ads
ads
नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:

मॅथ्यू म्हणे!

॥ टेहळणी : डॉ.परीक्षित स. शेवडे |

Reverend Father Mathew Peiris1

Reverend Father Mathew Peiris1

३१ जानेवारी १९७९ ची दुपार. श्रीलंकेतल्या कोलंबो जनरल हॉस्पिटलच्या वॉर्ड क्र. ४७ मध्ये एक वृद्ध रूग्णा दोन पाद्रींसह दाखल झाली. तिची प्रकृती फारच चिंताजनक दिसत होती. एकूण लक्षणे पाहता; डॉ. सिद्धीअर्चिग्गे टेरेन्स गामिनी राजा डिसिल्व्हा यांनी हायपोग्लायसेमियाचे(रक्तातील साखरेची पातळी धोकादायकरीत्या कमी होणे) निदान केले. रुग्णेचे नाव होते युनिस पिएरिस आणि तिच्यासह आलेल्या तिच्या पतीचे नाव होते फादर मॅथ्यू पिएरिस. फादर मॅथ्यू हे एक नामवंत व्यक्तिमत्व होते. त्याच्यात भूत पळवून लावण्याची शक्ती होती. दर आठवड्यात भूत उतरवण्याचे त्याचे वर्ग चालत आणि त्यांना संपूर्ण श्रीलंकेतून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असे. जनमानसावर त्याची पकड घट्ट होती. डॉ. टेरेन्स यांनी रुग्णेतिहास विचारताना बीपी, डायबेटीस असा काही त्रास होता का? अशी नेहमीची विचारणा केली. फादर मॅथ्यूने नकारात्मक मान हलवली. फक्त दोन दिवसांपूर्वीच आपल्या पत्नीची ग्लुकोज पातळी बिघडली होती असे मोघम सांगितले. डॉक्टरांनी ५०% डेक्स्ट्रोज आणि हायड्रोकॉर्टीसॉन शिरेवाटे देण्यास सुरु केले. या उपचारांनी रक्तातील साखरेची पातळी योग्य प्रमाणात येणे अपेक्षित होते. मात्र तसे न होता स्थिती अधिकच बिघडली. हा विचित्र अनुभव घेणार्‍या आणि कोड्यात सापडलेल्या डॉ. टेरेन्सनी रुग्णेची एकंदर परिस्थिती पाहता; फादरमॅथ्यू याला त्याबाबत कल्पना दिली. त्याने थंडपणे विचारले; जगेल की मरेल? त्याचा हा थंडपणा आणि योग्य उपचारांना प्रतिसाद न देणारी रूग्णा पाहता डॉ. टेरेन्सचा संशय बळावला. रुग्णेच्या बेडचार्टवर निदान लिहिताना त्यांनी ‘रक्तातील साखर कमी झाल्यामुळे कोमा’ असे लिहिले असले तरी त्याच्या शक्यता पाहता पॅनक्रियाज या अवयवाला आलेली सूज आणि डायबेटीसवरील औषधांचा अतिरेक होऊन झालेली विषबाधा(?) अशी शक्यता नोंदवून ठेवली आणि इथेच या केसची चक्रे फिरली.
काही महिन्यांपूर्वी अशीच लक्षणे घेऊन आलेला एक रुग्ण मृत्यू पावला होता. त्याची अधिक माहिती काढताना डॉक्टर आणि पोलीस यांना समान धागा सापडला. त्या रुग्णाचे नाव होते रसेल इंग्राम आणि तो फादर मॅथ्यूच्या घरीच राहत होता! रसेल आणि त्याची पत्नी डलरीन हे दोघेही फादर मॅथ्यूच्या घरी काही काळापासून राहत होते. रसेल हा बेरोजगार होता तर डलरीन ही टायपिंगचे काम करत असे. फादर मॅथ्यूने डलरीनला पाहताच त्याला ती आवडली आणि या प्रकरणाचा बोभाटा होऊ नये यासाठी चर्चने त्याला राहायला दिलेल्या घरात त्याने तिला तिच्या नवर्‍यासह राहण्यास बोलावले. डलरीन ही मॅथ्यूची स्वीय्य सहाय्यक म्हणून काम पाहू लागली; जेणेकरून कोणाच्याही संशयाशिवाय त्यांना आपले संबंध सुरु ठेवता येतील. कालांतराने या प्रकरणाचा रसेलला पत्ता लागला असावा; म्हणून त्याचा काटा काढण्यासाठी फादर मॅथ्यूने डायबेटीसवरील गोळ्यांची अतिरिक्त मात्रा अन्नात कालवून रसेलला देण्यास सुरुवात केली. काही काळातच त्याचे पॅनक्रियाज काम करेनासे झाले आणि वरील सगळी लक्षणे दिसून आली. मात्र; इतक्या मोठ्या प्रमाणात मॅथ्यूला डायबेटीसवरील गोळ्या कशा उपलब्ध झाल्या याचे कोडे काही सुटत नव्हते. अखेरीस जे सत्य समोर