हज सबसिडी बंद

हज सबसिडी बंद

►मुस्लिमांना प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार देणार ►नकवी यांची घोषणा, नवी…

चकमकीत मला ठार करण्याचा कट : तोगडिया

चकमकीत मला ठार करण्याचा कट : तोगडिया

►लवकरच पुराव्यांसह समोर येणार, अहमदाबाद, १६ जानेवारी – १०…

न्या. लोयांच्या मृत्यूसंबंधी दस्तावेज याचिकाकर्त्याला द्या

न्या. लोयांच्या मृत्यूसंबंधी दस्तावेज याचिकाकर्त्याला द्या

►सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश, नवी दिल्ली, १६ जानेवारी…

क्षेपणास्त्र डागल्याच्या संदेशामुळे गोंधळ

क्षेपणास्त्र डागल्याच्या संदेशामुळे गोंधळ

वॉशिंग्टन, १४ जानेवारी – अमेरिकेच्या हवाईक्षेत्रातील हवाई बेटावर क्षेपणास्त्र…

‘जम्मू-काश्मीरला जाणे टाळा’

‘जम्मू-काश्मीरला जाणे टाळा’

►अमेरिकेची पर्यटकांना सूचना, वॉशिंग्टन, ११ जानेवारी – अमेरिकेने भारतात…

ममतांच्या दौर्‍यातील संपादक ‘चमचे-चोर’?

ममतांच्या दौर्‍यातील संपादक ‘चमचे-चोर’?

लंडन, १० जानेवारी – पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी…

भाजपाची तिरंगा रॅली

भाजपाची तिरंगा रॅली

►संविधान बचाव रॅलीला प्रत्युत्तर ►•रावसाहेब दानवे यांची घोषणा, मुंबई,…

ना. स. फरांदे कालवश

ना. स. फरांदे कालवश

पुणे, १६ जानेवारी – भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि विधान…

बापू बिरू वाटेगावकर यांचे निधन

बापू बिरू वाटेगावकर यांचे निधन

सांगली, १६ जानेवारी – पश्‍चिम महाराष्ट्रात ‘रॉबिनहूड’ प्रमाणे आयुष्य…

श्री सिद्धरामेश्‍वर यात्रा : सामाजिक सप्तरंगांचे एक आकाश

श्री सिद्धरामेश्‍वर यात्रा : सामाजिक सप्तरंगांचे एक आकाश

॥ तरंग : दीपक कलढोणे | ‘हर्र बोला हर्र’…

विवेकानंदांचे परखड हिंदुत्व!

विवेकानंदांचे परखड हिंदुत्व!

॥ विशेष : मुकुल कानिटकर | एकीकडे जग भारताकडे…

संभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा

संभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | हा वारस…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:12
अयनांश:
Home » आसमंत » राष्ट्रकारण सर्वोपरी !

राष्ट्रकारण सर्वोपरी !

