ads
ads
राहुल गांधींचे आरोप खोटे

राहुल गांधींचे आरोप खोटे

►दसाँ एव्हिएशनच्या सीईओचे स्पष्टीकरण ►रिलायन्स कंपनीला आम्ही निवडले, नवी…

असोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली

असोसिएटेड जर्नल्सची याचिका हायकोर्टाने फेटाळली

►नॅशनल हेरॉल्ड इमारत रिकामी करण्याचे प्रकरण, नवी दिल्ली, १३…

दरवर्षी १ हजार प्राचीन मूर्तींची तस्करी

दरवर्षी १ हजार प्राचीन मूर्तींची तस्करी

नवी दिल्ली, १३ नोव्हेंबर – भारतातून दरवर्षी सुमारे १…

आंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला

आंग सान स्यू कीकडून अ‍ॅमनेस्टीने पुरस्कार परत घेतला

►रोहिंग्या प्रकरण ►नऊ वर्षांपूर्वी दिला होता पुरस्कार, नेईपिडॉ, १३…

स्टॅन ली यांचे निधन

स्टॅन ली यांचे निधन

►स्पायडर मॅन, हल्क यांचे जनक, न्यू यॉर्क, १३ नोव्हेंबर…

तुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता

तुलसी गबार्ड अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता

मुंबई, १३ नोव्हेंबर – अमेरिकेच्या पहिल्या हिंदू खासदार तुलसी…

मंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून शिवसेनेचा गदारोळ!

मंत्रिमंडळ बैठकीत ‘अवनी’वरून शिवसेनेचा गदारोळ!

►कुणी ‘ब्र’ देखील काढला नाही : मुनगंटीवारांचा दावा, मुंबई,…

प्रकाश आंबेडकरांनी टाळला संभाजी भिडेंचा उल्लेख!

प्रकाश आंबेडकरांनी टाळला संभाजी भिडेंचा उल्लेख!

►कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण, मुंबई, १३ नोव्हेंबर – कोरेगाव…

महाराष्ट्रात काँग्रेस लोकसभेच्या सर्व जागा लढविणार!

महाराष्ट्रात काँग्रेस लोकसभेच्या सर्व जागा लढविणार!

►चाचपणी सुरू केली ►राफेल प्रकरणी राकाँच्या भूमिकेने नाराज, मुंबई,…

दिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत

दिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत

॥ विशेष : धनश्री बेडेकर | हिंदू धर्मात निसर्गचक्राला…

एक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत!

एक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | भ्रष्टाचाराचे अनेक आश्रयदाते…

रिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष

रिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | देशात किंवा कदाचित…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:32 | सूर्यास्त: 17:49
अयनांश:

मला काय त्याचे?

॥ संवाद : सोमनाथ देशमाने |

चित्तोडमध्ये नव्हे तर लव्ह जिहादच्या भयाने भारतभर हजारो पद्मावती आक्रोश करत आहेत! मला काय त्याचे?… हा पुरोहितांचा प्रश्न आहे, मला काय त्याचे? हा शेतकर्‍यांचा प्रश्न आहे, मला काय त्याचे? ही माझ्या बापाची समस्या आहे, मला काय त्याचे? हद्द झाली! जग भारताकडे आशेने बघू लागले आहे!… असेल, मला काय त्याचे? मला काय मिळाले? पेट्रोल स्वस्त झाले? अनुदान, आरक्षण, कर्जमाफी मिळाली? कर कमी झाला?… अरे हा जिवंत माणसांचा देश आहे की मुर्दाड फुकट्यांची धर्मशाळा? जो भंडारा घालील त्याचा उदो उदो? जो खोबरं उधळील त्याचं चांगभलं?

