ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, ल.त्र्यं. जोशी, स्तंभलेखक » रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी |

संघस्थापनेपासूनचा हा धावता आलेख एवढ्याचसाठी मांडला आहे की, १९२५ च्या विजयादशमीपासून तर परवा ११ सप्टेंबर २०१८ रोजी शिकागोमध्ये झालेल्या विश्‍व हिंदु संमेलनापर्यंतचा संघाचा हिंदु बंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंतचा प्रवास अधोरेखित व्हावा. त्यातून संघाच्या विस्ताराची जशी जाणीव होते तसेच हिंदुबंधुत्व आणि विश्‍वबिंधुत्व ह्या दोन वेगवेगळ्या संकल्पना नाहीत हेही स्पष्ट होते. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना संघशिक्षा वर्गाच्या समारोपाला निमंत्रित करण्यापासून तर येत्या १७ सप्टेबरपासून दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या सरसंघाचलकांच्या त्रिदिवसीय व्याख्यानमालेपर्यंतच्या घटनांचा आढावा घेतला तर हा संघाचा नवा ऑफेन्सिव्ह आहे असे मला वाटते.

Rss G

Rss G

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या विश्‍वव्यापी संघटनेची आता नव्याने ओळख करुन देण्याची खरे तर गरज नाही. एक तर गेल्या ९३ वर्षांपासून ती अतिशय खुलेपणाने आपले कार्य करीत आली आहे आणि दुसरी त्याहून महत्वाची बाब म्हणजे वेगवेगळ्या निमित्ताने तिचे विरोधक तिला सतत चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात. त्या चर्चेतूनही तिचे खरे स्वरुप लोकांच्या लक्षात येते व त्यांच्या गैरसमजांवर पडदा पडतो. स्व. डॉ. हेडगेवार यांनी १९२५ मध्ये हिंदु समाजाला संघटित स्वरुप देण्यासाठी या संघटनेची स्थापना केली. तेव्हापासून तीन बंदींचा अल्प काळ सोडला तर तिचे कार्य अव्याहतपणे सुरु आहे. तिच्या प्रगतीचे अनेक टप्पे केवळ संघस्वयंसेवकांनीच नव्हे तर संपूर्ण देशवासियांनी पाहिले आहेत आणि प्रसंगपरत्वे अनुभवलेही आहेत. त्यामुळे या संघटनेबाबत जनमानसात सहसा गैरसमज निर्माण होत नाहीत आणि झालेच तर ते प्रामाणिक असतात. ज्यांनी हेतुपूर्वक गैरसमज करुन घेतले आहेत त्यांना समजावण्याच्या भानगडीत संघ सहसा पडत नाही. त्यातून घडते असे की, संघाला मिळणारा जनमानसाचा पाठिंबा दिवसागणिक वाढतोच आहे. आज जेव्हा मी संघस्वरुपाचे नव्याने आकलन करण्याचा प्रयत्न करीत आहे तेव्हा डॉ. हेडगेवारांनी पाचदहा लहान मुलांसह नागपूरच्या मोहितेवाड्याच्या परिसरातील पहिल्या शाखेचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते आणि त्याच वेळी ११ ते १३ सप्टेंबर २०१८ पर्यंत स्वामी विवेकानंदांच्या १२५ वर्षांपूर्वीच्या जागतिक धर्म परिषदेतील ऐतिहासिक भाषणाच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या शिकागो येथील विश्‍व हिंदु संमेलनाचे दृष्य दिसायला लागते. एकीकडे ९३ वर्षांपूर्वी डॉ. हेडगेवार यांनी मांडलेल्या हिंदुबंधुत्वाच्या कल्पनेचे स्मरण होते आणि दुसरीकडे त्याच वेळी संघाच्या विश्‍वबंधुत्वापर्यंतच्या प्रवासाचा साक्षात्कारही होतो.
