ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, ल.त्र्यं. जोशी, स्तंभलेखक » ‘मी टू’ उच्चभ्रूंची उत्स्फूर्त चळवळ

‘मी टू’ उच्चभ्रूंची उत्स्फूर्त चळवळ

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी |

Me Too

Me Too

‘मी टू’ या स्त्रीमुक्तीच्या चळवळीची हल्ली विशेषत: इंग्रजी माध्यमातून बरीच चर्चा होत आहे. मराठी माध्यमातूनही ती कमी प्रमाणात पण होत आहे. ते आवश्यकही आहे. कोणत्याही कारणाने महिलांची अवहेलना व्हायलाच नको. त्या महिला आहेत, दुबळ्या आहेत म्हणून नव्हे. त्यांच्यावर उपकार करण्याच्या भावनेतूनही नव्हे तर स्त्रीपुरुष समानतेचा सिध्दांत मनोमन स्वीकारण्याच्या मानसिकतेतून व्हायला हवी. पण ते उद्दिष्ट ‘मी टू’ चळवळीबाबत मिटक्या मारत तिची खिल्ली उडविण्यामुळे निश्‍चितच साधले जाणार नाही. तिचे खरे स्वरुप समजून घेणेच त्यासाठी आवश्यक आहे. कारण तो समाजपरिवर्तनाचा एक गंभीर विषय आहे आणि असे परिवर्तन मुंगीच्या वेगानेच होत असते हा आपला अनुभव आहे.
मुळात आज तरी माध्यमांमधून फोफावणारी ही चळवळ उच्चभ्रूंची उत्स्फूर्त चळवळ आहे. ती आपल्या महिलांनाच प्रथम कळली असे नाही. २०१७ मध्ये अमेरिकेत तिचा जन्म झाला. आपल्याकडील उच्चभ्रू महिलांचे त्याकडे लक्ष वेधले गेले. त्यापैकी काही धैर्याने पुढे आल्या. जाहीरपणे बोलू लागल्या. पण याबाबत भारतात व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रिया पाहता आणि प्रतिक्रियांपेक्षा सामूहिक मौनाचा विचार करता आपण या चळवळीचे गांभीर्यच अद्याप लक्षात घेतले नाही असे म्हणावे लागेल. तसे पाहिले तर या विषयावर प्रतिक्रिया फार कमी प्रमाणात व्यक्त होत आहेत. ज्या व्यक्त होत आहेत त्यापैकी बहुसंख्य लोक ‘आताच कां?’ असा प्रश्‍न उपस्थित करुन व्यक्त होणाऱ्या महिलांची अवहेलना करीत आहेत. या विषयाची थट्टा करणाऱ्या तर शेकडो प्रतिक्रिया आहेत. पण ज्या काही प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत त्या फक्त उच्च वर्गातूनच येत आहेत. जे किमान पदवीधर आहेत, इंग्रजी बोलू, लिहू शकतात, जे इंटरनेट हाताळूू शकतात, उच्चभ्रू वर्तुळात वावरतात, त्यांच्याकडूनच ह्या प्रतिक्रिया येत आहेत. हा वर्ग अर्थातच बॉलिवुड, पत्रकारिता, विचारवंत, कार्पोंरेट क्षेत्र यामधील आहे. परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम.जे.अकबर हे राजकारणात असल्याने त्यांना घेरण्यापुरत्याच प्रतिक्रिया राजकारण्यांकडून आल्या आहेत. काही अपवाद वगळता राजकारणातील कुणाही महिलेने आतापर्यंत या चळवळीमध्ये सहभाग घेतल्याचे मला तरी ठाऊक नाही. उलट एरव्ही दूरचित्रवाणीवरुन प्रतिक्रियांचा पाऊस पाडणाऱ्या राजकारण्यांनी चळवळीबाबत मौन पाळण्याचेच ठरविलेले दिसते. बॉलिवुड व पत्रकारिता क्षेत्रातील घटनांबाबतही या क्षेत्रातील नेहमीच्या बडबोल्या मंडळींनी सावधगिरी बाळगण्याचीच भूमिका घेतलेली दिसते. कदाचित उद्या आपलेही नाव चर्चेत येऊ शकते या भीतीपोटी हे घडत असेल. पण त्यामुळे या विषयावरील चर्चा बंद होईल अशी कुणाची समजूत असेल तर ती चुकीची ठरण्याची शक्यताच अधिक आहे.
