ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी » माओवाद्यांचे शहरातील कारस्थान

माओवाद्यांचे शहरातील कारस्थान

॥ विशेष : प्रवीण दीक्षित |

गेल्या काही दिवसांत राज्यासह देशाच्या विविध भागात नक्षलसमर्थक लोकांच्या अटकसत्रानंतर ‘शहरी नक्षलवाद’ हा निरनिराळ्या ठिकाणांच्या चर्चेचा मुख्य मुद्दा झाला. लोकांनी निवडून दिलेल्या अत्युच्च लोकप्रतिनिधींना ठार मारण्याचा कट रचल्याचा व त्यासाठी आवश्यक दारुगोळा, शस्त्रे मिळविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या सर्वांवर आहे. त्यासाठी नेपाळ व मणिपूर येथील कॉम्रेडस्ची मदत घेणेही प्रस्तावित होते. ‘शहरी नक्षलवाद’ काय आहे? ‘शहरी नक्षलवाद्यां’चे कार्य कसे चालते? शहरी आणि जंगलातील नक्षलवादी एकमेकांना कसे पूरक काम करतात? याचीच माहिती या लेखातून जाणून घेऊ या.

Urban Naxals T

Urban Naxals T

२००४ मध्ये विविध माओवादी, लेनिनवादी कम्युनिस्ट घटकांचे विलीनीकरण झाल्यावर कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) स्थापण्यात आला. २००७मध्ये या पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक झाली, त्यात त्यांनी चीनच्या धर्तीवर भारतात क्रांती करून राज्यसत्ता बळकावण्याचा सविस्तर विचार “Strategy and Tacticts of the Indian Revolution, CPI (Maoist) २००७’ या नावाने प्रसिद्ध केला. त्यानुसार, जर भारतात क्रांती करून राज्यसत्ता काबीज करायची असेल, तर त्यासाठी भारतातील सैन्यदल, पोलिस व शासकीय अधिकार्‍यांची कत्तल करण्यात यावी, हे प्रमुख उद्दिष्ट ठरविण्यात आले. प्रथम ग्रामीण भागात क्रांती करावी, असे ठरविण्यात आले. कारण तिथे भारतीय सैन्य व पोलिस यांचा सहज पाडाव करता येणे शक्य होईल व नंतर हळूहळू शहरांनाही हेरून ज्या ज्या ठिकाणी शासकीय किल्ले मजबूत आहेत, ते ते हळूहळू उद्ध्वस्त करावेत, असे ठरविण्यात आले. अशाप्रकारे ग्रामीण भागांमध्ये गुरिल्ला गट व मुक्त भागाची निर्मिती करण्यात यावी व यासाठीचे आवश्यक पाठबळ निर्माण करण्यासाठी सामान्य माणसाची मदत इतक्या मोठ्या प्रमाणावर करावी की, ज्यामध्ये शासनाचे सर्व सैन्य व पोलिस बुडून जातील, असेही ठरविले गेले.
सदरच्या प्रस्तावात शहरी भागांना क्रांतीच्या दृष्टीने विशेष महत्त्व देण्यात आले आहे. कारण, औद्योगिक कामगार हे शहरात मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत व ते क्रांतीला अनुकूल घटक आहेत आणि सत्ताधार्‍यांची प्रशासकीय यंत्रणाही शहरी भागात एकत्रित आहे. शहरातील चळवळ ही प्रामुख्याने नवीन उमेदवार व नेतृत्त्व देण्याचा उगम आहे. त्यातूनच विविध गोष्टींची रसद पुरविणे, तंत्रज्ञान मिळविणे, माहिती मिळविणे या सर्व जबाबदार्‍या शहरातील माओवादीच पार पाडू शकतात. शहरातील सशक्त माओवाद अजून सबळ केला नाही, तर माओवादी चळवळीवर मर्यादा पडतील व चळवळीची प्रगती खंडित होईल, हे ते चांगल्याप्रकारे जाणून होते. शहरातील माओवादाची उद्दिष्टे खालील प्रकारे ठरवण्यात आली आहेत.
१. सामान्य लोकांना क्रांतिसाठी प्रोत्साहित
करणे व एकत्र करणे.