नागपुरात स्व. अनंतराव शेवडे यांच्या पुढाकाराने झालेल्या पहिल्या विश्‍व हिंदी संमेलनानंतर आजही देशविदेशात विश्‍व हिंदी संमेलने होतच आहेत. पण ती हिंदी भाषेपुरती मर्यादित आहेत. मात्र शिकागोमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विश्‍व हिंदु संमेलनाचे प्रयोजनच वेगळे होते. स्वामीजींनी १२५ वर्षांपूर्वी मांडलेल्या विचारांचेच स्मरण करुन देणे व ते आजही कसे प्रासंगिक आहे हे अधोरेखित करणे हा या संमेलनाचा हेतू होता आणि सरसंघाचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या उदबोधनातून तो स्पष्टही झाला. जगभरातून त्यात सहभागी होण्यासाठी आलेल्या महानुभावांची उपस्थिती आणि सरसंघाचलकांचे विचार म्हणजे संघाच्या हिंदुबंधुत्वापासून तर विश्‍वबंधुत्वापर्यंतच्या प्रवासाचा शंखनादच होता. प्रारंभीच्या काळात संघाने आपले कार्य हिंदु समाजापर्यंतच सीमित ठेवण्याचे जाहीर केले असले तरी त्यात इतर समाजांविषयीचा दुस्वास मात्र नव्हता. हा देश मूलत: हिंदूंचा आहे. तो या मातृभूमीचा पुत्ररुप समाज आहे. त्यामुळे या देशाला पुनर्वैभव प्राप्त करुन देण्याची त्या समाजाची जबाबदारी आहे. त्याला त्या उद्दिष्टाची विस्मृती झाल्यामुळे विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याला संघटित स्वरुप दिले की, या समस्यांचे स्वाभाविकपणे निराकरण होईल. म्हणून हिंदु संघटन, अशी संघाची मांडणी होती. पण त्याबद्दल विविध कारणांनी व उद्देशांनी त्याच्यासंबंधी गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्याची चिंता न करता वा कोणत्याही प्रकारे विचलित न होता संघाने आपले कार्य सुरुच ठेवले. एकच कार्य, एकाच उद्देशाने अनेक संकटांनंतरही सतत ९३ वर्षे चालू ठेवणे ही साधीसुधी बाब निश्‍चितच नाही. पण ‘नाभिषेको न संस्कार: सिंहस्य क्रियते मृगै:, विक्रमार्जितस्य राज्यस्य स्वयमेव मृगेंद्रता’ या सुभाषितपंक्तींवर संघाचा प्रगाढ विश्‍वास असल्यानेच आजचे स्वरुप त्याला प्राप्त झाले आहे.
अर्थात या ९३ वर्षात संघ ‘मित:काल’(एकाच जागेवर उभे राहून पाय आपटणे) करीत राहिला नाही. संघाबद्दल असे म्हटले जाते कीं, ‘संघ बदलत नाही.’ हे एका अर्थाने खरे आहे. कारण संघाचा मूलभूत सिध्दांत कधीच बदलत नाही पण त्यात बाह्य बदल सातत्याने होत आहेत. अगदी संघस्थापनेपासून तर आजच्या क्षणापर्यंत. कारण मूळ सिध्दांताला मुरड न घालता कालानुरुप बदलत राहण्याची सवय संघाने स्वत:ला प्रारंभापासूनच लावून घेतली आहे. संघाच्या या स्वरुपाच्या संदर्भात मला राज्यशास्त्रातील एक उक्ती आठवते. त्यात इंग्लंडच्या राजाबद्दल ‘किंग इज डेड लाँग लीव्ह द किंग’ असे म्हटले जाते. त्याचा अर्थ असा की, राजपदावरील व्यक्तीचा मृत्यु जरी झाला तरी राजपद मात्र अढळच आहे. त्याच धर्तीवर संघाबद्दल ‘संघ बदलत नाही. संघ बदलतच राहतो’ असे सहज म्हणता येईल.
संघाच्या बाह्य स्वरुपाचा इतिहास पाहिला तर या उक्तीचा प्रत्यय येईल. संघशाखेत कवायतीसाठी दिल्या जाणाजया संस्कृत आज्ञांपासून तर संघाच्या गणवेषापर्यंत, प्रारंभीच्या ४० दिवसांच्या व नागपुरातील एकाच ‘ओटीसी’ पासून तर २५ दिवसांच्या प्रांताप्रांतांमधील संघ शिक्षा वर्गांपर्यंत संघात बदल झाला आहे. त्यात सहभागी होणार्‍या स्वयंसेवकांच्या संदर्भात तर इतके बदल झाले आहेत की, आज तरुणांसाठी वेगळे संघ शिक्षा वर्ग होत आहेत तर ज्येष्ठांसाठी वेगळे वर्ग होत आहेत. त्यातील कार्यक्रमातही गरजेनुसार बदल झाले आहेत. त्यामुळे संघ स्थितिशील आहे या म्हणण्याला अर्थच उरत नाही. हे बदलही केवळ संघ शिक्षा वर्गांच्या वा गणवेषाच्या संदर्भातच झाले असे नाही. संघाच्या सर्व गतिविधींमध्ये ते झाले आहेत. ‘गतिविधी’ हा सर्वनामात्मक शब्द डॉ. हेडगेवारांच्याच काय श्रीगुरुजींच्या काळातही उच्चारला जात नव्हता. पण आज संघात ते विशेषनाम झाले आहे. कारण आजच्या संघात ‘गतिविधी’ या शब्दाला विशिष्ट अर्थ प्राप्त झाला आहे.
