ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, सोमनाथ देशमाने, स्तंभलेखक » भारत पुन्हा विश्‍वनायक होणारच!

भारत पुन्हा विश्‍वनायक होणारच!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने |

(उत्तरार्ध)

Narendra Modi23

Narendra Modi23

जवाहरलाल नेहरुंनी वामपंथी भाडोत्री इतिहासकारांकडून लिहून घेतलेला इतिहास सुरु होतो मोगलांच्या-पाश्‍चात्यांच्या भारत आगमनापासून, कारण तोच काँग्रेससाठी सोयीचा होता. त्यापूर्वीचा भारतवर्षाचा, हिंदुंचा दैदिप्यमान इतिहास त्यांनी लोकांसमोर येऊच दिला नाही, कारण तो नेहरु घराण्यासाठी गैरसोयीचा होता. मोगलांचे, इंग्रजांचे उदात्तीकरण त्यांना जवळचे वाटले आणि त्यासाठीच त्यांनी हिंदुंची सतत प्रताडना केली, जी त्यांच्या वंशजांकडून आजतागायत सुरु आहे. देशाची फाळणी? काश्मीर समस्या? हा नेहरुशाहीचा वारसा आहे. नेहरुंनी बिघडवलेली परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी देशाचा दैदिप्यमान वारसा घराघरात पोहचवला पाहिजे मोदीजी! आमच्या संपन्न ज्ञानभांडाराची चावी आहे संस्कृत! शालेय स्तरापासून ते महाविद्यालयीन स्तरापर्यंत ती अनिवार्य केली पाहिजे. वेद काय म्हणतात ते समजून घ्यायचे असेल, तर आम्हाला मॅक्समुल्लर वाचावा लागतो! कारण आम्हाला संस्कृत येतच नाही! वेदविज्ञानाचा अभ्यास, त्यावर संशोधन करण्यासाठी नालंदा, तक्षशिलाच्या धर्तीवर खास भारतीय विद्यापीठं स्थापन केली पाहिजेत, तेव्हाच नोबेल पारितोषिकं भारताकडे धावत येतील! काय नाही हो आमच्या ज्ञानभांडारात? घरात कामधेनू असताना, आंबट ताक मागायला आम्ही दुसर्‍याच्या दारात का जात आहोत? कारण, आमच्या दारी कामधेनू आहे, हेच विसरुन गेलो आहोत!
जवाहरलालपासून सोनियालालपर्यंत एका गोष्टीचं टिकून असलेलं काँग्रेसी सातत्य वाखाणण्यासारखं आहे, हिंदूद्रोह! वामपंथी, जिहादी आणि मिशनरीज हे तर हिंदुंच्या जीवावरच उठले आहेत आणि काँग्रेस हिंदुंची प्रतारणा करण्यात नेहमीच आघाडीवर असते! नसलेला हिंदू आतंकवाद, हिंदू अतिरेकी या कल्पना चितारणारे कुटील कारस्थान अंगलट आल्यानंतर काँग्रेसने हिंदुंमध्ये फूट पाडण्यासाठी आता तशीच चिखलफेक संघावर करायला सुरुवात केली आहे. एकीकडे जागतिक व्यासपीठांवर जाऊन सत्वशील, सहिष्णू हिंदुंची तुलना मुस्लीम ब्रदरहुडशी करायची आणि दुसरीकडे कैलास मानससरोवर तीर्थयात्रा करायची? सध्याच्या इंधन समस्येला आपल्याच सरकारची दहा वर्षाची दिवाळखोर राजवट कारणीभूत असताना अलिबाबा आणि चाळीस चोर भारत बंद पुकारुन सार्वजनिक मालमत्तेची निर्लज्यपणे राखरांगोळी करतात? कशासाठी? सुस्थितीत आलेली देशाची तिजोरी ताब्यात घेण्यासाठी? काँग्रेस पक्षातील, संपुआ सरकारमधील उच्चपदस्थांनी दिलेल्या तोंडी आदेशांवरुन सार्वजनिक बँकांनी अंधाधुंद कर्जवाटप कसे केले आणि त्यामुळे अनुत्पादक कर्जांचा, एनपीएचा डोंगर कसा वाढत गेला, याचे स्पष्टीकरण रिझर्व बँकेच्या माजी गव्हर्नरांनी नुकतेच केले आहे. तरीही मांसभक्षी लांडगे शाकाहारावर प्रवचनं देत फिरत आहेत? सोनिया, राहुलसह काँग्रेसची डझनभर वरिष्ठ मंडळी जामीनावर आहेत! पूर्वी एखाद्याच्या साध्या चौकशीसाठी पोलीस गल्लीत येऊन गेले, तरी सार्‍या गावाला मेल्याहून मेल्यासारखे होत असे! आज आरोपपत्र दाखल झालेले, जामीन मिळालेले, सजा भोगत असलेले भणंग निर्लज्यपणे नीतिमत्तेवर व्याख्यानं झोडत फिरताहेत? हजारो लाचार हात टाळ्या पिटताहेत? सत्यवचनी राजा हरीश्‍चंद्राच्या स्वतंत्र भारताची एवढी नैतिक अधोगती कशी झाली? आम्ही संस्कृतला दुरावलो आणि आमची अधोगती सुरु झाली! राजा हरीश्‍चंद्राची अनुकरणीय कहानी आम्ही आमच्या लेकरांपर्यंत येऊच दिली नाही मोदीजी! आर्यभट्ट, चरक, पाणिणी, पतंजली, वेदव्यास, वाल्मिकी