या चळवळीत आतापर्यंत व्यक्त झालेल्या महिलांच्या हेतूबद्दल कुणी शंका घेऊ शकेल, आता दहा वर्षांनंतर काय होऊ शकणार, हा प्रश्‍नही उपस्थित केला जात असेल पण एक बाब ध्यानात घेणे आवश्यक आहे की, या महिलांनी आपली व्यथा किंवा क्षोभ सहजासहजी सार्वजनिक केलेला नाही. तिचा हेतू काय असेल हे तिचे तिला ठाऊक पण एक तनुश्री दत्ता हिमतीने पुढे आली आणि तिच्यापासून प्रेरणा घेऊन अन्य महिला मोठ्या धैर्याने पुढे येत आहेत. आपला दावा सिध्द करण्यासाठी आपल्याजवळ पुरेसे पुरावे आहेत काय, याचाही त्यांनी फारसा विचार केलेला दिसत नाही. तसे अशा प्रकरणांचे पुरावे गोळा करणे हेही अतिशय कठिण काम आहे. शिवाय जाहीरपणे बोलण्याचे धैर्य गोळा करायलाही त्यांना स्वत:शी, नातेवाईकांशी, मित्रमैत्रिणींशी बोलावे लागले. त्यातून त्यांना पाठबळ मिळत गेले. ‘माझ्यावर बलात्कार झाला किंवा माझी छेडखानी झाली’ हे महिलेने आणि संबंधित पुरुषाचे नाव घेऊन तपशीलवार जाहीरपणे सांगणे ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. अशा महिलेवर ‘तिला प्रसिध्दीचा सोस असल्या’चा आरोप सहज करु शकतो, पुरुषप्रधान समाज ‘महिलेतच काही तरी खोट असेल’असा विचार करु शकतो, याची तिला भीती असते. अशाच प्रकारच्या अन्यायाच्या शिकार झालेल्या महिला बदनामीच्या भीतीने मौन पाळण्यातच धन्यता मानण्याची शक्यताही असते. शिवाय मानहानीच्या कारवाईची तलवार टांगलेलीच असते. आपली तक्रार कायद्याच्या चौकटीत बसेलच याची खात्रीही नसते. उलट आपण लोकांच्या टवाळीचा विषय बनू याची खात्री असते.अशा परिस्थितीत तसे बोलणे किती कठिण असते याची कुणीही कल्पना करु शकतो. त्यामुळेच त्यांच्या अभिव्यक्तीची उपेक्षा करणे चुकीचे ठरेल. उलट त्यांची गंभीरपणे दखल घेणेच आवश्यक आहे. केवळ अमेरिकेतून एक वर्षानंतर आपल्याकडे आली असे म्हणून वा ती चळवळ राजकीय हेतूने चालविली जात आहे असे म्हणून त्यातून सुटका करुन घेता येणार नाही.
अर्थात या महिलांचे सर्व आरोप खरेच असतील असे समजण्याचेही कारण नाही. प्रत्यक्ष चौकशीतूनच ते उघड होऊ शकते. पण बलात्कार किंवा विनयभंगांचे हे प्रकार त्या महिलांपुरतेच मर्यादित नाहीत. त्यांच्या विशिष्ट परिस्थितीमुळे त्या बोलत आहेत व इतर बोलत नाहीत एवढाच फरक आहे. आज समाजाच्या विविध क्षेत्रात त्याचा प्रत्यय रोज येतो. महिलांवरील अत्याचार फक्त कामाच्या ठिकाणीच होतात असेही नाही. शेवटी कामाचे कोणते ठिकाण हाही प्रश्‍न आहे. केवळ वातानुकूलित कार्यालयांमध्येच ते घडत नाहीत. घरांमध्ये, कौटुंबिक विवाह समारंभांमध्ये, क्रीडास्पर्धांमध्ये एवढेच नाही तर शेतांमध्ये आणि फुले मार्केटसारख्या भाजीबाजारांमध्येही ते घडत असतात व त्याचे एकच कारण आहे. ते म्हणजे समाजाची पुरूषप्रधानता. स्त्रीपुरुष समान असूच शकत नाहीत, अशी मानसिकता. मला जुन्या काळातील एक हिंदी चित्रपट आठवतो. त्यात दिवंगत जीवन हा कलाकार खलनायकाची भूमिका करीत होता. अडचणीचा