हज सबसिडी बंद

हज सबसिडी बंद

►मुस्लिमांना प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार देणार ►नकवी यांची घोषणा, नवी…

चकमकीत मला ठार करण्याचा कट : तोगडिया

चकमकीत मला ठार करण्याचा कट : तोगडिया

►लवकरच पुराव्यांसह समोर येणार, अहमदाबाद, १६ जानेवारी – १०…

न्या. लोयांच्या मृत्यूसंबंधी दस्तावेज याचिकाकर्त्याला द्या

न्या. लोयांच्या मृत्यूसंबंधी दस्तावेज याचिकाकर्त्याला द्या

►सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश, नवी दिल्ली, १६ जानेवारी…

क्षेपणास्त्र डागल्याच्या संदेशामुळे गोंधळ

क्षेपणास्त्र डागल्याच्या संदेशामुळे गोंधळ

वॉशिंग्टन, १४ जानेवारी – अमेरिकेच्या हवाईक्षेत्रातील हवाई बेटावर क्षेपणास्त्र…

‘जम्मू-काश्मीरला जाणे टाळा’

‘जम्मू-काश्मीरला जाणे टाळा’

►अमेरिकेची पर्यटकांना सूचना, वॉशिंग्टन, ११ जानेवारी – अमेरिकेने भारतात…

ममतांच्या दौर्‍यातील संपादक ‘चमचे-चोर’?

ममतांच्या दौर्‍यातील संपादक ‘चमचे-चोर’?

लंडन, १० जानेवारी – पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी…

भाजपाची तिरंगा रॅली

भाजपाची तिरंगा रॅली

►संविधान बचाव रॅलीला प्रत्युत्तर ►•रावसाहेब दानवे यांची घोषणा, मुंबई,…

ना. स. फरांदे कालवश

ना. स. फरांदे कालवश

पुणे, १६ जानेवारी – भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि विधान…

बापू बिरू वाटेगावकर यांचे निधन

बापू बिरू वाटेगावकर यांचे निधन

सांगली, १६ जानेवारी – पश्‍चिम महाराष्ट्रात ‘रॉबिनहूड’ प्रमाणे आयुष्य…

श्री सिद्धरामेश्‍वर यात्रा : सामाजिक सप्तरंगांचे एक आकाश

श्री सिद्धरामेश्‍वर यात्रा : सामाजिक सप्तरंगांचे एक आकाश

॥ तरंग : दीपक कलढोणे | ‘हर्र बोला हर्र’…

विवेकानंदांचे परखड हिंदुत्व!

विवेकानंदांचे परखड हिंदुत्व!

॥ विशेष : मुकुल कानिटकर | एकीकडे जग भारताकडे…

संभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा

संभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | हा वारस…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:12
अयनांश:
Home » आसमंत, दीपक कलढोणे, स्तंभलेखक » लाख मोलाचे दोन रुपये…!

लाख मोलाचे दोन रुपये…!

