ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी » भारत भाग्य विधाता : इतिहास, मिथक आणि वास्तव

भारत भाग्य विधाता : इतिहास, मिथक आणि वास्तव

॥ विशेष : प्रशांत आर्वे |

उपलब्ध तथ्यांच्या आधारेच व्हायला पाहिजे, असा परिपाठ महाराष्ट्रात अनेक थोर इतिहासकारांनी घालून दिला आहे. त्यात वि. का. राजवाडे, गो. स. सरदेसाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दामोदर कोसंबी, सर जदुनाथ सरकार, प्रा. शेषराव मोरे, डॉ. ब्रह्मानंद देशपांडे, सेतू माधवराव पगडी… ही यादी फार मोठी आहे. मात्र, आम्ही हा इतिहासलेखनाचा संपन्न वारसा यापुढे गमावून बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. माणसाला आपल्या परंपरा आणि आपली पाळेमुळे शोधून काढण्याचा निश्‍चित अधिकार आहे. ती जिज्ञासा असायलाच हवी. मात्र, ती जिज्ञासा अवैज्ञानिक असेल तर विकृतीकडे जाते आणि अनेक मिथकांना जन्म देते. ही मिथके समाजाचे आणि पर्यायाने राष्ट्राचे नुकसान करीत असतात. अशा अशास्त्रीय इतिहासलेखनातून जी मिथके सिद्धांत म्हणून उभी राहिली त्यांनी भारताचे प्रचंड नुकसान केले.

