ads
ads
तिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक

तिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक

►हवाईदल प्रमुख धानोआ यांचे प्रतिपादन, नवी दिल्ली, १८ नोव्हेंबर…

‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

►६८ टक्के लाभार्थ्यांनी घेतला फायदा, नवी दिल्ली, १८ नोव्हेंबर…

फक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा

फक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा

►एनआरसीमध्ये समावेश करण्याचा मुद्दा, गुवाहाटी, १८ नोव्हेंबर – राष्ट्रीय…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

१३ विधेयके सादर होणार

१३ विधेयके सादर होणार

►आजपासून मुंबईत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ►मराठा आरक्षणाचे विधेयकही सादर…

वरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता

वरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता

►पुणे पोलिसांचा न्यायालयात दावा ►आठ दिवसांची पोलिस कोठडी, पुणे,…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:35 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:

मीडिया कसा असावा?

॥ रोखठोक : हितेश शंकर |

गेल्या दोन दशकांत, भारतात मीडियाची संख्यावृद्धी आणि विस्तार जोरदार राहिला आहे. विशेषत: वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया चॅनेल्सची संख्या आणि त्यांच्या भौगोलिक व्याप्तीचा अतिशय विस्तार झाला आहे. ही चांगली गोष्ट आहे. परंतु प्रश्‍न हा आहे की, तंत्रज्ञानामुळे प्राप्त सुविधा आणि प्रतिस्पर्धेमुळे आलेला वेग यामुळे माध्यमांचे जग आधीच्या तुलनेत अधिक चांगले झाले आहे का?