२. त्यांची एकत्र संघटना तयार करणे.
३. त्यांना सशस्त्र कामासाठी तयार करणे.
हे विस्ताराने जाणून घेऊया.
१. सामान्य लोकांना क्रांतिसाठी प्रोत्साहित
करणे व एकत्र करणे –
कामकरी, अर्धकुशल कामगार, विद्यार्थी, मध्यम वर्गातील चाकरमानी व बुद्धिजीवी यांच्या माध्यमांतून ही जबाबदारी पार पाडणे महत्त्वाचे आहे. तसेच विशेष सामाजिक घटक जसे महिला, अनुसूचित जातीय सदस्य, धार्मिक अल्पसंख्यांक यांना क्रांतिसाठी तयार करणे आवश्यक आहे.
२. त्यांची एकत्र संघटना तयार करणे –
कामगारांना एकत्र करणे व नंतर कामगार व शेतकरी यांच्यात एकी घडविणे. कामगारांच्या शोषणाविरुद्ध व अन्यायाविरुद्ध त्यांना एकत्र करणे. जागतिकीकरणाला विरोध करणे. हिंदू प्राबल्यास विरोध करणे, हे यातील महत्त्वाचे घटक आहेत. शहरातील माओवाद्यांना ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडायची आहे.
३. त्यांना सशस्त्र कामासाठी तयार करणे –
ग्रामीण भागामध्ये सशस्त्र उठाव होत असताना शहरातील चळवळीतून त्याला पूरक काम करणे महत्त्वाचे आहे. यासाठी शहरातील माओवाद्यांनी सैन्य, पोलिस, प्रशासन, न्यायव्यवस्था या विविध घटकांमध्ये खोलवर प्रवेश करावा. महत्त्वाच्या औद्योगिक चळवळीत लोकांना प्रोत्साहित करावे. ग्रामीण सशस्त्र चळवळीच्या नेत्यांच्या बरोबर समन्वय राखून घातपात करावा. आवश्यक ती रसद पुरवावी, ही कामे करावयाची आहेत. यासाठी वर उल्लेखलेल्या समाजातील लोकांना प्रोत्साहित करणे, ही त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे. शहरातील माओवाद्यांनी मदत करताना आवश्यक ते साहित्य, मनुष्यबळ याचा अव्याहत पुरवठा होईल, याची खात्री करणे आवश्यक आहे. सैन्य, अर्धसैन्य, पोलिस, वरिष्ठ प्रशासन या सर्व ठिकाणी माओवादी घुसविणे आवश्यक आहे. सैन्य व पोलिसदले यांच्यामध्ये समविचारी लोकांना प्रोत्साहित करणे, त्यांच्या मदतीने क्रांती करणे, सैन्याची माहिती माओवादी लोकांना पुरविणे व अशा प्रकारे सैन्य व पोलिसदल आतून पोखरून खिळखिळे करणे ही महत्त्वाची कामे आहेत. शस्त्रे व दारूगोळा, संचारमाध्यमे, औषधांचा पुरवठा, दुरुस्तीसाठी आवश्यक मदत, प्रचार, प्रसिद्धी, आजारी व्यक्तींना मदत या सर्व गोष्टींसाठी शहरी चळवळीतील कार्यकर्त्यांवरच क्रांती अवलंबून असते. गुरिल्ला भागांच्या आसपास असलेल्या छोट्या शहरांमध्ये क्रांतिकार्‍यांना मदत करण्यासाठी भूमिगत कार्यकर्त्यांनी समर्थक तयार करणे आवश्यक आहे.
शहरातील माओवाद्यांच्यामध्ये सतत नेतृत्त्व निर्माण करणे, उघड व गुप्त कामांमध्ये समन्वय राखणे, वरिष्ठ आणि कनिष्ठ यांच्यामध्ये एकसूत्रता ठेवणे, शहरी व ग्रामीण नेतृत्वामध्ये सौहार्द ठेवणे ही यांची कामे आहेत. क्रांती हे माओवाद्यांच्या विविध संघटनांचे एकमेव राजकीय उद्दिष्ट असले, तरी त्यांच्या विविध संघटना जणू काही आपला एकमेकांशी काहीच संबंध नाही, असा वरकरणी आव आणत असतात. पण आतून मात्र त्या एकमेकांशी घट्ट जोडलेल्या असतात.
