ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी » मुळांपासून तुटले की, हिंदू पाकिस्तान आठवतो!

मुळांपासून तुटले की, हिंदू पाकिस्तान आठवतो!

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य |

अध्यात्म-आधारित हिंदू जीवनदृष्टीच्या मुळांशी असलेला संबंध क्षरण होत गेला की मग, हिंदू पाकिस्तान, हिंदू तालिबान, हिंदू आतंकवादसारखे विचार सुचू लागतात आणि नंतर संबंध नष्ट होण्याची प्रक्रिया पूर्ण होताच, अभारतीयीकरणाची प्रक्रियाही पूर्ण होते व ‘भारत तेरे तुकडे होंगे, भारत की बर्बादी तक जंग चलेगी, जंग चलेगी’ यांसारखे नारे तोंडात येतात. अन् तेही अडाणी, मागास आणि गरीब लोकांच्या तोंडात नाही, तर सर्वात प्रगतिशील मानल्या जाणार्‍या शैक्षणिक संस्थेतील भारतीय बुद्धिमत्तेच्या अत्याधुनिक तरुण प्रतिनिधींच्या तोंडात!

Shashi Tharoor 7

Shashi Tharoor 7

चर्चसमर्थित आणि कम्युनिस्टांच्या अभारतीय विचारांनी प्रभावित झालेले काँग्रेस पक्षाचे काही नेते, आपल्या क्षुद्र राजकीय स्वार्थासाठी भारताच्या अस्मितेवरच आघात करणारी वक्तव्ये देतात तेव्हा आश्‍चर्य कमी, पण वेदना अधिक होतात. ही नेतेमंडळी उच्चशिक्षित आहेत. यांच्या या वक्तव्यांमुळे माजी राष्ट्रपती डॉ. एस. राधाकृष्णन् यांच्या आयोगाने भारतीय शिक्षणाच्या अभारतीय स्वरूपाविषयी १९४९ साली लिहिलेल्या टिप्पणीचे स्मरण होते. ‘द अन्-इंडियन कॅरेक्टर ऑफ एज्युकेशन’वर डॉ. एस. राधाकृष्णन् यांनी लिहिले आहे- ‘एका शतकाहून अधिक वर्षांपासून या देशात सुरू असलेल्या शैक्षणिक पद्धतीबाबत एक महत्त्वाची आणि गंभीर तक्रार ही आहे की, या पद्धतीत भारताच्या भूतकाळाला दुर्लक्षित केले आहे आणि भारतातील विद्यार्थ्यांना आपल्या सांस्कृतिक ज्ञानापासून वंचित ठेवले आहे. यामुळे काही लोकांमध्ये ही भावना निर्माण झाली की, आमच्या मुळांचा काहीच मागमूस नाही. याहूनही वाईट गोष्ट म्हणजे, आमची मुळे आम्हाला अशा जगात सीमित करून टाकतात, ज्याचा वर्तमानाशी काहीही संबंध नाही, असे मानणे.’
आता एवढ्यात काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने असेच वक्तव्य दिले. त्यांनी म्हटले की, भाजपा पुन्हा सत्तेत आली तर भारत ‘हिंदू पाकिस्तान’ होईल.
कम्युनिझम्सारख्या अभारतीय विचारांमुळे आणि त्याच्या प्रभावामुळे हे अभारतीयीकरण इतके खोलवर रुजले आहे की, याने केवळ आमची विचारशक्तीच नाही, तर आमच्या शब्दावलीलादेखील प्रभावित केले आहे. हिंदू पाकिस्तान, हिंदू तालिबान, हिंदू दहशतवाद ही सर्व शब्दावली याच संपूर्ण अभारतीय विचाराची अभिव्यक्ती आहेत. मुळात ‘हिंदू पाकिस्तान’ हा शब्दच पूर्णत: विरोधाभासी आहे.
या वक्तव्याची निरर्थकता समजून घेण्याआधी भारत आणि हिंदुत्व म्हणजे काय, हे जाणून घ्यावे लागेल.
