ads
ads
दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

•अजित डोवाल यांचे प्रतिपादन •पुलवामा हल्ला कधीच विसरणार नाही,…

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

•टेरर फंडिंगप्रकरणी ईडीची धडक कारवाई, नवी दिल्ली, १९ मार्च…

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

•सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, नवी दिल्ली, १९ मार्च – इमारतीच्या…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

•फेसबूकला होती संपूर्ण माहिती, लंडन, १८ मार्च – कॅम्ब्रिज…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

•शरद पवार यांची मागणी •कुणीच अर्ज भरू नये, मुंबई,…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:31 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, ल.त्र्यं. जोशी, स्तंभलेखक » राजकारणात अभ्यासाला पर्याय नाही

राजकारणात अभ्यासाला पर्याय नाही

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी |

राहुल व त्यांच्या टीमचा अभ्यासाच्या अभावाचा प्रश्‍न केवळ राफेलपुरताच मर्यादित नाही. मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी आतापर्यंत जेवढे हथकंडे वापरले ते सर्व फसले आहेत. भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईकविरुध्द काँग्रेसने काय कमी कलकलाट केला? आपण लष्कराच्या मनोबलाशी खेळतो आहोत याचेही भान त्यावेळी त्याला राहिले नाही. नोटबंदीबाबतही त्यापेक्षा वेगळे नाही. सी.बी.आय. न्यायालयाचे न्यायाधीश लोया यांच्या मृत्युप्रकरणात तोंड घालण्याची त्यांना काहीही गरज नव्हती. पण पुन्हा राहुल तोंडघशी पडले. तशीच गत न्यायमूर्ती दीपक मिश्रांविरुध्दच्या महाभियोग प्रकरणातही नामुष्कीच पत्करावी लागली. शेवटी अभ्यास तो अभ्यासच. होमवर्क ते होमवर्कच. त्याला पर्याय नाही हे राहुल व त्यांच्या चौकडीला केव्हा कळेल?

