हज सबसिडी बंद

हज सबसिडी बंद

►मुस्लिमांना प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार देणार ►नकवी यांची घोषणा, नवी…

चकमकीत मला ठार करण्याचा कट : तोगडिया

चकमकीत मला ठार करण्याचा कट : तोगडिया

►लवकरच पुराव्यांसह समोर येणार, अहमदाबाद, १६ जानेवारी – १०…

न्या. लोयांच्या मृत्यूसंबंधी दस्तावेज याचिकाकर्त्याला द्या

न्या. लोयांच्या मृत्यूसंबंधी दस्तावेज याचिकाकर्त्याला द्या

►सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश, नवी दिल्ली, १६ जानेवारी…

क्षेपणास्त्र डागल्याच्या संदेशामुळे गोंधळ

क्षेपणास्त्र डागल्याच्या संदेशामुळे गोंधळ

वॉशिंग्टन, १४ जानेवारी – अमेरिकेच्या हवाईक्षेत्रातील हवाई बेटावर क्षेपणास्त्र…

‘जम्मू-काश्मीरला जाणे टाळा’

‘जम्मू-काश्मीरला जाणे टाळा’

►अमेरिकेची पर्यटकांना सूचना, वॉशिंग्टन, ११ जानेवारी – अमेरिकेने भारतात…

ममतांच्या दौर्‍यातील संपादक ‘चमचे-चोर’?

ममतांच्या दौर्‍यातील संपादक ‘चमचे-चोर’?

लंडन, १० जानेवारी – पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी…

भाजपाची तिरंगा रॅली

भाजपाची तिरंगा रॅली

►संविधान बचाव रॅलीला प्रत्युत्तर ►•रावसाहेब दानवे यांची घोषणा, मुंबई,…

ना. स. फरांदे कालवश

ना. स. फरांदे कालवश

पुणे, १६ जानेवारी – भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि विधान…

बापू बिरू वाटेगावकर यांचे निधन

बापू बिरू वाटेगावकर यांचे निधन

सांगली, १६ जानेवारी – पश्‍चिम महाराष्ट्रात ‘रॉबिनहूड’ प्रमाणे आयुष्य…

श्री सिद्धरामेश्‍वर यात्रा : सामाजिक सप्तरंगांचे एक आकाश

श्री सिद्धरामेश्‍वर यात्रा : सामाजिक सप्तरंगांचे एक आकाश

॥ तरंग : दीपक कलढोणे | ‘हर्र बोला हर्र’…

विवेकानंदांचे परखड हिंदुत्व!

विवेकानंदांचे परखड हिंदुत्व!

॥ विशेष : मुकुल कानिटकर | एकीकडे जग भारताकडे…

संभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा

संभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | हा वारस…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:12
अयनांश:
Home » अनय जोगळेकर, आसमंत, स्तंभलेखक » रौप्यमहोत्सवी संबंधांना रूपेरी कोंदण

रौप्यमहोत्सवी संबंधांना रूपेरी कोंदण

अनय जोगळेकर |

गेल्या २४ वर्षांत भारत आणि इस्रायल संबंध असले तरी गेल्या अडीच वर्षांच्या काळात ते अधिक दृश्य झाले आहेत. २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतनयाहू यांची भेट घेतली. मार्च २०१५ मध्ये आधुनिक सिंगापूरचे जनक ली कुआन यू यांच्या अंत्यविधीच्या निमित्ताने मोदींनी इस्रायलचे राष्ट्रपती रिवलिन यांचीही भेट घेतली. तत्पूर्वी राजनाथसिंह, सुषमा स्वराज यांनी इस्रायला भेट दिली तर फेब्रुवारी १५ मध्ये मोशे यालोन हे भारताला भेट देणारे इस्रायलचे पहिले संरक्षणमंत्री ठरले. राष्ट्रपती रूवेन रिवलिन यांच्या भारतभेटीने एक वर्तुळ पूर्ण होत असून आता सगळ्यांच्या नजरा मोदींच्या इस्रायल आणि पंतप्रधान बेंजामिन नेतनयाहूंच्या भारत दौर्‍याकडे लागले आहे.