एवढ्यात नागपुरात, भारतासंबंधी बोलताना माजी राष्ट्रपती डॉ. प्रणव मुखर्जी यांनी म्हटले की, ‘‘पश्‍चिमेकडील राज्याधारित राष्ट्राची (नेशन स्टेट) संकल्पना, भारतीय राष्ट्र-संकल्पनेहून अगदी वेगळी आहे. पश्‍चिमेकडे जी राष्ट्रे विकसित झालीत, त्यांचा आधार एक विशिष्ट भूमी, एक विशिष्ट भाषा, एक विशिष्ट संप्रदाय (रिलीजन) आणि समान शत्रू हा राहिला आहे. परंतु, भारताच्या राष्ट्रीयतेचा आधार ‘वसुधैव कुटुंबकम्’ आणि ‘सर्वे भवन्तु सुखिन: सर्वे सन्तु निरामया।’ असा वैश्‍विक चिंतनाचा राहिला आहे. भारताने सदैव संपूर्ण विश्‍वाला एक परिवार म्हणून पाहिले आहे आणि भारत सर्वांच्या सुखाची आणि निरामयतेची आकांक्षा करत आला आहे. भारताची ही ओळख, मानवी समूहांचा संगम, त्यांचे आत्मसातीकरण व सहअस्तित्वाच्या प्रदीर्घ प्रक्रियेतून तयार झाली आहे. आम्हाला सहिष्णुतेतून शक्ती प्राप्त होते, आम्ही बहुलतेचे स्वागत करतो आणि विविधतेचे गुणगान करतो. हे वैशिष्ट्य अनेक शतकांपासून आमच्या सामूहिक मन आणि बुद्धीचे अविभाज्य अंग आहे. हीच आमची राष्ट्रीय ओळख बनली आहे.’’
भारताच्या या मुळातील उदार, सर्वसमावेशी, सहिष्णू, वैश्‍विक चिंतनाचा आधार, भारताची अध्यात्म-आधारित एकात्म व सर्वांगीण जीवनदृष्टी आहे. ही बाब सर्व जग जाणते. डॉ. राधाकृष्णन् यांनी याच जीवनदृष्टीला हिंदू जीवनदृष्टी (हिंदू व्ह्यू ऑफ लाईफ) म्हटले आहे. याच्या वैशिष्ट्यांबाबत ते म्हणतात-
‘‘हिंदू पद्धतीतील सुधारणेची (रीफॉर्म) विशेषता ही आहे की, प्रत्येक समूह आपल्या पुरातन संबंधांना कायम ठेवतानाच आपली ओळख तसेच हितसंबंधांचे संरक्षणदेखील करू शकतो. ज्याप्रमाणे विद्यार्थी आपल्या महाविद्यालयीन गौरवाबाबत विचार करतो, त्याचप्रमाणे हे समूह आपल्या देवतांबाबत विचार करतात. आम्हाला विद्यार्थ्यांना एका महाविद्यालयातून दुसर्‍या महाविद्यालयात न्यायचे नाही आहे, उलट प्रत्येक महाविद्यालयाचा स्तर उंचवायचा आहे, मानदंडांना वर उचलायचे आहे आणि त्यांच्या आदर्शांवर विचार करायचा आहे, त्यांचे अध्ययन व चिंतन करायचे आहे. यामुळे प्रत्येक महाविद्यालयाद्वारे आम्ही एकाच लक्ष्याची प्राप्ती करू शकू.’’
ते पुढे म्हणतात-
‘‘आम्ही बघतो की, विविध नावे दिली असली, तरी हिंदू एकाच अंतिम तत्त्वाला, चैतन्याला मानतो. त्याच्या सामाजिक व्यवस्थेत जाती अनेक असल्या तरीही समाज एक आहे. समाजात अनेक वंश अथवा जाती असतील, परंतु त्या सर्व एकसमान तत्त्वाने आपापसात बांधल्या गेल्या आहे.’’
गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांनीदेखील आपल्या ‘स्वदेशी समाज’ शीर्षकाच्या निबंधात हेच म्हटले आहे. ते लिहितात-
‘‘अनेकतेत एकता बघणे आणि विविधतेत ऐक्य प्रस्थापित करणेच भारताचा अंतर्निहित धर्म आहे. भारत विविधतेला विरोध मानत नाही आणि परक्याला शत्रू मानत नाही. म्हणून कुणाचा त्याग किंवा विध्वंस न करता, तो आपल्या विशाल व्यवस्थेत सर्वांचा समावेश करण्याची इच्छा बाळगतो. या कारणामुळे तो सर्व मार्गांचा स्वीकार करतो आणि आपापल्या परिघात सर्वांच्या महत्त्वालाही स्वीकारतो. भारताच्या या गुणामुळेच आम्ही कुणा समाजाला विरोधी मानून भयभीत होणार नाही. प्रत्येक मतभिन्नता (कॉन्फ्लिक्ट) आम्हाला आपला विस्तार करण्याची संधी देईल. हिंदू, बौद्ध, मुस्लिम आणि ख्रिश्‍चन परस्परांशी लढून भारतात मरणार नाहीत; येथे त्यांना एकप्रकारचे सामंजस्यच प्राप्त होईल. हे सामंजस्य अहिंदू नसणार, उलट ते विशिष्ट अर्थाने हिंदू असेल. त्याचे बाह्य रूप भले कितीही विदेशी असो, परंतु त्याचा अंतरात्मा भारताचाच असेल.’’
