ads
ads
काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:52 | सूर्यास्त: 17:54
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, स्तंभलेखक, हितेश शंकर » मुद्यांना फक्त अनुभवायचे!

मुद्यांना फक्त अनुभवायचे!

॥ रोखठोक : हितेश शंकर |

संपुआचे राज्य होते. तीन लॉर्ड साहेब होते. तिघांनाही कामाला लावण्यात आले. तिघांनीही संविधानाची शपथ घेऊन सांगितले की, आम्ही तर चिमणीचीही हत्या करत नाही, मग संविधानाची हत्या कशी करणार? तिघांनीही आपापल्या प्रांतात भाजपाचे सरकार पाडून काँग्रेसचे सरकार स्थापन केले. काँग्रेसची ही सरकारे उघडपणे चर्चसमर्थित होती आणि ‘कुठल्याही परिस्थितीत पाहिजे म्हणजे पाहिजे’ प्रकारची होती.

Sansad Amit Shah Mamata Banarjee

Sansad Amit Shah Mamata Banarjee

निवडणुका जसजशा जवळ येतात, राजकीय क्षेत्रात हालचालींना वेग येतो. यात नवल असे काही नाही. सध्या लोकसभेची निवडणूक अजून काही इतकी जवळ आलेली नाही. तरीही राजकीय हालचालींना वेग आला आहे. हे मात्र नवलाचे आहे. जे काही होत आहे, कदाचित तसे कधी घडले नसावे. एवढ्यातच एका पक्षाच्या अध्यक्षांना संसदेत बोलूच दिले नाही. हा नेहमीचा किंवा सामान्य गोंधळ नव्हता. कुणालाही संसदेत बोलू देणे अथवा बोलू न देणे, हे केवळ संसदेच्या किंवा संसदेच्या बाहेरच्या परिस्थितीनुरूप समजून घेता येईल. यावेळी अशी कुठली परिस्थिती होती? एवढेच नाही, त्यांना संसदेच्या बाहेर, बंगालध्येही बोलू न देण्याचे फर्मान काढण्यात आले होते. याच्या आधी आणखी एका पक्षाचे अध्यक्ष जेव्हा संसदेत बोलले, त्यांचे ते बोलणे, नेहमीचीच पप्पूगिरी म्हणून मान्य करण्याची ‘एक्सपायरी डेट’ निघून गेली आहे. मामला गंभीर आहे.
प्रथम अविश्‍वास प्रस्तावाची चर्चा करू. अविश्‍वास प्रस्ताव येणार, ही बाब आधीपासून चर्चेत आणि प्रक्रियेत होती. परंतु, चर्चेसाठी हा प्रस्ताव मंजूर होईल, याची कदाचित कल्पना नसावी. असो. अविश्‍वास प्रस्ताव आला. एखादा मुद्दा? बाब ‘माना अथवा नका मानू’, या स्तराची नाही आहे. बाब जरा प्रामाणिक स्तराची आहे. एखादा मुद्दा?
मुद्दा अनुभव घेण्याच्या लायकीचा होता. पाहणे, बोलणे (वाचणे) किंवा समजण्याच्या लायकीचा नव्हता. अनुभव घेण्यापासून सुरवात करू.
१. वयोवृद्ध पक्षाची राजमाता एक शब्दही बोलली नाही. युवराज (आता सुलतान) बोलले. कृपया राज्याभिषेकाची परंपरा स्वीकारली गेल्याचा अनुभव करा.
२. युवराजांनी महत्त्वाचे म्हणून राफेल सौद्यात घोटाळ्याचा आरोप केला. कृपया कुणीही तथ्य मागू नये, कुणीही पुरावे मागू नये, फ़क्त अनुभव घ्यावा.
अनुभव घेणे चेतनही आहे आणि अचेतनही. जसे वर सांगितले आहे- बोलू देणे अथवा बोलू न देणे केवळ परिस्थितीसापेक्ष होऊन समजता येईल- म्हणून ज्यावर बोललेच न गेले किंवा बोललेच जात नाही त्या परिस्थितींचा फक्त अनुभव घ्या. जसे, संताप याचा आहे की, तुम्ही म्हैस तर सोडली, पण हे यासाठी सांगण्यात येत नाही, कारण म्हैस चोरीची होती. तुम्ही क्रोधाचा आणि त्याच्या कारणांचा केवळ अनुभव घ्या.
३. अनुभव घ्या की, भारताच्या सरन्यायाधीशांविरुद्ध महाभियोग आणण्यात येतो. कारण? तुम्ही स्वत:च अनुभव करा. प्रस्ताव सभापतींच्या पातळीवरच रद्द होतो. रद्द करण्याच्या सभापतींच्या निर्णयाविरुद्ध (किंवा अधिकाराविरुद्ध) मग न्यायालयात याचिका दाखल होते. नंतर ती आपणहूनच मागे घेतली जाते. या पूर्ण खटाटोपाचे कारण? कृपया स्वत:च अनुभव करा.
