ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, सोमनाथ देशमाने, स्तंभलेखक » भारत पुन्हा विश्‍वनायक होणारच!

भारत पुन्हा विश्‍वनायक होणारच!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने |

बॉम्बवर्षावात बेचिराख झालेला जपान राखेतून उठून ताठ मानेने उभा राहिला, कारण जपानी माणूस, देश मला काय देतो, याचा विचार न करता, मी देशाला काय देऊ शकतो, याचा विचार करतो! म्हणूनच हक्काची रजा घेतानाही तो चारदा विचार करतो, मी रजेवर गेल्यामुळे माझ्या देशाचं विकासचक्र मंदावणार तर नाही ना? दोष लोकांचा नाही हो, मोदीजी! त्यागाला सर्वोच्च स्थान असलेला आमचा महान वारसा नजरेआड करुन भाटांनी रचलेली विदेशी आक्रमकांची कवनं आमच्या माथी मारली गेली आणि पुरोगामित्वाच्या, भंपक सेक्युलॅरिझमच्या नावाखाली आम्ही तोच आमचा वारसा समजून बसलो. नेहरुयुगाची हीच तर देणगी आहे!

Pm Modi Bharat

Pm Modi Bharat

(पूर्वार्ध)
आदरणीय मोदीजी, सविनय प्रणाम!
सज्जनांना सुखावणारी, दुर्जनांना दुखावणारी आपली पंतप्रधानकीची पहिली कारकीर्द शेवटच्या टप्प्यात पोहचली आहे. आपल्या सरकारची पारदर्शकता, प्रामाणिकता आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार वाखाणण्यासारखा आहे. त्यानिमित्त हा पत्रप्रपंच!
१. संपुआ सरकारचा १० वर्षाचा धोरणलकवा आणि आघाडी सरकारचा १५ वर्षाचा सावळागोंधळ, या पार्श्‍वभूमीवर आपण आणि आपले पट्टशिष्य देवेंद्र, यांनी सत्तासूत्रं हाती घेतली! निसर्गचक्राची अवकृपा झाली. लातुर शहराला रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागला. पण न डगमगता, खचून न जाता महाराष्ट्राच्या तरुण, तडफदार आणि तितक्याच शालीन मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवारसारख्या भूपृष्ठ आणि भूपृष्ठाखालील पाणीसाठ्यात आश्‍चर्यकारक वाढ करणार्‍या काही भन्नाट योजना लोकसहभागातून राबविल्या!
२. संपुआ सरकार इराणचे ६.५० बिलियन डॉलर तेलकर्ज, मोदी सरकारच्या डोक्यावर ठेऊन गेले आहे. ६० दिवसात थकबाकी अदा करा, म्हणून इराण सरकार हात धुऊन मोदी सरकारच्या मागे लागले होते! कूटनैतिक कौशल्य वापरुन मोदी सरकारने हा प्रश्‍न हाताळला आणि आंतरराष्ट्रीय बाजारात भारताची पत खराब होऊ न देता कर्ज फेडत आणले! घोटाळेबाज संपुआचे तेलकर्ज फेडण्यासाठी सामान्य जनता वाढीव दराचा भार सहन करत आहे!
३. संपुआ सरकारच्या काळात स्टेशनांवर पिण्याचे एक लिटर पाणी २०-२५ रुपयाला मिळायचे, आज ते ५ रुपये लिटर मिळते!
४. संपुआ सरकारच्या काळात घरगुती गॅस सिलेंडरसाठी भल्या पहाटे उठून वितरकांच्या दुकानांसमोर तासनतास थांबावे लागत असे! सिलेंडर मिळेलच याची शाश्‍वती नसायची! आज ज्याला हवे तेव्हा गॅस सिलेंडर घरपोच पाठविले जाते!
५. दुबळ्या संपुआ सरकारच्या काळात चीनी ड्रॅगन भारतावर सतत गुरगुरत असे! आज खंबीर मोदी सरकार त्याला त्याच्याच भाषेत धमकावत आहे!
