ads
ads
प्रिया रमानीचे अकबरांवरील आरोप हेतुपूर्वक

प्रिया रमानीचे अकबरांवरील आरोप हेतुपूर्वक

►महिला पत्रकार बसू यांची साक्ष, नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर…

आलोक वर्मांवरील सीव्हीसीचा सीलबंद चौकशी अहवाल सादर

आलोक वर्मांवरील सीव्हीसीचा सीलबंद चौकशी अहवाल सादर

►सीबीआय विरुद्ध सीबीआय, नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर – केंद्रीय…

कुशवाह शरद यादवांच्या तंबूत?, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा

कुशवाह शरद यादवांच्या तंबूत?, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा

नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर – केंद्रात मंत्री असलेले राष्ट्रीय…

रोहिंग्यांचे स्थलांतरण ऐच्छिक व सन्मानपूर्वक व्हावे

रोहिंग्यांचे स्थलांतरण ऐच्छिक व सन्मानपूर्वक व्हावे

►अमेरिकेची भूमिका, वॉशिंग्टन, १२ नोव्हेंबर – बांगलादेशातून म्यानमारला रोहिंग्यांचे…

पंजाब नॅशनल बँकेला इंग्लडमध्येही २७१ कोटींचा चुना

पंजाब नॅशनल बँकेला इंग्लडमध्येही २७१ कोटींचा चुना

लंडन, १० नोव्हेंबर – घोटाळ्याच्या गर्तेत अडकलेल्या पंजाब नॅशनल…

अफगाणमध्ये शांततेचे नवे पर्व सुरू होणार

अफगाणमध्ये शांततेचे नवे पर्व सुरू होणार

►भारत, पाक व तालिबान एकाच मंचावर, मॉस्को, ९ नोव्हेंबर…

महाराष्ट्रात काँग्रेस लोकसभेच्या सर्व जागा लढविणार!

महाराष्ट्रात काँग्रेस लोकसभेच्या सर्व जागा लढविणार!

►चाचपणी सुरू केली ►राफेल प्रकरणी राकाँच्या भूमिकेने नाराज, मुंबई,…

पुन्हा भारनियमनाचे चटके नाही

पुन्हा भारनियमनाचे चटके नाही

►ऊर्जामंत्री बावनकुळे यांची ग्वाही, नागपूर, ११ नोव्हेंबर – राज्यात…

सुधीर मुनगंटीवार देशातील सर्वाधिक सक्षम वनमंत्री

सुधीर मुनगंटीवार देशातील सर्वाधिक सक्षम वनमंत्री

►हत्तीसारखे डौलाने चाला, टीकेची पर्वा करू नका ►नितीन गडकरी…

दिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत

दिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत

॥ विशेष : धनश्री बेडेकर | हिंदू धर्मात निसर्गचक्राला…

एक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत!

एक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | भ्रष्टाचाराचे अनेक आश्रयदाते…

रिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष

रिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | देशात किंवा कदाचित…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:32 | सूर्यास्त: 17:49
अयनांश:
Home » आसमंत, गजानन निमदेव, पुरवणी, स्तंभलेखक » राहुल गांधींच्या काँग्रेसने काय साध्य केले?

राहुल गांधींच्या काँग्रेसने काय साध्य केले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव |

Rahul Gandhi 6

Rahul Gandhi 6

चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देशम पक्षाने लोकसभेत मोदी सरकारवर आणलेला अविश्‍वास प्रस्ताव अपेक्षेप्रमाणेच फेटाळला गेला. तो फेटाळला जाणार, हे तेलगू देशम आणि काँग्रेससह सगळ्याच विरोधी पक्षांना माहिती होते. पण, आपण अविश्‍वास प्रस्तावाची नोटीस दिल्यानंतर ती लागलीच सरकारकडून स्वीकारली जाईल, याबाबत कुणालाच खात्री नव्हती. मात्र, चाणाक्ष असलेल्या मोदी सरकारने ही नोटीस स्वीकारली, त्यावर तीनच दिवसात चर्चा घडवून आणत मतदानही घेतले आणि विरोधकांना चारीमुंड्या चीतही केले. विरोधकांची खेळी त्यांच्यावरच उलटवण्यात सरकार यशस्वी ठरले.
मोदी सरकारला जनतेने पूर्ण बहुमताने निवडून दिले आहे, सरकारकडे स्पष्ट बहुमत आहे, सरकारच्या मित्र पक्षांनी विरोधात मतदान केले तरी सरकार भाजपाच्या भरवशावर विश्‍वास मत जिंकू शकते हे माहिती असतानाही तेलगू देशमने अविश्‍वास प्रस्ताव का आणला, काँग्रेसने तेलगू देशमला प्रोत्साहन का दिले, हे प्रश्‍न सामान्य जनतेला जरी सतावत राहणार असले तरी, अविश्‍वास प्रस्तावाच्या निमित्ताने सरकारचे अपयश आपल्याला चव्हाट्यावर आणता येईल, हा काँग्रेसचा डाव होता. पण, हा डाव काँग्रेसवरच उलटवण्यात मोदी सरकार यशस्वी  ठरले. कारण, ज्या गतीने सरकारने अविश्‍वास प्रस्ताव स्वीकारून त्यावर चर्चा घडवून आणली, त्या गतीने चर्चा करण्याची काँग्रेस आणि अन्य विरोधकांची तयारीच नव्हती, हे लोकसभेत स्पष्टपणे दिसून आले. शिवाय, सरकारवर टीका करताना काँग्रेसला ठोस मुद्देही सापडले नाहीत. राहुल गांधी यांनी तेच जुने आरोप पुन्हा लावले आणि भाषण संपल्यानंतर पंतप्रधानांची इच्छा नसतानाही त्यांना मिठी मारून लोकसभेचे आणि देशाचे मनोरंजन तेवढे केले.
राहुल गांधी यांचे भाषण आक्रमक झाले. त्यादिवशी त्यांच्या भाषणात जोश दिसून आला. पण, त्या जोशात काही दम नव्हता. घासून घासून खराब झालेलीच टेप त्यांनी वाजविली. विरोधी पक्षांच्या अन्य सदस्यांनीही सरकारवर आक्रमक टीका केली. पण, या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या आक्रमकपणे मुद्देसूद भाषण करून प्रत्युत्तर दिले, त्याने राहुल गांधींसह सगळेच विरोधक घायाळ झाले. अविश्‍वास प्रस्ताव आणून विरोधी पक्षांनी नेमके काय साध्य केले, हा प्रश्‍नही अनुत्तरितच आहे. ज्याप्रकारे अविश्‍वास प्रस्तावावर विरोधकांनी सरकारवर प्रहार केला, ते लक्षात घेता जनतेने काय निष्कर्ष काढला पाहिजे, हेही समजत नाही. जनतेला निष्कर्ष काढता येईल, असे ठोस मुद्दे विरोधी पक्षांनी मांडलेच नाहीत. मागणी करूनही केंद्र सरकारने आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा दिला नाही, ही अविश्‍वास प्रस्ताव आणण्यामागची तेलगू देशम पक्षाची भूमिका होती, ही बाब मागच्या दाराने समोर आली आहे आणि ती जर खरी असेल तर चंद्राबाबू नायडू हे आंध्रप्रदेशातील जनतेची दिशाभूल करताहेत, हे स्पष्ट आहे. एखाद्या राज्याला विशेष दर्जा देण्याची तरतूदच जर आपल्या घटनेत नसेल तर सरकार तो दर्जा देणार तरी कसा? थोडक्यात काय, अविश्‍वास प्रस्ताव आणून चंद्राबाबूंच्या तेलगू देशमने आत्मघात करून घेतला आहे.