reuven-rivlin-and-narendra-modiइस्रायलचे राष्ट्रपती रूवेन रिवलिन आठवडाभराच्या भारत दौरा आटोपून परत जात असताना आज मुंबईला धावती भेट देत आहेत. इस्रायली राष्ट्रपतींची भारतभेट ही दुर्मिळ घटना आहे. यापूर्वी, जवळपास २० वर्षांपूर्वी, म्हणजे जानेवारी १९९७ मध्ये इस्रायलचे राष्ट्रपती एझर वाइझमन भारतात आले होते. ऑक्टोबर २०१५ मध्ये प्रणव मुखर्जी हे इस्रायलला भेट देणारे भारताचे पहिले राष्ट्रपती ठरले. त्यामुळे राष्ट्रपती रिवलिन यांच्या भारतभेटीची दखल घेणे आवश्यक ठरते. लवकरच भारत-इस्रायल राजनैतिक संबंध प्रस्थापित झाल्याला २५ वर्षं पूर्ण होतील. भारतानंतर केवळ ९ महिन्यांच्या अंतराने म्हणजेच १४ मे १९४८ साली इस्रायलला स्वातंत्र्य मिळाले. ५ हजार वर्षांहून अधिक वर्षांचा गौरवशाली वारसा लाभलेल्या या आधुनिक देशांमध्ये अनेक साधर्म्य तसेच परस्परांना जोडणारे अनेक समान दुवे असले तरी शीतयुद्ध आणि तत्कालीन जागतिक परिस्थितीमुळे संपूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित व्हायला २९ जानेवारी १९९२ ही तारीख उजडावी लागली. त्याचे श्रेय शीतयुद्धाची अखेर आणि बदललेली वास्तविकता याचबरोबर पंतप्रधान नरसिंह राव यांनाही द्यावे लागेल.
गेल्या २४ वर्षांत भारत आणि इस्रायल संबंधात सातत्याने वाढ होत असली तरी गेल्या अडीच वर्षांच्या काळात ते अधिक दृश्य झाले आहेत. २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतनयाहू यांची भेट घेतली. मार्च २०१५ मध्ये आधुनिक सिंगापूरचे जनक ली कुआन यू यांच्या अंत्यविधीच्या निमित्ताने तेथे गेले असता मोदींनी इस्रायलचे राष्ट्रपती रिवलिन यांचीही भेट घेतली. तत्पूर्वी गृहमंत्री राजनाथसिंह यांनी नोव्हेंबर २०१४ मध्ये इस्रायला भेट दिली तर फेब्रुवारी २०१५ मध्ये मोशे यालोन हे भारताला भेट देणारे इस्रायलचे पहिले रक्षामंत्री ठरले. प्रणव मुखर्जींच्या इस्रायल दौर्यानंतर तीनच महिन्यांनी म्हणजे जानेवारी २०१६ मध्ये परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी इस्रायलला भेट दिली. राष्ट्रपती रूवेन रिवलिन यांच्या भारतभेटीने एक वर्तुळ पूर्ण होत असून आता सगळ्यांच्या नजरा पंतप्रधान मोदींच्या इस्रायल आणि पंतप्रधान बेंजामिन नेतनयाहूंच्या भारत दौर्याकडे लागले आहे.
इस्रायलचे दहावे अध्यक्ष रूवेन रिवलिन यांचा जन्म १९३९ साली जेरूसलेममध्ये झाला असून त्यांचे कुटुंबीय १८०९ सालापासून जेरूसलेममध्ये स्थायिक झाले आहेत. व्यवसायाने प्राध्यापक असलेल्या त्यांच्या वडिलांनी सर्वप्रथम पवित्र कुराण हिब्रूमध्ये भाषांतरित केले. चार वर्षांचा अपवाद वगळता रिवलिन १९८८ सालापासून उजव्या विचारधारेच्या लिकुड पक्षातर्फे इस्रायलच्या संसदेचे सदस्य असून राष्ट्रपती होण्यापूर्वी त्यांनी दोन वेळेला संसदेचे सभापतीपद भूषवले आहे. इस्रायली-पॅलेस्टाइन संघर्षाच्या पारप्रेक्ष्यातून बघितले असता रिवलिन अधिक उजव्या विचारसरणीचे-म्हणजेच इस्रायलच्या विभाजनाचे विरोधक असले तरी इस्रायलमधील अरब आणि अन्य अल्पसंख्याकांचे स्वातंत्र्य आणि हक्क याबाबतीत ते कमालीचे आग्रही आहेत. ते स्वतः सफाईदारपणे अरबी भाषा बोलतात. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत रिवलिन यांना काही अरब संसद सदस्यांची मतंही मिळाली होती. भारताप्रमाणेच इस्रायलमध्येही न्यायपालिका, संसद आणि कार्यपालिकेत वेळोवेळी निकोप संघर्ष होताना दिसतो. याबाबतीत संसदेचे सभापती म्हणून रिवलिन यांनी वेळोवेळी न्यायपालिका तसेच कार्यपालिकेच्या संसदेच्या अधिकारक्षेत्रात होणार्‌या हस्तक्षेपावर टीका केली. असे करताना आपल्याच – म्हणजे लिकुड पक्षाच्या सरकारच्या विरोधात मतं माडताना त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. २००७ साली राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत रिवलिन यांना शिमॉन पेरेस यांच्याकडून पराभव पत्करावा लागला असला तरी २०१४ साली राष्ट्रपती होण्यापूर्वी आणि त्यानंतरही त्यांचे व पेरेस यांच्याशी घनिष्ठ संबंध होते.
