हज सबसिडी बंद

हज सबसिडी बंद

►मुस्लिमांना प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार देणार ►नकवी यांची घोषणा, नवी…

चकमकीत मला ठार करण्याचा कट : तोगडिया

चकमकीत मला ठार करण्याचा कट : तोगडिया

►लवकरच पुराव्यांसह समोर येणार, अहमदाबाद, १६ जानेवारी – १०…

न्या. लोयांच्या मृत्यूसंबंधी दस्तावेज याचिकाकर्त्याला द्या

न्या. लोयांच्या मृत्यूसंबंधी दस्तावेज याचिकाकर्त्याला द्या

►सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश, नवी दिल्ली, १६ जानेवारी…

क्षेपणास्त्र डागल्याच्या संदेशामुळे गोंधळ

क्षेपणास्त्र डागल्याच्या संदेशामुळे गोंधळ

वॉशिंग्टन, १४ जानेवारी – अमेरिकेच्या हवाईक्षेत्रातील हवाई बेटावर क्षेपणास्त्र…

‘जम्मू-काश्मीरला जाणे टाळा’

‘जम्मू-काश्मीरला जाणे टाळा’

►अमेरिकेची पर्यटकांना सूचना, वॉशिंग्टन, ११ जानेवारी – अमेरिकेने भारतात…

ममतांच्या दौर्‍यातील संपादक ‘चमचे-चोर’?

ममतांच्या दौर्‍यातील संपादक ‘चमचे-चोर’?

लंडन, १० जानेवारी – पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी…

भाजपाची तिरंगा रॅली

भाजपाची तिरंगा रॅली

►संविधान बचाव रॅलीला प्रत्युत्तर ►•रावसाहेब दानवे यांची घोषणा, मुंबई,…

ना. स. फरांदे कालवश

ना. स. फरांदे कालवश

पुणे, १६ जानेवारी – भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि विधान…

बापू बिरू वाटेगावकर यांचे निधन

बापू बिरू वाटेगावकर यांचे निधन

सांगली, १६ जानेवारी – पश्‍चिम महाराष्ट्रात ‘रॉबिनहूड’ प्रमाणे आयुष्य…

श्री सिद्धरामेश्‍वर यात्रा : सामाजिक सप्तरंगांचे एक आकाश

श्री सिद्धरामेश्‍वर यात्रा : सामाजिक सप्तरंगांचे एक आकाश

॥ तरंग : दीपक कलढोणे | ‘हर्र बोला हर्र’…

विवेकानंदांचे परखड हिंदुत्व!

विवेकानंदांचे परखड हिंदुत्व!

॥ विशेष : मुकुल कानिटकर | एकीकडे जग भारताकडे…

संभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा

संभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | हा वारस…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:12
अयनांश:
Home » आसमंत, शेफाली वैद्य, स्तंभलेखक » मेड इन चायना: दिवाळीला ‘नाय ना’

मेड इन चायना: दिवाळीला ‘नाय ना’

