ads
ads
विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

►जावडेकर यांची घोषणा, नवी दिल्ली, १५ जानेवारी – आगामी…

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

•पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्ला, बालनगिर, १५ जानेवारी –…

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

•ख्रिश्‍चनांच्या कार्यक्रमातच राजनाथसिंह यांनी सुनावले, नवी दिल्ली, १५ जानेवारी…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » आसमंत, तरुण विजय, पुरवणी, स्तंभलेखक » भारत हेच माझे श्रद्धास्थान!

भारत हेच माझे श्रद्धास्थान!

॥ अन्वयार्थ : तरुण विजय |

‘‘एवढ्या कठीण, प्रतिकूल परिस्थितीतही आपण एवढे शांत कसे राहू शकता? आपल्या आस्था व श्रद्धेचा आधार कोणता?’’ अटलजींनी आपल्या चिरपरिचित शैलीत माझ्याकडे पाहिले आणि मंद स्मित करीत म्हणाले- ‘‘भारतच माझे श्रद्धास्थान आहे, माझे सर्वस्व आहे, अन्य कुणीही नाही.’’ मी काही क्षण स्तंभितच झालो. एवढी मोठी गोष्ट किती सहजतेने सांगून गेले अटलजी! अटलजींची तुलना केवळ अटलजींशीच केली जाऊ शकते! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, कवी असे की कुणाचेही हृदय उचंबळून येईल, वक्ते तर असे की मनातील ताराही झंकारतील, तुमच्या धमन्यांतील रक्त खवळेल, तर कधीकधी हसताहसता डोळ्यांत पाणी येईल. स्वहस्ते सुहृदांना असंख्य पत्रे लिहून त्यात आनंद मानणारे अटलजी, कदाचित पंडित नेहरूंनंतर पहिलेच पंतप्रधान असावेत. ‘आपले असेच प्रेम असू द्यावे, हीच इच्छा!’ अशीच बहुदा त्यांची पत्रातील शेवटची ओळ असायची.