Rafale Rahul

Rafale Rahul

जगातील सर्वाधिक वेगवान म्हणून वर्णन केल्या जाणार्‍या भारतीय अर्थव्यवस्थेचे शिल्पकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘चोर’ या अत्यंत असभ्य शब्दात उल्लेख केल्यामुळे काँग्रेसचे स्वनामधन्य अध्यक्ष राहुल गांधी यांची खाज जिरली म्हणून की, काय, त्यांनी आता ‘आगे आगे देखो’चा पवित्रा घेतलेला दिसतो. त्यांचा ‘संयम’ किती काळ टिकेल हा प्रश्‍नच आहे पण २०१४ नंतरच्या त्यांच्या कारकीर्दीत ‘राजकारणात अभ्यासाला पर्याय नाही’ एवढे जरी त्यांना कळले तरी त्यांच्या समर्थकांना ते पंतप्रधान होण्याएवढा आनंद होईल. कारण २०१४ नंतर आणि विशेषत: काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांची अवस्था ‘चेष्टा बघु किती’सारखी झाली आहे. खोटे बोलण्याचे तर त्यांनी जणू व्रतच घेतले आहे. राजकारणाच्या सभ्य भाषेत त्याचे ‘हिट अँड रन’ असे वर्णन केले जाते. त्यांच्या त्याप्रकारच्या वागण्याचा प्रत्यय केवळ राफेल प्रकरणामुळेच येतो असे नाही तर मोदी सरकारवर त्यांनी केलेल्या प्रत्येक हल्ल्याच्या वेळी येत आहे. पण तरीही ते आपली रणनीती बदलायला तयार नाहीत. माझे पत्रकारमित्र प्रवीण बर्दापूरकर यांच्या एका लेखाचा मथळा फक्त मी वाचला आहे. त्यात ते म्हणतात की, ‘राहुल गांधी बदले बदलेसे’ वाटत आहेत. पण नोटबंदी प्रकरणापासून तर राफेल प्रकरणापर्यंत राहुलने चालविलेले अकांडतांडव पाहता मला तरी तसे वाटत नाही. त्यांच्यात अजिबातच सुधारणा झाली नाही असे म्हणता येणार नाही पण भारताचे छाया पंतप्रधान म्हणण्याइतपत ती नक्कीच झाली नाही असे म्हणावे लागेल. आणि ते जोपर्यंत खोट्यावर इमले बांधण्याच्या आपल्या शैलीचा त्याग करीत नाहीत तोपर्यंत ते होणारही नाही. खोटे बोलण्याची ही शैली त्यांना कुठे घेऊन जाईल, याचा अंदाज करणेही कठिण आहे.
राफेलपासूनच आपण त्यांच्या खोटेपणाची उलटगिनती सुरु करु. राफेल सौद्यात काही घोटाळा झाला आहे, याची शंका येण्याइतपत जरी आधार मिळाला तर त्याची चौकशी व्हावी हे कुणीही मान्य करील. पण तो आधार मिळविण्याची जबाबदारी तरी तुम्ही घ्याल की, नाही? पण अशी जबाबदारी घेण्याची राहुलची वा काँग्रेसची तयारी नाही. आता कुठे त्यांनी हा विषय भारताच्या महालेखाकाराकडे(सीएजी) आणि केंद्रीय सतर्कता आयोगाकडे (सीव्हीसी) नेला आहे. पण त्यांच्या अभिप्रायाची वाट पाहण्याची मात्र त्यांची तयारी नाही. त्यापूर्वीच ते देशाच्या पंतप्रधानांना ‘चोर’ म्हणून ते मोकळे झाले आहेत. अशा सनसनाटी आरोपांच्या बातम्यांमुळे वृत्तवाहिन्यांचा टीआरपी भलेही वाढत असेल पण त्यांच्या विश्‍वसनीयतेला मात्र धक्काच बसतो. कारण सनसनाटी बातम्यांमुळे तयार झालेले परसेप्शन तथ्य समोर येताच विरघळून जाते. म्हणूनच राजकारणात तथ्याला, अभ्यासाला अधिक महत्व आहे. त्या मार्गाचा काँग्रेस प्रयत्नच करीत नाही. अल्पकाळ टिकणारी सनसनाटी निर्माण करण्यात ते यशस्वी झाल्यासारखे दिसतही असतील पण ती अल्पकाळच असते याचा विसर पडू देता कामा नये.