६. संपुआ सरकारच्या काळात हिंदुद्वेष्टे भंपक सेक्युलर नेते कब्र और मज़ार जाते थे, मथ्था टेकने के लिये! आज ते मठमंदीरांचे उंबरठे झिजवत आहेत! सीताराम येचुरी डोक्यावर मंगलकलश घेऊन हिंदुंच्या मिरवणुकीत सामील होत आहेत! ममता बेगम जन्माष्टमी साजरी करीत आहेत! अखिलेश यादव विष्णूमंदीर बांधायचा संकल्प करत आहेत! राहुल गांधी कैलास मानससरोवर यात्रेला निघाले आहेत!
७. संपुआ सरकार जागतिक बँकेसह मिळेल तिथून कर्ज काढत होते! मोदी सरकारने एक छदामही कुणाकडून कर्ज घेतले नाही! उलट संपुआ सरकारचे कर्ज मोदी सरकार फेडत आहे!
८. दुरस्थ नियंत्रकाद्वारे संचलित संपुआ सरकारच्या काळात गृहकर्जाचा व्याजदर १३% होता! आज चहावाला पंतप्रधान असलेल्या रालोआ सरकारच्या काळात तो ८.३०% इतका खाली आला आहे!
९. संपुआच्या काळात पाकिस्तानी पंतप्रधान भारतीय पंतप्रधानांना देहाती औरत म्हणाले होते! आज तिथले पंतप्रधान, मी नरेंद्र मोदींसारखं काम करीन, असं आश्‍वासन देऊन निवडून आले आहेत!
१०. संपुआ सरकारच्या काळात उघडे मैदान हेच सार्वजनिक शौचालय असायचे! रालोआ सरकारच्या स्वच्छ भारत अभियान प्रेरणेतून घरोघरी टुमदार शौचालये बांधली जात आहेत!
११. संपुआच्या राज्यात चुलीवर स्वयंपाक करणार्‍या ८ कोटी घरांमध्ये, मोदी सरकारने उज्वला योजनेअंतर्गत मोफत गॅस जोडणी दिली आहे!
१२. संपुआ सरकारच्या काळात धोकादायक अवस्थेत जीवन जगणारी १ कोटी बेघर कुटुंबं, मोदी सरकारने बांधून दिलेल्या छोट्याशा टुमदार घरात रहायला गेली आहेत! २०२२ पर्यंत प्रत्येक बेघराला घर द्यायचा संकल्प आहे!
१३. संपुआ सरकारच्या काळात जुनी कर्जफेड न करता, नवीन कर्ज काढणार्‍या २१०० कंपन्यांनी, मोदी सरकारच्या दिवाळखोरी कायद्याच्या दट्यामुळे ८३००० कोटी रुपये कर्जफेड केली आहे! ७.५ लाख कोटी एनपीए वसुलीची प्रक्रिया सुरु आहे!
१४. संपुआच्या शेवटच्या तीन वर्षात १४८७९ किमी रस्तेबांधणी कार्यादेश देण्यात आले होते, रालोआच्या सुरुवातीच्या तीन वर्षात ३४००० किमी रस्तेबांधणी कार्यादेश देण्यात आले आहेत! संपुआ सरकार प्रतिदिनी १० किमी रस्तेबांधणी करत होते, तर रालोआ सरकार दररोज १७ किमी! देशाच्या १२ प्रमुख बंदरांमधून संपुआ काळात ७४५ मिलियन टन मालवाहतूक होत होती, रालोआ काळात ती १०६५ मिलियन टनांवर पोहचली! १११ राष्ट्रीय जलमार्गांचा विकास केला जात आहे! नदीजोड प्रकल्पावर काम सुरु आहे!
१५. जो एलईडी बल्ब संपुआ सरकारच्या काळात ३५० रुपयाला मिळायचा, तो आता मोदी सरकारच्या काळात केवळ ५० रुपयात मिळतो! जवळपास ९० कोटी एलईडी बल्ब वितरीत करण्यात आले आहेत. पूर्वीचे अधिक ऊर्जा खाणारे पथदिवे बदलून त्याठिकाणी एलईडी बल्ब लावल्यामुळे २०,००० मेगावॅट वीज बचत होत आहे. त्यातूनच कृषीपंपांना २४ तास वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे! प्रत्येक गाव, घर आणि वावर सौरऊर्जा आत्मनिर्भर करायचे उध्दिष्ठ आहे, स्वातंत्र्यानंतर प्रथमच १८ हजार गावांमध्ये वीज पोहचली आहे!