Ved

Ved

कधी नव्हे ते अलीकडच्या दशकात इतिहास हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय्. दुर्दैवाने इतिहास आणि त्यातील पात्रे, घटनाक्रम हे वर्तमानात जातीय अस्मितेशी जोडले गेल्याने त्यावर तर्कशुद्ध व निरपेक्ष लेखन वा संशोधन दुरापास्त होऊन बसले आहे. गल्लीबोळात पूर्वग्रहदूषित अभ्यासकांचे पेव फुटलेले असताना, त्यांच्या हाती समूहमाध्यमं आल्याने वाट्टेल ते लिहिण्याची सोयच त्यातून झालेली आहे. मग या स्वनामधन्य अभ्यासकांना त्यासाठी पुरावे देण्याची वा संदर्भ जोडण्याची अजीबात गरज वाटत नाही. संशोधनातील अत्यंत साधा, पण महत्त्वाचा नियम म्हणजे ज्या गृहीतकाच्या आधारे आम्ही संशोधन करू पाहतोय् ते गृहीतक आम्हाला वाटेल त्या अगर आमच्या विचारधारेला पोषक अशा अंगाने आम्ही नेणार असू तर ते संशोधनच नव्हे. संशोधन हे उपलब्ध तथ्यांच्या आधारेच व्हायला पाहिजे, असा परिपाठ महाराष्ट्रात अनेक थोर इतिहासकारांनी घालून दिला आहे. त्यात वि. का. राजवाडे, गो. स. सरदेसाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दामोदर कोसंबी, सर जदुनाथ सरकार, प्रा. शेषराव मोरे, डॉ. ब्रह्मानंद देशपांडे, सेतू माधवराव पगडी… ही यादी फार मोठी आहे. मात्र, आम्ही हा इतिहासलेखनाचा संपन्न वारसा यापुढे गमावून बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
माणसाला आपल्या परंपरा आणि आपली पाळेमुळे शोधून काढण्याचा निश्‍चित अधिकार आहे. ती जिज्ञासा असायलाच हवी. मात्र, ती जिज्ञासा अवैज्ञानिक असेल तर विकृतीकडे जाते आणि अनेक मिथकांना जन्म देते. ही मिथके समाजाचे आणि पर्यायाने राष्ट्राचे नुकसान करीत असतात. अशा अशास्त्रीय इतिहासलेखनातून जी मिथके सिद्धांत म्हणून उभी राहिली त्यांनी भारताचे प्रचंड नुकसान केले. त्यापैकीच एक आर्य आक्रमणाचा सिद्धांत होय. या सिद्धांतामुळे द्रविड विरुद्ध आर्य असा संघर्ष गेले शतकभर उभा राहिलेला आहे. आपल्या प्रादेशिक अस्मितेच्या राजकारणापोटी, नुकतेच दिवंगत झालेल्या एम. करुणानिधी यांनी या सिद्धांताला खतपाणी घातले. नव्हे, त्यांनी एकेकाळी या मिथकाच्या आधारे संपूर्ण तामिळनाडू राज्यावर गारूड घातले होते. तसेही या देशात राष्ट्रीय अस्मितेवर जातीय, धार्मिक, वांशिक आणि प्रादेशिक अस्मिता कुरघोडी करताना दिसतात. याच सिद्धांताच्या आधारावर काही संघटना पुन्हा एकदा स्वतंत्र द्रविड देशाची मागणी करताना बघायला मिळत आहेत. त्यात भर म्हणून केरळच्या महापुरानंतर, ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांनी दक्षिणेतील राज्यांचे स्वतंत्र फेडरेशन असावे, अशी मागणी करणे हा योगायोग कसा मानता येईल? आर्य आक्रमणाचा सिद्धांत सर्वप्रथम फ्रेडरिक मॅक्समुलर यांनी मांडला. ज्यावर सुप्रसिद्ध आनुवंशशास्त्रज्ञ आणि ‘प्रिन्सिपल ऑफ जेनेटिक्स’ या ग्रंथाचे लेखकद्वय यांनी अत्यंत मार्मिक टिप्पणी केली. ते म्हणतात-
Max Muller, on an unlucky day, used the word -ryan race Thus arose out of talk alone, an imaginary creature : ryan man
नागपुरातील दिवंगत ज्येष्ठ संशोधक डॉ नि. र. वराडपांडे यांनी आर्य आक्रमण सिद्धांताची चिरफाड त्यांच्या ‘कपोलकल्पित आर्य आणि त्यांच्या स्वार्‍या’ या ग्रंथात सप्रमाण केलेली आहेच. खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर आर्य आक्रमणाचा सिद्धांत नाकारतात. प्रभू श्रीराम हा पहिला आर्य आक्रमक होता आणि त्यानेच द्रविडांना दक्षिणेकडे सरकायला भाग पाडले, हे आणखी एक मिथक. याच अनुषंगाने इरावथम महादेवन यांनी सिंधू लिपीत द्रविड भाषा शोधण्याचा अथक प्रयत्न केला. त्यांना त्यात अपेक्षित यश मिळाले नाही, हा भाग वेगळा. या विषयावर कोनराड एल्स्ट, डॉ. बी. बी. लाल, श्रीकांत तलगेरी, डॉ. शिंदे हे नव्याने संशोधन करण्यात व्यग्र आहेत. या सिद्धांताचे