ads
ads
संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

►सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे स्पष्ट प्रतिपादन, वृत्तसंस्था नवी…

पंतप्रधान मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव

पंतप्रधान मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव

वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ सप्टेंबर – पक्षभेद आणि राजकीय…

फुकटात काहीच मिळत नाही

फुकटात काहीच मिळत नाही

►चीनची मदत घेणार्‍या देशांना लष्करप्रमुखांचा इशारा, वृत्तसंस्था पुणे, १७…

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

वृत्तसंस्था मुंबई, १५ सप्टेंबर – भारत-अफगाणिस्तानने व्यापारासाठी पाकिस्तानची भूमी…

भारताचा सीपीईसीला कडाडून विरोध

भारताचा सीपीईसीला कडाडून विरोध

►चीनसह पाकला खडे बोल!, वृत्तसंस्था जीनिव्हा (स्वित्झर्लंड), १५ सप्टेंबर…

चिनी मालावर जास्तीचा कर लावण्याचे ट्रम्प यांचे निर्देश

चिनी मालावर जास्तीचा कर लावण्याचे ट्रम्प यांचे निर्देश

वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १५ सप्टेंबर – अमेरिका आणि चीन या…

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३ भावंडाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

►मराठवाड्यातील उमरज येथील घटना, प्रतिनिधी कंधार, १७ सप्टेंबर –…

महाराष्ट्रात वेगाने भरणाऱ्या ट्रेन्स

महाराष्ट्रात वेगाने भरणाऱ्या ट्रेन्स

मुंबई, १८ सप्टेंबर – ट्रेनने दररोज २३ दशलक्षांहून अधिक…

विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बीला परवानगी नाही

विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बीला परवानगी नाही

►मुंबई उच्च न्यायालयाची तात्पुरती बंदी, मुंबई, १४ सप्टेंबर –…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:15 | सूर्यास्त: 18:24
अयनांश:
Home » आसमंत, डॉ.सच्चिदानंद शेवडे, पुरवणी, स्तंभलेखक » लोहगोलासम ‘लोकमान्य’ तेज

लोहगोलासम ‘लोकमान्य’ तेज

॥ विशेष : डॉ. सच्चिदानंद शेवडे |

स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या जहाल मतांनी क्रांतियज्ञ चेतवणारं एक प्रखर व्यक्तिमत्त्व म्हणजे लोकमान्य टिळक. या महात्म्याची पुण्यतिथी साजरी करताना केवळ प्रतिमेला हारतुरे घालून उपयोग नाही तर त्यांच्या विचारांचा मागोवा घेणंही गरजेचं आहे. विविध शास्त्रांचे जाणकार, उत्तम गणितज्ञ, बलोपासक, द्रष्टी विचारसरणी, निर्भीडता आदी एक ना अनेक गुणांनी युक्त असणार्‍या या व्यक्तिमत्त्वाचे प्रत्येक पैलू खूप काही शिकवणारे आहेत. १ ऑगस्टला त्यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्यानिमित्त हा विशेष लेख.

