ads
ads
गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

•नितीन गडकरी यांची घोषणा, अमरावती, २१ जानेवारी – दक्षिणेतील…

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

बंगळुरू, २१ जानेवारी – प्रख्यात गुरुवर्य आणि कर्नाटकच्या तुमकुरू…

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

प्रयागराज, २१ जानेवारी – पौष पौर्णिमेच्या पावन पर्वावर सुमारे…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:01 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, ल.त्र्यं. जोशी, स्तंभलेखक » रिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष

रिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी |

देशात किंवा कदाचित जगातही जे जे चुकीचे घडेल त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच जबाबदार धरण्याची सवय मोदीविरोधकांना लागली आहे. त्यासाठी त्यांना कुठलेही कारण वा पुरावा देण्याची गरज वाटत नाही. आरोपाचा विषय मोदींशी थेट संबंधित असण्याचीही त्यांना गरज वाटत नाही. विषयाचा सखोल अभ्यास हा तर फार पुढचा प्रश्‍न. अभ्यास करण्यात वेळ वाया घालविण्याऐवजी नवीन आरोप करण्याची घाई त्यांना झाली असते. बरे हे एकदाच घडते असे नाही. त्यांचा आरोप सिध्द होतो असेही नाही. जवळपास प्रत्येक वेळी त्यांचे पितळ उघडे पडते. पण मोदींना जबाबदार धरण्याची सवय काही जात नाही.

