ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:

मुस्लिम सीआयएला भारी

॥ विश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले |

हेरकथा वाचण्याची आणि पाहण्याची सवय आपल्याला जेम्स बाँड वगैरेंमुळे लागलेली आहे. गुप्तहेरांच्या प्रत्यक्ष कामात असा थरारक अ‍ॅक्शनचा भाग फारच थोडा असतो. गुप्तहेरांच्या कामात गुप्तवार्ता संकलनाचा भाग मुख्य असतो. हे काम अत्यंत किचकट, वेळखाऊ, चिकाटीचा अंत पाहणारे आणि म्हणूनच कौशल्याची मागणी करणारे असते. चित्रपटातील गुप्तहेर नायक, त्याच्यावर सोपवलेली कामगिरी संपली की उंडारायला मोकळा असतो. प्रत्यक्षात गुप्तवार्ता संकलनाच्या कामाला कधी अंतच नसतो. ते निरंतर चालूच असते.

Cia

Cia

अमेरिकन हेरखातं सीआयए आणि रशियन हेरखातं केजीबी यांच्यातील स्पर्धेच्या, डावा-प्रतिडावांच्या, कुरघोडीच्या प्रयत्नांच्या असंख्य कहाण्या प्रसिद्ध आहेत. त्यातील जास्त कहाण्या अर्थातच अमेरिकेत प्रसिद्ध झालेल्या आहेत. वृत्तपत्रीय स्वातंत्र्य असल्यामुळे अमेरिकन पत्रकारांनी वेगवेगळ्या सूत्रांकडून मिळालेली माहिती मोकळेपणाने मांडलेली आहे. त्यात सीआयएने यशस्वी केलेल्या कामगिर्‍यांच्या कहाण्या आहेतच. परंतु, अनेकदा सीआयएने जादा शहाणपणा दाखवून नसत्या उठाठेवी केल्याच्या कथाही बेधडकपणे मांडण्यात आलेल्या आहेत.
उदाहरणार्थ, एकदा क्यूबाहून एका देशाकडे काही हजार टन साखर निर्यात होत होती. सीआयएच्या हस्तकांनी गुप्तपणे त्या जहाजावर प्रवेश मिळवून त्या साखरेच्या साठ्यावर एक निरुपद्रवी, पण घाणेरडा वास असलेले द्रव्य फवारले. हेतू हा की, अशी दुर्गंधी, साखर क्यूबाने आपल्याला पाठवल्याबद्दल, त्या देशाच्या लोकांनी संतापावं आणि परिणामी क्यूबाचे व त्या देशाचे राजनैतिक संबंध बिघडावेत. क्यूबा हा अमेरिकेच्या अगदी नाकाखाली वसलेला चिमुकला देश आहे. तिथे साम्यवादी राजवट आहे, म्हणून अमेरिका क्यूबावर खार खाऊन आहे. सीआयएची वरील कामगिरी अमेरिकन पत्रकारांना अजिबात आवडली नाही. त्यांनी सीआयएला उघडपणे झोडपून काढलं.
केजीबीच्या बाबतीत मात्र असं कधीच घडू शकले नाही. सोव्हिएत रशियात ‘प्रावदा’ आणि ‘इझवेस्तिया’ अशा नावांची दोन प्रमुख वृत्तपत्रं होती. प्रावदा म्हणजे सत्य आणि इझवेस्तिया म्हणजे वृत्त. परंतु, प्रावदामध्ये, इझवेस्तिया नाही आणि इझवेस्तियात प्रावदा नाही. म्हणजे सत्यामध्ये वृत्त नाही आणि वृत्तामध्ये सत्य नाही, असा विनोद त्या काळात प्रचलित होता. अर्थात, वस्तुस्थितीही तशीच होती. साध्या रोजच्या बातम्यांची जर ही अवस्था, तर केजीबीबद्दल सोव्हिएत पत्रकार काय लिहू शकणार?