अभ्यासाचे भान नसले म्हणजे काय होते याचा अनुभव येऊनही ते सुधरायला तयार नाहीत. ‘राफेल प्रकरण हे बोफोर्ससारखेच आहे’ असे म्हणून प्रारंभीच त्यांनी आपल्या पिताश्रींवर भ्रष्टाचाराचा आरोप करुन तोंडघशी पडले. खरे तर राफेल व बोफोर्स यात विदेशातून शस्त्रखरेदी याशिवाय अन्य कोणतेही साम्य नाही. एक तर राफेल हा भारत व फ्रान्स या दोन सरकारांमधील करार आहे. त्यात कुणीही मध्यस्थ नाही. बोफोर्सचा सौदा भारत सरकार व एक खासगी कंपनी यातील होता व त्यात विन चढ्ढासारखे मध्यस्थही होते. बोफोर्सचा गौप्यस्फोट भारतातील कोणत्याही विरोधी पक्षनेत्याने केला नाही, जरी त्यांनी तो विषय तर्कसंगत शेवटापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला असेल. बोफोर्स प्रकरणाची पहिली बातमी स्वीडीश रेडिओने दिली होती. तिची शहानिशा करण्यासाठी तेथेल सरकारने त्यांच्या ऑडिटब्युरोमार्फत चौकशी केली होती. त्यातून मध्यस्थ होते व लाच देण्यात आली होती हे सिध्द झाले होते. त्या अहवालावरच झाकपाक करण्यासाठी बी.शंकरानंद या मंत्र्याला राजीनामा द्यायला सांगून त्यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त सांसदीय समिती नेमण्यात आली होती. झाकपाक करण्याचेच काम असल्याने ती समितीही लाभधारकापर्यंत पोचू शकली नाही. पण क्वाट्रोचीमामाचे बँक ऑफ इंग्लंडमधील खाते सिल झाले होते. पुढे भारताच्याच एका मंत्र्याने कुणाच्या तरी दबावाखाली येऊन ते खाते उघडण्यास आणि आपले पैसे घेऊन इंग्लंडमधून पोबारा करण्यास क्वाट्रोचीमामाला मदत केली होती. भारतातून बाहेर सटकण्यातही कुणाची तरी मदत मिळाल्यामुळे तो यशस्वी झाला होता. तो ‘कुणीतरी’ कोण होता हे सर्वांना कळलेही आहे. राफेलप्रकरणात यापैकी काहीही घडलेले नाही. फ्रान्स सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्याची भूमिका घेतलेली नाही. राहुल गांधींचा प्रत्येक आरोप किती खोटा आहे हे सांगण्यास मात्र ते विसरले नाही. या प्रकरणात प्रत्येक वेळी ते खोटेच ठरले आहेत. तरी जर ते पंतप्रधानांना अर्वाच्य शिविगाळ करीत असतील तर ‘बेशरम’ म्हणून उल्लेख झाल्याचा राहुलसमर्थकांना कां राग यावा?
राफेलच्या किंमतीचाच विषय पहा. एक तर स्वत: राहुललाच नेमकी किंमत माहित नाही. त्यांनी प्रत्येक वेळी वेगवेगळी किंमत सांगितली आहे. ‘या सौद्यात गुप्ततेचे कलम नाही’ असे वाक्य फ्रान्सच्या अध्यक्षंच्या तोंडात त्यांनी लोकसभेत उच्चारले आणि त्या दिवसाचे लोकसभेचे कामकाज संपण्यापूर्वी फ्रान्स सरकारचा खुलासा लोकसभेत येऊन धडकला. कुणाची इज्जत गेली? राहुलची तर गेलीच पण त्याबरोबर त्यांच्यासारख्या खोटारड्या नेत्यामुळे लोकसभेलाही मान खाली घालावी लागली. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची साक्षही कामी आली नाही.
किंमतीतही एक फरक आहे. फक्त विमानाची आणि शस्त्रास्त्रांसहीत येणार्‍या विमानाच्या किंमतीत फरक राहणे स्वाभाविक आहे हे कुणालाही कळू शकते. शस्त्रास्त्रेही अतिशय भेदक असल्यामुळे त्या शस्त्रांचा किंमतीत समावेश होणे ओघानेच आले. पण विमानाची किंमत सांगतांना राहुल गांधी कधीही हा फरक सांगत नाहीत. एकीकडे ते केवळ विमानाची किंमत सांगतात आणि लगेच वाढलेली किंमत सांगतात. २०१२ मधील रुपयाची किंमत आणि २०१६ मध्ये असणारी रुपयाची किंमत यातील फरक लक्षात घेण्याची तर त्यांची तयारीच नाही. अनिल अंबानी यांच्या नावाचाही ते असाच नरो वा कुंजरो वा असाच करतात. वास्तविक राफेल करारातच अशी तरतूद आहे की, त्या सौद्याच्या निम्मे रक्कम त्या