आपल्या भेटीत रिवलिन यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महत्त्वाच्या विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा केली. रिवलिन यांच्यासोबत पत्रकारांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेती, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नाविन्यपूर्णता, व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण, पर्यटन, संस्कृती अणि उच्च शिक्षण या क्षेत्रांमध्ये भारत-इस्रायलमधील बहरत्या संबंधांची दखल घेतली. भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून आपल्या सरकारच्या मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्किल इंडिया आणि स्मार्ट शहरांच्या योजनेत इस्रायली कंपन्यांना मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले. पाकिस्तानचे नाव न घेता मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर कट्टरतावाद आणि दहशतवादाविरूद्ध लढण्यासाठी जगातील शांतीप्रिय देशांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्यत्वासाठी पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी इस्रायलचे आभार मानले. रिवलिन यांनीही इस्रायल मेक इन इंडिया आणि मेक फॉर इंडिया योजनांत भारताच्या सोबत असल्याचे प्रतिपादन केले.
रिवलिन यांच्या दौर्यात पाणी आणि कृषी क्षेत्रातील संबंध वृद्धींगत करण्यासाठी द्विपक्षीय करार करण्यात आले तसेच मुक्त व्यापार कराराबाबतही चर्चा झाली. रिवलिन यांनी आपल्या पत्नीसह आग्रा येथे ताजमहालला आणि इस्रायली तंत्रज्ञानावर आधारित जल- पुर्नरभरण प्रकल्पाला भेट दिली. हरियाणातील कर्नाल येथील भारत-इस्रायल कृषी गुणवत्ता केंद्राला भेट देऊन चंदीगड येथे सीआयआयच्या अन्न व कृषी तंत्रज्ञान परिषदेचे उद्घाटन केले. मुंबईमध्ये रिवलिन २६/११ च्या हल्ल्‌यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहणार असून भारतातील ज्यू धर्माच्या नेत्यांची भेट घेणार आहेत.
रिवलिन यांच्यासोबत इस्रायलमधील शेती, पाणी, संरक्षण या क्षेत्रातील कंपन्यांसोबत, आघाडीच्या विद्यापीठांच्या अध्यक्ष आणि वरिष्ठ प्रतिनिधींचे १५ सदस्यीय शिष्टमंडळ भारतात आले आहे.  १७ नोव्हेंबरला दिल्लीमध्ये रिवलिन आणि मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत इस्रायल आणि भारतातील विद्यापीठांमध्ये २१ सामंजस्य करार झाले. त्यातील निम्म्याहून अधिक करार महाराष्ट्रातील मुंबई विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, रसायन तंत्रज्ञान संस्था, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज इन्स्टिट्यूट, वेलिंगकर आणि ए. पी. जैन व्यवस्थापन संस्था, सकाळ समूह इ. विद्यापीठांशी झाले. आज इस्रायली विद्यापीठांमध्ये शिकणार्‌या परदेशी विद्यार्थ्यांपैकी १०% भारतीय विद्यार्थी आहेत. भारतातील आघाडीच्या कंपन्या इस्रायली विद्यापीठांमध्ये होणार्‌या संशोधनात तसेच तेथील स्टार्ट-अप कंपन्यांत गुंतवणूक करू लागल्या आहेत. भारतीय विद्यापीठांना उद्योजकता विकास केंद्र (इन्क्युबेटर्स) तसेच तंत्रज्ञान हस्तांतरण कंपन्या स्थापन करण्यात इस्रायली विद्यापीठं मदत करत आहेत.
भारताच्या ९ राज्यांमध्ये उभी रहात असलेली २६ भारत-इस्रायल कृषी गुणवत्ता केंद्रे हा इस्रायलसाठी जगातला सगळ्यात मोठा विकासात्मक सहकार्य प्रकल्प असून भविष्यात या केंद्रांची संख्या ४० पर्यंत जाणार आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून दरवर्षी हजारो प्रगतीशील शेतकर्‌यांना उत्पादकतेत वाढ, पिकांमधील वैविध्य आणि संसाधनांचा कार्यक्षमतेने वापर या विषयांचे प्रशिक्षण मिळत आहे. भविष्यात या केंद्रांत काढणी पश्‍चात तंत्रज्ञान आणि पुनर्चक्रीकरण केलेल्या पाण्याचा शेतीत अवलंब या क्षेत्रातील इस्रायलने केलेल्या प्रगतीचे धडेदेखील मिळू लागतील.