Media

Media

‘मी जितका असत्याला घाबरतो, तितका मृत्यूलाही घाबरत नाही!’’
-वेद व्यास (महाभारत, वनपर्व, ३०२/६)
पाञ्चजन्य आणि भारतीय जनसंचार संस्थेद्वारा खोट्या बातम्यांची झाडाझडती (अंक १ जुलै २०१८) मीडियाशी संबंधित विविध पक्षांना या मुद्यावर सावध आणि जागरूक करण्यात सफल झाली, असे वाटते. मीडियाची स्वायत्तता आणि शोधवृत्ती अबाधित ठेवून, त्याच्या आत्मनियमनाचा मुद्दा मीडियामध्येच वारंवार चर्चेला येणे, हा याचा संकेत आहे. याशिवाय व्हॉट्सअ‍ॅपसारख्या माध्यमांना अफवा पसरविण्याच्या तंत्रापासून रोखण्याचे तंत्रज्ञान, प्रशासनिक आणि न्यायिक पुढाकारदेखील स्वागतयोग्य म्हणता येईल. परंतु, अजून बरेच काही होणे बाकी आहे.
गेल्या दोन दशकांत, भारतात मीडियाची संख्यावृद्धी आणि विस्तार जोरदार राहिला आहे. विशेषत: वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया चॅनेल्सची संख्या आणि त्यांच्या भौगोलिक व्याप्तीचा अतिशय विस्तार झाला आहे. ही चांगली गोष्ट आहे. परंतु प्रश्‍न हा आहे की, तंत्रज्ञानामुळे प्राप्त सुविधा आणि प्रतिस्पर्धेमुळे आलेला वेग यामुळे माध्यमांचे जग आधीच्या तुलनेत अधिक चांगले झाले आहे का? मीडियामध्ये आणि आता विविध मंचांवर बातम्यांची सत्यता आणि बातम्यांचा दृष्टिकोन यांच्यासंबंधीच्या चर्चा बाहेर येऊ लागल्या आहेत. पत्रकार आणि संपादक सार्वजनिक मंचावरून सांगताना दिसतात की, आता आधीसारखे राहिले नाही. लोक म्हणू लागले आहेत की, पत्रकारांना भारतीय समाज आणि जनतेच्या प्राथमिकतेबाबत फारच कमी माहिती असते. एकतर ते मुद्दे आणि धोरणांना समजून घेण्यास असमर्थ आहेत किंवा ते वेड पांघरून पेडगावला तरी जात असले पाहिजे. जर हा विस्तार आहे, जर हा विकास आहे, तर हे मीडियावर लावण्यात आलेले प्रश्‍नचिन्हही आहे. सर्व गोष्टी चांगल्या असूनही सर्व मुसळ केरात जाण्याचे हे विचित्र उदाहरण आहे. सोशल मीडियानामक एका नव्या लोकमाध्यमाने या पारंपरिक पत्रकारितेला अनेकदा आरसा दाखवून या प्रश्‍नांना अधिकच धारदार केले आहे. संख्यात्मक वृद्धी आणि विस्तारानंतर प्रथमच, मीडियाला आत्ममंथन व आत्मनिर्देशन करण्यास बाध्य करणारा हा काळ आहे. लोकांच्या मनात असलेली मीडियाची प्रतिमाच त्याच्या भविष्याला निर्धारित करणार आहे. मग प्रश्‍न असा उभा राहतो की, कुठल्या प्रतिमेने आणि कुठल्या भावाने मीडिया भविष्याशी तालविन्यास करू शकतो? याचे उत्तर शोधणे सोपे नाही; परंतु सूचना आणि संवादरूपी या सागराचे विश्‍लेषण करण्यासाठी माशांशी तुलना करून त्याचे आकलन करणे मनोरंजक ठरेल.
पहिली तुलना कॉर्प माशांची आहे. या माशाची संख्या आणि भौगोलिक व्याप्ती खूपच विस्तृत आहे. हे म्हणजे, वृत्तपत्रांच्या वारेमाप आवृत्त्या किंवा इंटरनेटच्या समुद्रात असंख्य न्यूजपोर्टल असण्यासारखे आहे. परंतु, कॉर्पच्या प्रचंड संख्येशी तुलना करीत पुढे जाऊ तर लक्षात येईल की, त्यांची प्रचंड संख्या असण्याचे कारण, त्या काही विशिष्ट जलचर प्राण्यांचे भक्ष्यही आहेत. जे विकले जाईल, तेच दिसेल- संख्या आणि खळबळ… असे वाटते की, आजकाल भारतीय कॉर्प मीडियाने यालाच आपला मंत्र बनविला आहे. असे नसेल तर मग या अज्ञात आवृत्त्या किंवा स्वनामधन्य पोर्टल कुणाला पोसतात बरे? मीडिया कॉर्प मासे होऊ शकत नाही. कारण, आपले वाचक/दर्शक यांच्याशिवाय इतर वर्गाला पोषित करणारी पत्रकारिता भलेही कुण्या दुसर्‍याला पोषित करण्याचे माध्यम बनेल, परंतु स्वत: पुष्ट होऊ शकत नाही. कॉर्प माशांची हीच तर स्थिती आहे. याचा निष्कर्ष काय- संख्याबळ असून-नसून काही फरक पडत नाही; त्यासाठी विश्‍वासार्हता आवश्यक असते. याचाच अर्थ मीडियाने कॉर्प मासे होणे पुरेसे नाही.
…तर मग शार्क झाल्याने काम होईल! वेगवान, चलाख, शिकारी… शार्कची संख्या खूप जास्त नसते; परंतु तो धोकादायक शिकारी प्राणी असल्याकारणे आपला वंश टिकवून ठेवतो. अतिशय निबर चामडी, कुठल्याही वस्तूला फाडून फेकण्यासाठी पर्याप्त शक्तिशाली जबडे आणि असंख्य टोकदार दात! अस्तित्व वाचविण्यासाठी हे रूप पुरेसे भयानक आहे; परंतु जगाकडे केवळ शिकार्‍याच्या नजरेने बघत मीडियाने शार्कचे रूप धारण केले असले तरी निष्कर्ष काय- वार झेलण्यासाठी निबर चामडी असणे ठीक आहे; परंतु या निबर चामडीखाली संवेदनशीलताच शिल्लक नसेल तर सर्व काही वायाच जाणार! कारण, शार्क भलेही शिकार करून जगत असेल, मीडिया परस्परसंबंधाविना चालू शकत नाही. म्हणजेच, मीडियाला शार्क बनण्याच्याही पुढे जायला हवे.
आणखी एक मासा आहे डॉल्फिन. संख्येने कमी, परंतु डौलदार. जलचर प्राण्यांमध्ये सर्वांत बुद्धिमान. अशात, मीडियाला संख्याबळ, तेज, खळबळ आणि भीती पसरविणार्‍या रूपकांऐवजी, डॉल्फिनचे रूप अधिक चपखल बसेल. वेगवेगळ्या प्राण्यांनी भरलेल्या समुद्रात एक शांत, बुद्धिमान जीव. जो नव्या गोष्टी शिकण्यास उत्सुक असतो आणि नीट शिकल्यावर तसे आचरणही करतो. चुकांतून शिकतो, योग्य गोष्टींची पुनरावृत्ती करतो आणि लोकांचा प्रिय… मीडियाचे हे रूप का होऊ शकत नाही? जो कपट, कारस्थानांपासून दूर आहे, अनावश्यक हिंस्र नाही, ज्याचे अस्तित्व दुसर्‍यांना भयकंपित करीत नाही; उलट आकर्षक आहे…
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे- डॉल्फिन मनुष्यांचे मनोरंजन करते म्हणून ती चांगली आहे असे नाही… डॉल्फिनचे फळणे-फुलणे स्वस्थ सामुद्रिक पर्यावरणीय तंत्राचा संकेतदेखील आहे- त्या माशाची उपमा, मीडिया आणि मत्स्यजगतातील गुणसाम्यतेच्या शोधाचे चातुर्य, भलेही कुठल्याही प्रकारे पूर्णपणे ‘फिट’ बसणारी नसेल, परंतु सांकेतिक रूपात बरीच चपखल बसणारी आहे.

Posted by : | on : 16 Sep 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, स्तंभलेखक, हितेश शंकर.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, स्तंभलेखक, हितेश शंकर (186 of 1152 articles)

Sceince And Adhyatma
विशेष : प्रशांत आर्वे | विकारमुक्त जीवनाचा हा संदेश सगळ्यांपर्यंत जाण्याची आज गरज असताना, आम्ही त्याचा विज्ञानाशी बादरायण सबंध जोडत ...

×