काँग्रेसचे नेते विसरून जातात की, भारताच्या या उदार, सर्वसमावेशी, एकात्म आणि सर्वांगीण आध्यात्मिक परंपरेला नाकारूनच पाकिस्तानची निर्मिती झाली आहे. शिक्षणामुळे होत असलेले अभारतीयीकरण आणि कम्युनिझम्सारख्या अभारतीय विचारांनी प्रभावित होण्याचा हा परिणाम आहे. भारत हिंदू राहिला तरी पाकिस्तान कधीही होणार नाही. ‘हिंदू’ला नाकारण्यानेच तर पाकिस्तानचा जन्म झाला आहे! भारताची एकता, स्वाधीनता, सार्वभौमत्व आणि अखंडता यातच भारताचे ‘अस्तित्व’ आहे आणि हिंदुत्वाच्या नावाने ओळखला जाणारा, भारताचा अध्यात्म-आधारित सांस्कृतिक आणि वैचारिक वारसाच भारताची ‘अस्मिता’ आहे. आधुनिक आणि उच्चशिक्षित असूनही (अथवा त्यामुळेच?) काँग्रेसची ही नेतेमंडळी आपल्या क्षुद्र राजकीय स्वार्थासाठी आपल्या भारताच्या ‘अस्मिते’लाच नाकारत आहेत. ही अतिशय आश्‍चर्याची बाब आहे. त्यांना माहीत नाही का की, अस्मितेला नाकारण्याचा परिणाम म्हणून भारताचे अस्तित्व संकटात येऊ शकते? भारताची फाळणी या अस्मितेला नाकारण्यामुळेच तर झाली होती.
खरेतर, ज्या उदार, सहिष्णू, विविधतेचे गुणगान करणार्‍या पाच हजार वर्षांहून प्राचीन संस्कृतीचा प्रणबदांनी उल्लेख केला आणि ज्या वारशाला डॉ. राधाकृष्णन् आणि रवींद्रनाथ ठाकूर यांनी हिंदू जीवनदृष्टी म्हटले, त्या वारशाचा वारसदार तर पाकिस्तानही आहे. त्या वारशाशी आपले नाते तोडूनच तर तो पाकिस्तान झाला आहे. त्या वारशाशी जर तो स्वत:ला जोडत असेल, तर आपली मुस्लिम उपासना पद्धती न सोडताही तो हिंदू बनू शकतो. एम. सी. छागला, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, पाकिस्तानात जन्मलेले कॅनडानिवासी तारेक फतेहसारखे अनेक जण, मुस्लिम असतानाही या वारशाशी स्वत:ला जोडत होते/आहेत. याप्रमाणे मुसलमान असतानाही जर पाकिस्तान या उदार आणि सहिष्णू वारशाला स्वीकारत असेल तर तो ‘हिंदू पाकिस्तान’ बनेल अर्थात् ‘भारत’च बनेल. आपले राजकीय अस्तित्व कायम ठेवूनही तो हे करू शकतो. हा भारतीय विचार आहे. नेपाळ वेगळे राज्य असतानाही भारताच्या या सांस्कृतिक वारशाशी स्वत:ला जोडतो. म्हणून भारताचा शेजारी असूनही भारतासोबत त्याला कुठलीच समस्या येत नाही.
म्हणून भारताच्या या गहन सांस्कृतिक मुळांमुळेच भारताची ओळख तयार झाली आहे. या मुळांशी जोडले राहणे, जणूकाही आपल्या अस्तित्वाशी जुळून राहणे आहे आणि हे आपल्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे. या अस्मितेला डॉ. राधाकृष्णन् आणि गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांनी हिंदू अस्मिता किंवा जीवनदृष्टी म्हटले आहे. कुणाला हिंदू शब्दावर आक्षेप असेल, तर त्याला भारतीय अथवा इंडिक असेही म्हणता येईल. परंतु, हजारो वर्षांपासूनचा आमचा वारसाच त्याची विषयवस्तू (कन्टेन्ट) राहील. तसेही, हिंदू चिंतनच मानते की, ‘सत्य’ एक असले, तरी त्याला विभिन्न नावांनी ओळखले जाऊ शकते. विषयवस्तू महत्त्वाची आहे.