मजबुतीकरण करण्यामागे काही वर्ण वर्चस्वतावादी मंडळीदेखील कारणीभूत ठरली, हे नाकारता येत नाही. लोकमान्य टिळकांनी तर आर्यांचे वसतीस्थान थेट उत्तर ध्रुवाजवळ नेले. याची परिणती म्हणून आजच्या विघटनवादी शक्ती उभ्या राहू पाहात आहेत. वैचारिक मूळ नसलेला आणि केवळ द्वेषाधारीत असलेला मूलनिवासीवाद हे या सिद्धांताचे अपत्य. याच विचारांची झूल पांघरून एकेकाळी न्यायाधीश असलेले कोळसे-पाटील माध्यमांवर जाहीरपणे आपल्या प्रतिवाद्याला कुत्रा संबोधतात. यातच या विचारांची लायकी कळते. अशी सामाजिक व जातीय दुही माजविणार्‍यापासून वेळीच सावध होण्याची गरज आहे.
वसाहतवादी, प्राच्यवादी आणि राष्ट्रवादी इतिहासलेखनानंतर वंचितांचा इतिहास लिहिणारी पिढी निर्माण झाली. पुढे जाऊन भीमा-कोरेगाव हे मिथक वंचितांचा इतिहास लिहिताना निर्माण केले गेले. सामाजिक न्यायासाठी आणि दलितांचा विझलेला आत्मविश्‍वास पुन्हा निर्माण करण्यासाठी ज्या मिथकाची निर्मिती झाली तेच मिथक आज सवर्ण आणि दलित यांच्यात दुरावा निर्माण करण्यास कारणीभूत ठरताना दिसतंय. त्याच्या तपशिलात जाण्याचे कारण नाही. पण, या वर्षी उडालेला भीषण संघर्ष अंगाचा थरकाप उडवतो. या संघर्षात शहरी माओवादी बेमालूमपणे शिरले आणि संपूर्ण महाराष्ट्र पेटविण्याचा त्यांचा कट उघडकीस आला. पुण्यातील तुषार दामगुडे आणि अक्षय बिक्कड या तरुणांनी कटाच्या मागचे सूत्रधार सप्रमाण बाहेर आणले. एका ऐतिहासिक घटनेतून निर्माण झालेल्या मिथकाचा वापर समाजाच्या जोडणीसाठी न होता तो दुभंगण्यासाठी होत असेल तर डावे, उजवे, पुरोगामी या सगळ्यांनीच एकत्र बसून नव्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
आणखी एका मिथकाचे सिद्धान्तीकरण भारतात करण्यात आले तो म्हणजे ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी एकतर या देशात शिक्षण म्हणून असे काहीच नव्हते आणि असलेच तर ती केवळ विशिष्ट वर्गाची मक्तेदारी होती. बहुजन वर्गाला शिक्षण नाकारले गेले, हे देखील अलीकडच्या आकडेवारी आणि दस्तऐवजातून एक मिथक होते, हे सिद्ध होऊ घातले आहे.
पंडित सुखलाल यांचा ‘The destruction of Indigenous education’ हा अभ्यासपूर्ण ग्रंथ भारतीय शिक्षणावर प्रकाश टाकतो. १९३१ मध्ये महात्मा गांधी गोलमेज परिषदेच्या निमित्ताने लंडन येथे गेले असता, ‘रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अफेअर्स’ या संस्थेद्वारा महात्मा गांधी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. २० ऑक्टोबर १९३१ रोजी झालेल्या या व्याख्यानात गांधींनी सुरुवातीला भारतातील निरक्षरतेच्या कारणांची चर्चा केली. विविध क्षेत्रांतील अतिशय प्रतिष्ठित आणि प्रभावशाली माणसे या सभेला उपस्थित होती. ‘भारताचे भवितव्य’ असा विषय त्यांना देण्यात आला होता. भाषणात त्यांनी अस्पृशता, हिंदू-मुस्लिम प्रश्‍न आणि दारिद्र्य अशा विषयांना स्पर्श केला. सरतेशेवटी ते शिक्षणावर आले आणि म्हणाले, गेल्या ५० ते १०० वर्षांत भारतातील साक्षरतेचा अत्यंत र्‍हास झाला आहे आणि याला केवळ ब्रिटिश जबाबदार आहेत. पुढे गांधीजी म्हणाले, ब्रिटिश शासक भारतात आले तेव्हा त्यांना शिक्षणाचा सुंदर वृक्ष बहरलेला दिसला. तेव्हा जमीन खणून या वृक्षाचा बुंधा त्यांनी पाहिला. पण, नंतर मात्र त्यांनी हा बुंधा तसाच उघड्यावर सोडून दिला. साहजिकच, सुंदर वृक्ष कोमेजला. नव्या शासकांनी खर्चीक शिक्षण प्रणाली सुरू केली. पूर्वापार चालत आलेल्या शाळांना हा खर्च असह्य होता. सरकारने या शाळांची घोर उपेक्षा केली. गांधीजींच्या या भाषणाने संपूर्ण इंग्लंडमध्ये खळबळ माजली. महात्मा गांधींच्या या वक्तव्यावर ढाका विद्यापीठाचे पूर्व कुलगुरू फिलीप हरटोग यांनी जोरदार आक्षेप घेतला आणि हा आरोप सिद्ध करण्याचे आव्हान दिले. भारतात परतल्यानंतर गांधींना लगेच अटक झाली आणि ते हरटोग यांच्या आक्षेपाला उत्तर देऊ शकण्यास असमर्थ असल्याचे पत्र हरटोग यांना लिहिले आणि त्यांचे सहकारी प्रा. के. टी. शहा यांना फिलीप हरटोग यांच्या आक्षेपांचा प्रतिवाद करण्यास सांगितले. मात्र, प्रा. शहा यांच्या पत्रांनी फिलीप हरटोग यांचे सामाधान होणे शक्यच नव्हते.
