ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:27 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » आसमंत, डॉ.वाय.मोहितकुमार राव, पुरवणी, स्तंभलेखक » रिसेप्शनिस्ट ते पेप्सिकोच्या सीईओ!

रिसेप्शनिस्ट ते पेप्सिकोच्या सीईओ!

इंद्रा नूयी यांचा थक्क करणारा प्रवास!!

॥ अभिप्राय : डॉ.वाय.मोहितकुमार राव |

एक महिला आणि त्यातही गैरअमेरिकन महिलेला अशा सर्वोच्च शिखरावर पोचणे हे खूपच खडतर काम होते. यादरम्यान कामाच्या ठिकाणी होणारे मानसिक, सामाजिक आणि सांस्कृतिक भेदाचे सर्व अत्याचार इंद्रा यांनी सहन केले. कामकाजी महिला असणे हे वाटतं तितकं सोपं नाही आणि इंद्रा नूयी यांनाही ते चांगले ठाऊक आहे. मात्र, आपण एक उत्तम पत्नी, आई, मुलगी आणि मानसन्मान आणि प्रतिष्ठा मिळविणारी कामकाजी महिलासुद्धा होऊ शकतो, हे इंद्रा नूयी यांनी दाखवून दिले आहे.

Indra Nooye

Indra Nooye

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, असे नेहमीच बोलले जाते. यशस्वी पुरुषाच्या वाटचालीत एक स्त्री आई, पत्नी किंवा इतर कोणत्याही रूपात खंबीरपणे उभी असते, असा त्याचा अर्थ. मात्र, एक शिक्षित व स्वावलंबी महिला आपली प्रतिभा, जिद्द आणि स्वबळावर यशाला गवसणी घालू शकते, असेही म्हटले जाते. भारतीय वंशाच्या इंद्रा नूयी यांनी आपल्या कर्तृत्वानं हे सिद्धच करून दाखवलं आहे. कधीकाळी आपले शिक्षण पूर्ण करण्याच्या दृष्टीने पैसा कमावण्यासाठी मध्यरात्री १२ ते पहाटे पाच वाजेपर्यंत रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणार्‍या इंद्रा नूयी आज १३१ अब्ज डॉलर्सची उलाढाल असलेल्या आणि जगातील चौथ्या सर्वांत मोठ्या कंपनीच्या मालक आहेत. त्यांच्या या अफाट कर्तृत्वामुळेच इंद्रा नूयी यांचा जगातील शक्तिशाली महिलांपैकी एक म्हणून उल्लेख केला जातो. शीतपेयांच्या उत्पादनात आघाडीवर असलेल्या पेप्सिको कंपनीच्या सीईओ राहिलेल्या व सध्या चेअरपर्सन असलेल्या इंद्रा नूयी यांचा आजच म्हणजे २८ ऑक्टोबरला वाढदिवस आहे, हे विशेष!
केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात समाजात कमीजास्त प्रमाणात लिंगभेद हा केलाच जातो. मात्र, इंद्रा नूयी यांनी आपल्या थक्क करून टाकणार्‍या प्रवासातून एक आदर्श घालून दिला आहे. तुम्ही कुठे आहात आणि कुठून आला आहात, याला काहीही महत्त्व नसून, तुमच्याकडे स्वप्न असेल तर ते साध्य करण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती आणि निष्ठेची गरज असते, हेच नूयी यांच्या यशावरून स्पष्ट होते. भारतातील सध्याच्या चेन्नई आणि तेव्हाच्या मद्रास शहरातील एका पुराणमतवादी तामीळ कुटुंबात २८ ऑक्टोबर १९५५ रोजी इंद्रा यांचा जन्म झाला. त्यांचे वडील स्टेट बँक ऑफ हैदराबादमध्ये कार्यरत होते. इंद्रा यांचे शालेय शिक्षण मद्रास येथील होली अ‍ॅन्जेल्स अँग्लो इंडियन हायर सेकंडरी स्कूल येथे पार पडले. इंद्रा यांनी मद्रास ख्रिश्‍चन