ads
ads
तिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक

तिन्ही दलांचे संयुक्त नियोजन परिणामकारक

►हवाईदल प्रमुख धानोआ यांचे प्रतिपादन, नवी दिल्ली, १८ नोव्हेंबर…

‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘आयुषमान भारत’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

►६८ टक्के लाभार्थ्यांनी घेतला फायदा, नवी दिल्ली, १८ नोव्हेंबर…

फक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा

फक्त साडेचार लाख लोकांनीच केला नागरिकत्वाचा दावा

►एनआरसीमध्ये समावेश करण्याचा मुद्दा, गुवाहाटी, १८ नोव्हेंबर – राष्ट्रीय…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

१३ विधेयके सादर होणार

१३ विधेयके सादर होणार

►आजपासून मुंबईत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ►मराठा आरक्षणाचे विधेयकही सादर…

वरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता

वरवरा राव मणिपूर, नेपाळमधून शस्त्र आणणार होता

►पुणे पोलिसांचा न्यायालयात दावा ►आठ दिवसांची पोलिस कोठडी, पुणे,…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:35 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:

मूकबधिर थॉमसची गगनभरारी!

॥ अभिप्राय : डॉ.वाय.मोहितकुमार राव |

अत्यंत विषम परिस्थितीत जीवनाची ४५ वर्षे पूर्ण करणार्‍या केरळच्या साजी थॉमसने केवळ भारताचीच मान उंचावली असे नसून, संपूर्ण जगाला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे. केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील थोडुपूजा येथील थॉमसच्या गावकर्‍यांनी आधी तो मूकबधिर असल्यामुळे त्याचा तिरस्कार केला होता. मात्र, थॉमसने दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर अशी काही झेप घेतली की, कधीकाळी त्याची टिंगळटवाळी करणारे गावकरी आता त्याच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव करताना थकत नाहीत!