Rbi Reserve Bank Of India

Rbi Reserve Bank Of India

हल्लीचा काळ असा आहे की, देशात किंवा कदाचित जगातही जे जे चुकीचे घडेल त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच जबाबदार धरण्याची सवय राष्ट्रीय पातळीवरील मोदीविरोधकांना लागली आहे. त्यासाठी त्यांना कुठलेही कारण वा पुरावा देण्याची गरज वाटत नाही. आरोपाचा विषय मोदींशी थेट संबंधित असण्याचीही त्यांना गरज वाटत नाही. विषयाचा सखोल अभ्यास हा तर फार पुढचा प्रश्‍न. अभ्यास करण्यात वेळ वाया घालविण्याऐवजी नवीन आरोप करण्याची घाई त्यांना झाली असते. बरे हे एकदाच घडते असे नाही. त्यांचा आरोप सिध्द होतो असेही नाही. जवळपास प्रत्येक वेळी त्यांचे पितळ उघडे पडते. पण मोदींना जबाबदार धरण्याची सवय काही जात नाही. ही सवय इतकी टोकाला गेली आहे की, अजूनपर्यंत त्यांनी इंडोनेशियातील विमान अपघाताशी वा अवनी नावाच्या वाघिणीच्या मृत्युशी मोदींचा संबंध कसा जोडला नाही याचेच आश्‍चर्य वाटते.
याचा अर्थ असाही नाही की, मोदींचे सगळे म्हणणे त्यांच्या विरोधकांनी जसेच्या तसे मान्य करावे. मोदींची चूक होतच नाही असेही कुणाला म्हणता येणार नाही. त्यांची कार्यशैली शंभर टक्के निर्दोष आहे असा दावाही कुणाला करता येणार नाही. मोदीच काय पण सदगुणांचे पुतळे म्हणून मिरविणार्‍या कुणाही आजी माजी नेत्याबद्दल तसे म्हणता येणार नाही. कारण शंभर टक्के निर्दाष पूर्णपुरुष अजून जन्माला यायचा आहे. योग्य निष्कर्ष काढण्यासाठी ‘अ‍ॅव्हेलेबल बेस्ट’ काय आहे ते शोधण्याचीच गरज आहे. पण तसे काहीही न करता जे अ‍ॅव्हेलेबल आहे ते कसे वर्स्ट आहे हे दाखविण्याकडेच सर्वांचा कल असतो. जो नियम मोदींना लागू केला जातो तो मोदीविरोधी इतर नेत्यांना मात्र लागू केला जात नाही ही यातली आणखी एक मखलाशी. अशा स्थितीत सखोल अभ्यासाची अपेक्षा तरी कुणाकडून करावी हा एक खूप मोठा प्रश्‍नच आहे.
खरे तर आपला देश एवढा विशाल आहे आणि सर्व प्रकारच्या इतक्या विविधतांनी भरलेला आहे की, हे सगळे असूनही देश कसा चालू आहे, सातत्याने प्रगती करीत आहे, हे फार मोठे आश्‍चर्य आहे. त्याचे कारण जसे मोदी नाहीत तसेच दुसरे अन्य नेतेही नाहीत. त्याचे खरे श्रेय कुणाला द्यायचेच झाले तर आपल्या सामाजिक आणि राष्ट्रीय व्यवस्थेत मुरलेल्या संस्कारांना द्यावे लागेल. या समाजात अशी अंगभूत व्यवस्था विकसित झाली आहे की, तीच वेळोवेळी निर्माण होणार्‍या गंभीर समस्यातून कुठलाही खळखळाट न करता मार्ग काढते. ते करायला तिला वेळ लागत असेल पण हमखास मार्ग मात्र निघतोच आणि विकासाची प्रक्रिया पुढे सरकते. आपले संविधान, विधिपालिका, न्यायपालिका, कार्यपालिका ह्या घटनात्मक संस्थांचाही त्यात अपरिहार्यपणे सहभाग असतोच. पण ते कधीच आपल्या लक्षात येत नाही.
या वस्तुस्थितीची जाणीव नसल्याने परसेप्शन कसे बदलते व ते वस्तुस्थितीपासून कसे दूर असते हे सांगण्यासाठी हल्ली केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक यांच्यात निर्माण झालेल्या तणावाचे उदाहरण देता येईल. राजकीय स्वार्थामुळे परसेप्शन असे निर्माण केले जात आहे की, मोदी जणू काय सर्व घटनात्मक संस्थांचा विध्वंस करायलाच निघाले आहेत. प्रत्यक्षात तसे यावेळी प्रथमच घडत आहे काय, घडले असेल तर त्यावेळची वस्तुस्थिती कशी होती, आताची कशी आहे, याचा साधा विचारही कुणी करीत नाही. आपण स्वत:च तयार केलेल्या काल्पनिक आरोपात ते बसते, एवढेच पाहिले जाते. रिझर्व्ह बँक विवादाबद्दलही तसेच आहे. खरे तर विरल आचार्य नावाचे रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एका कार्यक्रमात राजकीय पुढार्‍याच्या थाटात बरळले नसते तर सरकार आणि बँक यांच्यात काही विवाद आहे याची चर्चाही झाली नसती. पण त्यांनी अशा थाटात भाषण केले की, जणू मोदी हातात मशाल घेऊन रिझर्व्ह बँक जाळायलाच निघाले आहेत. वस्तुस्थिती अशी आहे की, आपल्या व्यवस्थेत सरकार आणि रिझर्व्ह बँक यांचे संबंध अतिमधुर राहूच शकत नाहीत आणि त्याचे कारण अ किंवा ब व्यक्ती नाहीत. त्या व्यक्तींकडे संविधानाने दिलेली जबाबदारी हे कारण आहे. कोणत्याही लोकशाहीत ‘नियंत्रण आणि समतोल’ (ज्याचा ‘चेक अँड बॅलन्स’ या शब्दांत उल्लेख