ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी » यात कुठे आहे श्री गुरुजींना नाकारणे?

यात कुठे आहे श्री गुरुजींना नाकारणे?

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य, सह सरकार्यवाह, रा.स्व.संघ |

‘बंच ऑफ थॉट्स’मध्ये ‘अंतर्गत संकट’ नावाच्या प्रकरणात, ज्या तीन संकटांचा उल्लेख आहे, त्यातील जिहादी मुस्लिम कट्टरवादाच्या दहशतीने आज संपूर्ण जग त्रस्त आहे. या शक्ती भारतात ज्या फुटीरतावादी कारवाया करत आहेत, त्याने संपूर्ण देश चिंतित आहे. चर्चद्वारा फसवून-कपटाने होत असलेले कन्व्हर्जन, अनेक अराष्ट्रीय कारवायांना मिळणारे त्यांचे छुपे समर्थन आणि शहरी माओवाद किंवा नक्षलवादाच्या संकटांचे गांभीर्य, आताच्या काही घटनांमुळे सर्वांसमोर आले आहे. भारतात राहणार्‍या ख्रिश्‍चन किंवा मुसलमानांना सोबत घेऊन, भारताचे भविष्य घडविण्याच्या प्रयत्नांसोबतच, त्यांच्या आडून ज्या अतिरेकी, जिहादी, अराष्ट्रीय शक्ती भारताला विभाजित करण्याच्या कामी सक्रिय आहेत, त्यांच्यापासून सावध राहणेही आवश्यक आहे. श्री गुरुजींनी दिलेला हा इशारा आजही प्रासंगिक आणि सार्थक आहे.