यालाच संघटनात्मक विघटीकरण म्हणतात. कनिष्ठ पातळीवरील सर्व कार्यकर्त्यांचा माओवादी विचारसरणीवर पक्का विश्‍वास असावा लागतो. त्यामुळेच ते संघटनेच्या राजकीय उद्दिष्टांना पार पाडण्याचे काम अडचणीतही पूर्ण करू शकतात. हे करताना वरिष्ठ नेतृत्त्वाने कनिष्ठ कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संबंध ठेवू नये. जर कोणी कार्यकर्ते शासनाला माहिती झाले, तर त्यांना त्वरित भूमिगत ठेवण्यात यावे, अशी त्याची पद्धत आहे. सुरुवातीपासून ते क्रांतीचे उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत क्रांतिसाठी आवश्यक नवीन व्यक्ती मिळविण्यासाठी शहरी भाग हा अत्यंत महत्त्वाचे उगमस्थान आहे. विविध स्तरांवर क्रांती घडवून आणण्यासाठी व राजकीय प्रशिक्षण तसेच चळवळीवरील विश्‍वास घट्ट करण्यासाठी शहरांतून नवनवीन कॉम्रेड्सचा पुरवठा होणे गरजेचे आहे. (पान क्र. २९ ते १२५) Strategy and Tacticts of the Indian Revolution, CPI (Maoist) २००७ डिसेंबर, २०१२ मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडी (UPA)ने जाहीर केले की, २००७ नंतर वरील प्रमाणे माओवाद्यांचे हस्तक म्हणून काम करणार्‍या १२८ संघटना आहेत व सर्व राज्य सरकारांनी या संघटनांविरुद्ध कारवाई करावी. वरवरा राव, सुधा भारद्वाज, सुरेंद्र गडलिंग, रोना विल्सन, अरुण परेरा, व्हरनॉन गोन्साल्विस व महेश राऊत हे या अशा संघटनांमधे काम करत होते. यातील परेरा व गोन्साल्विस हे २००७ साली त्यांच्या आक्षेपार्ह कारवायांमुळे पकडले गेले होते व कित्येक वर्षे तुरुंगात होते.
वरवरा राव याला आंध्र प्रदेश व तेलंगणा पोलिसांनी अनेकवेळा पकडले होते. ज्या संघटनांमध्ये या व्यक्ती काम करत होत्या, त्या प्रतिबंधित अशा कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) यांना मदत करत होत्या व त्यांच्या भूमिगत कार्यकर्त्यांना मदत करून लोकांनी लोकशाही मार्गाने निवडून दिलेल्या शासनास उलथवून टाकण्याचा प्रयत्न करत होत्या. कामगारांचे व शोषितांचे राज्य स्थापन करण्यासाठी जनक्रांती करणे व त्यासाठी शहरी व ग्रामीण भागातील चळवळींमध्ये समन्वय निर्माण करणे हे माओवाद्यांचे प्रमुख धोरण आहे. शहरातील कार्यकर्त्यांमधून माओवाद्यांना रसद व कार्यकर्ते यांचा अखंड पुरवठा करणे, आवश्यक सामुग्री पुरविणे, तंत्रज्ञान उपलब्ध करणे, कुशल कामगार देणे, माहिती पुरविणे, औषधे पुरविणे या कार्यकर्त्यांच्या जबादार्‍या शहरातील उघडरीत्या काम करणार्‍या कार्यकर्त्यांसाठी ते पार पाडत होते. माओवाद्यांनी २००१ पासून ६ हजार ९५६ निरपराध नागरिकांना व २ हजार ५१७ पोलिसांना निर्घृणपणे ठार मारले आहे. याशिवाय विकासासाठी आवश्यक असे रस्ते, पूल, इमारतींचा विध्वंस केला आहे व विकास पूर्णपणे बंद पाडला आहे. वनवासींनी माओवाद्यांना झिडकारल्यामुळे आता ते शहरी भागात विशेष लक्ष देत आहेत.