१९४५ साली दुसरं महायुद्ध संपलं, तेव्हा अमेरिका आणि सोव्हिएत रशिया ही मित्रराष्ट्रं होती. पण, ती यापुढे मित्र न राहता कट्टर प्रतिस्पर्धी बनणार, हे लगेचच स्पष्ट झालं. तेव्हापासून १९९१ सालापर्यंत जगात एक जबरदस्त संघर्ष चालू होता. फक्त तो प्रत्यक्ष रणांगणावर नसल्यामुळे त्याला ‘शीतयुद्ध’ असे नाव मिळालेलं आहे. मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात या दोन राष्ट्रांची तीव्र स्पर्धा चालू होती. अंतराळ संशोधन क्षेत्रात प्रथम रशियाने अवकाशयान सोडून आघाडी घेतली; पण अखेर अमेरिकेने चंद्रावर माणूस उतरवून बाजी मारली. त्या कालखंडातील एक प्रसिद्ध किस्सा असा : अमेरिकेचे अपोलो यान चंद्रावर उतरलेलं ऐकून सोव्हिएत अध्यक्ष लिओनिद ब्रेझनेव्ह याची मिजास बिघडली. त्यांनी तातडीने अंतराळ संशोधकांची बैठक बोलावून त्यांची भरपूर खरडपट्टी काढली. अखेरीस ते म्हणाले, ‘‘ठीक आहे. झालं ते झालं. आता अमेरिकेवर मात करण्यासाठी आपण आपल्या अंतराळवीरांना सूर्यावर पाठवू. चला, लागा त्या तयारीला.’’ यावर संशोधकांनी ब्रेझनेव्हना सूर्य ही काय चीज आहे आणि सूर्यापासून कित्येक कोटी किमी अंतरावरही कोणतीही वस्तू कशी जळून खाक होईल, याची थोडक्यात माहिती दिली.
‘‘बेवकूफ’’ ब्रेझनेव्ह ओरडले. ‘‘सोव्हिएत फॉलिट ब्युरोला संपूर्ण विश्‍वाचे ज्ञान आहे, तर ही किरकोळ गोष्ट माहीत नाही, असे तुम्हाला वाटते की काय? पॉलिट ब्युरोने ठरवलंय् की, आपल्या अंतराळवीरांना रात्रीच्या वेळी सूर्यावर उतरवायचं!’’ अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांनी एकमेकांच्या दिशेने इतकी अण्वस्त्र सज्ज करून ठेवली होती की, दोन्ही देशांचे अध्यक्ष फक्त एक बटन दाबून अवघ्या काही मिनिटांत एकमेकांची आणि त्याबरोबरच संपूर्ण जगाची राखरांगोळी करण्यास समर्थ होते. ही ललित साहित्यातील रोमण्टिक कल्पना नसून वस्तुस्थिती होती. जर उघडउघड लष्करी तयारी एवढी असेल, तर गुप्तहेराच्या कारवाया किती मोठ्या प्रमाणावर असतील!
१९९१ साली सोव्हिएत रशियाचा बोजवारा उडाला आणि शीतयुद्ध संपलं. अणुयुद्धाच्या कोणत्या भीषण ज्वालामुखीवर अवघी मानवजात बसलेली होती, याची ज्यांना नीट कल्पना होती, अशा जगभरच्या जाणत्या माणसांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. सीआयए आणि केजीबी या दोघांचंही काम कमी झालं. ‘रशियन फेडरेशन’ या नव्या राष्ट्राने केजीबी हे सोव्हिएत कालखंडातील बदनाम नाव टाकून देऊन एसव्हीआर हे नवं नाव आपल्या हेरखात्याला दिलं.
सीआयएच्या अनेक निवृत्त हस्तकांनी आपापल्या रोमांचक आठवणींची पुस्तकं लिहिली. सीआयएची वेबसाईट उघडपणे उपलब्ध झाली. सीआयए प्रमुख उघडपणे पत्रकार परिषद घेऊ लागले. रशियाने इतका गवगवा केला नाही, तरी केजीबीच्या कामगिर्‍यांवर त्यांच्याच दस्तऐवजांच्या आधारे टोलेजंग ग्रंथ निर्माण होऊ लागले आहेत.