कंपनीला भारतात सुटे भाग तयार करण्यासाठी गुंतवावी लागेल. भारतीय उद्योगांना काम मिळावे, तरुणांना रोजगार मिळावा अशी त्या मागे योजना आहे. पण अशी संधी केवळ अनिल अंबानीनाच मिळाली नाही. अनेक भारतीय कंपन्यांना ती मिळाली. एवढेच काय पण राहुलचे मार्गदर्शक सॅम पिट्रोडा यांच्या कंपनीचाही त्यात समावेश आहे. पण राहुल गांधी अनिल अंबानीशिवाय कुणाचेही नाव घेत नाहीत. या प्रकरणात अनिल अंबानीही केवळ योगायोगानेच आले. रिलायन्स समूहाच्या अनेक कंपन्या आहेत याची राहुलला माहिती नाही असे नाही. २०१२ मध्ये फ्रान्सच्या कंपनीने अनेक कंपन्यांबरोबरच रिलायन्सची निवड केली होती हेही रेकॉर्डवर आहे. त्यावेळी रिलायन्स समूह एकत्र होता. त्यानंतर त्या कंपनीचे वाटे झाले व नेमक्या अनिल अंबानींच्या वाट्याला आलेल्या कंपनीकडेच संबंधित जबाबदारी गेली. पण हा तपशील राहुल गांधी कधीच सांगत नाहीत. कारण ते सांगितले तर त्यांच्या आरोपांचा डोलाराच कोसळून पडतो.
अगदी परवा परवा ते पुन्हा उघडे पडले. यावेळी त्यांनी फ्रान्सच्या माजी अध्यक्षाला विवादात ओढले. ओलांद नावाच्या त्या माजी अध्यक्षाची एका पत्रकाराने मुलाखत घेतली. मुलाखतीचा विषय होता त्या अध्यक्षाच्या चित्रपटक्षेत्रात काम करणार्‍या एका नटीचा. ती नटी ओलांद यांची प्रेयसी असल्याची व तिला ओलांदच्या दबावामुळे अनिल अंबानीने मदत केल्याची तक्रार होती. राफेल सौद्याशी तिचा काहीही संबंध नव्हता. पण जणू काय त्यासाठीच ती मुलाखत होती असा भ्रम राहुलसमर्थकांनी त्यांच्यासोबत असलेल्या मोदीविरोधी वृत्तवाहिन्यांच्या मदतीने निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण एकीकडे फ्रान्स सरकारने व दुसरीकडे अनिल अंबानीने आरोपांचा इन्कार केल्याने इथेही महाराज उघडे पडले. ते असे प्रत्येक ठिकाणीच उघडे पडत असल्यामुळे त्यांना विरोधी पक्षाचे कामही धड करता येत नाही असे मोदींनी म्हटले तर बिघडले कुठे? वास्तविक या प्रकरणात पाकिस्तानला डोकावण्याची संधी मिळायला नको एवढी तरी काळजी त्यांनी निश्‍चितच घ्यायला हवी होती. किमान पाकिस्तान डोकावल्यानंतर तरी त्याचा निषेध करायला हवा होता व आमचे आम्ही पाहून घेऊ असे ठणकावून सांगायला हवे होते. पण तेही त्यांना करता आले नाही. त्यामुळे त्यांचे पाकिस्तानशी संगनमत तर नाही ना, अशी शंका उत्पन्न करण्याची संधी मोदींना मिळाली.
राहुल व त्यांच्या टीमचा अभ्यासाच्या अभावाचा प्रश्‍न केवळ राफेलपुरताच मर्यादित नाही. मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी आतापर्यंत जेवढे हथकंडे वापरले ते सर्व फसले आहेत. भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईकविरुध्द काँग्रेसने काय कमी कलकलाट केला? आपण लष्कराच्या मनोबलाशी खेळतो आहोत याचेही भान त्यावेळी त्याला राहिले नाही. नोटबंदीबाबतही त्यापेक्षा वेगळे नाही. नोटबंदीमुळे लोकांना त्रास होऊ शकतो हे मोदींनी पहिल्याच दिवशी सांगितले होते. तरीही काँग्रेसने तिच्या विरोधात रान उठविण्याचा प्रयत्न केला. पण उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत लोकांनी तिला परस्पर उत्तर देऊन भाजपाला अभूतपूर्व यश मिळवून दिले. जीएसटी हा तर काँग्रेसचाच आवडता विषय. पण त्यांना तो तडीस नेता आला नाही. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेससहीत सर्व पक्षांच्या अर्थमंत्र्यांना सोबत घेऊन हा कर लागू केला. पण जणू काय तसे निर्णय घेण्याची ठेकेदारी आपलीच आहे अशा थाटात काँग्रेसने राहुलच्या नेतृत्वाखाली त्याला विरोध केला. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या वेळी तर तो चरमसीमेला नेला. पण तेथेही तो असफल झाला. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने तथाकथित सॉफ्ट हिुंदुत्वाचा वापर करुन पाहिला. आधी हिंदु समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. नंतर मंदिरांचे उंबरठे झिजविण्याचे नाटक केले. साधुसंतांच्या पाया पडण्याचे ढोंग रचले गेले. पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. आज कुमारस्वामीच्या नेतृत्वाखाली अगतिक होऊन सरकारात राहण्याची नामुष्की त्यांच्या नशिबी आली. सी.बी.आय. न्यायालयाचे न्यायाधीश लोया यांच्या मृत्युप्रकरणात तोंड घालण्याची त्यांना काहीही गरज नव्हती. पण आपल्याला एकीकडे अमित शहांना कोंडीत पकडता येईल व दुसरीकडे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनाही अडचणीत आणता येईल या दुहेरी हेतूने ते सर्वोच्च न्यायालयातील वकिलांच्या राजकारणात कुदले आणि तोंडघशी पडले. तशीच गत न्यायमूर्ती दीपक मिश्रांविरुध्दच्या महाभियोग प्रकरणातही त्यांना नामुष्कीच पत्करावी लागली.
मोदींच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांच्या कथित महागठबंधनाचे तर अद्याप बीजारोपणही होऊ शकले नाही. पाहता पाहता मायावतींनी छत्तीसगडमध्ये अजित जोगींशी युती जाहीर करुन टाकली. उत्तरप्रदेशात अखिलेश व मायावती काँग्रेसला दोनपेक्षा अधिक जागा द्यायला तयार नाहीत. बिहारमध्ये तिला लालुपुत्राच्या चरणी लीन व्हावे लागेल की, काय अशी स्थिती आहे. पश्‍चिम बंगालमध्ये स्वत: काँग्रेसजनांचाच ममतासोबत जाण्याला विरोध आहे. ममतांनीही जणू कथित महागठबंधनाचा नाद सोडला आहे. तेलंगणात श्रीनिवास रावांनी वेगळा मार्ग चोखाळलाच आहे. आंध्रात चंद्राबाबू आणि तामिळनाडूमध्ये स्टॅलीन राहुलपेक्षा भारी आहेत. महाराष्ट्रात शरद पवार काँग्रेसला सोबत घेण्यात यशस्वी होण्याचे संकेत दिसत नाहीत. पंजाबात कॅप्टन अमरिंदरसिंगानी आपले आसन राहुलशिवाय बळकट केले आहे. मध्यप्रदेशात कमलनाथ की, ज्योतिरादित्य शिंदे की, दिग्गीराजा असा तिढा कायमच आहे. राजस्थात सचिन पायलट आणि अशोक गहलोत यांच्यात काटाकाटी सुरुच आहे. राज्यसभेच्या उपसभापतिपदाच्या निवडणुकीतही त्यांना सर्व विरोधी पक्षांना सोबत घेता आले नाही. मायावतींनी छत्तीसगडमध्ये तरी त्यांची साथ सोडली आहे आणि उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थानच्या बाबतीत त्या डोळे वटारत आहेत. अलिकडे लोकसभेतील पक्षनेते मल्लिाकार्जुन खरगेही सक्रिय दिसत नाहीत. जणू काय सुरजेवाला, अभिषेक मनु सिंघवी, कपिल सिब्बल, अखिलेशप्रताप सिंग आदींच्या चौकडीने राहुलचा कब्जाच घेतला आहे. जनमत चाचण्यांमध्ये राहुल मोदींच्या जवळपास फिरकतांनाही दिसत नाही. अशा स्थितीत खोटारडेपणाचे राजकारण राहुल आणि काँग्रेसला कितपत वाचवू शकेल हा प्रश्‍नच आहे. पण जगाचा नियमच आहे की, झोपी गेलेल्याला जागे करता येते. झोपेचे सोंग घेणार्‍याला कुणीही जागे करु शकत नाही. तसेच राहुल आणि काँग्रेसच्या बाबतीत होत आहे.
