याची सूत्रबद्ध मांडणी केलेली आहे.)
४. सुदृढ लोकशाहीसाठी राजकारणाचे शुद्धीकरण ही अपरिहार्यता आहे. पण राजकारणाच्या खर्चासाठी सूत्रबद्ध, सर्वमान्य अर्थसंकल्पीय आर्थिक तरतूद केल्याशिवाय ते शक्य आहे काय? अशी तरतूद कशी करता येईल आणि ती का केली पाहिजे, याची मांडणी करणारा अर्थक्रांतीचा हा तिसरा पुरवणी प्रस्ताव. राजकारण बदलल्याशिवाय काहीच बदलणार नाही, असे म्हटले जाते. पण ते बदलायचे असेल तर अर्थक्रांतीच्या या प्रस्तावावर देशात व्यापक मंथन झाले पाहिजे. ज्या राजकारणावर आज देशाची कायदा आणि सुव्यवस्था आणि पर्यायाने भारतीय समाजाचा आनंदांक अवलंबून आहे, त्याच्या शुद्धीकरणाचा मार्ग या प्रस्तावाद्वारे अर्थक्रांतीने देशासमोर ठेवला आहे.

Posted by : | on : 11 Nov 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, यमाजी मालकर, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, यमाजी मालकर, स्तंभलेखक (34 of 1154 articles)


तोरसेकर | राजकारणात अनेकदा आपला तोटा करून घेताना शत्रूला मोठा करणारे धूर्त जगाने बघितले आहेत. किंबहुना धूर्तपणाच्या आहारी गेलेल्या नेत्यांनी ...

×