हा देशाचा अमूल्य वारसा नाही का? प्रभु रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण हा देशाचा महान क्षत्रीय वारसा नाही का? राजा भरत, सम्राट चंद्रगुप्त, चक्रवर्ती राजा अशोक, राजा पुलकेशी … हा आमचा आदर्श राज्यकारभाराचा वारसा नाही का? हा वारसा स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या तरुणाईसमोर कधी येऊच दिला नाही! नेहरुंनी कार्ल मार्क्स घरोघरी पोहचवला, परंतु आचार्य चाणक्य यांना परसदारीही जागा दिली नाही! अशा परिस्थितीत चक्रवर्ती सम्राट चंद्रगुप्त मौर्य कसा निर्माण होणार? कोण घडवणार?
राम-रावण युध्दात राक्षस मारले गेले, पण शूर्पनखेची वंशावळ शाबूत राहिली. पुतना मावशीला श्रीकृष्णाकडून मोक्ष मिळाला, पण तिची पिलावळ आजही मिठ्या मारत फिरत असते. महाभारत युध्दात कौरव मारले गेले, पण अतृप्तात्मा अश्‍वत्थामा घराघरांत अशांती पेरतोच आहे. पृथ्वीराज चौहानला पकडून देणार्‍या जयचंद राठोडला मोहम्मद घोरीने कंठस्नान घातले, पण हजारो जयचंदी अवलादी आजही पृथ्वीराज चौहानच्या शोधात फिरताहेत.
मोदीजी, जगातल्या पहिल्या तीन प्रभावशाली नेत्यांमध्ये आपली गणना होत आहे! हा एकट्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौरव नसून, करोडो भारतीयांचा गौरव आहे! असे असले तरी, आम्हाला हवे आहेत, ते मोदीजी अजून दिसलेच नाहीत! मेरे सव्वा सौ करोड देशवासीयों… हे राजकीय परिभाषेत ठीक आहे हो, पण त्याच सव्वाशे कोटीतले, भर रस्त्यावर गायबछडे कापून मेजवान्या झोडणारे काही केरळीय भामटे, अरब अमिरातीने जाहीर न केलेल्या मदतीबद्दल आभार, अभिनंदनाचे लाल-हिरवे फलक लावतात आणि जिवाची पर्वा न करता पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी अहोरात्र काम करत असलेल्या हजारो संघ स्वयंसेवकांचे साधे आभार मानायलाही नकार देतात? दोन ओवैसी बंधु शंभर कोटी हिंदुंना कापून काढायची जाहीर धमकी देतात? तेव्हा हिंदुंनी काय करायचे? आमच्याही धमन्यातले रक्त खवळते हो मोदीजी, पण आमच्या त्याच रक्तातली हिंदू सहिष्णुता आम्हाला पुनःपुन्हा शांत करीत असते! हा कोंडमारा आम्ही, आमच्याच मायभूमीत आणखी किती दिवस सहन करायचा मोदीजी? आपले सरकार गोरक्षकांवर कठोर कारवाई करते, पण यांच्यावर, यांच्या आँका-फादर-कॉम्रेडवर मात्र कुठलीच कारवाई होत नाही? भारत तेरे टुकडे होंगे। भारत की बरबादी तक, जंग चलेगी। या घोषणा राज्यघटनेप्रमाणे देशद्रोही नसतीलही, पण मग त्या पुन्हा प्रत्यक्षात यायची वाट बघायची का? भारत की बरबादी तक, जंग चलेगी। ही माझ्या भारतमातेला दिलेली खुनाची धमकी नाही का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शंका जरी आली असती, तरी यांच्यासाठी त्यांनी मृत्यूदंडाची तरतूद केली असती! आता तरी राष्ट्रद्रोहाची सुस्पष्ट वैधानिक व्याख्या करायला नको का? त्या पाच तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करायच्या आधीच न्यायालये त्यांच्या मदतीला धाऊन गेली, पण कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह वर्षानुवर्षे कोठडीत नरकयातना भोगत असताना त्यांच्याविरुध्द खटले का उभे राहिले नाहीत, याची दखलही घेतली गेली नाही! याकुब मेमनच्या शिक्षेवर राष्ट्रपतींनी शिक्कामोर्तब केल्यानंतरही सर्वोच्च न्यायालय मध्यरात्री आपली दारं उघडते, एखाद्या चित्रपटाविरुध्द याचिका दाखल झाली, तर निर्मात्याचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून तातडीने सुनावणी घेते, समलैंगिकांना न्याय देण्यासाठी आम्ही सरकारच्या निर्णयाची आणखी वाट पाहु शकत नाही म्हणते, मग राममंदीर खटला, रोहिंग्या निष्कासन, कलम ३५-अ, ३७०, समान नागरी कायदा यावर निर्णय देण्यासाठी न्यायालय कशाची वाट बघत आहे?