तरंग : दीपक कलढोणे |

auto-rickshaw-free-vector-designअगदी परवा अनुभवायला मिळालेली साधीच गोष्ट. सोलापूर बसस्थानकाकडून पुना नाका ओव्हरब्रीज एवढे अंतर ऑटोरिक्षाने गेलो. वेळ सकाळची. तीस रुपये भाडे ठरले. एका दुकानातून कॅडबरी विकत घेण्यासाठी अवघ्या दहा-वीस फुटावरच रिक्षा थांबवली. दोन-तीन मिनिटात परत येईपर्यंत रिक्षाजवळ एक महिला उभी होती. रिकामी रिक्षा पाहून ती तेथे येऊन थांबली होती. त्या माऊलीलाही पूना नाक्यापर्यंत यायचे होते. शेअर रिक्षा समजून ती तिलाही रिक्षात घेण्याची रिक्षाचालकाला विनंती करीत होती. ताई, ही शेअर रिक्षा नाही. या शब्दात रिक्षाचालकाने तिला नकार दिला. परंतु तिला कामाला जायचे होते. तिने पुन्हा विनंती केली, भाऊ, मला कामाला जायचंय. उशीर झालाय लई. मालकीनबाई रागावत्याल. येऊंदेनं मलाबी गाडीत. मी पैसे देते की तुझे काय असतील ते..!  रिक्षावाल्याने एकदा माझ्याकडे पाहिले. माझ्या चेहर्‍यावर कोणतीही नाराजी नाही, हे त्याने ओळखले आणि तो म्हणाला. बरं ताई, बसा..! त्याची परवानगी मिळताच झपकन् पदर खोचत तिने आपला कृश देह रिक्षाच्या आसनावर टेकविला. तिला थोडेसे अलिकडे जेथे उतरायचे होते, तेथे तिने रिक्षा थांबवायला सांगितली. पटकन् खाली उतरुन हाताच्या मुठीत ठेवलेली एक दहा रुपयाची घामेजलेली ओलसर नोट रिक्षावाल्याच्या पुढे केली. रिक्षावाल्याने तिला सांगितले, पैसे नको ताई..!    साहेबांचे भाडे घेऊन मी निघालो होतो. भाडे ठरलेय आमचे.    तुमचे पैसे नको. तुम्ही कामाला जा. तुम्हाला उशीर झालाय. ती कांहीशी चुरगाळलेली ओलसर दहाची नोट तशीच पुढे करुन ती म्हणाली, भाऊ, तसं नको..! कुठं फेडू बाबा तुझं उपकार. कष्टाचं पुरतबी न्हाय, सरतबी न्हाय. कुनाला तरी मला पैसं द्यायलाच लागलं आसतं की.. घे बाबा. अनमान करु नगं.. या संभाषणामध्ये दोन मिनिटे गेली. रिक्षावाला पैसे घेईना. ती कांही पैसे द्यायचा आग्रह सोडेना..्! शेवटी रिक्षावाला म्हणाला, ताई, तुम्हाला उपकार वाटू नये म्हणून एक-दोन रुपये असले तर द्या.. बास झाले तेवढे. तिने कनवटीचा छोटा बटवा काढला. त्यातून पाच रुपये रिक्षावाल्याच्या हातावर ठेवले. त्याने ते घेतले नाहीत. ताई एक-दोन रुपये द्या म्हनतो ना.. पाच रुपये नको. तुमच्या समाधानासाठी म्हणून तेवढेच एक-दोन रुपये बास..! अत्यंत प्रसन्न मुद्रेनं ती माऊली म्हणाली, बरं बाबा.. ही घे दोन रुपयं.. तुझ्या लेकराबाळास्नी सुख लागुदी बाबा.. त्यानं ते दोन रुपये घेतले. मोठ्या श्रद्धेने आपल्या कपाळाला लावून खिशात ठेवून दिले. रिक्षावाल्याच्या हातावर दोन रुपये ठेवून ती झपझप पावले टाकीत तिच्या वाटेवर निघून गेली.. शहरातल्या कडक डामरी सडकेवरही त्या माऊलीच्या पावलांचे सुंदरसे ठसे उमटताहेत, असा क्षणभर भास झाला.. तिच्या वाटेवर पडणार्‍या अनवाणी पावलांकडे आणि कडक डामरी सडकेवर उमटलेल्या अदृश्य ठशांकडे मी कांही क्षण मनमुग्ध होऊन पहात राहिलो. भरलेल्या डोळ्यांमुळे मला तिची वाट दिसेना.. धूसर धूसर होत गेलेल्या तिच्या कृश आकृतीकडे वळून वळून पहात राहिलो. रिक्षा पुढे धावत राहिली. ती धूसर आकृती नजरेच्या टप्प्याच्या पलीकडे गेली. मी रिक्षावाल्याला विचारले.. तुमच्या ओळखीच्या आहेत का त्या ताई..? तो म्हणाला, नाही..! आम्ही काय? जिथं भाडं