ads
ads
जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

•भारतीय लष्कराचा कठोर संदेश •पुलवामा हल्ल्यामागे पाक लष्कर, आयएसआयच,…

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

नवी दिल्ली, १९ फेब्रुवारी – महाराष्ट्राच्या कडे-कपारीत ज्यांच्या नावाचा…

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

•एका वैमानिकाचा मृत्यू, दोन सुरक्षित •एअर शो सरावादरम्यान दुर्दैवी…

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

•इम्रान खानची धमकी, इस्लामाबाद, १९ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी…

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

सॅन फ्रान्सिस्को, १९ फेब्रुवारी – मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी…

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

•सर्व आरोप काल्पनिक, आंतरराष्ट्रीय तत्त्वांचीही पायमल्ली •हरीश साळवे यांचा…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

मुंबई, १७ फेब्रुवारी – यापुढे पाकिस्तानी कलाकार आणि गायकांसोबत…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 18:28
अयनांश:
Home » आसमंत, डॉ.वाय.मोहितकुमार राव, पुरवणी, स्तंभलेखक » माध्यान्ह भोजन ते कोट्यवधींचे साम्राज्य!

माध्यान्ह भोजन ते कोट्यवधींचे साम्राज्य!

॥ अभिप्राय : डॉ.वाय.मोहितकुमार राव |

नानजुंदी यांच्या या यशानं प्रभावित झालेल्या सराफा व्यावसायिकांनी त्याला आपला नेता घोषित केलं आहे आणि आता ते अखिल कर्नाटक विश्‍वकर्मा महासभेचे अध्यक्ष आहेत. नानजुंदी यांनी व्यवसायाच्या विस्तारासोबतच समाजाच्या कल्याणासाठीही बरंच काही केलं आहे. कोणत्याही अडचणीमुळं खचून न जाता जोमानं प्रयत्न केले तर यश हमखास मिळतंच हाच आदर्श नानजुंदी यांनी आपल्या जीवनातून घालून दिला आहे.