आज संघसंलग्न संघटनांसाठी माध्यमांमध्ये वापरला जाणारा ‘संघ परिवार’ हा शब्द तरी स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत कुठे होता?. कारण त्यावेळी परिवार असा नव्हताच. त्या काळात राष्ट्रसेविका समिती ही संघाव्यतिरिक्त परिवारातील एकमेव संस्था होती. कारण त्यावेळच्या परिस्थितीत इतर संस्थांची गरजच भासली नाही किंवा गरज भासली असली असेलही तरीही ती पूर्ण करण्याइतपत संघाचा विस्तार झाला नव्हता. कुणाला संघाला दूषणच द्यायचे असेल तर तो ‘संघाला उशीरा कळले’ असे फार तर म्हणू शकतो.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तर देशाचे चित्रच बदलले. कदाचित आनुषंगिक कामे किती महत्वाची आहेत याची विदारक जाणीव फाळणीच्या वेळी भारताच्या पूर्व आणि पश्‍चिम सीमांवर झालेल्या हिंदूंच्या रक्तपातामुळे व माताभगिनींच्या किंकाळ्यांमुळेही संघाला झाली असेल पण त्यानंतर संघाने कधीच मागे पाहिले नाही. असे म्हटले जाते की, पहिल्या संघबंदीच्या काळात त्या लोकशाहीविरोधी कारवाईचा निषेध करण्यासाठी व संघाची बाजू मांडण्यासाठी एकही राजकीय पक्ष संसदेत वा संसदेबाहेर पुढे न आल्याने संघाला राजकीय क्षेत्रात आपले कार्यकर्ते पाठविण्याचा निर्णय घ्यावा लागला व त्यावेळी मंत्रिमंडळाचा राजीनामा देणारे डॉ. श्यामाप्रसाद यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनसंघाची स्थापना करावी लागली. नेमके काय घडले याबाबत मतमतांतरे असू शकतात पण तेव्हापासून तर आणिबाणीकालीन जनता पक्षापर्यंत आणि त्यानंतर स्थापन झालेल्या भारतीय जनता पार्टीपर्यंतच्या पक्षात संघ स्वयंसेवकांनी आपुलकीने योगदान दिले ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. कामगार क्षेत्रात कार्यरत असणार्‍या स्वयंसेवकांना भारतीय मजदूर संघाची स्थापना करावीसी वाटली म्हणून ती संघटना स्थापन झाली. वनवासी भागातील अवैध धर्मांतराच्या विळख्यातून वनवासी बांधवांना मुक्त करण्यासाठी वनवासी कल्याण आश्रम उदयाला आला. हिंदु समाजातील काही दुर्दैवी घटकांना अस्पृश्यता, अज्ञान, अंधश्रध्दा यांच्या विळख्यातून काढून व्यापक हिंदुत्वाचा साक्षात्कार घडविण्यासाठी संतमंडळींनी एकत्र येऊन ‘हिंदवा: सहोदरा:’ या भावनेने विश्‍व हिंदु परिषदेची स्थापना केली गेली आणि मग एकेक ‘भारती’ जन्माला येऊ लागली. संस्कार भारती, सहकार भारती, विद्या भारती, आरोग्य भारती आदी नावांनी त्या क्षेत्रपरत्वे ओळखल्या जातात. राष्ट्रीय शिख संगत, समरसता मंच, सर्वपंथसमादर मंच यासारखे मंचही तयार झाले. मुस्लिम राष्ट्रीय मंच हा अलिकडेच स्थापन झालेला मंच अल्पसंख्यकांनाही आकर्षित करु लागला आहे. ख्रिस्ती समाजाचा एखादा मंच आहे की, नाही हे मला ठाऊक नाही पण विशेषत: भारतीय जनता पार्टीत अनेक ख्रिस्ती नेत्यांचा समावेश आहे हे निश्‍चित. केंद्रात तर एक ख्रिस्ती मंत्री आहेतच शिवाय गोव्यामधील भाजपाच्या नेतृत्वाखालील मंत्रिमडळात दोन ख्रिस्ती मंत्री आहेत आणि उपसभापतिपदही त्या समुदायातील नेत्याकडेच आहे. एवढेच काय पण अल्पसंख्य समुदायातील अनेक तरुण संघशाखेतही येऊ लागले आहेत. त्यांचा शो पीस म्हणून वापर करायचा नाही असे संघाने ठरविले म्हणून अन्यथा त्यांचीही नावे दिली जाऊ शकतात. तात्पर्य हेच की, प्रारंभी प्राप्त परिस्थितीनुसार रुढार्थाने हिंदु म्हणविल्या जाणार्‍या समाजापर्यंत मर्यादित असलेला संघ आता अधिक व्यापक होऊ लागला आहे, होत आहे. वरील सर्व स्थित्यंतरे हा त्याचेच प्रत्यक्ष रुप.
