ads
ads
भारत-पाक चर्चा रद्द

भारत-पाक चर्चा रद्द

►इम्रान सरकारचाही खरा चेहरा दिसला ►भारताचा स्पष्ट आरोप, वृत्तसंस्था…

शहरी नक्षलवादाला राहुल गांधींचा पाठिंबा

शहरी नक्षलवादाला राहुल गांधींचा पाठिंबा

►अमित शाह यांचा आरोप, वृत्तसंस्था रायपूर, २१ सप्टेंबर –…

तोयबाच्या पाच अतिरेक्यांचा खातमा

तोयबाच्या पाच अतिरेक्यांचा खातमा

►भारतीय जवानांची मोठी कामगिरी, वृत्तसंस्था श्रीनगर, २१ सप्टेंबर –…

बुरहान वाणीवर पाकने काढले टपाल तिकीट

बुरहान वाणीवर पाकने काढले टपाल तिकीट

इस्लामाबाद, २० सप्टेंबर – आम्ही दहशतवादाचे पाठीराखे नाहीत, असा…

जैश, तोयबापासून भारताला मोठा धोका

जैश, तोयबापासून भारताला मोठा धोका

►पाकने उपलब्ध केली सुरक्षित भूमी ►अमेरिकेची स्पष्ट भूमिका, वृत्तसंस्था…

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

►एअर इंडियाच्या विमानातील इंधन आले होते संपत ►अमेरिकेच्या वादळाचाही…

डीजे, डॉल्बीवर बंदी कायम

डीजे, डॉल्बीवर बंदी कायम

वृत्तसंस्था मुंबई, २१ सप्टेंबर – मुंबई उच्च न्यायालयाने डॉल्बीवरील…

वित्त आयोगाने राज्याला आर्थिक शक्ती प्रदान करावी

वित्त आयोगाने राज्याला आर्थिक शक्ती प्रदान करावी

►सुधीर मुनगंटीवार यांची मागणी, तभा वृत्तसेवा मुंबई, २० सप्टेंबर…

वित्त आयोगाकडून अर्थव्यवस्थेवर आधी चिंता, नंतर प्रशस्तीपत्रक

वित्त आयोगाकडून अर्थव्यवस्थेवर आधी चिंता, नंतर प्रशस्तीपत्रक

तभा वृत्तसेवा – मुंबई, २० सप्टेंबर राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत दोनच…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:16 | सूर्यास्त: 18:21
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, सतीष भा. मराठे, स्तंभलेखक » महासत्ता भारत : एक विचार

महासत्ता भारत : एक विचार

॥ विशेष : सतीश भा. मराठे |

आपण महासत्ता होण्यापासून अजून इतके लांब का आहोत? असा प्रश्‍न कधी आपल्या देषातील बुद्धिजीवींना पडला आहे का? अर्थातच नाही. असा प्रश्‍न पडत नसल्यानेच आपण महासत्तापदाची पात्रता असूनही महासत्ता म्हणवून घेण्याच्या कल्पनेच्या जवळपास पोहचू शकलो नाही, हे नाकारता येणार नाही. या उदासीनतेसाठी विविध सरकारांच्या आजपर्यंतच्या धोरणांना जबाबदार ठरविल्यास ते चूक ठरू नये.