वेधक : शेफाली वैद्य |

chinese_crackers_banedदिवाळीचे फटाके आणायला दुकानात गेले होते. सगळ्या स्टॉल्स मध्ये अनिल, स्टॅण्डर्ड, अनमोल हे भारतीय बनावटीचेच ब्रॅण्ड डिस्प्लेला लावलेले दिसत होते. मी मुद्दाम वेगवेगळ्या तीन-चार स्टॉल्स मध्ये विचारलं, ’फटाके सगळे भारतीयच बनावटीचे आहेत का’? ’ताई आम्ही चायनीज माल ठेवलाच नाही ह्या वर्षी’ मला उत्तर आलं. केवळ मीच नव्हे तर फटाके घ्यायला आलेली बहुतेक सगळीच गिर्‍हाइकं थोड्या-फार फरकाने आवर्जून हा एकच प्रश्न विचारत होती, ’फटाके इंडियनच आहेत ना हो’? गेल्या वर्षी चायनीज बनावटीचे फटाके खूप दिसले होते बाजारात, पण घेताना विचारलं तर दुकानदार प्रामाणिकपणे सांगायचे ’चायनीज माल स्वस्त असला तरी चांगला नसतो ताई, अर्धे फटाके पेटतील, अर्धे तसेच राहतील. हा भारतीय माल कसा, वर्षभर तसाच ठेवला तरी पुढच्या वर्षी पटेलच बघा’.
ह्या वर्षी एकूणच चायनीज मालाविरुद्ध वातावरण देशात बरंच तापलेलं दिसतंय. समाजातल्या सगळ्याच थरातले लोक कुठलीही गोष्ट खरेदी करताना दुकानदाराला आवर्जून विचारत आहेत की का माल चिनी बनावटीचा तर नाही ना? मग तो आकाश कंदील असो, फटाके असोत किंवा दिव्यांच्या माळा असोत. काल संध्याकाळी एका हार्डवेरच्या दुकानात गेले होते दिव्यांच्या माळा आणायला. दुकानदाराला म्हटलं, ’भारतीयच दाखवा, चिनी नको’, तर तो हसला, म्हणाला, ’ह्या वर्षी सगळे हेच म्हणायला लागलेत’. त्याने मला भारतीय बनावटीच्या दिव्यांच्या माळा दाखवल्या. चिनी बनावटीच्या माळा आणि भारतीय बनावटीच्या माळा ह्यांच्या किमतीत सरासरी वीस ते पन्नास रुपयांचा फरक होता, आणि मुख्य म्हणजे भारतीय माळा महाग असूनही लोक त्या विकत घेत होते. तो दुकानदारही मोठ्या आनंदाने भारतीय बनावटीच्या माळा विकत होता.
मी माझं सामान घेत असतानाच तिथे अजून एक माणूस आला, ’चांगल्या रंगीत माळा दाखवा राव, पण आपलाच दाखवा, त्या चिनी नको’, तो म्हणाला. दुकानदाराने त्याला दोन-तीन वेगवेगळ्या प्रकारच्या दिव्यांच्या माळा दाखवल्या.
’ह्या नक्की भारतीयच आहेत ना?’ एक माळ हाताळत त्याने विचारलं.
’हो. त्या चायनीज माळा त्या बघा बाहेर डिस्प्लेला लावल्यात. त्या दिसताना सुद्धा वेगळ्याच दिसतात’, दुकानदाराने सांगितलं.
’तुम्ही ठेवल्यात कशाला चायनीज माळा दुकानात? खरंतर तुम्ही चायनीज माल विकायलाच नाही ठेवला पाहिजे’ त्या माणसाने सात्विक संतापाने म्हटलं. दुकानातल्या बाकीच्या गिर्‍हाईकांनी लगेच त्याला दुजोरा दिला. ’काही काही बारीक माळा इंडियन नाही मिळत अजून म्हणून ठेवाव्या लागतात चायनीज माळा. काय करणार’? दुकानदार ओशाळून म्हणाला.
’ह्या वर्षी चायनीजचा डिमांड कमी झालाय का हो’? मी विचारलं.
’हो ताई, खूपच कमी झालाय. जवळ जवळ पन्नास ते साठ टक्के खप घटलाय चायनीज मालाचा. जो येतो तो इंडियनच वस्तू मागतोय’, दुकानदार म्हणाला. ’हा सगळा सोशल मीडियाचा परिणाम आहे ताई’.
चायनीज वस्तूंचा बहिष्कार ही आता केवळ कवीकल्पना राहिलेली नाही. ह्या दिवाळीत त्या बहिष्काराचा चांगलाच परिणाम बाजारात दिसून येतोय. स्वतः चायनीज दूतावासालाही ह्याबाबत अधिकृत स्टेटमेंट द्यावं लागलं इतका मोठा ह्या बहिष्काराचा आर्थिक परिणाम आहे. अखिल भारतीय विक्रेता संघटनेने तर म्हटलंय की ह्या वर्षी दिवाळीशी संबंधित चायनीज मालाचा खप जवळजवळ तीस ते चाळीस टक्क्‌यांनी घटेल असं त्यांना वाटतंय. चिनी दूतावासाने दिलेल्या अधिकृत निवेदनात म्हटलंय की चायनीज मालाचा भारतात बहिष्कार झाला तर त्याचा चीनच्या अर्थकारणावर काहीच परिणाम होणार नाही, कारण भारत ही चीनसाठी मोठी बाजारपेठ नाहीच आहे. चीनचं असं म्हणणं आहे की त्यांच्या एकूण निर्यातीतला फक्त दोन टक्के वाटा भारताचा आहे. पण हे अर्धसत्य आहे, कारण चिनी मालावर घातलेल्या अघोषित बहिष्काराचा परिणाम चिनी निर्यातीवर अगदीच नगण्य असता तर चिनी दूतावासाला असं अधिकृत निवेदन देण्याचा खटाटोप का करावा लागला असता?
सामाजिक आणि आर्थिक बहिष्कार हे सर्वसामान्य लोकांच्या हातात असलेलं हत्यार वेळप्रसंगी किती प्रभावी बनू शकतं ह्याचं यंदाच्या दिवाळीतला चिनी बनावटीच्या मालावरचा बहिष्कार हे एक आदर्श उदाहरण आहे.•••

शेअर करा

Posted by on Nov 6 2016. Filed under आसमंत, शेफाली वैद्य, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आसमंत, शेफाली वैद्य, स्तंभलेखक (1365 of 1414 articles)


टेहळणी : डॉ.सच्चिदानंद शेवडे | ही कथा चक्क अतींद्रिय घटनेमध्ये मोडणारी आहे. त्यामुळे वाचकांनी आपल्या विवेकानुसार ती मानावी अथवा नाकारावी. ...