१६. केंद्र सरकारच्या जनआरोग्य मिशनखाली राबविण्यात येत असलेल्या आयुषमान भारत योजनेअंतर्गत राष्ट्रीय स्वास्थ्य बिमा योजना आणि जेष्ठ नागरिक आरोग्य बिमा योजना कार्यान्वित आहेत. १,५०,००० आरोग्य सुविधा केंद्र स्थापित करण्यात येणार आहेत. १० कोटी कुटुंबांना ५ लाखांपर्यंत औषधोपचार सुविधा पुरविली जाणार आहे.
१७. सोलर चक्र मिशन योजनेअंतर्गत हजारो कारागीरांना रोजगार मिळणार आहे. ५५० कोटी रुपये सबसिडी देण्यात येणार आहे. ४०० ते २००० कारागीरांचा एक याप्रमाणे देशभर ५० समुह निश्‍चित केले गेले आहेत.
१८. देशातल्या १०१ मागास जिल्ह्यांचा कायापालट करण्यासाठी ट्रान्स्फॉरमेशन ऑफ अस्पायरेशनल डिस्ट्रिक्ट्स योजना नीती आयोग राबवत आहे.
१९. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेचा विस्तार करुन राष्ट्रीय पोषण अभियान सुरु करण्यात आले आहे. ६ वर्षाखालील बालकं, पौगंडावस्थेतील कुमारीका, गरोदर महिला, स्तनपान करणार्‍या माता, रक्तक्षयी बालकं, कुमारीका आणि महिला यांची संपूर्ण काळजी घेतली जात आहे.
२०. नशामुक्ती अभियानाचा विस्तार केला गेला आहे. त्यासाठी २१ कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे. ड्रग तस्करीला प्रभावीपणे आळा घातला जात आहे.
२१. गोबर धन योजना ही स्वच्छ भारत अभियानाच्या पुढाकारातून ग्रामीण भागातील पशूधनाच्या मलमूत्रापासून शेणखत आणि जैविक वायू निर्मितीला चालना देत आहे.
२२. हरित क्रांती कृषोन्नती योजनेअंतर्गत वेगवेगळ्या ११ योजना आणि सेवाकार्ये एकत्र करण्यात आली आहेत. शेती आणि शेतीपूरक घटकांचा समग्र विकास हा या योजनेचा उद्देश आहे.
२३. अटल भूजल योजना ही केंद्र सरकारची ६००० कोटी रुपयांची महत्वाकांक्षी योजना भूपृष्ठ आणि भूपृष्ठाखालील जलसाठ्यात वाढ करणे, त्यांचे संवर्धन करणे यासाठी कार्यान्वित करण्यात आली आहे.
२४. राष्ट्रीय बांबु मिशन: मोदी सरकारने बांबुची वर्गवारी बदलल्यामुळे बांबु उत्पादनासाठी आता परवानगीची गरज नाही. प्रत्येक शेतकर्‍याने बांधांवर, परसदारी निरंतर उत्पन्न देणारी बांबु लागवड करावी म्हणून मोदी सरकार प्रोत्साहन देत आहे. या आणि अशा मार्गांनी शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट होणार आहे, पारंपारिक एकरी उत्पन्न दुप्पट होणार नाही! देशात अगरबत्यांसाठी लागणार्‍या बांबुची आपल्याला चीन वगैरे देशांकडून आयात करावी लागते!
२५. स्टार्ट अप योजनेअंतर्गत ४ कोटी तरुणाईला कमी व्याजदराने कर्ज देऊन उद्योग-व्यवसाय सुरु करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
२६. प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत ६ कोटी तरुणाईला प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
२७. मुद्रा बँक योजनेअंतर्गत जवळपास १२ कोटी लोकांना आपला उद्योगधंदा सुरु करण्यासाठी-वाढविण्यासाठी ५ लाख कोटी कर्ज देण्यात आले आहे. काम मागणारे हात कमी करुन काम देणारे हात वाढविण्यावर मोदी सरकारचा भर आहे.