India A Potential Superpower Of Capabilities

India A Potential Superpower Of Capabilities

दि. २४ सप्टेंबर २०१७ रोजी बीबीसी या ब्रिटिश प्रसारण संस्थेचे भारतातील माजी प्रमुख मार्क टुली यांनी इंडियन एक्स्प्रेस कार्यालयाला भेट देऊन अनेक विषयांवर मते व्यक्त केली. मार्क टुली यांचा जन्म ऑक्टोबर १९३५ मध्ये भारतातील कलकत्ता शहरात झाला. १९६५ सालापासून त्यांनी पत्रकारितेच्या जगतात आपले विशिष्ट स्थान निर्माण केले आहे. ३० वर्षे ते बीबीसीचे पत्रकार म्हणून नवी दिल्ली येथे कार्यरत होते. आणिबाणीच्या काळात इंदिरा गांधी सरकारने त्यांना १८ महिने देशातून हद्दपार केले होते. असे असले तरी १९९२ साली पद्मश्री व २००५ साली पद्मभूषण या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले.
या अशा बहुपरिचित व नामांकित ज्येष्ठ पत्रकाराने इंडियन एक्स्प्रेसच्या चर्चासत्रात एक धक्कादायक विधान केले. यावर देशातील माध्यमांमध्ये व बुद्धिजीवी वर्गात विचारमंथन होणे नितांत गरजेचे असून तसे होतांना दिसत नसल्याने हा लेखप्रपंच केला आहे.
वस्तुत: भारतवर्षाचा विचार करता असे म्हणावे लागेल की भारत देषाला हजारो वर्षांचा इतिहास असून समृद्ध वारसा लाभला आहे. या देशाची संस्कृती अतिप्राचीन असून जगात कोठेही न आढळणारी विविधता येथे नांदत आहे. जगाने झिडकारलेल्या अनेक वांशिक गटांना या देशाने सामावून घेतले आहे. शिया मुसलमान इराण व्यतिरिक्त एवढ्या मोठ्या संख्येने फक्त भारतातच सुरक्षित आहेत. हजार वर्षांंपासून विविध आक्रमणांचा आघात सोसत आपण संस्कृती, परंपरा, साहित्य व कला यांची जपणूक करत जगाला चकित करत आलो आहोत. या कालावधीत जगातील अनेक संस्कृती लोप पावल्या. आपण मात्र आपल्या संस्कृतीचे धीराने जतन करू शकलो. भारतातील पहिली मशीद ६२९ साली केरळ येथे कोण्या मुस्लिम आक्रमकाद्वारे मंदिर पाडून बांधली गेली नसून एका हिंदू राजाच्या सहमतीने बांधली गेली आहे. उदारतेचे व सहिष्णुतेचे यापेक्षा दुसरे उदात्त उदाहरण या जगात अन्यत्र सापडणे शक्य नाही. गेल्या ७० वर्षांत जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपण कीर्ती मिळवली आहे. शांततेने मतपत्राद्वारे अनेक सरकारे सत्तारूढ झाली तर अनेक पदच्युतही झाली. आपण गंभीरपणे राबवत असलेली ही विशाल लोकशाही जगासाठी कौतुकाची व आश्‍चर्याची बाब ठरली आहे. अशा रीतीने लोकशाही हा आधुनिक आविष्कार अंगिकारूनही सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करत आपण जगासमोर उदाहरणे ठेवली आहेत.
लोकसंख्येच्या दृष्टीने जगात चीननंतर आपला दुसरा क्रमांक लागतो. आपल्या देशाचे क्षेत्रफळ ३२ लाख ८७ हजार वर्ग कि. मी. इतके असून रशिया, अमेरिका, कॅनडा, ब्राझील, चीन व ऑस्ट्‌ेलिया या देशांनंतर भौगोलिक आकारमानाच्या अनुषंगाने आपण सातव्या स्थानावर आहोत. जगातील वेगाने विकसित होत जाणार्‍या मोजक्या अर्थव्यवस्थेत भारताची गणना होते. आपल्या स्थलसेनेचे जगातील स्थान ४ थ्या क्रमांकाचे आहे. संख्या व गुणवत्तेच्या आधारे आपल्या वायुसेनेचा व नौसेनेचा क्रमांक अनुक्रमे ५ वा व ७ वा लागतो. भारताला ७००० कि. मी. चा सागरी किनारा लाभला असून देश नैसर्गिक साधनसंपत्तीने युक्त आहे. या तपशीलावरून एक बाब स्पष्ट होते की, आधुनिक जगातील सर्व निकष व मानकांना अनुसरून देखील भारताची गणना जगातील पहिल्या दहा देशात होते, हे कुणीही नाकारू शकत नाही. तरीही जागतिक मंचावर अग्रक्रम देतेवेळी भारताला हेतुपुरस्सर का डावलले जाते ?
