ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » आसमंत, डॉ.वाय.मोहितकुमार राव, पुरवणी, स्तंभलेखक » महाशय धरमपाल : टांगेवाला ते अब्जाधीश

महाशय धरमपाल : टांगेवाला ते अब्जाधीश

॥ अभिप्राय : डॉ.वाय.मोहितकुमार राव |

महाशय धरमपाल हे खरोखरच आजच्या काळातील एक प्रेरणास्रोत आहेत. बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेल्या धरमपाल यांची यशोगाथाही तशीच बहुमुखी आहे. धरमपाल हे खर्‍या अर्थाने कर्मयोगी असून, सातत्याने प्रकाशझोतात येण्याची त्यांना हौसच आहे. यशाची एकेक पायरी चढत धरमपाल मोठे होत गेले. आज महाशय धरमपाल ‘मसाला किंग’ म्हणून ओळखले जात असले तरी त्यांच्या यशामागे खूप मोठा संघर्ष आहे.

Mahashay Dharampal

Mahashay Dharampal

कोणत्याही क्षेत्रात यशोशिखर गाठायचे असेल, तर जिद्द आणि कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नसतो किंवा तिथपर्यंत पोहोचण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो, हे जीवनाच्या विविध क्षेत्रांत यशस्वी झालेले सर्वच जण सांगत असतात. शिवाय, फक्त उच्च शिक्षण घेतल्यानंतरच यश मिळविता येते, असाही काही नियम नाही. फारसे शिक्षण घेतले नसतानाही देदीप्यमान यश मिळविणार्‍यांची संख्या काही कमी नाही. महाशय धरमपाल हे त्यापैकीच एक नाव.
मसाला हा प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात स्वयंपाक घरातील अविभाज्य घटक आहे आणि मसाला म्हणजे एमडीएच, असे जणू समीकरणच गेल्या काही वर्षांमध्ये तयार झाले आहे. ‘असली मसाले सच सच, एमडीएच, एमडीएच’, या टीव्हीवर सातत्याने झळकणार्‍या जाहिरातीमध्ये हसतमुख दिसणारे आजोबा दुसरेतिसरे कुणी नसून, महाशय धरमपाल आहेत. धरमपाल यांचा साधेपणा आणि उत्पादनांचा दर्जा हेच त्यांच्या यशाचे खरे गमक आहे.
महाशय धरमपाल हे खरोखरच आजच्या काळातील एक प्रेरणास्रोत आहेत. बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेल्या धरमपाल यांची यशोगाथाही तशीच बहुमुखी आहे. धरमपाल हे खर्‍या अर्थाने कर्मयोगी असून, सातत्याने प्रकाशझोतात येण्याची त्यांना हौसच आहे. महाशय धरमपाल यांचा जन्म सध्या पाकिस्तानात असलेल्या सियालकोट येथे २७ मार्च १९२३ रोजी झाला. त्यांचे पिता महाशय चुन्नीलाल आणि आई छनन देवी हे दोघेही परोपकारी, धार्मिक वृत्तीचे आणि आर्य समाजाचे साधक होते. धरमपाल यांनी १९३३ साली पाचवी इयत्ता उत्तीर्ण होण्यापूर्वीच शाळा सोडली. १९३७ साली त्यांनी आपल्या वडिलांसोबत आरशाचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर त्यांनी कारपेंटर म्हणून काम केले, कपडा व्यापारी म्हणून व्यवसाय केला. शिवाय त्यांनी हार्डवेअर आणि धानाच्या व्यवसायातही भाग्य आजमावून बघितले. काही ना काही कारणामुळे त्यांचे हे छोटेमोठे व्यवसाय फार काळ चालू शकले नाहीत. त्यामुळे अखेर त्यांनी ‘महाशय दी हत्ती’ अर्थात ‘देगी मिर्च’ या लोकप्रिय नावाने सुरू असलेल्या वडिलोपार्जित व्यवसायातच लक्ष घालण्याचा निर्णय घेतला.
महाशय धरमपाल मूळचे सध्या ईशान्य पाकमधील पंजाब प्रांतातील सियालकोटचे आहेत. त्याठिकाणी त्यांच्या वडिलांचा ‘महाशय दी हट्टी’ या नावाने १९१९ साली सुरू केलेला मसाले विकण्याचा व्यवसाय होता. महाशय धरमपाल तिथेच लहानाचे मोठे झाले. त्यांनी दहा वर्षांचे असतानाच शाळा सोडून दिली. १९४७ साली देशाचे विभाजन होऊन भारत आणि पाकिस्तान या दोन देशांची निर्मिती झाली. त्यावेळी आत्ताच्या पाकिस्तानमधून भारतात येणारे हिंदू आणि शिखांचा नरसंहार करण्यात आला. त्यांच्या गावाच्या एका बाजूला हिंदू होते, तर दुसर्‍या बाजूला मुस्लिम. तोपर्यंत त्यांना कधीही एकमेकांमध्ये वेगळेपण दिसलं नाही. मात्र, फाळणी झाली तेव्हा सियालकोट पाकिस्तानात राहणार असल्याचे कळल्यानंतर हिंदूंमध्ये एकच गोंधळ उडाला. शिवाय धार्मिक हिंसाचार भडकल्याच्या वृत्तामुळे हिंदूंमध्ये अधिकच अस्वस्थता पसरली आणि आता आपल्याला घरदार सोडावं लागणार याची त्यांना कल्पना आली होती.