कटाक्ष : गजानन निमदेव

rashtra-karanभारतीय लष्कराने अतिशय धाडसाने सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला नामोहरम केले. जगात पाकिस्तानची छी थू झाली. भारताच्या प्रतिष्ठेत भर पडली. भारताचा धाक निर्माण होण्यास मदत झाली. पण, आपली प्रतिष्ठा जाईल अन अतिरेक्यांना पोसत असल्याचे पितळ उघडे पडेल या भीतीने पाकिस्तानने सर्जिकल स्ट्राईक झालेच नाही, असा दावा केला. दुर्दैवाने भारतातील काही नतद्रष्टांनी पाकच्याच सुरात सूर मिळविले. भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळेल अन पुढल्या वर्षी काही राज्यांमध्ये होणार्‍या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला त्याचा लाभ होईल, या भयगंडाने ग्रासलेल्या विरोधी पक्षांनी राष्ट्रहिताचा कसलाही विचार न करता सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी ज्याला नरेंद्र मोदीच दिसतात, ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पाकिस्तानात हिरो ठरले. कारण, त्यांनी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले होते. सत्तेबाहेर गेलेल्या राजकीय पक्षांनी थोडा धीर धरत संधीची वाट पाहिली पाहिजे. देश संकटात असताना राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर गलिच्छ राजकारण न करता राष्ट्रकारण केले तर त्याचा लाभ सगळ्यांनाच होणार आहे.
जेव्हा जेव्हा युद्ध होते आणि युद्धात देश जिंकतो, तेव्हा तेव्हा सत्तेवर असलेल्या राजकीय पक्षाला त्याचा फायदा होतो. हा अनुभव आहे. १९७१ साली भारताने पाकिस्तानला हरविल्यानंतर बांगलादेश नावाचा नवा देश अस्तित्वात आला. पाकिस्तानचे विभाजन झाले होते. या युद्धात विजय मिळाला, त्यावेळी इंदिरा गांधी ह्या देशाच्या पंतप्रधान होत्या. त्यांनी विजयाचे श्रेय घेतले नसते, तरी देशाने ते त्यांनाच दिले असते. कारण, त्यावेळी देशवासीयांची अशी भावना झाली होती की इंदिरा गांधी यांनी अतुलनीय धाडस दाखवून पाकिस्तानशी युद्ध केले अन् देशाला विजय मिळवून दिला. आता युद्ध काही प्रत्यक्ष इंदिरा गांधी यांनी केले नव्हते. आमचे शूर जवान सीमेवर प्राणपणाने लढले होते. पण, तरीही राजकीय पाठबळ असल्याशिवाय सैन्य लढू शकत नाही, लढत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे २८ सप्टेंबर २०१६ रोजी गुलाम काश्मिरात घुसून भारतीय लष्कराने ४० पाकिस्तानी अतिरेक्यांचा खात्मा केल्याचे श्रेय हे आता सत्तेत असलेल्या मोदींना मिळणारच. त्याचा राजकीय लाभही त्यांना मिळेल. पण, म्हणून भारतातील विरोधी पक्षांनी झालेल्या कारवाईवरच शंका उपस्थित करायची, हा सैनिकांचा अपमान आहे. त्यांचे मनोधैर्य खच्ची करणारा प्रकार आहे.
देशातील जनता हुशार आहे. मतदार आता जागृत झाला आहे. अरविंद केजरीवाल, संजय निरुपम, पी. चिदम्बरम् यांच्यासारख्यांनी कितीही पुरावे मागितले अन् मोदी सरकारला संशयाच्या जाळ्यात ढकलण्याचा प्रयत्न केला तरी सुज्ञ जनतेवर त्याचा काहीएक परिणाम होणार नाही. २०१४ साली झालेल्या निवडणुकीत जनतेने घोटाळेबाज अन् भष्टाचार्‍यांना त्यांची जागा दाखवून दिल्यानंतरही ही मंडळी सुधरणार नसतील तर पुढली आणखी २०-२५ वर्षे नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीच देशातील सरकार चालवेल, अशी व्यवस्था मतदार नक्कीच करतील. लढाई तर सैनिक लढले, शहीद तर आमचे जवान झाले. मग, मोदी आणि भाजपा कसले श्रेय घेत आहे, असा प्रश्‍न विचारून कॉंग्रेसने आपला बावळटपणाच जनतेसमोर आणला आहे. सर्जिकल स्ट्राईकचे यश हे संपूर्ण भारतीयांचे आहे, पण खरे श्रेय, हे राजकीय धाडस दाखविणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे, असे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी जे म्हटले आहे, ते योग्यच आहे. विरोधी पक्षांनी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागून देशाची अप्रतिष्ठा करण्याऐवजी मुक्तकंठाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारचे अभिनंदन केले असते तर देशातील जनतेत त्यांच्याबद्दल आदरच निर्माण झाला असतो. पण, श्रेयाच्या लढाईत ते स्वत:ची प्रतिष्ठा घालवून तर बसलेच, राष्ट्रीय ऐक्याला तडा देण्याचे पापही त्यांनी आपल्या माथी घेतले.