Shriguruji

Shriguruji

दिल्लीच्या विज्ञान भवनात आयोजित सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची तीन दिवसांची व्याख्यानमाला- भविष्यातील भारत : संघाचा दृष्टिकोन, पूर्णपणे सफल राहिली. या व्याख्यानमालेत प्रतिपादित विषयांवर आजही चर्चा सुरू आहे. श्रोत्यांमध्ये अधिकतर नवीन लोक होते. त्यामुळे त्यांना संघाबद्दलची माहिती एकतर नव्हती किंवा फारच कमी होती किंवा भ्रामक होती. त्यामुळे अनेकांना हे चांगले तर वाटले, परंतु सोबतच आश्‍चर्यही वाटले की, खरेच संघात असे असते?
संघाचे तसेच राष्ट्रीय विचारांचे जे विरोधक आहेत, त्यांची तर झोपच उडाली आहे. ज्या कपोलकल्पित गोष्टी आक्रमकपणे प्रचारित करीत आतापर्यंत विरोधक प्रचार करत होते, त्यांचा तो काल्पनिक आधारच कोलमडून पडला आहे. तरीही, मनाचा मोठेपणा, मोकळेपणा नसल्याने, तसेच संघाला जाणून घेण्याची प्रामाणिक इच्छा नसल्याने, त्यांचा तोच घासून गुळगुळीत झालेला तर्क आणि विरोध आजही सुरू आहे. या वामपंथी वृत्तीचा सामना करत करत, संघाचे काही समर्थक वा काही स्वयंसेवकही त्यांच्याप्रमाणेच विचार करू लागले आहेत, असाही एक आश्‍चर्यकारक अनुभव या काळात आला.
एका गोष्टीवरून खूप आनंद किंवा आश्‍चर्य प्रकट होत आहे. सरसंघचालकांनी बंच ऑफ थॉट्स संबंधी जे स्पष्ट विचार प्रकट केलेत, त्याचा असा एक अर्थ लावला जाऊ लागला आहे की, संघाने श्री गुरुजी यांच्या या पुस्तकाला नाकारले आहे किंवा श्री गुरुजींनाच संघाने नाकारले आहे. परंतु, हे खरे नाही.
बंच ऑफ थॉट्स हे, श्री गुरुजी सरसंघचालक झाल्यानंतर (१९४० साली) विविध विषयांवर त्यांनी व्यक्त केलेल्या विचारांचे संकलन आहे. याची पहिली आवृत्ती १९६६ साली प्रकाशित झाली होती. यात संकलित झालेल्या अनेक विचारांची पृष्ठभूमी त्या काळातील संदर्भ आणि परिस्थिती होती. हा कालखंड भारताच्या आणि संघाच्या इतिहासाचा विशेष महत्त्वाचा कालखंड राहिला आहे. त्यामुळे त्या काळी प्रकट केलेल्या विचारांना, त्या काळातील घटनांच्या संदर्भात समजले पाहिजे.
डॉ. हेडगेवार यांच्या मृत्यूनंतर ज्यावेळी श्री गुरुजींच्या खांद्यावर संघकार्याचा विस्तार व त्याला दिशा देण्याची महत् जबाबदारी आली, तेव्हा श्री गुरुजींचे वय केवळ ३४ वर्षांचे होते. संघकार्याला देशव्यापी करायचे होते. पाकिस्तानच्या मागणीने जोर पकडला होता. १९४२च्या ‘भारत छोडो’ आंदोलनात ठिकठिकाणी स्वयंसेवक सहभागी झाले होते. अनेकांना सश्रम कारावास, तर कुठे मृत्युदंडाची शिक्षा मिळाली होती. पाकिस्तानची मागणी घेऊनच १९४६ ची निवडणूक झाली होती. मुस्लिमबहुल भागात हिंदूंवर हल्ले होत होते. ‘डायरेक्ट अ‍ॅक्शन’मुळे बंगालमध्ये हिदूंचा महाभीषण नरसंहार झाला होता. भारताला स्वातंत्र्य तर मिळाले, परंतु सोबतच दुर्दैवाने भारताची फाळणी झाली. नव्या पाकिस्तानात हिंदूंचा भीषण ‘कत्ल-ए-आम’ सुरू झाला. लाखोंच्या संख्येत आपल्याच देशात हिंदूंना निर्वासित होऊन यावे लागले. त्यांना मदत करण्यात संघाच्या स्वयंसेवकांनी आपले सर्वस्व पणाला लावले. या निर्वासितांना स्वयंसेवकांशिवाय दुसरा आधार नव्हता. महात्मा गांधींची हत्या झाल्यामुळे संपूर्ण देश स्तब्ध झाला होता. याचा खोटा आरोप रचून संघावर बंदी लावण्यात आली. ही स्वतंत्र