Saji Thomas

Saji Thomas

प्रबळ इच्छाशक्ती आणि आत्मविश्‍वासाच्या जोरावर जीवनात येणारे कोणतेही आव्हान किंवा समस्येवर मात करून यशोशिखर गाठता येते, हे अनेकांनी आपल्या जीवनप्रवासातून दाखवून दिले आहे. आव्हान किंवा अडचणीचे संधीत रूपांतर करण्याची क्षमता असलेले लोकच जीवनात यशस्वी ठरतात, हेदेखील तेवढेच सत्य आहे. तो बोलू शकत नाही, परंतु हजारो लोकांच्या तोंडून त्याचे कौतुक झाले, तो ऐकू शकत नाही, परंतु त्याने केलेल्या आविष्काराच्या झंकारामुळे अवघे आकाश दुमदुमून गेले. मूकबधिर ही फक्त एक संज्ञा आहे, हे त्याने दाखवून दिले. अपंगत्वावर मात करून यशोशिखराच्या दिशेने झेप घेण्याचा निर्धार त्याने केला आणि जेव्हा आपल्या अफाट कल्पनाशक्तीतून त्याने साकारलेल्या दुर्लभ आणि अत्यंत किफायतशीर जेटने अवकाशात झेप घेताच जगाने त्याला सलाम केला!
अत्यंत विषम परिस्थितीत जीवनाची ४५ वर्षे पूर्ण करणार्‍या केरळच्या साजी थॉमसने केवळ भारताचीच मान उंचावली असे नसून, संपूर्ण जगाला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे. केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील थोडुपूजा येथील थॉमसच्या गावकर्‍यांनी आधी तो मूकबधिर असल्यामुळे त्याचा तिरस्कार केला होता. मात्र, थॉमसने दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर अशी काही झेप घेतली की, कधीकाळी त्याची टिंगळटवाळी करणारे गावकरी आता त्याच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव करताना थकत नाहीत!
साजी थॉमसच्या दृष्टिकोनातून जमीन आणि अवकाश यामध्ये काहीही फरक नाही. अपंगत्व आल्याने थॉमसला सातवीत शाळा सोडावी लागली. परंतु, विषम परिस्थिती आणि शारीरिक दुर्बलतेला कधीही वरचढ होऊ द्यायचे नाही, असा निर्धारच थॉमसने केला होता. याचाच एक भाग म्हणून त्याने जुन्या स्कूटर-बाइक्स आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा कचरा गोळा करण्यास सुरुवात केली. शिवाय कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे रबराची रोपे लावण्याच्या कामात हातभार लावून तो मोलमजुरी करत होता. तल्लख बुद्धीचा असल्याने लवकरच त्याने टीव्ही दुरुस्त करण्याची कला अवगत केली आणि त्यानंतर विवाहसमारंभांची व्हिडीओग्राफी तो करू लागला. आपला आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह केल्यानंतर जो पैसा वाचत होता तो थॉमस आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी समर्पित करत असे आणि पाहतापाहता त्याने विमानाचे पंख बनविले, स्कूटरचे शॉकप आणि बाइक्सच्या इंजिनाचा वापर करून अवकाशात भरारी मारणारे जेटही थॉमसने तयार केले! जेट तयार करताना त्याच्या इंजीनचा आवाज ऐकण्याच्या कामात पत्नी मारियाने थॉमसची खूप मदत केली.
थॉमसने आपल्या अफाट कल्पनाशक्तीच्या जोरावर जेट तर तयार केले, आता त्याच्या उड्डाणाची तयारी सुरू होती. परंतु, यामाहाच्या इंजिनाने साथ दिली नाही आणि थॉमसचे पहिले किफायतशीर जेट उड्डाण करू शकले नाही. मात्र, या अपयशाचा आपल्या निर्धारावर कोणताही परिणाम होऊ न देता थॉमसने आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी दिवसरात्र एक केला आणि कठोर मेहनत केली. याच दरम्यान २००८ साली थॉमसने तिरुअनंतपुरम् येथे विंग कमांडर एसकेजी नायर यांची भेट घेतली. दैवयोगानेच ही भेट झाली, असेच म्हणावे लागेल. कारण या भेटीनंतर जेट तयार करण्याच्या कामात नायर थॉमसचे मेंटर झाले. त्यांनी आपल्या शाळेच्या परिसरात थॉमसला आपले जेट उडविण्याची परवानगी दिली आणि पाहतापाहता थॉमसच्या स्वप्नपूर्तीचा दिवस उजाडला. विंग कमांडर नायर यांच्या उपस्थितीत थॉमसच्या जेटने अवकाशात झेप घेतली. बालपणापासून बघितलेले स्वप्न प्रत्यक्षात साकारत असल्याचा आनंद थॉमसच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे झळकत होता. थॉमसने भंगारातून, बाजारात उपलब्ध असलेल्या इतर किफायती जेटच्या तुलनेत चांगले विमान तयार करून दाखविले. विंग कमांडर नायर यांनीही थॉमसची ही अफलातून कल्पनाशक्ती आणि प्रयत्नांना भरभरून दाद दिली- ‘‘शारीरिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या व्यक्तीने हा एक करिश्मा करून दाखविला आहे!’’ या शब्दांत त्यांनी थॉमसचे कौतुक केले. ‘‘मी यापूर्वी अनेक विमानं उडविली आहेत. परंतु, सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या एक्स एअरक्राफ्टपेक्षा थॉमसचे एअरक्राफ्ट चांगले आहे,’’ असे सांगतानाच, ‘‘तुम्ही त्याला डिझाईन द्या, तो त्याप्रमाणे जेट तयार करून दाखवतो!’’ असे नायर यांनी सांगितले.
बाजारात उपलब्ध असलेल्या अशाच जेटची किंमत २५ लाख रुपये असताना, थॉमसचे जेट जवळपास अर्ध्या किमतीत म्हणजे १४ लाखांमध्ये तयार झाले. ‘डिस्कव्हरी चॅनेल’नेही थॉमसच्या या आविष्काराची आवर्जून दखल घेतली. डिस्कव्हरीने आपल्या ‘एचआरएक्स सुपरहिरोज्’ या कार्यक्रमातही थॉमसला पाचारण केले होते. थॉमसने ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्’मध्येही आपल्या नावाची नोंद केली आहे. थॉमसला एका परवान्याची गरज असल्याने त्याने नागरी उड्डयण महासंचालनालयाकडे (डीजीसीए) अर्ज केला होता. आपल्याला एरोनॉटिक्स मेकॅनिक म्हणून नोकरी मिळावी, अशीही त्याची इच्छा होती. थॉमसला पुस्तक वाचनाची आवड आहे, तो इंटरनेटचा अ‍ॅक्टिव्ह युझर असून, इलेक्ट्रॉनिक्स आणि एरोनॉटिक्स या विषयांचीही त्याला चांगली समज आहे, असे पत्नी मारियाने सांगितले.
अशी गगनभरारी घेतल्यानंतरही थॉमसला सरकारी यंत्रणेच्या अनास्थेचा सामना करावा लागला. पत्नी मारियाने, केरळचे तत्कालीन मुख्यमंत्री ओमन चंडी यांच्याकडे अनेकदा पाठपुरावा केला, परंतु त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. आश्‍वासनांशिवाय तिथे काहीच हाती न लागल्याने तो नाखुश होता. धावपट्टीची गरज भासणार नाही, असे दोन इंजीनचे विमान तयार करण्याची थॉमसची इच्छा आहे.
विषम परिस्थितीवर मात करून गगनभरारी घेणार्‍या थॉमसचे हे कर्तृत्व इतर अनेकांसाठी खरोखरच प्रेरणादायी आहे. जीवनात कोणतीही अडचण किंवा समस्या आल्यास डगमगून न जाता, त्याचा धाडसाने मुकाबला करण्याची प्रेरणा तर यातून मिळतेच, परंतु प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर काहीही करता येऊ शकते, हा संदेशच थॉमसने दिला आहे, हे निश्‍चित!

Posted by : | on : 9 Sep 2018
Filed under : आसमंत, डॉ.वाय.मोहितकुमार राव, पुरवणी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, डॉ.वाय.मोहितकुमार राव, पुरवणी, स्तंभलेखक (208 of 1152 articles)


मानसरंग : मयुरेश डंके | पूर्वी जेव्हा एखादा मुलगा मला म्हणायचा की, ‘मला सैन्यदलात जायचंय’ तेव्हा अभिमान वाटायचा, कौतुक वाटायचं. ...

×