आले त्याने सर्वांनाच हादरून सोडले. आपल्या पाद्रीपदाचा गैरवापर करत मॅथ्यूने काही डॉक्टर्सना अंधारात ठेवत ही औषधे मिळवली होती! अखेरीस हे प्रकरण न्यायालयात गेले आणि फादर मॅथ्यू व डलरीन या दोघांनाही मृत्युदंड ठोठावण्यात आला. वरिष्ठ न्यायालयाने मात्र डलरीनला निर्दोष मुक्त केले तर फादर मॅथ्यूला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पुढे १९ वर्षे शिक्षा भोगून तो माफीची याचना करून सुटला देखील; मात्र कर्माचे फेरे म्हणा वा अन्य काही…पुढील वर्षीच त्याचे निधन झाले. ऐंशीच्या दशकात लंकेला हादरवून सोडणारे हे हत्याकांड बरेच गाजले. कित्येकांच्या आजही त्याच्या आठवणी तितक्याच ताज्या आहेत. धार्मिक पदाचा, धर्मसत्तेचा गैरवापर कसा होऊ शकतो याचे हे धडधडीत उदाहरण होते. चर्चच्या इतिहासात पदाचा गैरवापर करून गुन्हे करणे हे नाविन्यपूर्ण नसले तरी एखाद्या पाद्रीने थेट दोन हत्या करणे हे धक्कादायक होतेच. आज या घटनेला इतकी वर्षे उलटल्यावर त्यावर आधारित सिनेमा श्रीलंकेत तयार झाला आहे. लवकरच तो प्रदर्शितदेखील होईल.
मात्र असे असूनही ‘धर्मसत्तेचा गैरवापर’, ‘भूत-प्रेत या अंधश्रद्धा मानणारे पाद्री’, ‘धर्माआड चालणारा बाजार’ अशी शीर्षके वा अशी दिशा घेतलेल्या चर्चा श्रीलंकेच्या प्रसारमाध्यमातून झालेल्या आपल्याला दिसत नाहीत. त्यावेळची प्रसिद्ध झालेल्या बातम्या, लेख वा सध्या चित्रपटाच्या निमित्ताने या प्रकरणाशी संबंधित प्रकाशित होणारे लेख यांत हे विलक्षण साधर्म्य आढळते. या प्रकरणावर चित्रपट येऊ घातल्याने श्रीलंकेतील कोणत्या ख्रिश्‍चन संघटनेने अद्याप तरी बंदीची मागणी केलेली दिसली नाही. आरोपी हा गुन्हा सिद्ध होईपर्यंत निर्दोष असतो आणि गुन्हा सिद्ध झाल्यावर केवळ ‘गुन्हेगार’ हीच त्याची ओळख असते. आपल्या देशात मात्र अशा गुन्ह्याआड दडून धर्म, श्रद्धा, परंपरा इत्यादींवर आघात करण्याचा अत्यंत चुकीचा पायंडा पडला आहे; पाडला गेला आहे. त्यातही दुर्दैव म्हणजे गुन्हा सिद्ध न झालेला आरोपीदेखील हिंदू धर्माच्या धार्मिक पदावर असेल तर सर्व स्तरातून त्याच्या बदनामीची मोहीमच उघडली जाते. पुढे जाऊन त्याची आरोपातून निर्दोष मुक्तता झाल्यावरही ही मोहीम थांबवली जात नाही. अशा वेळी कायद्याचा मान वगैरे संकल्पना म्हणजे जणू काही काल्पनिक आहेत अशा थाटात स्वयंघोषित बुद्धिवादींचे वर्तन असते. ही सारी वागणूक अगदी निवडून हिंदू धर्मीयांबाबतच ठेवली जाते. अन्य पंथांच्या बाबतीत मात्र असे मुळीच घडलेले दिसत नाही.म्हणून तर ननवरील बलात्काराबद्दल निषेध नोंदवण्यासाठी कोणी पुरोगामी पुढे येत नाही वा कोणती वृत्तवाहिनी चर्चाही घेत नाही. खरे तर ही दुटप्पीपणाची परिसीमा आहे. गुन्हा सिद्ध झाल्यावर धर्म, जात, लिंग या संकल्पनांचे काहीच महत्व उरत नाही. उरतो तो केवळ हीन असा गुन्हा. सर्वत्र पंथनिरपेक्षता ही फार दूरची बाब आहे; किमान गुन्हेगारीच्या क्षेत्रात जरी ही ‘पंथनिरपेक्षता’ आपण दाखवू शकलो तरी तो लोकशाहीचा मोठा विजय ठरेल! •••

Posted by : | on : 21 Oct 2018
Filed under : आसमंत, डॉ.परीक्षित स. शेवडे, पुरवणी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, डॉ.परीक्षित स. शेवडे, पुरवणी, स्तंभलेखक (87 of 1153 articles)

Eklavya
मानसरंग : मयुरेश डंके | फेव्हिक्विकची एक जुनी जाहिरात पाहत होतो. एका तळ्याकाठी मासे पकडायला आलेला एक अवखळ, चंचल खेडवळ ...

×