याच पध्दतीने संघातही अंतर्गत बदल होत आहेतच. १९२५ ते १९४० या कालावधीत संघाने आपल्या कार्यपध्दतीला आकार देण्याचा प्रयत्न केला. ती सिध्दही करुन दाखविली. कारण तोपर्यंत संघाचे कार्य भारतातील सर्व प्रांतापर्यंत पोचले होते. म्हणूनच १९४० च्या संघ शिक्षा वर्गातील सर्व प्रांतांचे प्रतिनिध्त्वि पाहून डॉ. हेडगेवार म्हणाले होते की, ‘आज मी हिंदुराष्टलाचे छोटेखानी स्वरुप पाहत आहे’. त्यानंतर संघाचे विस्तारपर्व सुरु झाले व ते आजतागायतही सुरुच आहे. या पर्वात संघाने अंतर्गत कायंपददतीतही गरजेनुसार बदल केले. दैनंदिन शाखेचा आग्रह यत्किंचितही कमी होऊ न देता तिला नवनवे आयाम जोडले. प्रारंभी फक्त संध्याकाळच्याच शाखा होत्या. नंतर प्रभातशाखा, रात्रशाखा, अतिसायंशाखा सुरु झाल्या. आता त्यांची मजल ई शाखांपर्यंत गेली तर कुणाला आश्‍चर्य वाटणार नाही. ज्यांना दैनंदिन शाखेत येणे जमत नाही त्यांच्यासाठी साप्ताहिक मीलने सुरु झाली. संघकार्य सार्वभौम (म्हणजे सर्व ठिकाणी, शहर असेल तर सर्व मोहल्यात, ग्रामीण भाग असेल तर सर्व खेड्यात) व्हावे म्हणून संघाने सेवा वस्त्यांच्या स्वरुपात सर्वत्र संपर्क आणि संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि या प्रक्रियेला अंत नाही.
पूर्वी संघ फक्त भारतातच होता. आता जगातील सुमारे शंभर देशात तरी तो पोचला आहे. त्याचे संचालन करण्यासाठी संघाने विदेश विभाग नावाची स्वतंत्र यंत्रणा उभी केली आहे. भारतातल्या प्रमाणेच तिकडे शाखा चालतात, नित्यनैमित्तिक कार्यक्रम होतात. संघाच्या अधिकार्‍यांचे दौरेही होतात. या ठिकाणी हे उल्लेखनीय आहे की, हे असले तरी संघाचे पहिले दोन सरसंघचालक डॉ. हेडगेवार व श्रीगुरुजी कधीही परदेशात गेले नाहीत. कारण त्यावेळी तशी गरज नव्हती. ६० वर्षांनंतर तशी गरज निर्माण होताच ते जाऊ लागले आहेत. तसे परदेशात जाणारे पहिले सरसंघचालक म्हणजे स्व. बाळासाहेब देवरस.
संघस्थापनेपासूनचा हा धावता आलेख एवढ्याचसाठी मांडला आहे की, १९२५ च्या विजयादशमीपासून तर परवा ११ सप्टेंबर २०१८ रोजी शिकागोमध्ये झालेल्या विश्‍व हिंदु संमेलनापर्यंतचा संघाचा हिंदु बंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंतचा प्रवास अधोरेखित व्हावा. त्यातून संघाच्या विस्ताराची जशी जाणीव होते तसेच हिंदुबंधुत्व आणि विश्‍वबिंधुत्व ह्या दोन वेगवेगळ्या संकल्पना नाहीत हेही स्पष्ट होते. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना संघशिक्षा वर्गाच्या समारोपाला निमंत्रित करण्यापासून तर येत्या १७ सप्टेबरपासून दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या सरसंघाचलकांच्या त्रिदिवसीय व्याख्यानमालेपर्यंतच्या घटनांचा आढावा घेतला तर हा संघाचा नवा ऑफेन्सिव्ह आहे असे मला वाटते.

Posted by : | on : 16 Sep 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, ल.त्र्यं. जोशी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, ल.त्र्यं. जोशी, स्तंभलेखक (487 of 1287 articles)


संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावरून आपण आपल्या सरकारचं प्रगतिपुस्तक सादर करून भविष्यकालीन योजना देशवासीयांसमोर मांडल्यात. ‘‘मेरे ...

×