वनवासी, वंचितांसाठी आम्ही काम करतो, अशा बढाया वामपंथी मारत असतात आणि ख्रिश्‍चन मिशनरीज मंडळी शिक्षणाच्या, मानवसेवेच्या नावाखाली याच घटकांच्या धर्मांतरणाचा व्यवसाय करतात! यांची मिलीभगत असल्याशिवाय हे शक्य आहे का? आमची काही मंडळी विदेशींनी फेकलेली उष्टी हाडकं चघळत, त्यांच्या देश पोखरुन काढणार्या कार्याचं कौतुक करतात, भंपक सेक्युलर सरकारं त्यांना पुरस्कार देतात! नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान असताना, यांची धुडगूस घालायची हिंमत कशी होते?
मोदीजी, जरा त्या चीनकडे बघा! भारतातल्या नक्षली, जिहादी मानसिकतेच्या कम्युनिस्टांपेक्षा चीनी कम्युनिस्टांची राष्ट्रभक्ती हिंदुंना अधिक जवळची वाटते! प्राचीन चीनी परंपरा, सभ्यता, संस्कृती आणि बौध्द धर्म यांच्या जीवावर नाही उठले ते, तर त्यांनी इस्लाम, चर्च, कम्युनिझम यांनाच राष्ट्रहितार्थ वाकविले! आपल्या जाहीर भाषणादरम्यान भोंग्यावरुन अजान सुरु झाली, म्हणून आपण भाषण थांबवले मोदीजी! खरं म्हणजे आपल्या भाषणादरम्यान त्यांनी भोंग्यावरुन बांग द्यायला नको होती! आपण थांबलात, हा आपला सुसंस्कृतपणा झाला! त्याला सकारात्मक प्रतिसाद देत, त्यांनी भोंग्यावरील अजान कायमच्या बंद करायला हव्या होत्या! चीनमध्ये अशा अजानला परवानगी नाही, आणि असतीच तर त्यांनी भाषण न थांबवता, भोंग्यांचा आवाज कायमचा बंद केला असता! म्हणून माओ त्से तुंग चीनचा राष्ट्रनायक झाला! भारतीय कम्युनिस्ट माओचे नाव बदनाम करत आहेत. जगभर गेलेला कम्युनिझम तिथेच रुजला, जिथे त्याने तिथल्या मातीशी इमान राखले! चीनमध्ये देशाच्या ध्येयधोरणांविरुध्द फाजील हट्ट करणार्‍या विद्यार्थ्यांवर रणगाडे घातले गेले! इथे विद्यापीठांमधून देशद्रोही गरळ ओकणारे घोडविद्यार्थी एका रात्रीत महान विचारवंत झाले आणि देशभर आगी लावत फिरत आहेत! कुणाला ना लाज, ना शरम, ना चीड! सांस्कृतिकदृष्ट्या कम्युनिस्ट चीन हे खर्‍या अर्थाने हिंदुराष्ट्र आहे आणि शी झिनपिंग हे राष्ट्रनायक आहेत! चीनमध्ये कुणाच्याही धार्मिक भावना, अभिव्यक्तीस्वातंत्र्य वगैरे राष्ट्रहिताच्या आड आले, की तो संपला! चीन ज्या सफाईने मिशनरी, जिहादींचा आदरसत्कार करीत आहे, तो मार्ग अनुकरणीय आहे. आमचा पंतप्रधान जगभर बदनाम झाला तरी चालेल, पण तो आमचा राष्ट्रनायक असला पाहिजे! जग काय म्हणेल? जगात बदनामी होईल? याचा विचार करणारा नेता, त्याच्या देशाचा राष्ट्रनायक होऊच शकत नाही! इस्त्रायलचा प्रत्येक पंतप्रधान भलेही जगात बदनाम झाला असेल, पण तो यहुद्यांचा राष्ट्रनायक बनला!