लागलं तिथं पळणार. आमच्या धंद्यात एखादं माणूस पुन्हा आमच्याच रिक्षात बसायचं प्रसंग लई कमी.. मी त्याला मुद्दामहून विचारले, ती पेैसे देते म्हटल्यावर तुम्ही तिला परवानगी दिली होती, मग ती दहा रुपये देत असताना तुम्ही दोनच रुपये का घेतले..? तो म्हणाला, साहेब, ती पैसे देते म्हनल्यावर मी तिला परवानगी न्हाई दिली. तुम्हाला आवडनार न्हाई असं वाटलं होतं. पन तुमच्याकडं बघितल्यावर वाटलं की, तुमची काय हरकत नसंल. म्हणून परवानगी दिली. ..आनि आपलं भाडं ठरलंच होतं की..! प्रत्येक ठिकाणी पैसे मिळवायलाच पाहिजित का? मानूसकीबी महत्वाची हाय की.. एवढं बोलेपर्यंत माझं उतरायचं ठिकाण आलेलं होतं. त्याच्या हातावर तीस रुपये ठेवले. वरती एक रुपयाचे नाणे ठेवले. त्याला म्हटले.. त्या दोन रुपयात माझा हा एक रुपया मिसळूदे..! त्याने ते रुपयाचे नाणेही श्रद्धेने कपाळाला लावले आणि हसत हसत खिशात ठेवले.. बरंय साहेब, भेटू योग आला तर पुन्हा.. असं म्हणत त्याने भर्रकन् रिक्षा वळवली आणि सर्व्हिस रोडच्या दिशेने तो निघूनही गेला..
त्या कष्टकरी माऊलीच्या पावलांचे डामरी सडकेवर उठलेले ठसे आणि रिक्षावाल्याचा हा आगळावेगळा ‘सर्व्हिस रोड’ मनात खूप वेळ रेंगाळत राहिला. त्या माऊलीच्या हातातली कष्टाच्या घामाने भिजलेली दहा रुपयाची नोट कांहीशी चुरगाळलेली होती, पण मन मात्र परीटघडीसारखे शुभ्र होते. तिने दिलेले दोन रुपये कपाळाला लावून स्वीकारणार्‍या रिक्षावाल्याच्या कपाळी दिवसभर रिक्षा चालवून असे किती धन मिळत असणार..? परंतु त्या दोन रुपयांचे मूल्य लाख मोलाचे आहे. ही त्याची श्रद्धा मोठी जगावेगळी होती. साध्या माणसांच्या कामात आणि घामात दडलेल्या प्रामाणिकपणा आणि तत्व-सत्वशीलतेच्या विचारांना सूर्यकिरणांची तेजस्वी झळाळी असते. कष्टाच्या घामाचा सुगंध उंची अत्तरालाही दिपवून टाकणारा असतो, याचा एक विलक्षण अनुभव या दोन व्यक्तींनी मला आकस्मिकपणे दिला होता. आपापल्या भाकर-तुकड्यामध्ये फुकटचे मिळालेले विषाप्रमाणे मानणारी माणसेच देश खर्‍या अर्थाने महान बनवित असतात.
रविवारी हा प्रसंग अनुभवला आणि मंगळवारी सायंकाळी सात वाजता पाचशे, हजाराच्या नोटा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ नाव नव्हे तर देशभक्तीचे ते सुंदर गाव आहे, याचे अवघ्या जगाला दर्शन झाले. कष्टकर्‍यांकडे येणारा रोजच्या कमाईचा पैसा सदैव ताजा असतो. तो कधीच शिळा होत नाही,  म्हणूनच असा घामाने भिजलेला पैसा काळा होत नाही. स्वच्छ मनाने कमावलेल्या पैशाला नेहमीच सुवर्णझळाळी असते. काळा पैसा बाहेर येईलही ! पण मनांवर आलेली अप्रामाणिकपणाची काजळी पैशाला काळा रंग बहाल करीत असते. हा काळा रंग आणि काजळी ज्यांच्या मनाला स्पर्शही करु शकत नाही अशा दोन माणसांचे आणि त्यांच्या दोन रुपयांचे दर्शन हे भगवान कृष्णाच्या विश्वदर्शनाइतकेच मौल्यवान वाटले…

शेअर करा

Posted by on Nov 13 2016. Filed under आसमंत, दीपक कलढोणे, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आसमंत, दीपक कलढोणे, स्तंभलेखक (1350 of 1414 articles)


समाजकारण : डॉ. भीमराव गस्ती | ‘वृक्षवल्ली आम्हां सोयरे’ असे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी म्हटले आहे, याचा अर्थ अरण्यात असलेल्या आदिवासींना ...