होतो) यांचा अपरिहार्यपणे वापर केला जातो. ते तत्व वापरले गेले नाही तर कुठली तरी घटनात्मक संस्था अनियंत्रित होतेच. १९७५ मध्ये जेव्हा आणिबाणी लागू झाली तेव्हा ती केव्हा तरी हटेल असे कुणालाही वाटत नव्हते. पण आपल्या संविधानातील समतोलाच्या या पध्दतीमुळेच इंदिराजींना आणिबाणी मागे घ्यावी लागली. सरकार व रिझर्व्ह बँक यांच्या संबंधानाही तेच लागू होते. संविधानाने रिझर्व्ह बँकेला स्वायत्तता दिली आहे पण त्यावर मर्यादाही घातल्या आहेत. सरकारला देश चालवावा लागतो आणि रिझर्व्ह बँकेला अर्थव्यवस्था सांभाळावी लागते. त्यासाठी त्या दोन्ही संस्थांना अधिकार देण्यात आले आहेत. तसेच त्यांनी ते कोणत्या परिस्थितीत वापरावेत हे आणि त्यात मतभेद झाले तर कुणाचा शब्द अंतिम हेही सांगून ठेवले आहे.
आज मोदी सत्तेवर आहेत म्हणून रिर्झ्व्ह बँकेच्या स्वायत्ततेचे ढोल पिटले जात आहेत. पण रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असतांना नंतर पंतप्रधान झालेले डॉ. मनमोहन सिंग गव्हर्नर म्हणून कसे वागले होते हे सोयीस्करपणे झाकून ठेवले जात आहे. इतिहास त्याला साक्षी आहे. एवढेच नाही तर त्याला स्वत: डॉ. सिंग यांनी त्यांच्या कन्येने लिहिलेल्या ‘स्ट्रीक्टली पर्सनल : मनमोहन अ‍ॅन्ड गुरशरण’ या पुस्तकातून दुजोरा दिला आहे. रिझर्व्ह बँक गव्हर्नर व अर्थमंत्री यांच्या संबंधांच्या संदर्भात डॉ. सिंग म्हणतात ‘त्या दोघांमध्ये विचारांची देवाणघेवाण सुरुच असते. मला सरकारला विश्‍वासात घ्यावे लागत असे. रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर हा काही अर्थमंत्र्यापेक्षा श्रेष्ठ नसतो आणि जर अर्थमंत्र्यांचा आग्रह असेल तर मला नाही असे वाटत की, गव्हर्नरला तो नाकारण्याचा अधिकार आहे. अर्थात त्याला पदाचा राजीनामा द्यायचा नसेल तर’. एवढे नमूद करुनच डॉ. सिंग थांबले नाहीत तर ते जेव्हा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते तेव्हा प्रणव मुखर्जी देशाचे अर्थमंत्री होते. त्यावेळी त्यावेळचे बहुचर्चित व्यक्तित्व स्वराज पॉल यांच्या कॅप्रो समूहाला एस्कार्टस या भारतीय कंपनीचे शेअर्स खरेदी करायचे होते. एवढेच नाही तर त्यांनी ते खरेदी करणे सुरुही केले होते. पण रिझर्व्ह बँकेला हा व्यवहार मान्य नव्हता. तसे गव्हर्नर मनमोहनसिंग यांनी अर्थमंत्र्यांना कळविलेही होते. पण जेव्हा सरकारने सांगितले तेव्हा गव्हर्नर सिंग यांनी त्या व्यवहाराला निमूटपणे संमतीही दिली होती. त्यावेळी आजच्यासारखे आंधळे विरोधक नव्हते. त्यामुळे प्रणव मुखर्जी रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेवर घाला घालायला निघाले आहेत असा आरोप कुणाला करावासा वाटला नाही. पण आज मात्र तशीच परिस्थिती निर्माण झाली असतांना मोदींंवर वाटेल तसे आरोप केले जात आहेत. या आरोपात काहीही दम नाही हे मोदींना ठाऊक असल्यामुळे ते तोंडाची वाफ दवडत नाहीत. पण त्यामुळे वस्तुस्थिती थोडीच बदलते? ती समोर येते आणि मोदीविरोधकांचे पितळ उघडे पडते.
थोडे विषयांतर करुन हाच मुद्दा आणखी स्पष्ट करायचा झाल्यास परवा काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिाकार्जुन खरगे सीबीआयमधील विवादात रजेवर असलेले संचालक आलोक वर्मा यांच्या बाजूने उभे राहिले आहेत. न्यायालयातही गेले आहेत. तसे करण्याचा त्यांचा अधिकार नाकारण्याचे कारण नाही पण जेव्हा आलोक वर्मा यांना सीबीआय संचालकपदी नेमण्याचा विषय पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि विरोधी पक्षनेते यांच्या त्रिसदस्य समितीसमोर आला तेव्हा याच खरगेंनी याच आलोक वर्मांच्या नावाला प्रखर विरोध केला होता. खरे तर परिस्थिती बदलली तरीही शाश्‍वत मूल्ये बदलायला नकोत. पण ती बदलली की, नेते आपली भूमिका कशी बदलतात हे यावरुन स्पष्ट होते. त्यामुळे मोदी रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेवर घाला घालायला निघाले आहेत या आरोपात किती तथ्य आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