सीतामातेचा शोध घ्यायला गेलेल्या हनुमंताने लंका जाळली, म्हणून रामरायांनी त्याला झापले नाही? उलट त्याचा जाहीर सत्कार केला आणि त्यामुळे रामसेनेच्या अंगात वीरश्री संचरली! कर्णाच्या रथाचे चाक जमिनीत रुतले, म्हणून तो खाली उतरला, अर्जुनही थांबला! तेव्हा श्रीकृष्ण, शाब्बास पार्थ, असं नाही म्हणाले? तर अरे बघतोस काय? कर त्याचं शीर धडावेगळं? असा धर्मादेश दिला! टिनपाट कार्टी आमच्या सुरक्षादलांवर दगडफेक करतात, त्यांच्या डोक्यावर टपल्या मारतात आणि आमचा बहादूर जवान त्यांच्या कानाखाली जाळही करु शकत नाही? भारताच्या कुठल्या प्रतिष्ठेचा संदेश जात असेल जगात? मेजर गोगोई चूक की बरोबर, आम्हाला माहीत नाही, पण त्याच्यामुळे आमची मान क्षणभर ताठ झाली! श्रीराम, श्रीकृष्ण, श्रीमारुतीराया आमचे आदर्श आहेत ना? श्रीमद्भगवद्गीता आमचे युध्दशास्त्र आहे ना? छत्रपती शिवराय, महाराणा प्रताप आमचे राष्ट्रनायक आहेत ना? मग आम्ही मार का खातोय? आम्ही भारताचे मानचित्र आजतागायत पूर्ववत का करु शकलो नाही? आम्हाला आधुनिक आचार्य चाणक्य आणि सम्राट चंद्रगुप्त मौर्य हवे आहेत! भरतभूमीला भौगोलिक, सांस्कृतिक, आर्थिक गतवैभव प्राप्त करुन देणारा राष्ट्रनायक हवा आहे आणि तो आम्हाला आपल्यात दिसतोय मोदीजी! पाकिस्तान कधीच मित्र होऊ शकत नाही, कारण त्याचा जन्मच हिंदुद्वेषातून झाला आहे! हिंदुंविषयी आपुलकी असलेल्या बौध्द चीनची हिंदू भारताशी घनिष्ठ मैत्री होऊ शकते, मोदीजी! कुणाचाही मुलाहिजा न ठेवता लोकसंख्या नियंत्रण कसे करावे, ते चीनकडून शिकले पाहिजे!
कम्युनिस्ट प्रायोजित नक्षलवाद, मिशनरीज प्रायोजित धर्मांतरण आणि वहाबी जिहादी मानसिकता, या भारतासमोरच्या गंभीर समस्या आहेत. कलाक्षेत्रापासून विधीव्यवस्थेपर्यंत बहुतेक क्षेत्रात यांनी त्यांचे हस्तक पेरले आहेत. प्रसारमाध्यमं आणि मानवाधिकार आयोग आहेतच यांच्या दिमतीला! परवापर्यंत सत्ताधार्‍यांच्या कृपाप्रसादाने यांची कामं बिनबोभाट सुरु होती, पण आपण सत्तेवर आल्यापासून यांच्या नाड्या आवळायला सुरुवात झाली, म्हणून हे आता आपल्याच जीवावर उठले आहेत, मोदी हटाव! गंमत म्हणजे भारताबाहेर हाडवैरी असलेल्या कम्युनिस्ट, ख्रिश्‍चन आणि इस्लाम यांची भारतात मात्र जीवश्‍चकंठश्‍च मैत्री आहे! कारण यांचे उध्दिष्ठ एकच आहे, सनातन भारत संपविणे! हिंदू कमकुवत केला, की देश तुटला! म्हणून प्रहार हिंदुंवर! त्यासाठी यांना दारुगोळा बाहेरुन आणावा लागत नाही, तो भारतातच ठासून भरलेला आहे. काडीपेटी असली की झालं! परधर्मियांविषयी कमालीचा हळवा असलेला हिंदू, जात-पंथ-भाषा यावरुन पेटवला, की आपल्याच बांधवांना गाडायची भाषा करतो!
