हज सबसिडी बंद

हज सबसिडी बंद

►मुस्लिमांना प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार देणार ►नकवी यांची घोषणा, नवी…

चकमकीत मला ठार करण्याचा कट : तोगडिया

चकमकीत मला ठार करण्याचा कट : तोगडिया

►लवकरच पुराव्यांसह समोर येणार, अहमदाबाद, १६ जानेवारी – १०…

न्या. लोयांच्या मृत्यूसंबंधी दस्तावेज याचिकाकर्त्याला द्या

न्या. लोयांच्या मृत्यूसंबंधी दस्तावेज याचिकाकर्त्याला द्या

►सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश, नवी दिल्ली, १६ जानेवारी…

क्षेपणास्त्र डागल्याच्या संदेशामुळे गोंधळ

क्षेपणास्त्र डागल्याच्या संदेशामुळे गोंधळ

वॉशिंग्टन, १४ जानेवारी – अमेरिकेच्या हवाईक्षेत्रातील हवाई बेटावर क्षेपणास्त्र…

‘जम्मू-काश्मीरला जाणे टाळा’

‘जम्मू-काश्मीरला जाणे टाळा’

►अमेरिकेची पर्यटकांना सूचना, वॉशिंग्टन, ११ जानेवारी – अमेरिकेने भारतात…

ममतांच्या दौर्‍यातील संपादक ‘चमचे-चोर’?

ममतांच्या दौर्‍यातील संपादक ‘चमचे-चोर’?

लंडन, १० जानेवारी – पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी…

भाजपाची तिरंगा रॅली

भाजपाची तिरंगा रॅली

►संविधान बचाव रॅलीला प्रत्युत्तर ►•रावसाहेब दानवे यांची घोषणा, मुंबई,…

ना. स. फरांदे कालवश

ना. स. फरांदे कालवश

पुणे, १६ जानेवारी – भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि विधान…

बापू बिरू वाटेगावकर यांचे निधन

बापू बिरू वाटेगावकर यांचे निधन

सांगली, १६ जानेवारी – पश्‍चिम महाराष्ट्रात ‘रॉबिनहूड’ प्रमाणे आयुष्य…

श्री सिद्धरामेश्‍वर यात्रा : सामाजिक सप्तरंगांचे एक आकाश

श्री सिद्धरामेश्‍वर यात्रा : सामाजिक सप्तरंगांचे एक आकाश

॥ तरंग : दीपक कलढोणे | ‘हर्र बोला हर्र’…

विवेकानंदांचे परखड हिंदुत्व!

विवेकानंदांचे परखड हिंदुत्व!

॥ विशेष : मुकुल कानिटकर | एकीकडे जग भारताकडे…

संभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा

संभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | हा वारस…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:12
अयनांश:

मैनावती

अंतराळाच्या अंतरंगातून : शिरीष गोपाळ देशपांडे |

mainawatiमैनावती म्हणजे नानासाहेब पेशवे यांची कन्या. नानासाहेब म्हणजे १८५७ मधले नानासाहेब. पानिपतच्या वेळचे पेशवे नाही. दुसर्‍या बाजीरावाचे दत्तकपुत्र नानासाहेब पेशवे हे पहिल्या स्वातंत्र्यसंग्रामाचे अग्रणी होते! त्यांची कन्या मैनावती. नानासाहेबांचे वय १८५७ मध्ये फार नव्हते. सबब मैनावतीचे वय १८५७ मध्ये फारच कमी असावे. जेमतेम पंधरा वर्षे!! पण, तिच्या नावाने कानपुरापासूनचा मुख्य मोठा रस्ता आहे, म्हणतात. याचा अर्थ तिने ब्रह्मावर्तातल्या आपल्या मुख्य घरी किंवा कानपुरात फार मोठा पराक्रम केला असला पाहिजे.
१८५० मध्ये सातारा, नागपूर इत्यादी ठिकाणे इंग्रजांनी ताब्यात घेतली. भारतीय स्वातंत्र्य संपुष्टात आले. सारी मदार या पेशवाईवर होती. तिथला म्हणजे; शनिवारवाड्यावरला झेंडा बाळाजीपंत नातू याने १८१८ मध्ये उतरवून तेथे इंग्रजांचे निशाण फडकावले होते. दुसर्‍या बाजीरावाला ऐंशी हजार पौंडांची सालाना पेंशन देऊन त्याला महाराष्ट्रातून हद्दपार केले गेले. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, ओरिसा, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, इत्यादी प्रदेशांना पेशव्यांनी स्वातंत्र्याची चटक लावून ठेवली होती. त्यामुळे दुसर्‍या बाजीरावास उत्तरप्रदेशातल्या कानपुराजवळ बिठूर इथे ठेवण्यात आले. हे ब्रह्मदेवाचे विश्रांतिस्थान होते. इथेच वाल्मीकिने रामायणाची रचना केली होती. ‘‘विट्ठल विट्ठल’’ करायला नाही; तरी, हरिचिंतनात ‘‘राम राम’’ करीत उर्वरित काळ व्यतीत करायला दुसर्‍या बाजीरावास इथे पाठवले. इथे त्याने वाडाबिडाही बांधला. साळीच्या मुलांना दत्तक घेतले. त्यांत नानासाहेब हा थोरला दत्तक! दुसर्‍या बाजीरावानंतर दुसरा नानासाहेब हा पेशवा होणार होता. पण, तो, तात्या टोपे, (ब्रह्मावर्तातल्याच) मोरोपंत तांब्यांची मनू (झाशीची राणी) यांना काय अवलक्षण सुचले, देव जाणे; त्यांनी स्वातंत्र्ययुद्धाचा उद्घोष करून, एकच एल्गार केला.
पारतंत्र्य येऊन जेमतेम सातच वर्षे झाली होती. ‘पेन्शनसाठी सगळे झाले’, असे राष्ट्रविरोधी मत कोणी व्यक्त केलेच तर त्यांना तूर्तास आपण क्षमा करू. तात्या टोपे किंवा अझिजान किंवा अझीम-उल्ला खान इत्यादींना पेंशनसाठी लढण्याचे काहीच कारण नव्हते. जे स्वातंत्र्याच्या विरुद्ध लढून इंग्रजांचे लांगुलचालन करीत राहिले त्या मध्यप्रदेशातील तथाकथित राजघराण्याचाही पेन्शनशी काहीच संबंध नव्हता. स्वातंत्र्यासाठी लढणार्‍यांवर चिखलफेक करण्याची दळभद्री दिग्विजयी सवय अजूनही कुठे कमी झालेली नाही. देश एकसारखा गुलाम का होतो, हे आपण समजूनच घेतले पाहिजे.
नानासाहेब पेशव्यांनी कानपूर स्वतंत्र केले तेव्हा नानासाहेबांची कन्या मैनावती ही ब्रह्मवर्तात होती. श्रीमंतांचा वाडा हा जणू तिच्याच ताब्यात होता. इंग्रजांच्या विरुद्ध त्या काळी पराकोटीचा असंतोष होता. जिथे इंग्रज दिसेल तिथे त्याला ठार मारावा, असा संताप भारतीयांच्या मनात होता. भारतीयांनी कानपूर स्वतंत्र केले. ब्रह्मावर्त स्वतंत्रच होते. पण, ब्रह्मावर्तात इंग्रज स्त्री-पुरुष पुष्कळ होते. त्यांच्या जीवित्वाला धोका होता. किंबहुना तो ध्यानात घेऊनच मैनावतीने त्या सर्वांना वाड्यात आश्रयाला आणून ठेवले. श्रीमंतांच्या वाड्यावर हल्लाबोल करून इंग्रज स्त्री-पुरुषांना ठार मारावे, एवढी कोणाची टाप नव्हती. पंतप्रधानांबद्दल तेवढी नम्रता त्या काळी असे!! नानासाहेबांचा सहृदय निरोप आला की, ‘निष्पाप इंग्रजांना आश्रय द्यावा.’ त्यापूर्वीच पंधरा वर्षांच्या मैनावतीने इंग्रजांच्या स्त्रिया, मुलेबाळे इत्यादींना राजवाड्यात आणून ठेवले होते. इंग्रजांनीही नि:श्‍वास टाकला. त्यांच्या मनांत नानासाहेबांच्या सहिष्णूपणाबद्दल खात्री होती.