Atal Bihari Vajpayee 1

Atal Bihari Vajpayee 1

प्रश्‍न अगदी सरळ होता- ‘‘एवढ्या कठीण, प्रतिकूल परिस्थितीतही आपण एवढे शांत कसे राहू शकता? आपल्या आस्था व श्रद्धेचा आधार कोणता?’’ अटलजींनी आपल्या चिरपरिचित शैलीत माझ्याकडे पाहिले आणि मंद स्मित करीत म्हणाले- ‘‘भारतच माझे श्रद्धास्थान आहे, माझे सर्वस्व आहे, अन्य कुणीही नाही.’’ मी काही क्षण स्तंभितच झालो. एवढी मोठी गोष्ट किती सहजतेने सांगून गेले अटलजी!
अटलजींची तुलना केवळ अटलजींशीच केली जाऊ शकते! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, कवी असे की कुणाचेही हृदय उचंबळून येईल, वक्ते तर असे की मनातील ताराही झंकारतील, तुमच्या धमन्यांतील रक्त खवळेल, तर कधीकधी हसताहसता डोळ्यांत पाणी येईल. स्वहस्ते सुहृदांना असंख्य पत्रे लिहून त्यात आनंद मानणारे अटलजी, कदाचित पंडित नेहरूंनंतर पहिलेच पंतप्रधान असावेत. ‘आपले असेच प्रेम असू द्यावे, हीच इच्छा!’ अशीच बहुदा त्यांची पत्रातील शेवटची ओळ असायची.
ते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जिवलग व विश्‍वासू सहकार्‍यांपैकी एक आणि डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींचेही खूप आवडते होते. ‘राष्ट्रधर्म’सारख्या पत्रिकेत त्यांची धारदार लेखणी उमटू लागली. ‘हिन्दू तन मन, हिन्दू जीवन, रग-रग हिन्दू, मेरा परिचय’ आणि ‘गगन में लहराता हैं भगवा हमारा’ यांसारख्या कविता त्यांनी या काळातच रचल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्याविषयी ते लिहितात, ‘‘केशव के आजीवन तप की यह पवित्रतम धारा, साठ सहस ही नहीं, तरेगा इससे भारत सारा.’ त्याच अटलजींनी ‘हिरोशिमा’ आणि ‘मनाली मत जैइयो’ यासारख्या काव्यरचनाही केल्या. त्यांची संसदीय शैली स्वत:च एक राजकीय विद्यालय होते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आक्रमकतेतही शालीनता, तीव्र वाक्प्रहार करतानाही बाळगलेला संयम आणि आज संसदेत जवळजवळ संपुष्टात आलेले हास्य ही त्यांची अद्भुत व आगळीवेगळी शैली होती. आज याच्या केवळ आठवणीच शिल्लक राहिल्या आहेत. पंडित नेहरूंनी तर त्यांची प्रशंसा केली होतीच, पण अटलजींनीही इंदिराजींची मुक्तकंठाने प्रशंसा केली होती, हेही लक्षात घेतले पाहिजे. ते आणिबाणीत तुरुंगात गेले. अन्याय, अत्याचार, दडपशाही सुरू होती. पण, नंतर सत्ता मिळाल्यावरही इंदिराजींविषयी त्यांनी कटु भाषा वापरली नाही. कठोर प्रहार करणार्‍या त्यांच्या वक्तव्याचे उदाहरणच द्यायचे झाल्यास- ‘‘बेटा कार बनाता है, माँ बेकार बनाती है,’’ या वाक्याचे देता येईल. संसदेत झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी हे वाक्य उच्चारले होते. मारुती कारच्या उत्पादनाच्या पृष्ठभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले होते.
बहुदा कच्छ येथील सत्याग्रह आंदोलनाचा प्रसंग असावा. आंदोलन केल्याने अटलजींना तुरुंगात जावे लागले. नंतर त्यांची सुटका करण्यात आली. पत्रकारांनी त्यांना विचारले, ‘‘आपण तर तुरुंगात गेला होता, मग बाहेर कसे आलात?’’ अटलजींनी एक क्षणभर रोखून पाहिले आणि नंतर खळखळून हसून म्हणाले, ‘‘कैद मांंगी थी, रिहाई तो नही मांगी थी…’’- ही एका प्रसिद्ध चित्रपटगीताची ओळ होती!
लाहोर बसयात्रेप्रसंगीही ते खूप आशावादी होते. त्या वेळी गव्हर्नर हाऊसमध्ये त्यांनी दिलेले भाषण राजकीय क्षेत्रातील ऐतिहासिक भाषण मानले जाते. मात्र, जनरल परवेज मुशर्रफ यांच्या विश्‍वासघातामुळे त्यांना खूप त्रास झाला. ते कुठलीही किंमत देऊन, स्वत: चार पावले पुढे चालून पाकिस्तानशी मैत्री करू इच्छित होते. मात्र, प्रत्येक वेळी पाकिस्तानने विश्‍वासघात केला. ‘‘यांच्यावर भरवसा तरी कसा ठेवायचा?’’ असे ते एकदा म्हणालेदेखील. कारगिल युद्धातील शहीदांविषयी ते कमालीचे संवेदनशील होते. त्यांच्या काळात प्रथमच शहीद सैनिकांवर संपूर्ण शासकीय इतमानात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची मैत्री तर कथेचा विषय आहे. चंद्रशेखर आणि नरसिंह राव यांच्याशी असलेली मैत्री तर सर्व सीमा पार करून गेली. अटलजींच्या ‘मेरी इक्यावन कविताएँ’ या पुस्तकाचे लोकार्पण तर तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्या हस्ते झाले आणि त्यांनीही मैत्रीसाठी सर्व बंधने झुगारून लावली. जॉर्ज फर्नांडिस यांचा साधेपणा त्यांना नेहमीच भावला आणि काँग्रेसने शवपेटी घोटाळ्यात उगीचच त्यांचे नाव गोवल्याबद्दल त्यांना खूप वेदना झाल्या.