महाशय धरमपाल यांनी ७ सप्टेंबर १९४७ ला सियालकोट सोडले आणि कुटुंबीयांसह अमृतसर येथील निर्वासित शिबिरात दाखल झाले. त्यावेळी धरमपाल २३ वर्षांचे होते. नंतर त्यांनी जावयासह अमृतसर सोडले आणि कामाच्या शोधात ते दिल्लीला आले. अमृतसर पाक सीमेच्या खूपच जवळ आहे आणि दंगल होण्याची जास्त शक्यता आहे, असे त्यांना वाटले. पूर्वी ते अनेकदा दिल्लीला येऊन गेले असल्याने पंजाबपेक्षा दिल्लीत राहणे परवडणारे आहे, याची त्यांना कल्पना होती. आपल्या नातेवाईकाच्याच करोलबाग परिसरातील फ्लॅटमध्ये ते राहू लागले. या फ्लॅटमध्ये ना वीजपाण्याची सोय होती, ना स्वच्छतागृह. ते दिल्लीला जात असताना वडिलांनी त्यांना १५०० रुपये दिले. महाशय धरमपाल यांनी त्या पैशातून ६५० रुपयांना एक टांगा विकत घेतला. कॅनॉट प्लेसमधून करोलबागला जाण्यासाठी ते प्रवाशांकडून त्याकाळी दोन आणे घेत असत. मात्र, या अल्प उत्पन्नात कुटुंबाचा गाडा चालविणे त्यांना अशक्य होऊ लागले. अशातच असा एक दिवस उजाडला की, दिवसभर ओरडूनही त्यांना प्रवासी मिळेनासे झाले. त्यामुळे आता टांगा विकण्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.
आपण कौटुंबिक व्यवसाय सुरू करू शकतो, असा विश्‍वास असल्यामुळे महाशय धरमपाल यांनी आपली धडपड सुरूच ठेवत टांगा विकून अजमल खान रोडला १४ बाय ९ फुटांचे एक दुकान बांधले आणि सियालकोटच्या महाशय दी हट्टीच्या धर्तीवर ‘देगी मिरचवाले’ या नावाने व्यवसाय सुरू केला. काही वर्षे आपल्या छोट्याशा दुकानातच मसाले तयार करताकरता त्यांना बर्‍यापैकी उत्पन्न मिळू लागले. त्यामुळे त्यांची रोजीरोटीची चिंता आता मिटली होती. सियालकोट येथील मसाला व्यावसायिक म्हणून त्यांची ख्याती हळूहळू वाढू लागली. यातच त्यांनी दिल्लीत एमडीएच एम्पायरची मुहूर्तमेढ रोवली. १९५३ साली त्यांनी चांदणी चौक परिसरात आणखी एक दुकान भाड्याने घेतले आणि १९५९ साली स्वत:चा कारखाना सुरू करण्यासाठी कीर्तीनगर परिसरात एक भूखंड विकत घेतला. जसजसा महाशय धरमपाल यांचा व्यवसाय वाढू लागला तसतसा दिल्लीचाही विस्तार होऊ लागला.
अशी यशाची एकेक पायरी चढत धरमपाल मोठे होत गेले. आज महाशय धरमपाल ‘मसाला किंग’ म्हणून ओळखले जात असले तरी त्यांच्या यशामागे खूप मोठा संघर्ष आहे. कीर्तीनगर येथे कारखाना सुरू केल्यानंतर महाशय धरमपाल यांनी कधीही मागे वळून बघितले नाही. आज केवळ भारतातच नव्हे तर जगभरात त्यांचा एम. डी. एच. ब्रॅण्ड पोचला आणि तेवढाच लोकप्रियदेखील आहे. आज संपूर्ण जगभरात विस्तार झालेल्या व्यवसायाचे मालक असलेले महाशय धरमपाल अब्जाधीश असले तरी त्यांचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत, हे आणखी एक ठळक वैशिष्ट्य.
धरमपाल एक अब्जाधीश आणि यशस्वी उद्योजक असले तरी त्यांचे एक वेगळे रूपही आहे आणि समाजसेवेचे जणू त्यांनी व्रतच घेतले आहे. आज संपूर्ण भारतात धरमपाल यांच्याकडून संचालित केल्या जाणार्‍या शाळा आणि रुग्णालये आहेत. धरमपाल यांनी १९७५ मध्ये सुभाषनगर, आर्यसमाज येथे १० खाटांचे रुग्णालय सुरू केले. त्यानंतर १९८४ साली त्यांनी नवी दिल्लीच्या जनकपुरी भागात आई छननच्या स्मरणार्थ २० खाटांचे रुग्णालय सुरू केले. आता तिथे ५ एकर विस्तीर्ण परिसरात सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल असून, ३०० खाटांची सोय आहे. शिवाय एमआरआय, सीटी स्कॅन, हार्ट विंग, न्युरो सायन्स, आयव्हीएफ इत्यादी अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध आहेत.
सध्या नव्वदीत असलेले धरमपाल नियमितपणे रुग्णालयाला भेट देतात. याशिवाय त्यांनी एमडीएच इंटरनॅशनल स्कूलसह २० शाळा सुरू केल्या आहेत. यशस्वी उद्योजक या नात्याने यशोशिखरावर असूनही समाजातील गरिबांना मदत करण्याची सामाजिक जबाबदारी पार पाडणारे महाशय धरमपाल खरोखरच युवकांसाठी एक प्रेरणास्रोत आहेत.

Posted by : | on : 28 Oct 2018
Filed under : आसमंत, डॉ.वाय.मोहितकुमार राव, पुरवणी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, डॉ.वाय.मोहितकुमार राव, पुरवणी, स्तंभलेखक (377 of 1288 articles)

Car Sales Analysis
अर्थपूर्ण : यमाजी मालकर | मोटारींचा खप एकदोन टक्क्यांनी कमी झाला, तरी हल्ली चिंता व्यक्त केली जाते आहे. खरे म्हणजे, ...

×