अविश्‍वास प्रस्तावावर राहुल गांधी यांवेही भाषण झाले. ते काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. कारण, त्यांच्या भाषणानंतर भूकंप येणार, असे सांगितले जात होते. प्रत्यक्षात तर भूकंप सोडाच, झाडाचे साधे पानही हलले नाही. उलट, पंतप्रधानांची इच्छा नसतानाही जबरदस्तीने त्यांच्या गळ्यात पडून राहुल गांधी यांनी स्वत:चे हसे करून घेतले. आपल्या भाषणाच्या शेवटी ते असे म्हणाले की, आमच्या मनात सगळ्यांबद्दल प्रेम आहे. पण, प्रत्यक्ष भाषणात तर त्यांनी मोदी, भाजपा यांचा द्वेष करणारीच वाक्ये उच्चारली. त्यांच्या भाषणात पूर्ण वेळ केवळ आणि केवळ अहंकारच दिसून आला. तुम्ही आमचा कितीही द्वेष केला तरी आम्ही तुमच्यावर प्रेमच करतो, तुमच्यासारखे द्वेषाचे राजकारण आम्ही करीत नाही, हे देशाला दाखविण्याच्या नादात त्यांनी पंतप्रधानांना जबरदस्तीने मिठी तर मारली, पण नंतर आपल्या बाकावर जाऊन बसल्यावर त्यांनी आपल्याच पक्षाच्या सदस्यांकडे पाहून डोळा मारला. मिठी मारून जे थोडे गमावले होते, ते डोळा मारून सगळेच गमावले. त्यांची ती मिठी उत्फूर्त नव्हती, तर आदल्या रात्री त्यांना याबाबत शिकवणी देण्यात आली असावी, अशी दाट शंका घ्यायला वाव आहे. त्यांनी मारलेली मिठी निश्‍चितच राजशिष्टाचाराला धरून नव्हती.
पंतप्रधानांच्या गळ्यात पडण्याचे अशोभनीय वर्तन केल्यानंतर आपल्या जागी स्थानापन्न होताच त्यांनी काँग्रेसी सहकार्‍यांकडे पाहून डोळा मारल्याने त्यांचे सगळे नाटक उघड झाले. राहुल गांधींना देशातल्या गोरगरीब जनतेच्या समस्यांशी काहीही देणेघेणे नाही, मोदी सरकारवर खोटेनाटे आरोप करीत जनतेची दिशाभूल करायची अन सरकार पाडून सत्तेत यायचे, एवढाच त्यांचा मर्यादित हेतू दिसतो आहे. डोळा मारल्याने त्यांचे पितळ उघडे पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्या डोळ्यात डोळे भिडवून पाहू शकत नाहीत, हा त्यांचा आरोपही मोदींनी त्यांच्यावरच उलटवला. मी तुमच्यासारखा नामदार नाही, मी तर कामदार आहे, माझी काय बिशाद तुमच्या नजरेला नजर भिडविण्याची, असे शालजोडीतले मारत मोदी यांनी राहुल गांधी यांची बोलतीच बंद केली.
ज्यांनी डोळ्यांत डोळे घालून बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांचे काँग्रेसने काय हाल केलेत, याची आठवण मोदींनी आपल्या भाषणातून सगळ्याच विरोधी नेत्यांना करून दिली. काँग्रेसने आपल्या सत्ताकाळात कशा प्रकारे राज्यांमधील सरकारे पाडण्याचा खेळ केला, याचीही आठवण मोदींनी यावेळी करून दिली. सर्जिकल स्ट्राईकला जुमला स्ट्राईक म्हणणार्‍या राहुल गांधी यांचा मोदींनी खरपूस समाचार घेतला नसता तरच नवल. काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर राहुल गांधी सत्ताधारी पक्षापुढे तगडे आव्हान उभे करतील, अशी अपेक्षा काँग्रेसला होती. पण, ती अपेक्षाही फोल ठरली. राज्याराज्यांमध्ये जमावाकडून निर्दोष लोकांच्या हत्या होत आहेत, हा मुद्दा