प्रसंग आला व पत्नीने बोलण्याचा प्रयत्न केला की, तो तिला पहिला प्रश्‍न विचारत असे. ‘पती कौन होता है?. पत्नीचे ठरलेले उत्तर असे ‘साक्षात परमेश्‍वर’. त्यावर त्याचा ‘ तो फिर अंदर जाव’ हा आदेशही ठरला असे. कदाचित ती अतिशयोक्ती असेल पण आपल्या कौटुंबिक वा सार्वजनिक जीवनात महिलांना कितपत सन्मानाने वागविले जाते हा प्रश्‍न स्वत:लाच विचारुन पाहावा. म्हणजे महिलांशी आपण किती सन्मानाने व्यवहार करतो हे कळेल. महिला आरक्षणाचे उदाहरणही यासाठी पुरेसे आहे. आपण स्थानिक स्वराज्य संस्थांमधून महिलांना आरक्षण दिले. त्या जिल्हा परिषदांपासून तर ग्राम पंचायतींपर्यंत निवडून येऊ लागल्या. पदेही भूषवू लागल्या. पण प्रत्यक्षात त्यांच्या अधिकारांचा वापर त्यांचा पतीच करतो. सह्या फक्त महिलांच्या असतात. महिलांप्रतीची मानसिकताच यातून प्रकट होते. एकवेळ ती असली म्हणजे त्यांना सन्मान देण्याचा प्रश्‍न तर उपस्थित होत नाहीच उलट त्यांचे स्थान भोगवस्तूपुरते मर्यादित राहते. मग तिचा वापर करतांना तिच्या नात्याचा, पदाचा, अधिकाराचा प्रश्‍नच राहत नाही.
दररोज उजेडात येणाऱ्या या प्रकारांना मुख्यत: दोन बाजू आहेत. एक नैतिक आणि दुसरी कायद्याची. त्या दोन्ही सारख्याच महत्वाच्या आहेत. जे नैतिक असते ते सगळे कायदेशीरच असते हे जसे गृहित धरता येणार नाही तसेच जे कायदेशीर असते ते सगळे नैतिकच असते असेही मानता येणार नाही. आपल्याकडे महिलांसंबधीचा कायदा तर खूप कठोर आहे. ‘पत्नीच्या संमतीशिवाय तिच्याशी शरीरसंबंध करणे हा बलात्कारच असल्याचे’ आपल्या सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे आणि पत्नी वगळता सर्व महिला आपल्यासाठी माताभगिनीसमान असाव्यात अशी आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. त्यासाठी आपण छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद यांच्या नावांचा वापर करण्यास चुकत नाही. पण नैतिकता आणि कायदा अशी दोन्ही पध्दतींनी मजबूत व्यवस्था असतांनाही आपल्याकडे बलात्कारांचे, महिलांच्या विनयभंगांचे, क्रौर्याचे प्रकार होत राहावेत, वाढावेत यापरते कोणते दुर्दैव असू शकेल? आपण त्याचे दशावतार सहन करीत आहोतच. त्या अपप्रवृत्तींना आव्हान देण्याचा प्रसंग जेव्हा येतो तेव्हाही आपण महिलांच्या बाजूने उभे न राहता जेव्हा त्यांच्या हेतूबद्दल तांत्रिक मुद्दे उपस्थित करुन मूळ विषयाला बगल देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा महिलांच्या समस्यांबद्दल आपली दानत किती तकलादू आहे हेच सिध्द होते.
आता वळू या गेल्या काही दिवसात उजेडात आलेल्या आरोपांकडे. पण जसजशी ही मोहिम विस्तारत जाईल तसतशी आरोपांची अनेक प्रकरणे समोर येऊ शकतात. त्या सर्वांनाच प्रसिध्दी मिळेल असे नाही. आपल्या माध्यमांना चघळण्यासाठी आणि टी.आर.