तात्यांवर, कानपूरच्या बिबिखान्यातल्या निष्पाप इंग्रज बायका-मुलांच्या, सुरक्षेचा जिम्मा होता. तात्याने, बोटीत घालून, इंग्रजी बायका-मुले कानपुरातून रवाना केली खरी; पण, बिबिखान्यातल्या व बोटीतल्या इंग्रजांची कत्तल झाली. ती अझिजानने करवली म्हणतात. पण, आळ नानासाहेब आणि तात्या टोपे यांच्यावरच आला.
इंग्रजांनी कानपूर ताब्यात घेतले त्यावेळी तात्यावर नुकतीच सरसेनापतिपदाची धुरा ठेवण्यात आली होती. तात्याने स्वातंत्र्याची फौज कानपुरातून सहीसलामत बाहेर काढली. इंग्रजांना केवळ मनगटे चावीत बसावे लागले. इकडे, नानासाहेब भूमिगत झाले होते. ते राज्यकारभार चालवायलाच निसटले होते. इत:परही तेच राष्ट्रप्रमुख राहाणार होते!! इंग्रजांचा भाबडा ठोकताळा होता की, नानाला हुडकून काढून तोफेच्या तोंडी दिले की, भारतात दहशत बसेल; आणखी शंभर वर्षे कोणी स्वातंत्र्याचे नावसुद्धा काढणार नाही. पण, नानासाहेब सापडेनात. इंग्रजांच्या तळपायाची आग मस्तकात गेली नसती तरच नवल! नानाला भूमिगतातून बाहेर काढून भूमीवर फरफटत आणायचे असेल तर एकच मार्ग होता. तो म्हणजे त्यांची कन्या मैनावती हिची अवहेलना करणे!!
ब्रह्मावर्तात जाऊन इंग्रजांनी आपल्या बायका-मुलांची गळाभेट घेतली. मात्र, त्या पाताळयंत्री हरामखोरांनी मैनावतीचे आभार मानण्याऐवजी तिला अटक केली. तिला गुन्हेगारासारखे खेचत कानपुरास आणले. कानपुरात ऐलान केले की, ‘‘ज्याच्यावर तुमची मदार आहे त्या नाना पेशव्याची मुलगी आमच्या कब्जात आहे. असेल जर नाना पेशवा तुमचा पोशिंदा तर यावे त्याने पुढे आणि आपली मुलगी सोडवून दाखवावी. किंवा असेल तुमच्यात कोणी माईचा लाल तर सोडवावे मैनावतीला!’’ .. १८५७ म्हणजे काही हिंदी सिनेमा नव्हता. कोणीतरी येईल आणि या पंधरा वर्षांच्या मुलीला सोडवील.
इंग्रजांनी संपूर्ण कानपूर शहराला, अंडर कंपल्शन, यायला लावले; त्या विस्तीर्ण मैदानात! कानपूरनिवासी नुसते थुंकले असते तरी इंग्रज वाहून गेले असते. पण, सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागणार्‍या लोकांचा तेव्हा पूर्वजन्म चालला होता. ते केवळ शंकासुरच राहिले होते. नानासाहेब पेशव्यांचा ठावठिकाणा मैनावतीस पुसून क्रूरकर्मी इंग्रज थकून गेले. मैनावतीने या इंग्रज स्त्री-पुरुषांना आणि मुला-बाळांना करारी आश्रय दिला होता त्यांपैकी कोणीही मैनावतीस वाचवावयाला आले नाही. त्यांची मुस्काटे दाबून ठेवलेली नव्हती. उलटपक्षी, तीही मंडळी मोठ्या उल्हासाने मैनावतीचे हाल आणि दशा पाहावयास, मैदानात अहमहमिकेने जमलेली होती. यांच्या जीवित्वाच्या रक्षणासाठी मैनावतीने आपल्या जीवनाचा केतू केला ती सर्व मंडळी तिच्या हालअपेष्टांचे साक्षीदार बनायला उत्साहाने आली होती.
मैनावतीने इंग्रजांना नाही सांगितले की, नाना कुठे आहेत, ते! इंग्रजांनी तिला सर्व कानपूरवासीयांच्या समक्ष, हाल हाल करून, जिवंत जाळले!!

शेअर करा

Posted by on Nov 13 2016. Filed under आसमंत, शिरीष देशपांडे, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आसमंत, शिरीष देशपांडे, स्तंभलेखक (1349 of 1414 articles)


तरंग : दीपक कलढोणे | अगदी परवा अनुभवायला मिळालेली साधीच गोष्ट. सोलापूर बसस्थानकाकडून पुना नाका ओव्हरब्रीज एवढे अंतर ऑटोरिक्षाने गेलो. ...