K P Nanjundi

K P Nanjundi

‘तुम्हाला बदल घडलेला बघायचा असेल, तर त्याची सुरुवात स्वत:पासूनच केली पाहिजे.’’ हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे शब्द आहेत. विषम परिस्थितीत नशिबाला दोष देत बसण्यापेक्षा स्वत: मेहनत करण्याची तयारी ठेवून हातपाय हलविले तर जीवनाला नक्कीच कलाटणी देऊन यशोशिखर गाठता येतं, हे अनेकांनी आपल्या कर्तृत्वानं दाखवून दिलं आहे. त्यापैकीच एक नाव आहे ते म्हणजे बंगळुरूचे कुल्लाचार नानजुंदाचार. बालपणी शाळेत मिळणार्‍या माध्यान्ह भोजनावर अवलंबून असलेली ही व्यक्ती आज दक्षिण भारतातील नावाजलेली सराफा व्यावसायिक बनली असून, त्यांच्या कंपन्या आणि शोरूम्सची उलाढाल १५०० कोटींपेक्षा जास्त झाली आहे.
बंगळुरूच्या विनोबानगर या तुलनेनं गलिच्छ असणार्‍या वस्तीत राहणारे कुल्लाचार नानजुंदाचार, पालक आणि सात भावांचं पोट भरण्यासाठी नगरपालिकेच्या शाळेत मिळणारे माध्यान्ह भोजन घेऊन जात असत. ते भोजनही इतक्या सहजासहजी मिळत नसे. ही साडेतीन दशकांपूर्वीची परिस्थिती होती. परंतु, कुल्लाचार यांनी अथक परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर नशिबालाही बदलण्यास बाध्य केलं. आज पन्नाशी गाठलेले नानजुंदाचार त्यांच्या शाळेतील रेकॉर्डमध्ये असलेल्या नावानं ओळखले जात नाहीत. आता ते के. पी. नानजुंदी आणि श्री लक्ष्मी गोल्ड पॅलेस चेनचे मालक म्हणून ओळखले जातात. संपूर्ण कर्नाटकात नानजुंदी हे नावाजलेलं व्यक्तिमत्त्व आहे. दोन वर्षांपूर्वी ८०० कोटींची उलाढाल असलेल्या नानजुंदी यांच्या व्यवसायाने आता हजार कोटींचा टप्पा ओलांडला आहे. बंगळुरू, मंगळुरू, हुबळी आणि बेळगाव येथे नानजुंदी यांच्या सात सराफा पेढ्या आहेत. गोव्यासह आणखी सहा ठिकाणी त्यांनी सराफा व्यवसाय सुरू केला आहे. शिवाय त्यांची पाच सिल्क शोरूम्स आहेत. त्यांचं वैशिष्ट्यपूर्ण शोरूम हे चार मजली असतं आणि त्यामधील प्रत्येक दोन मजल्यावर सिल्क आणि सोने-चांदीचा व्यवसाय आहे. मध्य कर्नाटकतील दावणगिरी येथे चित्रपटगृह, म्हैसूर येथे स्टार हॉटेल उभारण्याचंही काम सुरू आहे.
परंतु, हे शक्य तरी कसं झालं? आपल्या जीवनाचा अनोखा प्रवास उलगडताना नानजुंदी आपसूकच भावुक होतात आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रूही तरळतात. आपल्यासह भावंडांचं पालनपोषण करताना वडिलांची होत असलेली दमछाक त्यांना आठवते. खाद्यान्नामध्ये सर्वांत स्वस्त असलेली रागी घेण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नसायचे. झोपडपट्टीत राहात असताना पिण्याच्या पाण्यापासून ते भाजीपाला आणि खाद्यान्न हे सगळं निकृष्ट दर्जाचं मिळतं, असं सांडपाण्याच्या नाल्याच्या बाजूला असलेल्या आपल्या घराची कहाणी सांगताना ते म्हणाले. बंगळुरूच्या एच. सिद्धय्या रोडवरील पादचारी मार्ग हे माझ्यासह वस्तीतील इतर पुरुषांसाठी प्रातर्विधी उरकण्याचं ठिकाण होतं. वस्तीत फक्त दोनच शौचालये होती आणि त्याचा वापर महिला करायच्या. कधीकाळी अजूनही मी बालपण घालवलेल्या झोपडपट्टीत जातो, असं आज बंगळुरूच्या व्यावसायिक वर्तुळातील मोठं प्रस्थ असलेल्या नानजुंदी यांनी सांगितलं.
आधीची अनेक वर्षे त्यांना अजूनही खुपतात. नानजुंदी झोपडपट्टीत राहतात असं समजल्यानंतर शाळेतील मुलांनी त्यांच्यापासून दूर राहणंच पसंत केलं. त्यांच्या आईनं फुलं विकून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न केला. सोनार असलेल्या आपल्या वडिलांकडून नानजुंदी यांनी दागिन्यांचे पॉलिश, दुरुस्ती आणि नवे दागिने तयार करण्याचं कौशल्य प्राप्त केलं. परंतु, त्यांनी तयार केलेले दागिन्यांचे लहान तुकडे मोठ्या सराफा पेढ्यांमध्ये विकणं जिकिरीचं काम होतं. पेढीचे मालक त्यांना घाण समजत आणि भेटीसाठी तीन-चार तास रखडून ठेवत. आठ मुलांपैकी चौथे असलेले नानजुंदी यांनी सातवीची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली आणि नंतर चांगल्या शाळेत प्रवेश घेतला. परंतु, जीवनातील अडचणी कमी होण्याचं नाव घेत नव्हत्या. नानजुंदी महाविद्यालयात असताना त्यांच्या वडिलांचं यकृताच्या कर्करोगानं निधन झालं आणि आई व भाऊ मद्याच्या आहारी गेले.