Largest Fort In India Udaipur

Largest Fort In India Udaipur

चित्तोडची महाराणी पद्मावती हिच्या सौंदर्याची दिगंत किर्ती ऐकून बावचळलेला वासनांध अल्लाउद्दीन खिलजी चित्तोडभोवती वेढा टाकून बसला होता. बुलंद दरवाजा, भक्कम तटबंदी असलेल्या लढावू रजपुतांचा चित्तोडगड दाद देत नव्हता. हताश, कामातूर खिलजीला एके दिवशी स्वप्न पडले. महाराणी पद्मावती त्याच्यासमोर उभी होती. अल्लाउद्दीन खिलजी नखशिखांत शहारला. लाळ गाळत महाराणी पद्मावतीकडे पुढे पुढे सरकू लागला. क्षणार्धात महाराणी पद्मावतीत महाकाली महादुर्गा संचारली आणि तिने धडावेगळे केलेले अल्लाउद्दीन खिलजीचे शीर तिच्या चरणांवर येऊन पडले. या अल्ला, या अल्ला ओरडत अल्लाउद्दीन खिलजी झोपेतून जागा झाला. अंगातून घामाच्या धारा वहात होत्या. पहाटे पडलेल्या स्वप्नाचा मतितार्थ समजून घेऊन एखादा विचारी संस्कारी पुरुष गुमान परत फिरला असता! पण तो अल्लाउद्दीन खिलजी होता! बुलंद दरवाजा तोडून किल्ल्‌यात घुसायचा व महाराणी पद्मावती हस्तगत करायचा निर्णय करुन तो चित्तोडगडावर चाल करुन गेला. पुढे मागे हजारो सैनिक! तुंबळ युध्द झाले. विजयी उन्मादात अल्लाउद्दीन खिलजी बुलंद दरवाजातून आत प्रवेशता झाला आणि त्याचा चेहरा खाडकन उतरला. चिताभस्माचे ढीगच्या ढीग दिसत होते. शूरवीर रजपुत सैनिकांची प्रेतं इतस्ततः विखुरली होती. युध्द जिंकलेल्या अल्लाउद्दीन खिलजीचा चेहरा निस्तेज आणि चित्तोडसाठी लढता लढता वीरगतीला प्राप्त झालेल्या रजपुत सैनिकांच्या चेहर्‍यावर दिव्य तेज! रजपुत स्रियांचे नामोनिषाण कुठे दिसत नव्हते. अल्लाउद्दीन खिलजी काय समजायचे ते समजून चुकला. क्रोधाग्नीने त्याचा चेहरा लालेलाल झाला. युध्द जिंकूनही तो हरला होता. गडावरील मठमंदीरं उध्वस्थ करायचा त्याने आपल्या सैन्याला सुडादेश दिला आणि…
महाराणी पद्मावतीवर चित्रपट बनवताना असे भव्य दिव्य स्वप्न बॉलीवुडचा महान दिग्दर्शक संजय लीला भन्साळीला का पडले नाही?
चित्तोडभोवती अल्लाउद्दीन खिलजीचा वेढा पडल्यामुळे किल्ल्‌यातला धान्यसाठा संपत आला होता. बाहेरुन रसद येऊ शकत नव्हती. महाराजा रतनसिंह चिंताग्रस्त झाले होते. कुणीही परपुरुष रजपुत महिलाचे नखही पाहू शकत नाही, या रजपुती परंपरेला चित्तोडगडने मुरड घातली. अल्लाउद्दीन खिलजीने गडावर निरोप पाठवला होता की महाराणी पद्मावतीचे मला आरशात तरी दर्शन घडवा, मी आल्या पावली निघून जाईन! शत्रुलाही दिलेल्या शब्दाला जागणारे रजपुत आणि जन्मदात्या बापाला दिलेला शब्द मोडणारे मोगल! महाराजा रतनसिंह त्यांच्या धर्माला जागले आणि अल्लाउद्दीन खिलजी त्याच्या धर्माला जागला. महाराणी पद्मावतीचे आरशातले सौंदर्य बघून अल्लाउद्दीन खिलजी अधिकच चेकाळला. चित्तोडगडचा वेढा त्याने आणखी भक्कम केला.
महाराजा रतनसिंह यांनी मनात ठाम निश्चय करुन राजदरबार भरवला, विचार विनिमय करण्यासाठी! सेनाधिकारी आणि समस्त राजसभा यांच्या नजरा महाराज रतनसिंह यांच्या चेहर्‍यावर खिळल्या होत्या. धीरगंभीर आवाजात महाराज रतनसिंह रावल बोलु लागले. माझ्या प्रिय मेवाड बंधुभगिनींनो, आपण परम भाग्यशाली आहोत. आपल्या प्रिय चित्तोडगडाच्या शाही विवाहाचा मुहूर्त ठरला आहे. आपले आराध्य दैवत महादेव, देवाधिदेव महादेव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहाणार आहेत. हर हर महादेव! हर हर महादेव! गडाच्या पायथ्याशी तळ ठोकून बसलेल्या अल्लाउद्दीन खिलजीलाही शाही खलिता धाडला आहे. चित्तोडगडावर