उचलत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. पण, आरोप करताना ते हे विसरले की, कायदा-सुव्यवस्था राखणे हा राज्यांच्या अखत्यारीतील विषय आहे. केंद्र सरकार राज्यांना निर्देश तेवढा देऊ शकते. हे माहिती असूनही विरोधी पक्षांनी या मुद्यावर केंद्र सरकारलाच घेरण्याचा प्रयत्न चालविला आहे. मोदी सरकारच्या काम करण्याच्या शैलीमुळे देशात विविध ठिकाणी जमावाकडून हिंसाचार होत आहे, असे भासविण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांकडून केला जात आहे, जो अत्यंत दुर्दैवी आहे. आपल्या सत्ताकाळात देशात हिंसाचार घडावा, अशी कामना तरी कुठले सरकार करेल काय, याचा तर विचार विरोधी पक्षांनी करायला हवा ना! पण, मोदी सरकारला बदनामच करायचे ठरविले असेल त्यांनी, तर कोण काय करू शकतो? मोदी सरकारवर बिनबुडाचे आरोप करण्याऐवजी काँग्रेस आणि अन्य विरोधी सदस्यांनी जर अशा घटना घडू नयेत यासाठी काही ठोस उपाय सुचवून त्यावर सकारात्मक चर्चा घडवून आणली असती तर ते अधिक बरे झाले असते. यातून समाजात एक चांगला संदेशही गेला असता.
काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनीही आर्थिक आघाडीवर मोदी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. नोटांबदीच्या निर्णयाला दोन वर्षे होत आहेत. पण, अविश्‍वास प्रस्तावाशी नोटाबंदीचा मुद्दाही विरोधकांनी जोडला, याचेच आश्‍चर्य वाटते. नोटबंदीनंतर जीएसटी लागू करण्यात आला. त्यामुळे अर्थव्यवस्थेला हादरे जरूर बसले होते. पण, आता अर्थव्यवस्था त्यातून सावरली आहे. तरीही काँग्रेसने मोदी सरकारला घेरण्याचा केविलवाणा प्रयत्न केलाच. जगात भारतीय अर्थव्यवस्था सहाव्या क्रमांकावर आहे आणि ती पाचव्या क्रमांकावर पुढे सरकण्याच्या बेतात असताना जर विरोधक मोदी सरकारला दोष देत असतील तर त्यांची कीवच करावी लागेल. अविश्‍वास प्रस्तावाच्या निमित्ताने विरोधी पक्षांनी एकजुटीचे प्रदर्शन करण्याचा प्रयत्न जरूर केला असेल पण, त्यातही फार चांगल्या पद्धतीने ऐक्य दिसले नाही. त्यामुळे त्या आघाडीवरही विरोधक अपयशीच ठरले, असे म्हणावे लागेल. शिवाय, सरकारला घेरून जनतेचे लक्ष वेधण्यातही विरोधी पक्ष अपयशी ठरलेत. कारण, सरकारला घेरता येईल, असे ठोस मुद्देच विरोधी पक्षांकडे नव्हते. विरोधी पक्षांनी जे मुद्दे उपस्थित केले होते, त्याला सत्ताधार्‍यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याने अविश्‍वास प्रस्तावातली हवा तशीच निघून गेली होती. मतदानानंतर तर विरोधकांच्या अविश्‍वास प्रस्तावाचा फुगा पूर्णपणे पंक्चर झाला अन एका विषयावर पडदा टाकत सरकारने सुटकेचा नि:श्‍वास टाकला.

Posted by : | on : 5 Aug 2018
Filed under : आसमंत, गजानन निमदेव, पुरवणी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, गजानन निमदेव, पुरवणी, स्तंभलेखक (279 of 1134 articles)

Berlin Wall Flag
विश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले | म्हणजे बर्लिन भिंत २७ वर्षे उभी होती. पाव शतकाच्या या कालखंडात किमान एक लाख ...

×