याबाबत देशातील विचारवंतांनी ठामपणे मते मांडण्याची आता वेळ आली आहे.
टुली महाशयांचे म्हणणे आहे की भारताच्या महासत्ता होण्याच्या व संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीचे स्थायी सदस्य होण्याच्या महत्त्वाकांक्षेशी ते सहमत होऊ शकत नाहीत. त्यांचे म्हणणे आहे की, भारताची महत्त्वाकांक्षा वेगळी असली पाहिजे. इथे नागरिकांची उन्नती होईल व त्यांना स्वातंत्र्य उपभोगता येईल, तसेच या देशाने जगापुढे आदर्श ठेवणारा अशीच आपली प्रतिमा कायम ठेवावी. जाता जाता त्यांनी असा टोला लगावला की ‘ए लॉट ऑफ पीपल विल से, मार्क टुली वॉन्ट्स टु स्टॉप इंडिया बिकमिंग ए सुपर पॉवर. मे बी आय डू.’ हे त्यांचे विचार पश्‍चिमी जगताच्या विचारसरणीचे प्रातिनिधिक रूप मानावे का? याचा गंभीरपणे व चिकित्सकपणे प्रतिवाद करणे गरजेचे आहे.
मार्क टुली यांचे वक्तव्य आणि जणू त्यांच्या पाठीमागे दडलेले पाश्‍चात्य जग या दोन्हीचीही गंभीरपणे दखल घेतली पाहिजे. कारण एक काळ असा होता, जेव्हा इंग्रज अभिमानाने म्हणायचे, ‘त्यांचा सत्तासूर्य कधी मावळतच नाही. प्रत्यक्षात इंग्रजी साम्राज्याचा सूर्य मावळून अनेक वर्षे लोटली आहेत. त्यांच्या मानसिकतेत मात्र अजून बदल झाला नाही, हेच मार्क टुली यांच्या वरील मतप्रदर्शनातून ध्वनीत होते. एके काळी जगावर राज्य करणार्‍या ब्रिटनचे युरोपातील स्थानही आता डळमळित झाले आहे. त्यांचे महासत्तापण आता पोकळ वासा ठरले असून नावापुरतेच उरले आहे. असे असले तरी हे बदललेल्या परिस्थितीत भारत आणि भारतासारख्या इतर देशांना पुनर्रचित सुरक्षा परिषदेत स्थायी स्थान देऊन इंग्लंडने जगापुढे आदर्श ठेवावा, असे मार्क टुलीसाख्या इंग्रजांना का वाटत नाही? यातून आम्ही एकेकाळचे राज्यकर्ते असल्याने इतरांनी त्यांची बरोबरी न करता फक्त आदर्शवाद जपत रहावा असा मार्क टुली यांनी दिलेला अनाहूत सल्ला त्यांच्या ठायी असलेल्या वृथा अहंकाराचाच द्योतक आहे. इंग्लण्डने २००३ च्या इराक युद्धात विनाकारण उडी घेत मानवाधिकार मूल्यांची पायमल्ली करून आयसिस नावाचा राक्षस उभा केला, त्यावर मार्क टुलींनी भाष्य करणे आवश्यक होते. असे करणे कदाचित त्यांना शक्य झाले नसल्याने भारताला डोस पाजणे तुलनेने सोपे आहे असे वाटत असावे. आपण मात्र अजूनही साहेबांचे तथाकथित वर्चस्व झुगारून देण्यास तयार नाही याचाच वारंवार प्रत्यय येतो.
असे सगळे असले तरी आपण महासत्ता होण्यापासून अजून इतके लांब का आहोत? असा प्रश्‍न कधी आपल्या देषातील बुद्धिजीवींना पडला आहे का? अर्थातच नाही. असा प्रश्‍न पडत नसल्यानेच आपण महासत्तापदाची पात्रता असूनही महासत्ता म्हणवून घेण्याच्या कल्पनेच्या जवळपास पोहचू शकलो नाही, हे नाकारता येणार नाही. या उदासीनतेसाठी विविध सरकारांच्या आजपर्यंतच्या धोरणांना जबाबदार ठरविल्यास ते चूक ठरू नये. तसेच देशाचे बुद्धिजीवी, माध्यमे, विचारवंत, मुत्सद्दी राजकारणी, नोकरशहा व ज्यांच्यासाठी आपण लोकशाही राबवत आहोत ती या देशातील जनता, हे सर्व या स्थितीस जबाबदार आहेत. देशाच्या नागरिकांनी आपल्या राजकीय पक्षांना व देशातील विविध सरकारांना असा प्रश्‍नच कधी विचारला नाही. मतदार या बाबतीत जर इतका अज्ञानी, उदासीन व निष्क्रिय असेल तर नजीकच्या भविष्यकाळातही हे चित्र पालटण्याची शक्यता धूसर दिसते.