शत्रू राष्ट्राविरोधात सर्जिकल स्ट्राईकसारखी कारवाई केल्यावर वा झालेली लढाई जिंकल्यानंतर त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाने केला तर त्यात गैर काही नसते. १९७१ साली झालेल्या युद्धात पाकिस्तानला लोळविल्यानंतर विजयाचे श्रेय तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणि त्यांच्या कॉंग्रेस पक्षाने घेतले होतेच की! उत्तरप्रदेश आणि बिहार विधानसभेची मुदत संपायची असतानाच इंदिरा गांधी यांनी मुदतपूर्व निवडणुका घेतल्या. त्या दोन्ही निवडणुकांमध्ये कॉंग्रेस पक्षाला मोठा विजय मिळाला. खरे तर या दोन्ही राज्यांमध्ये १९६९ सालीच मध्यावधी निवडणुका झाल्या होत्या. त्यामुळे विधानसभांची निवडणूक १९७४ साली व्हायला पाहिजे होती. पण, १९७४ साली निवडणुका झाल्या असत्या तर कदाचित युद्धात मिळालेल्या विजयाचा लाभ कॉंग्रेसला १९७४ साली मिळाला नसता. राजकीय बेरीज-वजाबाकीचा विचार करूनच कॉंग्रेसने बिहार आणि युपीवर पुन्हा एकदा मध्यावधी निवडणुका लादल्या होत्या, याचे विस्मरण कॉंग्रेसवाल्यांना व्हावे, यातही आश्‍चर्य वाटण्यासारखे काही नाही.
१९७४ साली निवडणुका झाल्या असत्या तर कॉंग्रेसचा पराभव निश्‍चित होता. कारण, त्याच वर्षी जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वात असे जबरदस्त आंदोलन सुरू झाले होते की कॉंग्रेसच्या पायाखालची वाळू सरकायला सुरुवात झाली होती. जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन किती मजबूत आणि तीव्र होते याची कल्पना देशाला नंतरच्या काळात आलीच. १९७७ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला आणि केंद्रात जनता पार्टीचे राज्य आले. इंदिरा सरकारविरोधात जनतेत जो प्रचंड असंतोष होता, त्या असंतोषातून जयप्रकाशांचे आंदोलन सुरू झाले होते, हे लक्षात घेतले पाहिजे. तसा विचार केला तर पाकिस्तानला हरविल्याचे श्रेय आणि त्यामुळे मिळालेला राजकीय लाभ कॉंग्रेसला तीन वर्षांपेक्षा जास्त काळ मिळू शकला नाही. ही बाब लक्षात घेता राष्ट्रहितार्थ प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे. ज्यावेळी आपण पाकिस्तानसोबत लढतो आणि त्यात जिंकतो, त्यावेळी राजकारण न करता सत्तेत असलेल्या पक्षाला पाठिंबा दिला पाहिजे अन लष्कराचे धैर्य वाढविले पाहिजे. १९७१ साली पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केल्यानंतर विरोधी पक्षात असूनही अटलबिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधी यांना ‘दुर्गा’ असे संबोधले होते. विरोधी पक्षांनी अटलजींकडून काही शिकण्याची गरज आहे. अटलजींनी दाखविला तसा मोठेपणा दाखविण्याची गरज आहे. राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा जेव्हा जेव्हा म्हणून समोर येईल, तेव्हा तेव्हा पक्षभेद विसरून सगळ्यांनी ऐक्याचे प्रदर्शन घडविले तरच शत्रू राष्ट्राला धडकी भरेल. अन्यथा, आज पाकिस्तान जसा डोळे वटारत आहे, डॅ्रगन अधूनमधून विषारी फूत्कार सोडत आहे, तशी स्थिती कायम राहील. एकदा का परिस्थिती हाताबाहेर गेली तर मग ईश्‍वरही आम्हाला वाचवू शकणार नाही, हे प्रत्येक भारतीयाने लक्षात घेतले पाहिजे.