ज्या परिस्थितींवर बोलूच दिले जात नसेल, चेतन अवस्थेत त्यांना अनुभवण्याचा एकच मार्ग असू शकतो. सर्व परिस्थितींची यादी समोर ठेवणे आणि नंतर त्यांना स्वीकार किंवा रद्द करीत जाणे.
-एअरसेल-मॅक्झिम प्रकरण? काळ्या पैशाचा मामला, ज्यात चिदम्बरम् यांना स्थानिक न्यायालयाने सहकुटुंब बोलाविले आहे?
-कठुआ सामूहिक बलात्कार प्रकरणाला खूप चर्चेत आणणे आणि सत्य समोर येताच सर्वांचे चूप बसणे?
-राज्यसभेच्या २५ जागांच्या निवडणुकीचे निकाल? -रब्बी पिकांच्या समर्थन मूल्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट करणे? -दहशतवाद्यांप्रति सतत नरमाईचे धोरण घेत जाणार्‍या मेहबुबा मुफ्ती सरकारचे कोसळणे? -चर्च संचालित तमाम संस्थामंध्ये मुलांच्या खरेदी-विक्रीची आणि मुलांच्या लैंगिक शोषणाची प्रकरणे समोर येणे? -तमाम चर्चेसनी खुला फतवा जारी करणे की, हे सरकार पाडा-हटवा?
-ऑगस्ता-वेस्टलॅण्ड घोटाळा प्रकरण? -घोटाळे आणि त्यांच्या चौकशींची इतर प्रकरणे? -आसाममध्ये भारतीय नागरिकांची ओळख आणि घुसखोरांना त्यांच्यापासून वेगळे करणार्‍या न्यायालयाच्या पुढाकाराने संतापलेले राजकारण?
उपरोक्त प्रकरणांना स्वीकार करताना किंवा फेटाळताना तुम्हाला वाटू शकते की ‘उपरोक्त सर्वांचा’ पर्यायही असायला हवा.
‘उपरोक्त सर्व’च्या बाबतीत तुम्हाला देशात एक मत तयार होताना दिसेल. हे मत तरुण तर्कवादी भारताचे आहे. या तर्कवादी भारताने भ्रष्टाचाराचा दुर्गंध सुटलेल्या जुन्या घराणेशाही राजकारणाला धुर्‍यावर ठेवले आहे.
ज्यांचा कधीच कुठला पर्याय नव्हता, ते आज कल्पनातीत कष्टांनी घेरले आहेत. दुसर्‍याला जखमी करणारे राजकारण आज स्वत:च कण्हत आहे. केंब्रिज अ‍ॅनालिटिकाची चौकशी उगीचच सीबीआयकडे सोपविली.
-या चौकशीला थांबविण्याचाही पर्याय असायला हवा होता.
-केंब्रिज अ‍ॅनालिटिकाच्या प्रवर्तकांच्या कंपनीद्वारे मेहुल चौक्सीला अँटिगुआचे नागरिकत्व देण्याच्या प्रकरणालाही पर्याय असायला हवा. इतक्या पर्यायांधून कुणा एकाची निवड कशी करायची? काही जोडून बघू या.
संपुआचे राज्य होते. तीन लॉर्ड साहेब होते. तिघांनाही कामाला लावण्यात आले. तिघांनीही संविधानाची शपथ घेऊन सांगितले की, आम्ही तर चिमणीचीही हत्या करत नाही, मग संविधानाची हत्या कशी करणार? तिघांनीही आपापल्या प्रांतात भाजपाचे सरकार पाडून काँग्रेसचे सरकार स्थापन केले. काँग्रेसची ही सरकारे उघडपणे चर्चसमर्थित होती आणि ‘कुठल्याही परिस्थितीत पाहिजे म्हणजे पाहिजे’ प्रकारची होती. ही राज्ये होती- गोवा, छत्तीसगड आणि झारखंड. दोन बिंदू जुळले? आता तिसरा बिंदू जोडा. दोन-दोन आर्च बिशपांनी पत्रात कबुली देऊन दाखविले. एकाने हे लिहिले, दुसर्‍याने ते लिहिले. दोघांनी म्हटले- २०१९!
ठीक! म्हटले होते ना, अनुभवून पाहा!

Posted by : | on : 12 Aug 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, स्तंभलेखक, हितेश शंकर.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, स्तंभलेखक, हितेश शंकर (351 of 1226 articles)

Tunguska
विश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले | पाश्‍चिमात्यांचं हे वैशिष्ट्य आहे की, ते सतत शोध घेत असतात. इटलीच्या बोलोग्ना विद्यापीठातील संशोधक ...

×