रुधिराभिषेक करावयाचा आहे. महाकालचे शाही स्वागत नरमुंडमालांनी करावयाचे आहे. जोहररुपी रक्तकेसरी गुलाल उधळावयाचा आहे. स्वागतात कुठेही कमतरता राहता कामा नये. रजपुत परंपरेला कुठेही गालबोट लागता कामा नये. बुलंद दरवाजा उघडा. केसरी वस्त्र परिधान करुन महाकालचे भव्य स्वागत करा. त्याच्या स्वागतासाठी महाराणी पद्मावतीसह तमाम सौंदर्यवतींचे चिताभस्म तयार ठेवा. चला, चित्तोडगडाच्या शाही विवाहाच्या तयारीला लागा. … शूरवीर बादल कुजबुजला. मी सांगत होतो, हे परकीय आक्रमक मुळीच विश्वासपात्र नाहीत. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला हवे होते. पण आता वेळ निघून गेली आहे. आता त्यांना आपण आपल्या सनातन भाषेतच उत्तर देऊ. … हर हर महादेवच्या गगनभेदी ललकार्‍यांनी दरबार रोमांचित झाला कारण सर्वोच्च त्याग करायची वेळ आली होती.
हा हा म्हणता ही वार्ता राणीमहालांपर्यंत पोहचली. महाराणी पद्मावतीसह तमाम रजपुत वीरांगनांच्या अंगात वीरश्री संचारली. सनातन भारतीय परंपरेला सर्वाधिक काय प्रिय असेल तर नितीमत्ता आणि त्यासाठी सर्वस्वाचे बलिदान! राजपुत क्षत्राणी आणि त्यांच्यासाठी जोहरकुंड सजू लागले.
महाराजा रतनसिंह रावल यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी चित्तोडगड जेवढा सजला नव्हता, तेवढा आता त्याच्या शाही विवाहाच्या या प्रसंगी सजवला जात होता. प्रचंड उत्साह ओसंडून वहात होता. शत्रूची खांडोळी करता करता वीर मरण! शीलरक्षणार्थ जोहर! क्षत्रीयांच्या आयुष्यातील सर्वोच्च क्षण! रजपुत स्रिया सौभाग्य श्रृंगार करुन आणि रजपुत योध्दा शस्त्रसज्ज होऊन पुढील आदेशाची आतूरतेने प्रतिक्षा करत होते. चंदन, श्रीफळ, तूप, धूप, धीप, गंगाजल, तुलशीदल सारी जय्यत तयारी चालली होती. पुरोहितांनी राजमहालांकडे निरोप पाठवला की पहिले सूर्यकिरण जोहरकुंडावर पडले की जोहर सुरु होईल! पहिला आणि शेवटचा जोहर कुणाचा ते महाराणी पद्मावती ठरवतील. आहुती-राष्ट्रसमर्पण करण्याचा परमोच्च क्षण! ढोल, ताशे, नगारे वाजू लागले तसतसे सार्‍या चित्तोडगडात वीरश्री संचरु लागली. पूर्व क्षितिजावर रक्तिम लालिमा दिसू लागली. सर्व सतींनी आपापल्या पतीदेवांचे अंतिम दर्शन घेतले. तलवारीच्या पात्यांवर सर्रकन अंगठा चिरुन पतीदेवांनी धर्मपत्नींचे कुंकुमतिलक केले. महाराणी पद्मावतीला महाराज रतनसिंह कांही सांगू पहात होते, परंतु महाराणी पद्मावतीच्या चेहर्‍यावरील दिव्य तेज बघून ते गप्प राहिले. आज महाकालच्या पुजेसाठी चिताभस्म तयार करायला निघाली होती राणी पद्मावती! अग्रपुजेचा मान तिचा होता. महाकालात विलीन व्हायला निघाली होती महाकाली पद्मावती!
सूर्यनारायणाचे पहिले किरण जोहरकुंडावर पडले आणि धगधगत्या अग्नीकुंडात, मंत्रघोषात क्षत्रिय रजपुत स्त्रियांच्या समिधा पडू लागल्या. क्षणभर सूर्यदेवही काळवंडला असेल! पावन अग्नीत पावन देहांची आहुती! शीलरक्षणार्थ! सोळा सहस्त्र समिधा! वायुमंडल सुगंधीत झाले. पार्वतीला शिवाची शक्ती म्हणतात! आपापल्या अर्धांगिनींचे शौर्य बघून रजपुत वीरांच्या भुजांमध्ये हजार हत्तींचे बळ आले. बादलच्या वृध्द मातेची शेवटची आहुती पडली आणि जोहरयज्ञ संपन्न झाला.