पी. वाढविण्यासाठी रोज नवा विषय हवा असतो. तो तसा मिळाला की, ‘मी टू’ही मागे पडेल. पण त्यामुळे तक्रारी थांबतील असे नाही. मग त्या तक्रारींना वेगवेगळे हेतू चिटकवले जातील आणि मी टू चळवळीचा जोरही कमी होऊन जाईल. महिला सबलीकरणाचा विषय पुन्हा बॅकसीटवर जाईल. पुढे केव्हा तरी बऱ्यापैकी खळबळजनक प्रकरण समोर आले तरच अन्यथा त्या मुद्याचे व्यवस्थित दफन होईल. काही वकील तर आताच आपल्या अशिलांना सांगायला लागले आहेत की, ‘कोर्टात जाण्याच्या भानगडीत कशाला पडता? काही दिवस चर्चा होईल व लोक विसरुन जातील. कोर्टात गेलात तर प्रकरण दीर्घकाळ चर्चेत राहील’.असे व्हायला नको असेल तर या चळवळीने तिला नेमके स्वरुप दिले पाहिजे. आजमितीला ही केवळ वळवळ करणारी चळवळच आहे. तिचा नेता कोण, तिची कार्यपध्दती कोणती याबाबत सगळी संदिग्धताच आहे आणि ती तशीच राहण्याची शक्यता आहे. कारण काही उच्चभ्रू महिला सोडल्या तर सर्वसामान्य महिला आपली कथा सांगण्यासाठी पुढे येणारच नाहीत. आपल्यावर झालेले अत्याचार हा जीवनातील एक अपघात होता असे समजून तो विसरण्याचा त्यांचा व्यावहारिक प्रयत्न असेल. पण ते गृहित धरणेही योग्य ठरणार नाही. चळवळीचा काही तरी आकृतिबंध तयार व्हायला पाहिजे. तक्रारी तर्कसंगत शेवटाला कशा जातील यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. सुदैवाने केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांनी त्यात पुढाकार घेतलेला दिसतो. त्यांनी या विषयासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. वास्तविक तशा समितीचीही गरज नाही. आपल्याकडे केंद्र व राज्यपातळीवर महिला आयोग आहेत. त्यांच्याकडेही या प्रकरणांची व्यवस्था सोपविता येईल. पीडित महिलांनी माध्यमांकडे जाऊन सुटण्यासारखा हा प्रश्‍न नाही. या आंदोलनाचे लक्ष्य बनलेले लोक संबंधित महिलांविरुध्द बदनामीचे खटले दाखल करतील. नव्हे ते सुरुही झाले आहे. नाना पाटेकरांनी तनुश्री दत्ताला नोटिस दिली आहे. एम.जे. अकबर यांनी तर ९७ वकिलांची फौज उभी करुन न्यायालयात प्रकरणही दाखल केले आहे. पण ती प्रक्रिया वेळखाऊ आहे. या प्रकारांना आळा घालायचा असेल तर सक्षम यंत्रणा आवश्यक आहे. आपण विशाखा कायदा केला. पण किती कार्यालयांमध्ये त्यानुसार समित्या स्थापन झाल्या आहेत, त्या किती प्रभावी ठरल्या आहेत, याचा विचार केला तर हाती फारसे लागत नाही. अशा प्रकरणांची गांभीर्यपूर्वक कठोर चौकशी होणे आणि पीडितांना कालबध्द न्याय मिळणे हाच त्यावर प्रभावी उपाय असू शकतो. आज उजेडात आलेली सर्व प्रकरणे अशा सक्षम यंत्रणेकडे जायला हवीत. त्यात तथ्य आढळले तर आरोपींना शिक्षा व्हावी आणि वाईट हेतूने तक्रार करणाऱ्यांवरही जरब बसायला हवी. अन्यथा आरोप प्रत्यारोपांचा हा खेळ सुरुच राहील व त्यातून कुणालाही न्याय मिळू शकणार नाही. •••

Posted by : | on : 21 Oct 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, ल.त्र्यं. जोशी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, ल.त्र्यं. जोशी, स्तंभलेखक (389 of 1288 articles)

Kailash Satyarthi
विशेष : चारुदत्त कहू | बालहक्कांसाठी लढा देताना कैलाश सत्यार्थी यांच्यावर हल्ले होण्याच्याही घटना घडल्या आहेत. १७ मार्च २०११ मध्ये ...

×