या सर्वामुळे अशी एक हवा निर्माण होत होती की, आता गुप्तहेरांची, गुप्तवार्ता संकलनाची गरजच नाही. कोणत्याच विषयाचा कसलाही अभ्यास नसलेले आणि नुसतीच छाछूगिरी करून विचारवंत पत्रकार म्हणून मिरवणारे लोक फक्त आपल्याकडेच आहेत असं नाही; अमेरिकेत पण आहेत. तेच वर सांगितल्याप्रमाणे गुप्तहेरविरहित राजकारणाच्या स्वप्नात दंग होते. पण, त्यांना दणका देणारी एक बातमी मॉस्कोहून आली. अल्ड्रिच एम्स आणि रॉबर्ट हॅनसेन या दोघांना अमेरिकेनं पकडलं. ते अमेरिकेत राहून रशियासाठी हेरगिरी करीत होते.
दोघांवरही खटला चालला आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. रशियन हेरखातं एसव्हीआरची दोन मोठी हेरजाळी उद्ध्वस्त झाली. किमान वीस वर्षे त्यांच्या कारवाया सुरू होत्या. साहजिकच त्यांनी चौकशी सुरू केली की, हे कसं घडलं? अखेर त्यांच्या लक्षात आलं की, अलेक्झांडर झापोरोझस्की याने सीआयएला पुरवलेल्या माहितीमुळे एम्स आणि हॅनसेन पकडले
गेले. मधील काळात झापोरोझस्कीने रशियाला रामराम ठोकून अमेरिकेत राजकीय आश्रय घेतला होता. तो एसव्हीआरमध्ये कर्नलच्या हुद्यावर होता.
आता काय करायचं? त्याच्यावर मारेकरी घालायचे की त्याला पळवून आणायचं? पण एसव्हीआरने वेगळाच मार्ग धरला. त्यांनी झापोरोझस्कीला काहीतरी मोठं आमिष दाखवलं. ते काय होतं, हे अजून उघड झालेलं नाही. पण, त्याच्या मोहाने झापोरोझस्की स्वत:च्या पायाने रशियात परतला. एसव्हीआरने त्याला अटक करून, अत्यंत महत्त्वाची माहिती अमेरिकेला पुरवली, या आरोपाखाली त्याच्यावर खटला भरला. एम्स आणि हॅनसेन यांची हेरजाळी वीस-वीस वर्षे अमेरिकेत बिनधोकपणे कार्यरत होती. झापोरोझस्कीच्या एका बातमीने ती उद्ध्वस्त झाली. ही माहिती अतिमहत्त्वाचीच, नव्हे का!
यासारखंच एक गाजलेलं प्रकरण म्हणजे व्हिटाली युरेचेन्को याचं. युरेचेन्कोसुद्धा केजीबीमध्ये कर्नलच्या हुद्यावर होता. तो अमेरिकेत पळून गेला. त्यानेही सीआयएला महत्त्वाची गुपितं पुरवली आणि केजीबीने दाखवलेल्या कोणत्यातरी आमिषाला बळी पडून तो पुन्हा सोव्हिएत रशियाला परतला होता. त्यावेळी साम्यवादी राजवट होती. साम्यवाद्यांना आपल्या विरोधकांवर भूंकायला, म्हणजे प्रचारकी थाटाची बोंबाबोंब करायला फार आवडतं. त्यानुसार केजीबीने युरेचेन्कोला अटक करून शिक्षा तर दिलीच; पण सीआयएने युरेचेन्कोला अमली पदार्थांची इंजेक्शन्स देऊन त्याच्याकडून गुप्त माहिती कशी काढून घेतली, त्याचा कसा छळ केला, यांच्या कहाण्या भरपूर मसाला लावूने सर्वत्र छापवून आणल्या.