सिंहलद्विपचा राजा गंधर्वसेन व राणी चंपावती यांची राजकन्या असलेली पद्मिनी-पद्मावती लहानपणापासूनच युध्दकौशल्यात निपूण होती. जो कुणी माझ्या सैनिकाला द्वंद्वयुध्दात हरवेल त्याच्याशीच मी विवाह करीन, असा तिचा प्रण होता. तो सैनिक ती स्वतः पद्मावतीच असायची! या सोळा हजार पराक्रमी रजपुत स्रिया हातात तलवारी घेऊन, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढल्या असत्या तर भारताच्या इतिहासाला वेगळीच कलाटणी मिळाली असती. भरतभूमीवर परकीयांचे नामोनिषाण राहिले नसते आणि पुढचा साराच अनर्थ टळला असता. असो.
बुलंद दरवाजा उघडला गेला आणि रजपुत सेना अल्लाउद्दीन खिलजीच्या सैन्यावर तुटून पडली. त्यांच्याकडे आता स्वतःशिवाय गमावण्यासारखे काहीच नव्हते. घनघोर युध्द झाले. एकेका रजपुत वीराने १००-१०० खिलजी सैनिक कापून काढले तरीही चित्तोडगड पडलेच …
भारतीयांवर रानटी व सैतानी अत्याचार करणार्‍या अल्लाउद्दीन खिलजीविषयी माझ्या मनात तसूभरही सहानुभूती नाही. आणि तशी ती कुणाही भारतीयाच्या मनात असण्याची सुतराम शक्यता नाही, मग तो हिंदू असो की मुसलमान! मला पडलेलं हे स्वप्न मी सार्‍या भारतीयांना मातृवत पूजनीय असलेल्या महाराणी पद्मावतीच्या चरणी समर्पित करित आहे!
इसवी सन ७११ मध्ये पहिला अरब आक्रमक मोहमद बिन कासिम सिंधवर चाल करुन आला. त्यावेळी भारतात शेकडो क्षत्रिय घराणी होती, त्यांच्या रियासती होत्या परंतु, उर्वरित भारतातील एकही हिंदू राजा सिंधच्या मदतीला धावला नाही. सिंध पराभूत झाले आणि तिथेच अरबांनी हिंदुंना जोखले.
इसवी सन १३०३ पर्यंत अरबांसह इतर मुसलमान भारतात बरेच लांबवर आत घुसले होते. सुलतान जलालुद्दीन खिलजी हा अल्लाउद्दीन खिलजीचा काका व सासराही होता! त्याचा आणि आपल्या सख्ख्या भावांचा कपटाने काटा काढून अल्लाउद्दीन खिलजीने दिल्लीची बादशाही बळकावली होती. त्याने चित्तोडवर स्वारी केली तेव्हाही भारतात अनेक हिंदू रियासती अजून शिल्लक होत्या. परंतु कुणीही चित्तोडच्या मदतीला गेले नाही. मला काय त्याचे? परकीय आक्रमकांविरुध्द ज्याने त्याने लढावे किंवा तडजोडी कराव्या किंवा शरण जावे! मला काय त्याचे? याच निष्क्रियतेमुळे असेल कदाचित, रजपुतांनी आणि इतरांनीही मोगलांबरोबर तडजोडी केल्या असाव्यात. त्यावेळच्या सर्व हिंदू राजांनी आपापसात तडजोडी केल्या असत्या तर किती बरे झाले असते! परंतु तसे घडले नाही आणि त्यामुळेच भारत परकीयांच्या गुलामगिरीत गेला. आक्रमक जेते एकटे येत नसतात, त्यांच्या बरोबर त्यांचा धर्मही असतो. त्यामुळे हिंदू आक्रसत गेले आणि भारताच्या भौगोलिक सीमाही आक्रसल्या!
स्वतंत्र भारतातही आमची मानसिकता अजून तीच आहे, मला काय त्याचे? म्हणूनच काश्मिरी पंडीत आपल्याच मातृभूमीत निर्वासित जीवन जगत आहेत. भारतातल्या नऊ-दहा प्रांतात हिंदू अल्पसंख्यक होण्याच्या मार्गावर आहेत. मला काय त्याचे? बांग्लादेशी घुसखोरांमुळे आसाम-बंगाल प्रांतातील स्थानिक भूमीपुत्र उध्वस्थ होत आहेत. हा त्यांचा प्रश्न आहे, मला काय त्याचे? कोण कुठले रोहिंग्या मुसलमान ब्रह्मदेशातून आले आणि भारतात घुसले. मला काय त्याचे? भारत सरकार बघून घेईल! मोदी सरकार म्हणाले, रोहिंग्यांनों आपण अनाधिकृत घुसखोर आहात. आपल्याला परत जावेच लागेल. तर कित्येक मुल्ला-मौलवी केंद्र सरकारलाच आव्हान देत रोहिंग्यांच्या पाठीशी उभे राहिले! कॉंग्रेस नेते कपिल सिब्बल, प्रशांत भूषण प्रभूती वकील रोहिंग्यांचा बचाव करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेले! अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणी मकबूल फिदा हुसेन हिंदू देवदेवतांच्या बिभत्स प्रतिमा चितारतो. तो कोण कर्नाटकी महान सेक्युलर पुरोगामी साहित्यिक म्हणतो, मी