अलिकडे वृत्तवाहिन्यांवरील चर्चेतील राहुलच्या चौकडीतील सदस्यांचे वर्तन पाहिले तर त्यांनी कुणाचेच ऐकायचे नाही असे ठरविलेले दिसते. धादांत खोटे बोलायचे, वरुन त्याचे आक्रस्ताळेपणाने समर्थनही करायचे. भाजपा प्रवक्त्यांनी मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न केला तर अडथळे निर्माण करायचे अशी रणनीती त्यांनी ठरविल्याचे दिसते. पण शेवटी अभ्यास तो अभ्यासच. होमवर्क ते होमवर्कच. त्याला पर्याय नाही हे या चौकडीला केव्हा कळेल?
याउपरही राफेल प्रकरणाची कुठल्याही यंत्रणेमार्फत चौकशी व्हायला हरकत घेता येणार नाही. पण तत्पूर्वी सकृतदर्शनी तरी एखादा आरोप सिध्द होण्याचे संकेत मिळायला हवेत. आताही सीव्हीसी किंवा सीएजी यांची चौकशी होऊ द्यावी. त्यांना काही प्रथमदर्शनी शंका आली तर सखोल चौकशीही होऊ शकते. ती कुणीही अडवणार नाही. पण एक बाब मात्र कटाक्षाने लक्षात ठेवायला हवी व ती म्हणजे कुठल्याही परिस्थितीत राफेल विमानांचे आगमन मात्र रखडायला नको. कारण आधीच आपल्या अकार्यक्षमतेमुळे मनमोहन सरकारने देशाच्या संरक्षणसज्जतेशी अक्षम्य तडजेड केली आहे. आता आपल्या वायुदलाची उपेक्षा मुळीच करता यायची नाही. त्याला राफेल लढाऊ विमानांची नितांत गरज आहे. कारगील युध्दाच्या वेळी एअर कव्हर पुरेसे नसल्याने आपल्याला जवानांच्या प्राणांची मोठी किंमत द्यावी लागली आहे. तसे होऊ नये म्हणून वाजपेयींच्या काळापासूनच लढाऊ विमानांचा शोध सुरु झाला. रशियाची विमाने किती अपुरी आहेत हे वारंवार होणार्‍या मिग वा सुखोई विमानांच्या अपघातांमुळे सिध्द होत आहे. भारताचे तेजस विमान अद्याप जमिनीवरच आहे. खरे तर मनमोहन सरकारनेच हा सौदा करायला हवा होता. पण कदाचित मध्यस्थांची त्यांना लागलेली चटक पूर्ण न झाल्याने तो त्यांनी अर्ध्यावरच सोडला असावा. वायुदलाची भेदकक्षमता वाढविण्यासाठी मोदी सरकारने धडाकेबाज निर्णय घेतल्याने काँग्रेसची निराशा होणे शक्य आहे. त्यांनी ती जरुर गोंजारत बसावी पण राफेल विमाने लवकरात लवकर भारतीय वायुदलात सामील व्हायलाच हवीत. कारण त्यामुळे लष्कराचे मनोबल उंचावणार आहे. देशाच्या संरक्षणक्षमतेशी खेळून कुणालाही आपली राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करण्याची हौस भागविण्याची संधी मिळायला नको. मोदींचे सगळेच बरोबर आहे व ते चुकूच शकत नाहीत असे मला सूचित करायचे नाही. ते माणूस आहेत आणि मनुष्य हा चुकू शकतो. मोदीही चुकू शकतात. पण ते देशाशी बेइमानी करणार नाहीत हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. त्यांची दिशा योग्य असल्याचा निर्वाळा तर स्वत: सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी नुकताच दिला आहे.

Posted by : | on : 30 Sep 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, ल.त्र्यं. जोशी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, ल.त्र्यं. जोशी, स्तंभलेखक (444 of 1287 articles)

Rahul Gandhi Narendra Modi Amit Shah
जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तीनपैकी छत्तीसगडमध्ये मायावतींनी अजित जोगी यांच्या पक्षाशी आघाडी करून जागाही वाटून घेतल्या आहेत. मध्यप्रदेशात ...

×