भारताच्या द्वेषपूर्ण घाणेरड्या राजकारणाची सुरुवात होती. सरकार आरोप देखील सिद्ध करू शकत नव्हते. चर्चेचे सर्व मार्ग बंद झाल्यामुळे स्वयंसेवकांनी या अन्यायाविरुद्ध अभूतपूर्व असा शांतिपूर्ण सत्याग्रह केला. शेवटी बंदी उठवावी लागली. कम्युनिस्ट आंदोलनाचा प्रभाव वाढत चालला होता. त्याच्या माध्यमातून देशात विघटनकारी शक्ती सक्रिय झाल्या होत्या. १९६२ चे चिनी आक्रमण आणि भारतीय सैन्याचा घोर पराभव यामुळे निराशेचे वातावरण होते. कम्युनिस्टांनी उघडपणे चीनचे समर्थन केले होते. कन्वर्जनकेंद्रित ख्रिश्‍चनांच्या कारवाया वाढल्या होत्या. न्यायमूर्ती नियोगी आयोगाने आपल्या चौकशीनंतर जो अहवाल दिला, त्यामुळेच मध्यप्रदेश आणि तत्कालीन उडीसा (ओडिशा) राज्यात काँग्रेसचे सरकार असूनही, ‘कन्वर्जनविरोधी’ कायदा तयार करण्यात आला. चर्चच्या पातळीवर त्याला विरोधही झाला. या कालखंडात श्री गुरुजींनी वेळोवेळी स्वयंसेवक आणि नागरिकांसमोर जे विचार प्रकट केले, त्या विचारांचे संकलन बंच ऑफ थॉट्सच्या रूपात प्रसिद्ध झाले.
श्री गुरुजींनी त्यानंतरही ८ वर्षांपर्यंत, विविध विषयांवर मार्गदर्शन केले आहे. या कालखंडात श्री गुरुजींनी व्यक्त केलेल्या विचारांचे संकलन बंच ऑफ थॉट्स मध्ये नाही. म्हणून श्री गुरुजी जन्मशताब्दी वर्षात, श्री गुरुजींच्या विचारांचे समग्र संकलन १२ खंडांमध्ये २००६ साली प्रकाशित झाले. ते वाचण्यालायक आहे. याचा अभ्यास कुणा संघविरोधकाने केला असेल, असे वाटत नाही. या १२ खंडात जे विचार आहेत, त्याचे सार- ‘श्री गुरुजी : दृष्टि एवम् दर्शन’ या पुस्तकाच्या रूपात प्रकाशित झाले आहे. सरसंघचालकांनी हेच पुस्तक वाचण्याचे आवाहन केले आहे. यात श्री गुरुजींच्या विचारांना नाकारण्याची बाब कुठून येते?
त्या कार्यक्रमात, बंच ऑफ थॉट्सचा संदर्भ देऊन, मुसलमानांबाबत संघाचा काय विचार आहे, हे विचारले गेले. सरसंघचालकांनी जे उत्तर दिले, तोच विचार स्वत: श्री गुरुजींनी १९७२ साली डॉक्टर जिलानी यांना दिलेल्या मुलाखतीत मांडला आहे. ती मुलाखत एकतर संघ विरोधकांनी वाचली नसावी अथवा जाणूनबुजून विसरून गेले असतील. या मुलाखतीचा अंतिम भाग असा आहे-
डॉ. जिलानी : भारतीयीकरणावर खूप चर्चा झाली. भ्रम देखील पुष्कळ उत्पन्न झालेत. हे भ्रम कसे दूर होतील, हे आपण सांगू शकाल काय?
श्री गुरुजी : भारतीयीकरणाची घोषणा जनसंघाने केली; परंतु यावरून संभ्रम कशाला निर्माण व्हायला हवा? भारतीयीकरणाचा अर्थ सर्वांना हिंदू करणे असा होत नाही.
आम्हां सर्वांना हे सत्य जाणून घेतले पाहिजे की, आम्ही याच भूमीचे पुत्र आहोत. म्हणून याबाबतीत आपली निष्ठा अविचल राहणे अनिवार्य आहे. आपण सर्व एकाच मानवसमूहाचे अंग आहोत. आम्हा सर्वांचे पूर्वज एकच आहेत. म्हणून आम्हां सर्वांच्या आकांक्षाही एक समान आहेत. याला जाणणेच खर्‍या अर्थाने भारतीयीकरण आहे.
भारतीयीकरणाचा हा अर्थ नाही की, कुणाला आपली पूजापद्धती त्यागावी लागेल. हे आम्ही कधीच म्हटले नाही आणि कधी म्हणणारही नाही. आमचे तर असे म्हणणे आहे की, उपासनेची एकच पद्धत संपूर्ण मानव जातीला सोयीची नाही.
डॉ. जिलानी : तुमचे म्हणणे योग्य आहे. अगदी शंभर टक्के योग्य आहे. म्हणून या स्पष्टीकरणासाठी मी तुमचा अत्यंत आभारी आहे.