आजही सर्व महासत्तांना असेच वाटते की भारताने संकटसमयी कोणाच्यातरी दयेवर व मेहेरबानीवर अवलंबून रहावे. नकाराधिकारासाठी कोणापुढेतरी हात पसरावा. भारतासारख्या विशाल व महासत्तेची क्षमता असलेल्या देशाने ही अगतिकता अजून किती काळ सहन करायची? याबाबत सुस्पष्ट भूमिका घेण्याची वेळ आता आली आहे. आपला शेजारी चीनने ऑक्टोंबर १९६४ मध्ये १ ला अणुस्फोट केला. आपल्याकडे अशी क्षमता त्याआधीच होती. १९६१ साली अशी क्षमता प्राप्त केल्याचे सूतोवाच अणुशक्ती आयोगाचे तत्कालीन प्रमुख डॉ. होमी भाभा यांनी केले होते. तत्कालीन राजकीय नेतृत्वाच्या कचखाऊ वृत्तीमुळे व राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी आपण अण्वस्त्रसिद्धता मिळवू शकलो नाही. भारताने १ ला अणुस्फोट मे १९७४ मध्ये केला. याने संतुष्ट होत आपण पुन्हा या आघाडीवर तब्बल २४ वर्षे निष्क्रियता दाखवली. चीनने मात्र अण्वस्त्रधारी देश होत संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व मिळवत अनेक फायदे पदरी पाडून घेतले. चीनने याच कालावधीत जगाच्या राजकारणात ठसा उमटवत जग चीनला डावलू शकणार, नाही अशी व्यवस्था केली. आपण मात्र स्थायी सदस्यत्वाची १९५५ साली चालून आलेली सुवर्णसंधी याच चीनसाठी गमावून जागतिक राजकारणाच्या सारीपटावरून दूर फेकलो गेलो. भारत आज याचे दुष्परिणाम भोगत आहे.
आपण युद्धात पाकिस्तानला हरविल्याने हुरळून जाऊन आपले स्थान खुजे करून बसलो हीच खरी शोकांतिका आहे. या कोशातून आपण जितक्या लवकर बाहेर पडू तितका आपला पुढील मार्ग सुकर होईल.
चीनने महासत्ता होण्यासाठी १९७० च्या दशकात एकाच वेळी अनेक आघाड्यांवर कूच केली. अण्वस्त्रप्राप्ती, आक्रमक विस्तारवाद, चतुर मुत्सद्देगिरी व प्रचंड मोठी वेगवान अर्थव्यवस्था गेल्या ४०/४५ वर्षांत निर्माण करत जगाला दखल घेण्यास भाग पाडले. १९५० साली भारत व चीन आर्थिक क्षेत्रात समान पातळीवर होते. चीनने मात्र यापुढील काळात भारताला बरेच मागे टाकत आपल्याला रक्षात्मक भूमिका घेण्यास भाग पाडले. भारतीय नेतृत्व मात्र जग आपल्या सभ्य वर्तणुकीची कधीतरी दखल घेईल हे दिवास्वप्न पहात बसले. मार्क टुली जे म्हणतात त्याचा आजच्या संदर्भात हाच अर्थ आहे की तुम्ही फक्त आदर्शवादाला कवटाळत स्वप्नरंजन करावे. आज आपल्याकडे सर्व काही असताना आपण जगाकडून सतत दुर्लक्षिले जाऊन अपमानित का केले जात आहोत? यावर गंभीरपणे विचार व्हायला हवा. आजच्या घडीला आपल्या महासत्तापदप्राप्ती बाबत देशात तीन विचारधारा अस्तित्वात आहेत.
• पहिल्या विचारधारेचा असा समज आहे की आपली मृदु सत्ता हाच महासत्ता होण्याचा परवाना आहे.
• दुसर्‍या विचारधारेचा असा ठाम विश्‍वास आहे की नैतिकता व नैतिकतेवर आधारित धोरणच आपले मोठेपण सिद्ध करण्यास पुरेसे आहे.
• तिसरी विचारधारा असे मानते की भारत अनेक अन्तर्गत समस्यांनी ग्रस्त आहे. देशात पराकोटीची आर्थिक व सामाजिक विषमता आहे. आपले अविकसित असणे हाच महासत्ता होण्यातील मुख्य अडसर आहे. आपल्या धोरणकर्त्यांनी मात्र या सर्वांच्या पलीकडे जाऊन विचार व कृती करण्याची वेळ आली आहे. यासाठी देशातील बुद्धिवंतांनी नीतीनिर्धारणकर्त्यांवर योग्य तो दबाव ठेवणे ही काळाची गरज आहे. जनतेच्या योग्य दबावाशिवाय राज्यकर्ते वर्तमानात व भविष्यातही चुका करतील. ही शक्यता नाकारता येत नाही. हाच मार्क टुली यांच्या अनाहुत सल्ल्याचा मतितार्थ आहे, असे समजण्यास हरकत नाही.