एप्रिल २०१५ मधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इस्रायलला भेट दिली. त्यानंतर शेती, पाणी, व्यापार, गुंतवणूक, अंतर्गत आणि सायबर सुरक्षा इ. क्षेत्रातील व्यापारी तसेच प्रशासकीय शिष्टमंडळांनी परस्परांना भेटी दिल्या. आज शेतकर्‌यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी एकात्मिक कृषी व ग्रामविकास कार्यक्रम, पाण्याच्या ग्रीडद्वारे मराठवाड्यातील जलसुरक्षा, स्मार्ट आणि अमृत शहरे, दुष्काळ आणि आपत्ती व्यवस्थापन या बाबतीत आपले तंत्रज्ञान आणि अनुभवाची देवाणघेवाण करण्यासाठी इस्रायल उत्सुक आहे. राज्य मराठी विकास संस्था आणि मुंबई विद्यापीठाच्या संयुक्त उपक्रमांतर्गत या वर्षीपासून इस्रायलमधील तेल-अविव विद्यापीठात मराठीचे धडे गिरवले जाऊ लागले आहेत. या वर्षी महाराष्ट्राने गेल्या दोन हजारहून अधिक वर्षांपासून कोकण किनारपट्टीवर राहणार्‌या आणि भारतीय संस्कृतीत बेमालूमपणे मिसळून गेलेल्या ज्यू समुदायाला अल्पसंख्याकांचा दर्जा देऊन त्यांची अनेक दशकांची मागणी मान्य केली आहे.
भारतात झालेल्या आदरातिथ्याने भारावून गेलेल्या रिवलिन यांनी ओआरएफ आणि सीआयआयने आयोजित केलेल्या कार्यक्रमाची सुरुवात, माझ्या भारतातील बंधुंनो आणि भगिनिंनो या वाक्याने करत स्वामी विवेकानंदांचा तसेच दोन्ही संस्कृत्यांमध्ये हजारो वर्षांपासून रूढ असलेल्या विश्‍वबंधुत्त्वाच्या संकल्पनेचा दाखला दिला. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी ज्यूंच्या दुसर्‌या मंदिराच्या विध्वंसानंतर मसादा या डोंगरी किल्ल्‌याचा आश्रय घेतलेल्या यहुदी योद्ध्यांनी पराभूत होऊन शत्रूच्या हाती सापडण्यापेक्षा स्वाभिमानाने सामूहिक आत्मघाताचा निर्णय घेतला होता. या प्रसिद्ध गोष्टीचा दाखला देत रिवलिन यांनी असे सांगितले की, त्या यहुदी वीरांनी स्वातंत्र्य प्रिय असणार्‌या भारतीयांचा आदर्श आपल्यापुढे ठेवला होता. भारत व इस्रायल यांनी यापूर्वीही जग बदलले असून आगामी काळातही जग बदलण्याची ताकद आपल्यात असल्याची त्यांनी ग्वाही दिली.
१९९२ साली भारत-इस्रायल परस्पर व्यापार २० कोटी डॉलर होता. तो आता ५ अब्ज डॉलरच्या घरात गेला आहे. एकेकाळी हिरे आणि मौल्यवान खडे, ठिबक सिंचन आणि संरक्षण क्षेत्रांपुरते मर्यादित असलेले हे संबंध आता सर्वव्यापी झाले आहेत. शिक्षण आणि विद्वत्तेला समाजात मिळणारा मान, उद्योजकता, चाकोरीबाहेरचा विचार करण्याची क्षमता, खोलवर रूजलेली लोकशाही आणि अभिव्यक्ती  स्वातंत्र्यावरील विश्‍वास असे अनेक समान धागे भारत आणि इस्रायलला जोडतात. या जोरावरच २४ वर्षांच्या अल्प कालावधीत भारत इस्रायल संबंधांत एवढी मोठी प्रगती होऊ शकली. गेल्या वर्षभरात प्रथम प्रणव मुखर्जी आणि आता रिवलिन यांच्या भेटींमुळे परस्पर संबंधांना रूपेरी कोंदण घातले गेले आहे. २०१७ साली, भारत-इस्रायल द्विपक्षीय संबंधांचा रौप्य महोत्सव साजरा होत असताना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू भारताचा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलचा दौरा करून या मैत्रीपूर्ण संबंधांना एका नवीन उंचीवर नेऊन ठेवतील, अशी अपेक्षा आहे.(लेखक आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक आहेत.)

शेअर करा

Posted by on Nov 27 2016. Filed under अनय जोगळेकर, आसमंत, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अनय जोगळेकर, आसमंत, स्तंभलेखक (1305 of 1414 articles)


•वेधक : शेफाली वैद्य | दुकानदारालाही विचारलं, की चलनबंदीबद्दल त्याचं मत काय आहे? गल्ल्‌यावर बसलेला माणूस म्हणाला ’निर्णय का तो ...