सुदैवाने गांधीवादी विचारवंत धर्मपाल यांनी १९६६ मध्येच मद्रास इलाख्याचा १८२२ ते २५ दरम्यान झालेल्या शैक्षणिक सर्वेचा अहवाल अभ्यासला होता आणि त्या आधारावर फिलीप हरटोग यांचे आक्षेप खोडून काढणारे The beautiful tree- Indigenous Indian education in eighteenth century. हे पुस्तक लिहून काढले. हा ग्रंथ म्हणजे तत्कालीन ब्रिटिश जिल्हाधिकार्‍यांनी ब्रिटिश सरकारला पाठविलेला शिक्षणासंबंधीचा विस्तृत वृत्तान्त आहे. मद्रास इलाक्याच्या शैक्षणिक सर्व्हेमधून जी आकडेवारी धर्मपाल यांना उपलब्ध झाली त्याचा तपशील जागेअभावी इथे देणे शक्य नाही. मद्रास इलाक्याचे हे सर्वेक्षण थॉमस मन्रो यांच्या देखरेखीखाली करण्यात आले. मुंबई इलाक्याचे सर्वेक्षण जी. एल. प्रेन्डरगाष्ट यांच्या नेतृत्वात, तर डॉ. जी. डब्ल्यू. लिटनर यांच्या नेतृत्वात पंजाबचे सर्वेक्षण झाले. शासन स्तरावर कोणतीही धोरणे आखताना वर्तमानातील तत्कालीन परिस्थितीचे योग्य आकलन आवश्यक असते. याच उद्देशाने हे व्यापक सर्वेक्षण करण्यात आले. इथे हे लक्षात घेतले पाहिजे की, या शाळा म्हणजे आजच्या औपचारिक शिक्षणासारखे नव्हते. हे शिक्षण गावस्तरावरील गुरुकुल, मदरसे आणि शाळा अशा स्वरूपात होत्या. या शाळा समाजाकडून मिळणार्‍या आर्थिक सहयोगावर निर्भर होत्या. मद्रास प्रांतातील गंजाम, विशाखापट्टणम, राजमेंद्री, मसुलीपट्टणम, गुंटूर, नेल्लोर, कडप्पा, बेल्लारी, श्रीरंगपट्टण, मलबार, उत्तर अर्कोट, दक्षिण अर्कोट, चिंगलपेट, तंजावर, त्रिची, मदुराई, कोइम्बतुर, सालेम आणि मद्रास या सर्व जिल्ह्यांमध्ये ब्रिटिश जिल्हाधिकार्‍यांनी शैक्षणिक सर्वेक्षण केले. इथे एक लक्षात घेतले पाहिजे ते म्हणजे, मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीच्या अंमलबजावणीपूर्वी हे सर्वेक्षण केलेले आहे. या प्रदीर्घ सर्वेक्षणातून जी आकडेवारी हाती आली आहे ती अनेक मिथकांना धक्का देणारी आहे. या अहवालात मद्रास प्रांतातील शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचे जातिनिहाय वर्गीकरण करण्यात आले आहे. आश्‍चर्य म्हणजे राजमंद्री जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे २७९ महाविद्यालये असल्याचा ब्रिटिश अहवाल सांगतो. मद्रास इलाक्यात एकूण सवर्ण विद्यार्थ्यांची संख्या २९, ७२१ असून मागास व दलित वर्गाच्या विद्यार्थ्यांची संख्या ७५,९४३ इतकी आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जातीतील विद्यार्थिसंख्या ही त्रिवर्णिक विद्यार्थिसंख्येपेक्षा अधिक आहे. एक विशेष बाब अशी की, तत्कालीन शिक्षणव्यवस्थेमागील अर्थकारण तपासून पाहिले असता असे लक्षात येईल की, राज्याच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा शिक्षणव्यवस्थेवर खर्च होत असे. इंग्रज भारतात आल्यानंतर उत्पन्नाचे केंद्रीकरण झाले. शिवाय भारतीय समाजाची जी प्रचंड लूट झाली त्यामुळे शिक्षणाला असलेला लोकाश्रय संपुष्टात आला. दादाभाई नौरोजी यांच्या ‘ड्रेन थेअरी’ने भारताची झालेली प्रचंड लूट आपण जाणतोच. शिक्षणव्यवस्थेला असलेली मदत साहजिक बंद झाली आणि भारतीय शिक्षण पद्धतीचे कंबरडे मोडले. आणखी एक महत्त्वाचे, शिक्षण ही राज्याची जबाबदारी कधीच नव्हती. ती समाजाची जबाबदारी होती. त्यामुळे चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारापासून तर छत्रपती शिवाजी माहाराजांच्या अष्टप्रधान मंडळापर्यंत धर्मादायमंत्री दिसतात, पण शिक्षणमंत्री दिसत नाही.