मुंबई प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांची खरे तर राष्ट्रीय सुरक्षेच्या विषयावर काहीही बोलण्याची पात्रता नाही. पण, राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांना बोलणे अवघड जात असावे म्हणून त्यांनी कॉंग्रेसला जे म्हणायचे आहे, त्यासाठी संजय निरुपम यांचा वापर केला. या निरुपमाला १९७१ नंतरच्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीची आठवण करून दिली पाहिजे. उत्तरप्रदेशात १९६९ साली मध्यावधी निवडणूक झाली होती. त्यामुळे तिथे ७४ साली निवडणूक व्हायला पाहिजे होती. कमलापती त्रिपाठी यांच्या नेतृत्वात बहुमतातील कॉंग्रेस सरकार सत्तेत होते. सरकारला कसलाही धोका नव्हता. उत्तरप्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष राजेंद्रकुमारी वाजपेयी यांचा आणि मुख्यमंत्री कमलापती त्रिपाठी यांचाही विरोध असताना इंदिरा गांधी यांनी तिथे मध्यावधी निवडणूक घेतली. कारण, तिथे कॉंग्रेसचे जे २३० आमदार होते, त्यातील अनेक अविभाजित कॉंग्रेसमधील नेते होते. त्यामुळे सगळेच्या सगळे आमदार आपल्यासोबत राहतील की नाही याची शंका इंदिरा गांधी यांना होती. तसेच, ७४ मध्ये निवडणुका झाल्या तर यश मिळेलच याची खात्री नव्हती. त्यामुळे आता आपण युद्ध जिंकले आहे, त्याचा लाभ घेत निवडणूक जिंकावी अन उत्तरप्रदेशवरची पकड मजबूत करावी, या हेतूनेच इंदिरा गांधी यांनी आवश्यकता नसताना निवडणूक लादली. संजय निरुपम तेव्हा ‘बच्चा’ असतील. पण, अजूनही ते बच्चाच असतील याची कल्पना देशाने केली नव्हती. त्यामुळेच कोणत्या तोंडाने निरुपम, चिदम्बरम् ही मंडळी मोदी सरकारच्या नावाने बोंबा ठोकत आहे, हे जनतेला कळत नाही, असे समजण्याचा मूर्खपणा कोणी करू नये.
१९७१ चे युद्ध आणि आता झालेले सर्जिकल स्ट्राईक याची तुलना होऊ शकत नसली तरी दोन्ही घटना घडवून आणण्यासाठी अतुलनीय धैर्याची आवश्यकता होती. ते धैर्य ७१ साली इंदिरा गांधी यांनी दाखविले आणि आता पंतप्रधान मोदी यांनी. त्यामुळे सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागून ते बनावट असल्याचा जो कांगावा कॉंग्रेसच्या नेत्यांनी केला, तो देशासाठी घातक आहे. देशावर दीर्घकाळ राज्य करणार्‍या कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी तर कहरच केला. ‘मोदी सरकार जवानों के खून की दलाली करती है’ असले गलिच्छ विधान करून त्यांनी राजकीय अपरिपक्वतेचे प्रदर्शन तर केलेच, राजकारणात ते अजूनही पप्पूच असल्याचेही त्यांनी दाखवून दिले. लढाईत जिंकल्याचा जसा सत्ताधार्‍यांना फायदा मिळतो, तसा हारल्यानंतर तोटाही होतो. याचा अनुभव कॉंग्रेसनेच १९६२ साली चीनशी हारल्यानंतर घेतला होता. चीनसोबतच्या लढाईत पराभूत झाल्यानंतर नेहरू सरकार आणि कॉंग्रेसबाबत देशात असंतोष निर्माण झाला होता. त्यानंतर लोकसभेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत जे. बी. कृपलानी, राम मनोहर लोहिया आणि मिनू मसानी हे कॉंग्रेसच्या उमेदवारांना हरवून निवडून आले होते. या तिघांनाही पराभूत करण्यासाठी पंडित नेहरू यांनी भरपूर प्रयत्य केले होते. पण, लाभ झाला नाही. पण, १९६५ साली भारताने लालबहादूर शास्त्री पंतप्रधान असताना पुन्हा पाकिस्तानला युद्धात पराभूत केले अन् कॉंग्रेस पक्षाला बळ मिळाले. हे जे वास्तव आहे ते राहुल गांधी, पी. चिदम्बरम् आणि संजय निरुपम विसरलेत की काय? आता मोदी पंतप्रधान असताना आणि केंद्रात भाजपाचे सरकार असताना सैन्याने सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला घरात घुसून मार दिला अन त्यामुळे मोदी सरकारची प्रतिमा देशात उंचावली तर त्यात बिघडले काय? कॉंग्रेस आणि इतरांनी मोदी सरकारला श्रेय मिळू नये म्हणून चक्क सैन्याच्या कारवाईवरच शंका घेण्याचा करंटेपणा करायला नको होता. केजरीवालांकडून जनतेला कोणत्याही अपेक्षा नाहीत. ज्यांनी अण्णा हजारे यांच्या पुण्याईचा गैरफायदा घेतला, स्वत:चा राजकीय स्वार्थ साधला, अशांकडून देश काहीही अपेक्षा करीत नाही. सगळ्यांनी एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे अन् ती ही की, वैयक्तिक स्वार्थापेक्षा अन् राजकारणापेक्षा राष्ट्रकारण सर्वोपरी आहे.

शेअर करा

Posted by on Oct 23 2016. Filed under आसमंत. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आसमंत (991 of 1002 articles)


रसार्थ : चन्द्रशेखर टिळक दोन स्पेशल. क्षितिज पटवर्धन लिखित आणि दिग्दर्शित  हे नाटक सध्या मराठी रंगभूमीवर गाजत आहे. किमान पाच ...