रशिया हा देश आज आर्थिकदृष्ट्या गरीब आहे आणि त्यासाठी तो अमेरिकेकडेच याचना करतो आहे. अशा स्थितीत त्याने अमेरिकेतील आपली हेरजाळी कशासाठी कार्यरत ठेवली असतील? कुणीतरी एखादा जबरदस्त इसम आपल्या पाशवीशक्तीच्या जोरावर संपूर्ण जगावर कब्जा करू पाहत असतो आणि एखादा हेर-नायक त्याच्यावर मात करतो, अशा छापाच्या हेरकथा वाचण्याची आणि पाहण्याची सवय आपल्याला जेम्स बाँड वगैरेंमुळे लागलेली आहे. गुप्तहेरांच्या प्रत्यक्ष कामात असा थरारक अ‍ॅक्शनचा भाग फारच थोडा असतो.
गुप्तहेरांच्या कामात गुप्तवार्ता संकलनाचा भाग मुख्य असतो. हे काम अत्यूंत किचकट, वेळखाऊ, चिकाटीचा अंत पाहणारे आणि म्हणूनच कौशल्याची मागणी करणारे असते. चित्रपटातील गुप्तहेर नायक, त्याच्यावर सोपवलेली कामगिरी संपली की उंडारायला मोकळा असतो. प्रत्यक्षात गुप्तवार्ता संकलनाच्या कामाला कधी अंतच नसतो. ते निरंतर चालूच असते.
आचार्य चाणक्य हेरांना राजाचे डोळे म्हणतो. मानवी जीवनात डोळ्यांचं जे महत्त्व, तेच राजकारणात हेरांचं. आपल्या राष्ट्राचे जीवित सुरक्षित ठेवण्यासाठी शत्रूराष्ट्रांत तर हेरगिरी करायचीच, पण मित्रराष्ट्रांतही हेरगिरी करायची असते. कारण, राजकारणात कुणीच कायमचा शत्रू नसतो आणि कुणीच कायमचा मित्र नसतो. आपल्या राज्यकर्त्यांना आजूबाजूच्या सर्व राष्ट्रांची अद्ययावत माहिती पुरवत राहणे, हेच कोणत्याही हेरखात्याचं म्हणजे गुप्तवार्ता संकलन खात्याचे काम आहे. युद्धाची किंवा युद्ध होण्याची स्थिती असो वा नसो, माहिती मिळवणे चालूच राहणार; किंबहुना चालू राहिलाच हवी. जो देश असं करणार नाही, त्याला बावळटच म्हणावं लागेल.
आता हेच पाहा ना, सोव्हिएत रशिया खलास झाला म्हणून सीआयएने रशियातील हेरगिरी थांबवली असेल असे नव्हे. उलट सोव्हिएत पोलादी पडद्यामुळे जी माहिती मिळत नव्हती, तीसुद्धा सीआयएचे हस्तक उत्साहाने गोळा करीत असतील. पण, एकंदरीत शीतयुद्धाच्या समाप्तीमुळे सीआयए सुस्तावली, हेही तेवढेच खरे. जे साम्यवाद्यांनाही जमले नव्हते, ते मुस्लिमांनी ११ सप्टेंबर, २००१ ला सहजपणे करून दाखवले. सीआयए आणि एफबीआय अशा दोन-दोन सर्वशक्तिमान हेरखात्यांच्या नाकावर टिच्चून! •••

Posted by : | on : 7 Oct 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, मल्हार कृष्ण गोखले, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, मल्हार कृष्ण गोखले, स्तंभलेखक (368 of 1224 articles)

Kerala Flood
विशेष : विश्‍वराज विश्‍वा, कोची | केवळ हे सर्व तज्ज्ञच नाही, तर मेट्रोमॅन व विख्यात इंजिनीअर श्री. ई. श्रीधरन् यांनीही ...

×