या अहवालात काही जिल्हाधिकारी कार्यालयांनी शाळांमधून शिकविल्या जाणार्‍या पुस्तकांची यादीदेखील जोडली आहे. सर्व शाळांमधून रामायण, महाभारत आणि भागवत ही पुस्तके सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना शिकविली जातात. कारागीर वर्गाच्या विद्यार्थ्यांना १) नागलिंगायन कथा, २) विश्‍वकर्मा पुराण, ३) कमलेश्‍वर कालिका महत्ता; लिंगायत विद्यार्थांकरिता १) भवपुराण, २) राघवन कंकय्या, ३) गिरिजाकल्याण, ४) अनुभव मूर्त, ५) चिन्न बसवेश्‍वर पुराण, ६) गुरीलगुल्लू; वाचनीय पुस्तके- पंचतंत्र, वेताळपंचविशी, पंकलीसुयुक्त, हल्लर, महातरांगिनी; शब्दकोश आणि व्याकरण- निघुंट, शब्दमुनिदर्पण, शब्दमंजिरी, व्याकरण, आन्ध्रादीपक, आंध्रनामसंग्रह.
अनेक जिल्हाधिकारी कार्यालयांनी हे स्पष्ट केले की वेद, गणित, खगोलशास्त्र आणि वैद्यक या विषयांचे शिक्षण हजारो विद्यार्थी त्यांच्या घरीच घेत होते. घरी शिक्षण देण्याच्या या पद्धतीला ‘अग्रहारम’ असे म्हटले जात असे. महाविद्यालयीन शिक्षण घेणारे अधिकांश सवर्ण जातीतले विद्यार्थी होते. तथापि, वैद्यक आणि खगोलसारख्या विभिन्न विषयाचे शिक्षण सर्व जातीच्या विद्यार्थ्यांना खुले होते. क्षुद्र जातीचे पाच विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षण घेताना दिसून येतात.
मलबार जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाने घरी राहून खाजगी शिक्षकाकडून शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची आकडेवारी पाठविलेली आहे. मलबार जिल्ह्याच्या या आकडेवारीवरून हजारो विद्यार्थी घरी राहूनदेखील शिक्षण घेत होते, हे स्पष्ट होते. मलबार जिल्ह्यात १९४ विद्यार्थी आयुर्वेदाचे शिक्षण घेत होते. अन्य बर्‍याच जिल्ह्यांनी घरी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी पाठविलेली नसल्याने तो आकडा निश्‍चित कळू शकलेला नाही.
एकंदर डाव्या विचारवंतांनी जे शिक्षणविषयक मिथक या देशात पक्के केले तेसुद्धा वास्तवापासून फार लांब असल्याचे स्पष्ट होते. परंतु, या मिथकाच्या आधारे अनेक नवे मिथक जन्माला घातले गेले आणि त्याने समाजाची वीण उसविण्याचे काम केले. वरील आकडेवारीत मद्रास, बिहार आणि पंजाब प्रांताचा तपशील आलेला आहे. मात्र, मुंबई इलाक्यातील शैक्षणिक सर्वेक्षणाची माहिती संशोधकांनी शोधण्याची गरज आहे, ज्यामुळे या मांडणीला पूर्णत्व येऊ शकेल. इतिहास मिथकांच्या गर्तेत हरवून बसणार असेल, तर त्यात आपलेच नुकसान आहे आणि त्याचे परिणाम आपण भोगतोच आहोत. याशिवाय अशा असंख्य मिथकांना आपण जन्मास घातले आहे. या गोंधळात खरा इतिहास आमच्या हाती लागणे अशक्य होऊन बसते. वास्तविक, हे असे घडले हे कुणीच ठामपणे सांगू शकत नसला, तरी समोर असलेल्या तथ्यांच्या आधारावर मांडणी होणे ही काळाची गरज आहे, अन्यथा आज पिवळ्या पुस्तकांमधून आलेला इतिहास पुढच्या पिढ्यांना खरा वाटणार नाही कशावरून? आम्ही सांगतो तेच खरे, या नियमाने लिहिला जाणारा इतिहास अशाच मिथकांना जन्मास घालत राहील आणि त्याचे चटके समस्त समाजाला भोगावे लागतील, हे निश्‍चित! वास्तवापासून फारकत घेत जाणारा इतिहास येणार्‍या अनेक पिढ्यांचे नुकसान करणारा ठरेल. विद्वेष, विखार आणि पुन्हा अहंगंड आणि न्यूनगंडाचे दुष्टचक्र त्यातून उभे राहिल्याशिवाय राहणार नाही. हे होऊ द्यायचे नसेल, तर इतिहास संशोधन पद्धतीच्या काटेकोर वापरातून लिहिला जाणे यापुढे इतिहास संशोधकाकडून अपेक्षित आहे, अन्यथा आम्हाला इतिहास माफ करणार नाही…! •••

Posted by : | on : 9 Sep 2018
Filed under : आसमंत, पुरवणी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी (340 of 875 articles)

Formerindianpmatalbiharivajpayee
आदरांजली : डॉ. कुमार शास्त्री | ‘अटलजींची मुलाखत’ एक युवाअवस्थेचं स्वप्न होतं! अटलजी एक झपाटणारी विभूतीच होती आणि योगायोगाने आज ...

×