अशातच नानजुंदी यांनी १८ व्या वर्षात पदार्पण केलं. गरिबी, उपासमार, अपमान आणि मृत्यू या सर्व गोष्टी त्यांच्या कुटुंबात घडल्या. घरी मोठं कुटुंब असल्यानं त्यांचं पोट भरण्याच्या दृष्टीने मद्य किंवा धूम्रमान हा त्यांच्यासमोर पर्यायच नव्हता. त्यामुळे सकाळी ते वडिलांचा व्यवसाय चालवत असत. सायंकाळी कॉलेज करून रात्री ऑटो चालवत. फेर्‍यांच्या दरम्यान जेवढी होईल तेवढीच त्यांची झोप. परंतु, एवढे काबाडकष्ट केल्यानंतरही अडचणी संपता संपेनात. अखेर पतीनं दिलेलं १५ ग्रॅमचं मंगळसूत्र दे, अशी गळ त्यांनी आपल्या विवाहित बहिणीला घातली. बहिणीनं आनंदानं ते त्याला दिलं. नानजुंदी यांनी त्या मंगळसूत्रातून लहान लहान दागिने तयार केले आणि मोठ्या किरकोळ सराफा व्यापार्‍यांना विकले. माझे दागिने विकावे यासाठी मी व्यापार्‍यांचे अक्षरश: पाय धरत असे. मी चोरीच्या सोन्यातून ते तयार केले, असाही संशय काही जण घेत. परंतु, वडिलांना ते ओळखत असल्याने हळूहळू माझी स्वीकार्यता वाढू लागली. बहुधा या स्वीकार्यतेमुळेच त्यांनी १०० रुपयांचा चष्माही घेतला. झोपडपट्टीत लहानाचा मोठा झालो आणि बळकट स्नायू असल्याने माझ्या व्यक्तिमत्त्वात ती नजाकत नव्हती. त्यामुळं मी श्रूड दिसण्यापेक्षा मवाळ दिसण्यासाठी लूकमध्ये बदल केला आणि डोळ्यांवर चष्मा घालण्यास सुरुवात केली, असं झिरो नंबरचा चष्मा उतरवताना नानजुंदी म्हणाले. त्यांची ही क्लृप्ती चांगलीच कामी आली. आणखी काही महिने संघर्ष केल्यानंतर त्यांना चांगलं उत्पन्न मिळू लागलं. त्यांनी मग हळूहळू पाच ऑटोरिक्षा व एक कार्गो व्हॅन खरेदी केली. जवळच्याच भागात घर भाड्याने घेऊन कुटुंबाला तिथं हलवलं. स्वतंत्र किचन, हॉल, स्वच्छतागृह आणि वीज यामुळे तो एकप्रकारे राजमहालच होता. प्रथमच घरात विजेचा वापर केला तेव्हा मी १८ वर्षांचा होतो, असे नानजुंदी म्हणाले.
जॅकी चॅनची जादू
कालांतरानं नानजुंदी यांनी एक सराफा दुकान उघडलं आणि ते लहान भावाच्या हवाली केलं. वर्षं पुढे सरकत गेली आणि आर्थिक परिस्थिती सुधारली. मग नानजुंदी यांनी अ‍ॅक्शन स्टार जॅकी चॅनच्या चित्रपटांचं वितरण सुरू केलं. चेन्नई येथून ते रीळ आणत आणि बंगळुरूच्या वेगवेगळ्या भागांमध्ये त्यांचं वाटप करत. या प्रक्रियेत त्यांना बराच आर्थिक लाभ झाला. यातून नंतर त्यांनी चित्रपटांना अर्थसाहाय्य करण्यास प्रारंभ केला आणि कालांतराने ते कन्नड चित्रपट सृष्टीतील आघाडीचे वित्तपुरवठादार झाले. नंतर त्यांनी तीन कन्नड चित्रपटांची निर्मितीही केली. त्यांचा नावलौकिक वाढताच आघाडीचे कन्नड चित्रपट निर्माते त्यांच्या घरी येऊ लागले. अशाच एका घटनेत चित्रपट क्षेत्रातील मोठ्या व्यक्तीनं त्यांना टोमणा मारला. यांच्यासारखे लोक फक्त अर्थपुरवठा करण्याच्याच लायकीचे असतात, त्यांना अभिनयातलं काहीच कळत नाही, असं तो म्हणाला. मी झोपडपट्टीतून आलो असल्यानं माझ्याकडं गमावण्यासारखं काहीही नाही, असं उत्तर त्यांनी दिलं. मात्र, आज मी खूप लांब व अवघड डायलॉग एका शॉटमध्ये म्हणू शकतो, असा त्यांचा दावा आहे.
नानजुंदी यांच्या या यशानं प्रभावित झालेल्या सराफा व्यावसायिकांनी त्याला आपला नेता घोषित केलं आहे आणि आता ते अखिल कर्नाटक विश्‍वकर्मा महासभेचे अध्यक्ष आहेत. नानजुंदी यांनी व्यवसायाच्या विस्तारासोबतच समाजाच्या कल्याणासाठीही बरंच काही केलं आहे. जीवनात यशस्वी प्रवास सुरू असताना १० वर्षांपूर्वी आणखी एक कलाटणी मिळाली आणि त्यांच्या कारला अपघात झाला. चालक थोडक्यात बचावला. परंतु, महासभेतील त्यांच्या तीन सहकार्‍यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नानजुंदी यांना खाजगी हेलिकॉप्टरनं बंगळुरूच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्या वेळी आठवडाभर अतिदक्षता विभागात असलेल्या नानजुंदी यांना चित्रपटसृष्टीतील कोणीही भेटायला आलं नाही. एवढंच नव्हे, तर त्यांच्या मृत्यूची अफवा ऐकून उधार पैसे घेतलेल्यांनी आनंद साजरा केला. त्यामुळं आठ वर्षांपूर्वी त्यांनी या व्यवसायाचा त्याग करून सराफा व्यवसायात प्रवेश केला. अशा कठीण प्रवासातून त्यांनी आज एवढं मोठं साम्राज्य उभं केलं आहे. कोणत्याही अडचणीमुळं खचून न जाता जोमानं प्रयत्न केले तर यश हमखास मिळतंच हाच आदर्श नानजुंदी यांनी आपल्या जीवनातून घालून दिला आहे.

Posted by : | on : 12 Aug 2018
Filed under : आसमंत, डॉ.वाय.मोहितकुमार राव, पुरवणी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, डॉ.वाय.मोहितकुमार राव, पुरवणी, स्तंभलेखक (525 of 1222 articles)

Private Coaching Classes
प्रासंगिक : अरुणकुमार मुंदडा | खाजगी क्लासचालकांच्या मनमानीला अटकाव करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने कायदा करण्याचे ठरवले आहे. शासनाने महाराष्ट्र खाजगी ...

×