२८. मेक इन इंडिया योजनेअंतर्गत २० मोठ्या कंपन्यांनी उत्पादन करण्यास सुरुवात केली आहे. हजारो कुशल हातांना रोजगार मिळाला आहे.
२९. गरजुंना किफायतशीर किमतीत औषधं सहज उपलब्ध व्हावीत म्हणून देशभर जवळपास ५००० प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र उघडली गेली आहेत. हृदयशस्त्रक्रियेसाठी लागणारी स्टेंट पूर्वी ३ लाखाला मिळायची, आता फक्त २९ हजारात उपलब्ध आहे.
३०. जवानांसाठी समान श्रेणी, समान निवृत्ती वेतन योजना लागु केली आहे आणि किसानांसाठी कृषीमालाला दीडपट हमी भावाची घोषणा करण्यात आली आहे!
३१. थलसेना, वायुसेना आणि आरमार यांच्यासाठी लागणार्‍या अत्याधुनिक आयुधांची फार मोठ्या प्रमाणावर निर्मिती, खरेदी केली जात आहे! स्वतंत्र भारत प्रथमच बचावात्मक भूमिकेतून आक्रमक मानसिकतेकडे वेगाने वाटचाल करत आहे!
मोदींना शांतता मिळाली, तर तिचा उपयोग ते युध्द तयारीसाठी करतील, म्हणून आंतरराष्ट्रीय विरोधक आणि मोदींच्या लोकप्रियतेमुळे अस्तित्व पणाला लागलेले देशांतर्गत विरोधक, यांच्याकडून सतत अशांतता माजविली जात आहे!
आमच्या भरवशावर राहु नका मोदीजी! महाबिलंदर आहोत आम्ही! पेट्रोल-कांदे-बटाटे महागले, म्हणून भाजपा सरकारं हाकलून दिली आम्ही! गुलामगिरीचे प्रतिक असलेला बाबरी सांगाडा माझ्या रामभक्तांनी जमीनदोस्त केला, म्हणून उत्तर प्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी बाणेदारपणे सत्तात्याग केला, तरीही त्यांचा पराभव करुन कारसेवकांवर गोळ्या झाडणार्‍या मुलायम सिंगांना निवडून दिले आम्ही! कारगिल युध्दात विजय मिळवणारे, जगाच्या दबावाला भीक न घालता अणुचाचणी यशस्वी करणारे, देशाच्या तिजोरीत भर घालणारे अटल सरकार आम्ही घालवले आणि आम्हीच सलग दोनदा निवडून दिलेल्या सरकारने त्या तिजोरीची वाट लावली. आम्ही, विशेषतः हिंदू, असं आत्मघातकी का वागतो? संपुआकडून मिळालेली रिकामी तिजोरी मोदी सरकारने पुन्हा काठोकाठ भरत आणली आहे! करायची का पुन्हा रिकामी? मोदी सरकारच्या कार्यकाळात राममंदीर बांधकामास सुरुवात झाली नाही म्हणून, ज्यांना रामाचे अस्तित्वच मान्य नाही, त्यांच्याकडे पुन्हा राज्यकारभार सोपवायचा का? मोदीजी सव्वाशे कोटी भारतीयांना प्रेमाच्या धाग्यात बांधायचा आटोकाट प्रयत्न करत आहेत, तर तिकडे डझनभर शिलेदार पंतप्रधान होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. त्यात नेहरु खानदान का चिराग भी है जी!