कॉलेज येथून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये पदवी प्राप्त केली. वडील बँकेत असल्याने आईनेच इंद्रा आणि इतर बहिणींचे पालनपोषण केले. मोठ्या झाल्यावर तुम्ही काय होणार, असा प्रश्‍न आई मुलींना विचारत असे आणि सर्वोत्तम उत्तर देणार्‍याला बक्षीस! यामुळेच आपल्या भविष्यातील वाटचालीचा विचार करण्याची प्रेरणा इंद्राला मिळाली. निर्धार आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर इंद्राने आताच्या कोलकाता आणि तत्कालीन कलकत्ता शहरातील अत्यंत प्रतिष्ठित अशा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेत प्रवेश घेतला. तिथून त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले. त्यानंतर इंद्राने दोन वर्षे भारतातच जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन व मेट्टूर बर्डसेल या कंपन्यांमध्ये नोकरी केली.
यामधून कमावलेल्या थोड्याफार पैशांसह इंद्राने उच्च शिक्षणासाठी अमेरिकेकडे प्रयाण केले. याले येथे उच्च शिक्षण घेत असताना आपला खर्च भागविण्यासाठी इंद्रा, मध्यरात्री १२ ते पहाटे पाच वाजेपर्यंत रिसेप्शनिस्ट म्हणून काम करायच्या. या संघर्षादरम्यान याले येथे मास्टर्स पूर्ण केल्यानंतर, कमावून बचत केलेल्या पैशातून आपल्या पहिल्या मुलाखतीसाठी त्यांनी एक पाश्‍चिमात्य सूट खरेदी केला. परंतु, यावेळी तिने गुडघ्यापर्यंत येईल एवढा ट्राऊझर परिधान केल्यामुळे मुलाखतीत इंद्राला नाकारण्यात आले. यामुळे नाराज इंद्रा यालेमधील आपल्या प्राध्यापकांकडे गेल्या असता, तुला जे योग्य वाटेल ते परिधान कर, असा सल्ला त्यांनी इंद्राला दिला. त्यानंतर इंद्रा पुढच्या मुलाखतीला साडी नेसून पारंपरिक भारतीय पोशाखात मुलाखतीसाठी गेली आणि आश्‍चर्य म्हणजे तिला नोकरी मिळाली. तुम्ही काय परिधान करता यापेक्षा तुम्ही काय आहात याला जास्त महत्त्व आहे, हे या घटनेवरून सिद्ध होते.
या घटनेनंतर इंद्राने ‘बिईंग युव्हरसेल्फ’ म्हणजे आपण जे काही आहोत ते आहोत, याच विचारधारेच्या आधारे मार्गक्रमण सुरू केले. त्यानंतर इंद्राने बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपमध्ये कामास सुरुवात केली. त्या ठिकाणी तिला कठोर परिश्रम करावे लागले आणि परिश्रमाशी कोणतीही तडजोड न करण्याची इंद्रा दोन कारणं सांगतात. एकतर मी महिला व त्यामुळे आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी पुरुष सहकार्‍यांपेक्षा अधिक काम करणे आणि दुसरे म्हणजे अमेरिकन नसणे. सहा वर्षांनंतर इंद्रा यांनी मोटोरोला कंपनीमध्ये उपाध्यक्ष आणि कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी अ‍ॅण्ड प्लानिंग विभागाचे संचालकपद स्वीकारले. त्यानंतर चार वर्षे एसी ब्राऊन बोव्हेरी या झूरिचस्थित औद्योगिक कंपनीच्या अमेरिकेतील व्यवसायात उच्च व्यवस्थापनात काम केल्यानंतर १९९४ साली इंद्रा नूयी यांनी पेप्सिको कंपनी जॉईन केली.