श्री गुरुजी : तरीही मला शंका आहे की, मी सर्व गोष्टी स्पष्ट करू शकलो की नाही.
डॉ. जिलानी : काही हरकत नाही. तुम्ही तुमच्याकडून फारच चांगल्या प्रकारे स्पष्ट केले आहे. कुणीही विचारशील आणि भला माणूस तुमच्याशी असहमत होणार नाही. आपल्या देशातील जातीय बेसुरपणा समाप्त करण्याचा मार्ग शोधण्यास तुम्हाला सहकार्य करू शकतील अशा मुस्लिम नेत्यांची आणि तुमची बैठक आयोजित करण्याची वेळ आली आहे, असे तुम्हाला वाटत नाही का? अशा नेत्यांना भेटणे तुम्हाला आवडेल का?
श्री गुरुजी : केवळ आवडेलच असे नाही, तर अशा भेटीचे मी स्वागत करेन.
याच प्रकारे पत्रकार खुशवंत सिंग यांनी देखील श्री गुरुजींची मुलाखत घेतली होती. ती वाचली तरी, श्री गुरुजींबाबत जी धारणा वामपंथी प्रचारित करत आहेत, ती बदलून जाईल. ही मुलाखत देखील १९७२ सालची आहे. या मुलाखतीबाबत खुशवंतसिंग लिहितात- काही लोकांना न भेटताच तुम्ही त्यांच्याबद्दल दुर्भावना ठेवत असता. ज्यांचा मी तिरस्कार करत होतो, अशा माझ्या सूचीत श्री गुरुजींचे नाव सर्वात वर होते.
मुलाखतीच्या शेवटी हेच खुशवंतसिंग लिहितात- मी श्री गुरुजींमुळे प्रभावित झालो आहे का? मी कबूल करतो की, हो.
तर, हे आहे सत्य.
वास्तव आणि संदर्भाच्या आरशात बघितले, तर श्री गुरुजींचे समग्र वैचारिक साहित्य वाचल्याविना, त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचे प्रयत्न न करता, निखालस खोट्याचा प्रचार करणार्‍या वामपंथींची कुशलता स्पष्ट होते.
बंच ऑफ थॉट्स मध्ये, अंतर्गत संकट नावाच्या प्रकरणात, ज्या तीन संकटांचा ÷उल्लेख आहे, त्यातील जिहादी मुस्लिम कट्टरवादाच्या दहशतीने आज संपूर्ण जग त्रस्त आहे. या शक्ती भारतात ज्या फुटीरतावादी कारवाया करत आहेत, त्याने संपूर्ण देश चिंतित आहे. चर्चद्वारा फसवून-कपटाने होत असलेले कन्व्हर्जन, अनेक अराष्ट्रीय कारवायांना मिळणारे त्यांचे छुपे समर्थन आणि शहरी माओवाद किंवा नक्षलवादाच्या संकटांचे गांभीर्य, आताच्या काही घटनांमुळे सर्वांसमोर आले आहे.
भारतात राहणार्‍या ख्रिश्‍चन किंवा मुसलमानांना सोबत घेऊन, भारताचे भविष्य घडविण्याच्या प्रयत्नांसोबतच, त्यांच्या आडून ज्या अतिरेकी, जिहादी, अराष्ट्रीय शक्ती भारताला विभाजित करण्याच्या कामी सक्रिय आहेत, त्यांच्यापासून सावध राहणेही आवश्यक आहे. श्री गुरुजींनी दिलेला हा इशारा आजही प्रासंगिक आणि सार्थक आहे.
हे लक्षात घ्यायला हवे की, हिंदू जीवन, आपला मूळ विचार आणि मूल्यांना कायम ठेवून, ज्या प्रकारे कालानुरूप आविष्कृत होत राहिले आहे, तसेच संघकार्याचे स्वरूप आहे. संघाच्या ९२ वर्षांच्या प्रवासात अनेक चढ-उतार आलेत. विरोध, दुष्प्रचार, कुठाराघाताचे अनेक प्रयत्न झालेत. तरीदेखील संघकार्य आणि विचार सर्वव्यापी तसेच सर्वस्पर्शी होत आहे, वाढत आहे. यामागे मूळ हिंदू चिंतनाने प्रेरित युगानुकूल परिवर्तनशीलता आणि लवचिक दृढताच कदाचित कारण आहे.

Posted by : | on : 28 Oct 2018
Filed under : आसमंत, पुरवणी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी (236 of 875 articles)

Ayappa Swami
संवाद : सोमनाथ देशमाने | काय गंमत आहे बघा! ज्यांना काफिरांचे अस्तित्वच मान्य नाही, असा एक अहिंदू काफिरांच्या मंदिरात महिलांना ...

×