गेल्या काही दिवसांपासून महागाई वाढली, पेट्रोल-डिझेल महागले, आरक्षण मिळाले नाही, कर्जमाफी झाली नाही, अशी रुदाली ओरड होत आहे! राहुल गांधी आणि त्यांची काँग्रेस आम्हाला सगळं काही फुकट देईल, असे त्यांना वाटत असावे, पण देशाची तिजोरी सुरक्षित राहील का? देशाच्या सीमा सुरक्षित राहतील का? याचा विचार कुणी करायचा? देशाच्या हितासाठी, विकासासाठी आणि स्वाभिमानासाठी मी काही कठोर निर्णय घेईन, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०१४ सालीच सांगितले होते ना? पंतप्रधान मोदी, त्यांचे मंत्रीमंडळातले सहकारी आणि प्रशासकीय कर्मचारी-अधिकारी यांनी जीवाचे रान करायचे आणि आम्ही मात्र सगळं कसं स्वस्त, फुकट, सहजगत्या मिळाले पाहिजे, अशी अपेक्षा करणार? आम्हीही आमच्या अनावश्यक खर्चाला आळा घालून सहकार्य करायला नको का? देशहितासाठी काही दिवस तोशीस सोसायची सुद्धा आमची तयारी नाही? बॉम्बवर्षावात बेचिराख झालेला जपान राखेतून उठून ताठ मानेने उभा राहिला, कारण जपानी माणूस, देश मला काय देतो, याचा विचार न करता, मी देशाला काय देऊ शकतो, याचा विचार करतो! म्हणूनच हक्काची रजा घेतानाही तो चारदा विचार करतो, मी रजेवर गेल्यामुळे माझ्या देशाचं विकासचक्र मंदावणार तर नाही ना? दोष लोकांचा नाही हो, मोदीजी! त्यागाला सर्वोच्च स्थान असलेला आमचा महान वारसा नजरेआड करुन भाटांनी रचलेली विदेशी आक्रमकांची कवनं आमच्या माथी मारली गेली आणि पुरोगामित्वाच्या, भंपक सेक्युलॅरिझमच्या नावाखाली आम्ही तोच आमचा वारसा समजून बसलो. नेहरुयुगाची हीच तर देणगी आहे!
विदेशी, विधर्मी आक्रमणांच्यापूर्वी देशाला गौरवशाली इतिहास नव्हताच का? भारतात संपन्न कार्यसंस्कृती नव्हती का? तसे असते तर मोगल, इंग्रज भारतात कशाला आले असते बोंबलत? आचार्य चाणक्य, चक्रवर्ती सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांनी केलेली राज्यक्रांती कितीतरी महान असूनही ती अभ्यासक्रमांमधून गायब आणि फ्रेंच राज्यक्रांतीला मात्र अग्रस्थान? आधुनिक विज्ञानाची कास धरताना अध्यात्मिक विज्ञानावर अन्याय का केला? इंग्रजीचा आग्रह धरताना संस्कृतवर अन्याय का केला? प्रकांड पंडीत विदुशी गार्गी, मैत्रेयी, विदेही राजा जनक ही आमची प्रेरणास्थान अडगळीत का टाकली गेली? पृथ्वीराज चौहान, छत्रपती शिवराय, महाराणा प्रताप, गुरु गोविंदसिह हा देशाचा वारसा नाही काय? झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी होळकर, राणी दुर्गावती, राणी कित्तूर चन्नमा हा आमचा वारसा नाही काय? चाफेकर बंधु, स्वातंत्र्यवीर सावरकर, कान्हेरे, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, राजगुरु, मदनलाल धिंग्रा… हा आमचा प्रेरणादायी वारसा नाही का? लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक, बिपिचंद्र पाल, सुभाष चंद्र बोस … हा आमचा धगधगता वारसा नाही काय? सत्तरच्या दशकापर्यंत इंग्रजांचा गोरा इतिहास शालेय अभ्यासक्रमात होता, मग त्यांचा काळा इतिहास का आणि कुणी लपवला? (पुर्वाध)

Posted by : | on : 23 Sep 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, सोमनाथ देशमाने, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, सोमनाथ देशमाने, स्तंभलेखक (468 of 1287 articles)

Owaisi Prakashambedkar Rahul
जागता पहारा : भाऊ तोरसेकर | जातीपाती व धर्मपंथाच्या आधारावर मते मिळवण्याचे डावपेच आता निकामी होऊ लागले आहेत आणि अशा ...

×