पेप्सिको कंपनीत अथक परिश्रम आणि निष्ठेच्या जोरावर इंद्राने अनेक जबाबदार्‍या यशस्वीपणे पार पाडल्या. अनेकदा त्यांना रात्री उशिरापर्यंत काम करावे लागे. या परिश्रमाचेच फळ त्यांना मिळाले आणि २००० साली त्यांची पेप्सिकोच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. शिवाय कंपनीच्या संचालक मंडळातही त्यांचा समावेश करण्यात आला. यामुळे गदगद झालेल्या इंद्रा नूयी ही बातमी आपली आई, पती आणि दोन मुलींना सांगण्यास उत्सुक होत्या. त्यासाठी त्या लगेच घरी आल्या आणि आईला बघताच, तुला एक गोड बातमी द्यायची असल्याचे सांगितले. मात्र, आईने त्याकडे लक्ष न देता दुसर्‍या दिवशीसाठी दूध आणण्यास सांगितले. यामुळे नाराज झालेल्या इंद्राने दूध तर आणले, परंतु मी पेप्सिकोची सीईओ झाल्याचे वृत्त तुला का ऐकायचे नव्हते, असे त्यांनी आईला विचारले. इंद्राच्या आईने दिलेले उत्तर खूपच मार्मिक होते- ‘‘तू भलेही कंपनीच्या संचालक मंडळावर असशील. परंतु, घरात प्रवेश केल्यावर तू पत्नी, मुलगी, सून आणि आई आहेस, हे विसरू नकोस. तू हे सर्वकाही आहेस. ही जागा इतर कुणीही घेऊ शकत नाही. त्यामुळे कंपनीमधील मानसन्मान गॅरेजमध्येच ठेव आणि घरात काहीच आणत जाऊ नकोस.’’ हे आईने तेव्हा उच्चारलेले शब्द इंद्रा यांच्या मनावर कायमचे कोरले गेले.
एक महिला आणि त्यातही गैरअमेरिकन महिलेला अशा सर्वोच्च शिखरावर पोचणे हे खरंतर खूपच खडतर काम होते. यादरम्यान कामाच्या ठिकाणी होणारे मानसिक, सामाजिक आणि सांस्कृतिक भेदाचे सर्व अत्याचार इंद्रा यांनी सहन केले. कामकाजी महिला असणे हे वाटतं तितकं सोपं नाही आणि इंद्रा नूयी यांनाही ते चांगले ठाऊक आहे. मात्र, आपण एक उत्तम पत्नी, आई, मुलगी आणि यासोबतच मानसन्मान आणि प्रतिष्ठा मिळविणारी कामकाजी महिलासुद्धा होऊ शकतो, हे इंद्रा नूयी यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळेच इंद्रा नूयी यांचा जीवनप्रवास जीवनात खरोखरच काहीतरी साध्य करून भरारी घेण्यास उत्सुक असण्यासह कामकाजाच्या ठिकाणी सहन कराव्या लागणार्‍या गोष्टींचा मुकाबला करण्याच्या दृष्टीने खरोखरच प्रेरणादायी आहे. एक महिला तिच्या इच्छेनुसार कोणतीही गोष्ट साध्य करू शकते, हेच इंद्रा यांच्या यशस्वी जीवनावरून स्पष्ट होते.
‘‘नेतृत्वाची व्याख्या करणे खूपच अवघड आहे आणि चांगल्या नेतृत्वाची त्याहीपेक्षा अवघड. परंतु, जर तुम्ही लोकांना पृथ्वीच्या टोकापर्यंत आपल्या मागे येण्यास बाध्य केले, तर तुम्ही महान नेते आहात.’’ -इंद्रा कृष्णमूर्ती नूयी

Posted by : | on : 4 Nov 2018
Filed under : आसमंत, डॉ.वाय.मोहितकुमार राव, पुरवणी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, डॉ.वाय.मोहितकुमार राव, पुरवणी, स्तंभलेखक (367 of 1299 articles)

Senior Citizens
अर्थपूर्ण : यमाजी मालकर | माणसासाठी अटळ असणार्‍या वृद्धावस्थेचा सन्मान करणारी प्रभावी अशी सामाजिक व्यवस्था असू शकते काय? ज्येष्ठ नागरिकांना ...

×