६ जून, २०१८ रोजी व नंतर महाराष्ट्र पोलिसांनी पकडलेल्या व्यक्ती व त्यांच्याशी निगडीत असलेल्या संस्था पुढीलप्रमाणे सुरेंद्र गडलिंग (Gen. secretary Indian Association of People’s Lawyers),, रोना (Public Relation Secretary Committee for the Release of Political Prisoners) सुधीर ढवळे (Republican Panthers), शोमा सेन (Ewecutive Member, Committee for Protection for Democratic Rights ), महेश राऊत(State Convener, Maharashtra Vistha[an Virodhi Jan Vikas Andolan), वरवरा राव (President, Revolutionary Democratic Front), सुधा भारद्वाज (Vice President, Indian Association of People’s Lawyers), गौतम नवलाखा (Leader, People’s Union for Democratic Rights), व्हरनॉन गोन्साल्विस (Gen. Secretary, Maharashtra State Committee of CPI/Maoist), आणि अरूण परेरा (ew-Member, Maharashtra State Committee of CPIMaoist). लोकांनी निवडून दिलेल्या अत्युच्च लोकप्रतिनिधींना ठार मारण्याचा कट रचल्याचा व त्यासाठी आवश्यक दारुगोळा, शस्त्रे मिळविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या सर्वांवर आहे. त्यासाठी नेपाळ व मणिपूर येथील कॉम्रेडस्ची मदत घेणेही प्रस्तावित होते.
शोषित व पीडित व्यक्तींना सामाजिक न्याय मिळवून देणे हे जर या लोकांचे उद्दिष्ट असते, तर शासनाच्या या घटकांसाठीच्या विविध कल्याणकारी योजना परिणामकारक रीत्या राबविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले असते व शासनाला मदत केली असती. जी लोकशाही सतत वाढावी म्हणून सर्व थरांवर गेली सात दशके प्रयत्न झाले आहेत, तीच लोकशाही नष्ट करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. लोकशाहीने उपलब्ध करून दिलेले भाषणाचे स्वातंत्र्य शासनाविरुद्ध वापरून मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट-माओइस्ट प्रणाली जी चीन व रशियातूनही हद्दपार झाली आहे, ती त्यांची प्रेरणास्थळे आहेत. इतके दिवस दुर्गम अशा भागातील वनवासींना क्रूररीत्या छळल्यानंतर त्यांनी शहरातील गरीब, झोपडपट्ट्यांत राहणार्‍या व्यक्ती व सहज बळी पडणारी महाविद्यालये, विद्यापीठांतील तरुण-तरुणी यांना सावज करायचे ठरविले आहे व त्यातूनच जवाहरलाल नेहरू विद्यापीठासारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये, TISS मध्ये त्यांनी चळवळी उभारल्या आहेत. ‘प्राध्यापक साईबाबा’ हा अशाच लोकांचा म्होरक्या होता. परंतु, न्यायालयाने त्याच्या देशविघातक कारवायांसाठी त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळे महाविद्यालयातील तरुण, शहरातील बुद्धिजीवी, अनुसूचित जातीतील व्यक्ती यांनी माओवाद्यांच्या स्वार्थी भूलथापांना बळी न पडता त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करत असलेल्या योजनांमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. तसेच, अन्य विरोधी पक्षांनीही हे समजून घेणे गरजेचे आहे की, या चळवळीचे लक्ष भाजप नसून सर्व देशात अराजक माजवणे हे आहे. (लेखक निवृत्त पोलिस महासंचालक आहेत) •••

Posted by : | on : 16 Sep 2018
Filed under : आसमंत, पुरवणी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी (128 of 794 articles)

Digree
मानसरंग : मयुरेश डंके | माझा एक कारागिर मित्र आहे. हार्मोनियम ट्यून करणं आणि दुरूस्तीची कामं तो करतो. साधारण दहावी ...

×