तशीच गोष्ट रिझर्व्ह बँक कायद्यातील सातवे कलम वापरण्याच्या संदर्भातील. या कलमाचा वापर करण्याबद्दल मोदी सरकारने सूचित केल्याबरोबर किती धुराळा उडविण्यात आला? पण १९३४ साली रिझर्व्ह बँक स्थापन झाली तेव्हाच त्या विषयीच्या कायद्यात हे सातवे कलम समाविष्ट करण्यात आले आहे. बँक आणि सरकार यांच्यात मतभेद झाले तर सरकारने या कलमाचा वापर करुन कसा विचारविनिमय करावा हे या सातव्या कलमात नमूद करण्यात आले आहे. याचा एक अर्थ तर स्पष्ट आहे की, असे मतभेद निर्माण होऊ शकतात हे कायदा करणार्‍यांनी मान्य केले होते. आता १९३४ पासून एकदाही वापरण्यात न आलेल्या या कलमाचा वापर जर मोदी करत असतील तर ते काय रिझर्व्ह बँक मोडित काढायला निघाले आहेत? आतापर्यंत एकदाही त्या कलमाचा वापर करावा लागला नसेल तर त्याचा अर्थ त्या काळात सरकार व गव्हर्नर दोघेही शहाणे असतील असाच निघू शकतो आणि आता गरज निर्माण झाली असेल तर सरकार किंवा बँक यांच्यापैकी एक शहाणा नसेल असा अर्थ निघू शकतो. इथपर्यंत सगळे ठीक आहे पण कोण शहाणा व कोण मूर्ख हे ठरविण्याचा प्रश्‍न येतो तेव्हा वस्तुस्थिती पूर्णपणे नजरेआड करुन मोदींना घाईघाईने मूर्ख ठरविले जाते. गव्हर्नरचे काही चुकू शकते याचा विचार करण्याचीही कुणाला गरज वाटत नाही. खरी गोम इथेच आहे. सर्वांना मोदींना बदनाम करण्याची विलक्षण घाई झाली आहे. त्यामुळे भूतकाळात आपल्याच पक्षाचे नेते कसे वागले याचा विचार करण्याचीही त्यांना गरज वाटत नाही. कारण तो केला तर मोदीविरोधाची धारच बोथट होऊन जाते.
मोदीविरोधक तेथेच थांबत नाही. आज जेव्हा सरकार विरुध्द रिझर्व्ह बँक असे चित्र निर्माण होत आहे ते जणू प्रथमच होत आहे असे भासविले जाते. कारण त्याशिवाय मोदी विध्वंस करायला निघालेत हे कसे सिध्द होऊ शकेल? पण कुणी कितीही ठरवले तरी कोंबडा आरवल्याशिवाय राहत नाही. रिझर्व्ह बँकेच्या १९३४ मधील स्थापनेनंतर चौथे गव्हर्नर जॉन ऑस्बर्न स्मिथ यांनी १९३७ मध्येच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, ही वस्तुस्थिती सोयीस्कर रीतीने झाकून ठेवली जाते. त्यांच्या दुर्दैवाने रिझर्व्ह बँक विरुध्द सरकार हा सामना पं. जवाहरलाल नेहरु पंतप्रधान असतांनाच जानेवारी १९५७ मध्ये झडला होता व त्यात गव्हर्नरला नमते घ्यावे लागले होते. पण त्याचा उच्चार तर सोडा विचारही कुणी मनात आणत नाही. त्यावेळी अर्थमंत्री टी.टी. कृष्णम्माचारी व रिझर्व्ह बँक गव्हर्नर यांच्यात मतभेद झाले होते. तेव्हा नेहरुंनी गव्हर्नरांना खडसावून पत्र लिहिले होते. त्यात ते म्हणतात ‘रिझर्व्ह बँकेला सरकारच्या धोरणाच्या विरोधात जाऊन धोरण तयार करता येणार नाही. कारण रिझर्व्ह बँक ही सरकारी कारभाराचाच एक भाग आहे.’ पण मोदीविरोधाची आपली आवडती थिम दामटण्यासाठी ही सगळी वस्तुस्थिती झाकून ठेवली जाते आणि जणू काय मोदी एकापाठोपाठ एक घटनात्मक संस्था उद्ध्वस्त करायला निघाले आहेत, असे भासविले जाते. यातून मात्र कोण, कुणाचा विध्वंस करायला निघाले आहे हे स्पष्ट होते.
मोदी किंवा अर्थमंत्री जेटली काय म्हणतात, त्यांनी कशासाठी रिझर्व्ह बँकेशी पंगा घेतला (अर्थात घेतला असेल तर) याचा विचार करण्याची कुणालाही गरज वाटत नाही. खरे तर सरकारी बँकांच्या एनपीएबाबत सरकार व रिझर्व्ह बँक यांच्या आकलनात फारसा फरक नाही. एनपीए ही बँकिंग व्यवस्थेला लागलेली कीड आहे हे त्या दोहोंना मान्य आहे. पण सरकारला देश चालवायचा असल्याने व रिझर्व्ह बँकेला अर्थव्यवस्था सांभाळायची असल्यामुळे थोडी मतभिन्नता निर्माण झाली आहे. एनपीएबाबत रिझर्व्ह बँकेने काही कठोर पावले उचलल्यामुळे अर्थकारणात काही समस्या निर्माण झाल्या आहेत. मग त्या पतपुरवठ्याबद्दल असतील किंवा नॉनबँकिंग फायनान्स कंपन्या वा सूक्ष्म, लघु व मध्यम (एमएसएम) उद्योगांसंबंधी असतील, त्याबाबत विचार करण्यासाठी कायद्यानुसारच सातव्या कलमाचा वापर करण्याचे सरकारने ठरविले आहे. त्याबाबत एवढा गहजब कशाला? •••

Posted by : | on : 11 Nov 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, ल.त्र्यं. जोशी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, ल.त्र्यं. जोशी, स्तंभलेखक (198 of 1154 articles)

Congress About Naxal
जागता पहारा : भाऊ तोरसेकर | इतका मोठा तमाशा करूनही सुप्रिम कोर्टाला नक्षली संशयितांना साधा जामिन मंजूर करता आला नाही, ...

×