आता याच्या उलट बघू या. भारतीय सांस्कृतिक विचार, परंपरेशी खोलातून जुळून राहिला, तर आमची विचार करण्याची पद्धत कशी राहते, याचे एक सुयोग्य उदाहरण आचार्य महाप्रज्ञाजींच्या वक्तव्यातून लक्षात येईल. तेरा पंथ ही श्‍वेतांबर जैनांमधील एक आध्यात्मिक परंपरा आहे. त्याचे आचार्य महाप्रज्ञ प्रमुख होते. राष्ट्रीय विचारांचे आध्यात्मिक महापुरुष म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती आणि प्रतिष्ठा होती. ते म्हणायचे- मी तेरा पंथी आहे. याचे कारण मी स्थानकवासी जैन आहे. मी स्थानकवासी जैन आहे, याचे कारण मी श्‍वेतांबर जैन आहे. मी श्‍वेतांबर जैन आहे याचे कारण की मी जैन आहे आणि मी जैन आहे, याचे कारण मी हिंदू आहे. हा भारतीय पद्धतीचा फार सुरेख विचार आहे. मी एकाच वेळी तेरा पंथी, स्थानकवासी, श्‍वेतांबर जैन आणि हिंदू असू शकतो. याचे कारण हे की, भारतीय चिंतन या सार्‍या विविधतेत कुठलाही विरोधाभास (कॉन्ट्रॅडिक्शन) बघत नाही. ही एकाचीच वेगवेगळी अभिव्यक्ती आहे. ही भारताची परंपरा राहिली आहे. परंतु, खोलातील या मुळांशी असलेला संबंध कमकुवत होत गेला की, ही व्याख्या बदलत जाते. त्यानंतर असे सांगणे सुरू होते की, मी हिंदू आहे; परंतु मी जैन आहे. मी जैन आहे, परंतु मी श्‍वेतांबर आहे. मी श्‍वेतांबर आहे, परंतु मी स्थानकवासी आहे आणि मी स्थानकवासी असलो तरी, मी तेरा पंथी आहे.
मुळांशी असलेला संबंध क्षरण होत होत अशी स्थिती येते की, मी जैन, श्‍वेतांबर, स्थानकवासी आणि तेरा पंथी असलो, तरी मी हिंदू नाही. आणि मग यावर राजकारण सुरू होते. मुळांशी असलेला संबंध याहूनही अधिक नष्ट झाला की मग हिंदू पाकिस्तान, हिंदू तालिबान, हिंदू दहशतवादसारखे विचार सुचू लागतात आणि हा संबंध नष्ट होण्याची प्रक्रिया पूर्ण होताच, अभारतीयीकरणाची प्रक्रियाही पूर्ण होते व ‘भारत तेरे तुकडे होंगे, भारत की बर्बादी तक जंग चलेगी, जंग चलेगी’ यासारखे नारे तोंडात येतात अन् तेही अडाणी, मागास आणि गरीब लोकांच्या तोंडात नाही, तर सर्वात प्रगतिशील मानल्या जाणार्‍या शैक्षणिक संस्थेतील भारतीय बुद्धिमत्तेच्या अत्याधुनिक तरुण प्रतिनिधींच्या तोंडात! एवढेच नाही, तर या लोकांना समर्थनदेखील याच भारताच्या पैशावर शिकलेल्या आणि मोठ्या प्रज्ञावान प्राध्यापकांकडून मिळते. अभारतीयीकरणाचे याहून अधिक स्पष्ट उदाहरण देण्याची गरज नाही.
म्हणूनच डॉ. प्रणबदा यांनी, पाच हजार वर्षांपासून तयार झालेल्या भारताच्या ओळखीचा जो उल्लेख केला तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आम्ही आमच्या मुळांशी खोलवर जुळून राहू तरच जगात आपली ओळख निर्माण करून आम्ही टिकू शकू. सुप्रसिद्ध कवी प्रसून जोशी यांच्या एका कवितेत म्हटले आहे-
उखड़े उखड़े क्यों हो वृक्ष, सूख जाओगे।
जितनी गहरीं जड़े तुम्हारी, उतने ही तुम हरियाओगे।
सहसरकार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ •••

Posted by : | on : 2 Sep 2018
Filed under : आसमंत, पुरवणी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी (350 of 875 articles)

Atal Bihari Vajpayee2
रोखठोक : हितेश शंकर | त्यांच्या शब्दांप्रमाणेच अटलजीदेखील शाश्‍वत आहेत. भारतमाता आपल्या अशा सुपुत्रांना नेहमी स्मरणात ठेवते. अटलजी साक्षात् शब्द ...

×