महासत्तापदाच्या जवळ पोचण्यासाठी भारताला खालील किमान गोष्टी कराव्या लागतील.
• विद्यमान सरकारला देशांतर्गत व पक्षांतर्गत विरोध मोडून काढत आर्थिक सुधारणा वेगाने रेटाव्या लागतील. ज्यामुळे सध्याच्या साडे सहा ते सात टक्के इतक्या आर्थिक विकासदराहून साडे नऊ ते दहा टक्के विकासदर गाठणे शक्य होईल. ही स्थिती प्राप्त करण्यासाठी फार मोठ्या राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे.
• परराष्ट्रधोरणात डोकलाम प्रकरणी दाखविला तसा ठामपणा भविष्यातही दाखविण्याची गरज आहे.
• दक्षिण चीन समुद्रातील विवादाबाबत जागतिक न्यायाधिकरणाने दिलेला आदेश धुडकाऊन लावत चीनने या भागात कृत्रिम बेटे निर्माण करत आपले विस्तारवादी धोरण उद्दामपणे रेटले. यामुळे या क्षेत्रातील फिलिपिन्स, व्हिएतनाम व जपान यासारखे देश त्रस्त झाले. या सर्वांना आता भारताकडून यासंबंधी निर्णायक कृतीची अपेक्षा आहे. आपणास असे करण्यापासून परावृत्त करावे हाच डोकलाम आगळिकिचा संदेश असावा, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. या अनुषंगाने आपण दृढता कायम राखल्यास महासत्ता होण्याच्या दृष्टीने एक प्रमुख पाऊल ठरेल.
• हिंदी महासागरात आपलेच वर्चस्व कायम राहील, यासाठी या क्षेत्रातील अनेक राष्ट्रांना आपल्याला विश्‍वासात घ्यावे लागेल. जगाचा फार मोठा व्यापार याच क्षेत्रातून होत असतो. चीन ८० टक्के खनिज तेल याच भागातून आयात करतो. चीनने भविष्यात पुन्हा डोळे वटारल्यास आपण मलाक्काच्या सामुद्रधुनीत त्यांची ही आयात बाधित करू शकतो, याचे ठाम संकेत आपणास आत्ताच द्यावे लागतील. आपल्याकडे अशी क्षमता असून ती चाणाक्षपणे प्रकटित करण्याची मुत्सद्देगिरी आपल्याला दाखवावी लागेल.
• राष्ट्रहित कशात आहे याची ठोस परिभाषत्त आपल्याला जगापुढे मांडावी लागेल. अशी परिभाषा १९७८ साली चिनी नेतृत्वाने जगापुढे आक्रमकपणे मांडली होती.
• भारताचे सुरक्षातंत्र गुंतागुंतीचे असून त्यात तात्काळ सुधारणा करण्याची आवष्यकता आहे. जगातील शस्त्र आयात करणारा सर्वात मोठा देश हे बिरूद अभिमानाने मिरवण्यासारखे नाही, याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे. एकात्मिक संरक्षण कमांड स्थापन करण्याची मागणी तात्काळ पूर्ण केल्याशिवाय चीन-पाकिस्तान यांचे आव्हान तसेच ईशान्य भारतातील घुसखोरींची समस्या सक्षमपणे निपटू शकणार नाही. आपल्या देशात इतर प्रगत राष्ट्रांप्रमाणे संरक्षणविषयक धोरणाचे व्हिजन डॉक्युमेंट अस्तित्वात नाही. याच्या अभावी संकटप्रसंगी तात्पुरते धोरण राबवत आपण शत्रूशी मुकाबला करत आलो आहोत. आधुनिक युगात मात्र असे प्रासंगिक व तात्पुरते धोरण राबवत आपले महत्त्व व क्षमता प्रदर्शित करू शकणार नाही.

Posted by : | on : Oct 22 2017
Filed under : आसमंत, पुरवणी, सतीष भा. मराठे, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, सतीष भा. मराठे, स्तंभलेखक (949 of 1372 articles)

Sanghgeet
तरंग : दीपक कलढोणे | कुणी कुणाला आदेश न देता हे स्वयंसेवी भावनेने चाललेले संघकार्य होते. नाट्यगृहातील पावणे नऊशे आसने ...

×