रामजन्मभूमीविषयी त्यांची स्वत:ची काही मते होती आणि त्यावर ते शेवटपर्यंत ठाम राहिले. मात्र, संघटनेची किंवा वरिष्ठ अधिकार्‍यांची प्रतिष्ठा धोक्यात येईल, असा एकही शब्द चुकूनही त्यांच्या तोंडून कधी बाहेर पडला नाही. एका अत्यंत वरिष्ठ संघ अधिकार्‍याने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमुळे त्यांना कमालीचे दु:ख झाले. त्या काळात तसेही स्वदेशी चळवळीच्या आंदोलकांमध्ये कडवटपणा आला होता. मात्र, अटलजींनी ते दु:ख, त्या वेदना विषाप्रमाणे गिळून टाकल्या. मात्र, टीकेचा, विरोधाचा एक शब्दही तोंडातून उच्चारला नाही. नंतर मी त्यांना म्हटले की ‘‘अटलजी, आपण स्वयंसेवकांचा सन्मान राखलात. कारण आपण काहीही म्हटले असते तर एक परंपरा खंडित झाली असती.’’ उदास होऊन ते म्हणाले, ‘‘बोलून काय करणार होतो आणि बोलण्यासारखे आणखी काय राहिले होते?’’ एकदा एखादी गोष्ट ठरविली तर त्यापासून किंचितही दूर हटायचे नाही, मग भलेही कुणी काहीही म्हणो, असा सौम्य व्यक्तिमत्त्वाच्या अटलजींचा पोलादी निर्धार असायचा. ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’च्या ऐवजी ‘गर्व से कहो हम भारतीय हैं’ म्हणण्याचे धाडस त्यांनी दाखविले; तर प्रतिक्रियेतून आलेली जागृती स्वास्थ्यकारक नाही, असेही त्यांनी ‘पाञ्चजन्य’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. ते म्हणाले, ‘‘जर केवळ प्रतिक्रियास्वरूप म्हणून हिंदुत्वाचा अभिमान उत्पन्न झाला असेल, तर अन्य लोकही तशीच प्रतिक्रिया व्यक्त करून अधिकच कट्टर होतील. विधायक तत्त्वांच्या आधारावरच वर्तमानातील समस्या सोडविण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत. भारतात हिंदू बहुसंख्येने आहेत. त्यामुळे आमच्यावर अधिकच जबाबदारी आहे.’’
माहिती आणि तंत्रज्ञानक्षेत्रात क्रांती, मोबाईल, टेलिफोन स्वस्त करून घराघरांत पोहोचविणे, भारतात सुवर्ण चतुर्भुज राष्ट्रीय महामार्गांची निर्मिती आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह भारताचे सेनादल अधिकाधिक सामर्थ्यशाली करणे, अटलजींचे साहस आणि विकासकेंद्रित धोरणाचा शानदार परिचय आहे. देशातील सर्वात निम्न पातळीवरील माणसाचे दारिद्र्य कसे कमी होईल, याचीच त्यांना अहोरात्र चिंता असायची. पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा एकात्म मानववाद आणि गांधीजींच्या तत्त्वज्ञानावर त्यांची प्रगाढ श्रद्धा होती. यामुळेच भाजपाची स्थापना झाल्यावर त्यांनी ‘गांधीवादी समाजवाद’ स्वीकारला. आपल्या कट्टर प्रतिस्पर्ध्यावर कठोर व्यक्तिगत हल्ला चढविण्याच्या ते विरोधात होते. त्या काळात आम्ही ‘पाञ्चजन्य’च्या माध्यमातून सोनियांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसवर अतिशय कठोर शब्दांत प्रहार करीत होतो. अशातच ‘पाञ्चजन्य’चा एक अंक पाहून त्यांनी पंतप्रधान कार्यालयातूनच फोन केला- ‘‘विजयजी, काँग्रेसच्या धोरण आणि कार्यक्रमांवर अवश्य टीका करा, मात्र व्यक्तिगत गोष्टींना चर्चेबाहेर ठेवा. तेच योग्य ठरेल,’’ असे ते म्हणाले. एकदा ाम्ही ‘धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे’ हा अंक काढला. या अंकाच्या मुखपृष्ठावर काशीच्या डोमराजासमवेत संत, शंकराचार्य आणि विश्‍व हिंदू परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष अशोकजी सिंघल यांचे भोजन करतानाचे छायाचित्र छापले. अटलजी हे पाहून खूप प्रसन्न झाले आणि म्हणाले- ‘‘या गोष्टीचा जेवढा अधिक प्रसार, प्रचार होईल तितके चांगले होईल. अशाप्रकारचे कार्यक्रम अधिकाधिक झाले पाहिजेत, पण मनापासून झाले पाहिजेत. केवळ फोटो काढण्यापुरते नाही!’’ ‘पाञ्चजन्य’चे ते प्रथम संपादक तर होतेच, शिवाय प्रथम वाचकही होते. पंतप्रधान राहूनही आमच्या अंकावरील त्यांची प्रतिक्रिया ते कळवत होते. एकदा स्वदेशीवर केंद्रित आमच्या अंकावरील मुखपृष्ठावर भारतमातेचे द्रौपदी वस्त्रहरणासारखे चित्र पाहून ते संतप्त झाले. ते म्हणाले- ‘‘आम्ही जिवंत असताना अशाप्रकारचे चित्र? आम्ही काय मेलो आहोत काय? संयम आणि शालीनतेशिवाय पत्रकारिता होऊ शकत नाही.’’
खरेतर अटलजींना ‘भारतरत्न’ मिळाले असे नसून ‘भारतरत्न’ला ‘भारतरत्न’ मिळाले आहे! त्यांनी भारतीयांची भारताविषयीची आस्था, श्रद्धा जागविली. सगळ्यांना प्रेमाने सोबत घेऊन जाण्याचा त्यांचा स्वभाव होता. आज एक कविहृदयाचा भारतनायक आमच्यातून निघून गेला असला, तरी अधिक विराट आणि स्नेहमय स्वरूपात आमच्या मनावर अधिराज्य करीत आहे. ‘अमर अटल’ प्रत्यक्षातील अटलपेक्षाही कितीतरी मोठे झाले आहेत…

Posted by : | on : 26 Aug 2018
Filed under : आसमंत, तरुण विजय, पुरवणी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, तरुण विजय, पुरवणी, स्तंभलेखक (395 of 1136 articles)

Atal Bihari Vajpayee Afp1
संवाद : सोमनाथ देशमाने | ऋषीतूल्य महामानव अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रध्दांजली प्रस्तावाला मतीन सय्यद केवळ हिंदुद्वेषातून विरोध करत असताना, ...

×