आज सकाळीच तुमच्या महादेवाच्या पिंडीवर लघुशंका करुन आलो! तो जागचा हललाही नाही! काय तुमच्या देवदेवता? बॉलीवुडचा कुणी संजय भन्साळी सतत मर्कट लीला करतो. मला काय त्याचे? चित्तोडची महाराणी पद्मावती आपल्यावर फिदा होऊन ती आपल्याशी प्रणयाराधन करत असल्याचे स्वप्न परकीय, परधर्मीय आक्रमक अल्लाउद्दीन खिलजीला पडले असेल-नसेल, तो आणि त्याचा परवरदिगार जाणो, परंतु असे दुःस्वप्न आमच्या संजय लीला भन्साळीला पडले असेल आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली त्यांनी ते पद्मावती चित्रपटात चितारले असेल तर त्याची करावी तेवढी निर्भत्सना कमीच होईल. … २० कोटी मुसलमानांना काय वाटेल याचा हज्जारदा विचार करणारी ही तथाकथित सेक्युलर मंडळी, १०० कोटी हिंदुंना काय वाटेल याचा कधीच विचार का करत नाहीत? यात मुसलमानांचा दोष नाही, दोष आमच्यातच आहे! १०० कोटीतला प्रत्येक हिंदू सुटा सुटा आहे! मोहमद बिन कासिम भारतात घुसला तेव्हापासून ते थेट आजतागायत! भारतीय मुसलमान हे आमचेच भाऊबंध आहेत. त्यांच्या हिंदू पुर्वजांवर आक्रमक मुसलमान परकीयांनी अनन्वित अत्याचार करुन त्यांना बळजबरीने मुसलमान बनविले. हिंदू सुटा सुटा नसता तर असे घडलेच नसते! म्हणून हा हिंदुंचा प्रश्न आहे, मला काय त्याचे? हा मुसलमानांचा प्रश्न आहे, मला काय त्याचे? ही वृत्ती अत्यंत घातक आहे, कारण प्रश्न कुणाचाही असला तरी त्याचे बरे वाईट परिणाम सर्व भारतीयांना भोगावे लागतात.
चित्तोडच्या किल्ल्‌यातच नव्हे तर लव्ह जिहादच्या भयाने भारतभर हजारो पद्मावती आक्रोश करत आहेत! मला काय त्याचे? हा त्या पोरींचा आणि त्यांच्या आईवडीलांचा प्रश्न आहे, मला काय त्याचे? … हा पुरोहितांचा प्रश्न आहे, मला काय त्याचे? हा शेतकर्‍यांचा प्रश्न आहे, मला काय त्याचे? हा शिक्षकांचा प्रश्न आहे, मला काय त्याचे? ही माझ्या बापाची समस्या आहे, तो बघून घेईल! मला काय त्याचे? हद्द झाली! आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचा दबदबा वाढत चालला आहे, जग भारताकडे आता आशेने आणि आदराने बघू लागले आहे! … असेल, मला काय त्याचे? मला काय मिळाले? पेट्रोल स्वस्त झाले? अनुदान, आरक्षण, कर्जमाफी मिळाली? बोनस मिळाला? वेतन आयोग लागु झाला? व्यवसायकर, विक्रीकर, आयकर कमी झाला? … अरे हा जिवंत माणसांचा देश आहे की मुर्दाड फुकट्यांची धर्मशाळा? जो भंडारा घालील त्याचा उदो उदो?जो खोबरं उधळील त्याचं चांगभलं?

Posted by : | on : 3 Dec 2017
Filed under : आसमंत, पुरवणी, सोमनाथ देशमाने, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

1 Responses to

मला काय त्याचे?

 1. S S BHOITE Reply

  5 Dec 2017 at 5:18 pm

  DEAR EDITOR,KHUPACH CHHAN LEKH AHE,DHYANWAD,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

  छायाचित्रातून

 • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
 • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
 • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
 • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
 • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, सोमनाथ देशमाने, स्तंभलेखक (994 of 1135 articles)

Rahul Gandhi Ahmed Patel
उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | गांधी घराण्याबाहेरचा कोणीही अध्यक्ष वा नेता होऊ शकत नाही, हे सत्य आहे. पण आजवरचे ...

×