ख्रिश्‍चनांना सार्‍या जगावर राज्य करायचे आहे आणि मुसलमानांना सारे जग इस्लाममय करायचे आहे! ईसाई जगत हे इस्लामिक जगताकडे असलेला प्राणवायू, म्हणजे खनिज तेलाचा साठा संपण्याची, संपविण्याची किंवा त्याला समर्थ पर्याय सापडण्याची वाट बघत आहे, तर इतर कशाचाही विचार न करता इस्लामिक जगत पॅन इस्लामच्या धर्मवेडाने झपाटले आहे! जिथे इस्लाम घुसला, तो देश संपला किंवा आक्रसला! जिथे इस्लाम आणि ख्रिश्‍चन मिशनरीज पोहचले, तिथे हा वेग अधिक असतो. अशा परिस्थितीत आपण काय करायला पाहिजे मोदीजी? देश आणि धर्मासाठी आक्रमक व्हायला पाहिजे! राष्ट्रचेतना, धर्मचेतना जागृत केली पाहिजे! भारताचे प्रशासन ज्या शापित, हॉन्टिंग वास्तूंमधून चालते त्यासह गुलामगिरीची सर्व प्रतिकं नेस्तनाबूत करायला हवीत! हिंदूजनसागराच्या उत्स्फूर्त आविष्कारातून बाबरी कलंक पुसला गेला, तेव्हा देशभर चैतन्याच्या लाटा उसळल्या होत्या! पण हिंदू पुन्हा मलूल झाले आहेत. एक कवी म्हणतो,
उखड़े उखड़े क्यों हो वृक्ष, सूख जाओगे।
जितनी गहरी जड़े तुम्हारी, उतने ही तुम हरियाओगे।
भोले शंकर कैलास पर्वतावर निवास करतात, असं हिंदू नुसतं म्हणतात आणि पाश्‍चात्य संशोधक त्याची खात्री करुन घेत आहेत! त्यांनी शोध लावला, की कुणी तरी म्हणणार, हे आमच्या ग्रंथात सांगितलंय! अरे, मग इतके दिवस तू काय झोपला होतास का? तिकडून काय येतय, याची वाट बघत बसलेल्यांकडून आपल्या पोतडीत काय आहे, याचा विसर पडणारच ना? तिकडून आलेल्या लोकांनी हिंदुंची वाट लावली, तरी आम्ही डोळे उघडायला तयार नाही आणि आम्ही डोळे उघडू नयेत म्हणून नेहरु खानदान आजतागायत प्रयत्नरत आहे. आम्हीच आमची जिज्ञासा मारुन टाकली आहे, आम्हीच आमची ओळख विसरलो आहोत! म्हणून तर आचार्य महाप्रज्ञ म्हणतात,
मी तेरा पंथी आहे, कारण मी स्थानकवासी जैन आहे;
मी स्थानकवासी जैन आहे, कारण मी श्‍वेतांबर जैन आहे;
मी श्‍वेतांबर जैन आहे, कारण मी जैन आहे;
मी जैन आहे, कारण मी हिंदू आहे!
उपासनापध्दती कुठलीही असली, तरी भारतमातेचा प्रत्येक सुपूत्र हिंदू आहे! भावनिक, मानसिक, सांस्कृतिकदृष्ट्या एकच नाळ असलेले जगभरातले हिंदू, बौध्द आणि यहुदी जर एकत्र आले, तर पूर्व दिशा सोनेरी प्रकाशाने उजळून निघेल आणि जगातला अंधार नाहीसा होईल! या सार्‍यांना एकत्र आणणार्‍या राष्ट्रनायकाचा देश आपोआप विश्‍वनायक होईल आणि आम्हाला तो भारतात दिसतोय मोदीजी! आपण राष्ट्रनायक आणि भारत विश्‍वनायक होऊ नये, हीच तर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय भारतविरोधकांची औरंगी व्यूहरचना आहे! त्यांचे श्राध्द आम्हालाच घालावे लागेल, कारण भारत पुन्हा विश्‍वनायक झालेला आम्हाला बघायचा आहे! बोला, हर हर महादेव!

Posted by : | on : 30 Sep 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, सोमनाथ देशमाने, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, सोमनाथ देशमाने, स्तंभलेखक (383 of 1224 articles)

Vishwa Hindu Sammelan
विशेष : डॉ. राम वैद्य, सह संयोजक, हिंदू स्वयंसेवक संघ | स्वामी विज्ञानानंद विश्‍व हिंदू परिषदेचे विदेशातील काम बघतात. जगभर ...

×