Lokmanya Bal Gangadhar Tilak

Lokmanya Bal Gangadhar Tilak

महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे होतात. याच धर्तीवर दरवर्षी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. लोकमान्यांच्या प्रतिमांवर सुवासिक फुलांचे हार चढतात. त्यांच्या जीवनचरित्रातील ठळक घटनांचं अवलोकन केलं जातं. मात्र, त्यांच्या विचारांवर विचार करणारे हाताच्या बोटांवर मोजता येतील इतके तरी असतील का असा प्रश्‍न पडतो. वस्तूत: सद्यस्थितीत साजरीकरणापेक्षा महापुरुषांच्या विचारांवर मंथन होणं आणि त्यातून निघणारं नवनीत ग्रहण करून समाजभानाचे वेगवेगळे कंगोरे जाणून घेण्याची खरी गरज आहे. याच धर्तीवर लोकमान्यांच्या जीवनचरित्रातील दुर्लक्षित पैलूंचा वेध घ्यायला हवा.
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे…
लोकमान्य टिळक हे नाव उच्चारलं की डोळ्यासमोर येतं ते वर उल्लेख केलेलं त्यांचं ओजस्वी विधान. या विधानातून समोर आलेला त्यांचा कणखर आणि निश्‍चयी बाणा हृदयाला भिडतो. पण मुळात हे वाक्य म्हणजे त्यांनी उच्चारलेल्या इंग्रजी वाक्याचा अनुवाद आहे जो अत्यंत चुकीचा आहे. टिळकांचं मूळ इंग्रजी वाक्य ‘स्वराज्य इज माय बर्थ राईट अँड आय शॅल हॅव इट असं आहे.’ जन्मसिद्ध याचा अर्थ जन्माबरोबर आलेला. मग जो हक्क जन्माबरोबर आलेला आहे तो मिळवायचा कशाला? पण हा साधा प्रश्‍नही आपल्याला कधी पडत नाही. कोणीतरी त्याचा सदोष मराठी अनुवाद केला आणि तेच चुकीचं वाक्य एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे पुढे नेलं गेलं. इथे लोकमान्यांना अधिकार नव्हे तर थेट स्वराज्यच मिळवायचं आहे. अधिकार जन्मत:च मिळाला आहे असं ते सांगतात. दुसरी बाब म्हणजे स्वराज्य हा शब्द नपुंसकलिंगी आहे. त्यामुळे योग्य अनुवाद करायचा झाल्यास ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारंच’ असं यायला हवं. इथे ‘तो’ हा शब्द येणारंच नाही. पण आपल्याकडे शब्दांची रचना आणि अर्थाकडे लक्षच दिलं जात नाही. या अनास्थेमुळेच वर्षानुवर्षे हे चुकीचं वाक्य कानी पडत असूनही आपण त्याचा स्वीकार करत राहतोे.
बंगामधील ‘बरदा’
लोकमान्यांपासून स्फुर्ती घेऊन विष्णुपंत बोपर्डीकर या मराठी माणसाने बंगालमध्ये शिवाजी उत्सव सुरू केला. १८९५ पासून बंगालमध्ये शिवाजी उत्सव सुरू झाला. खुद्द कोलकात्यामध्ये अनुशिलन समितीची केंद्रीय शाखा उघडल्यानंतर १९०२ मध्ये हा उत्सव सुरू झाला. त्या क्रांतिकारी संघटनेच्या सर्व केंद्रांमधून शिवाजी उत्सव सुरू झाला. लोकमान्यांच्या आग्रहामुळे रविंद्रनाथ टागोरांनी बंगाली भाषेमध्ये शिवाजी महाराजांवर १४४ ओळींची कविता लिहिली. ही कविता पुढे अनेक ठिकाणी म्हटली जाऊ लागली. फाळणीच्या वेळी लोकमान्यांच्या चतु:सूत्रीचा वापर केला तो बंगाल प्रांताने. त्यातील संपूर्ण स्वराज्य हे चौथं सूत्र वगळलं तर स्वभाषेत शिक्षण, स्वदेशीचा स्वीकार आणि विलायती मालावर बहिष्कार ही तीनही सूत्रं बंगालने स्वीकारली होती. बंगाल प्रांतामध्ये लोकमान्यांची एवढी लोकप्रियता होती की तिथे त्यांना ‘बरदा’ म्हणजे मोठा भाऊ आणि अरविंद घोष यांना ‘छोटदा’ म्हणजे धाकटा भाऊ म्हणून ओळखलं जात असे.
१९०६ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी महाविद्यालयीन दशेत असताना विलायती मालाची होळी केली. विदेशी कपड्यांची पहिली होळी पुण्याला पेटली, विजयादशमीचा तो दिवस! त्या दिवशी भाषण करण्यास लोकमान्य स्वत: हजर होते. होळी करण्यापूर्वी लोकमान्यांनी जमलेल्या युवकांना सूचना दिल्या होत्या, ‘ही होळी होळीसारखी हवी, शेकोटीसारखी नको. चार काटक्या जमा करून एखाद्या कोपर्‍यात केली जाते ती शेकोटी… होळीचा अर्थ भव्य आहे.’ त्यांच्या या आज्ञेचा मान राखत सावरकरादी स्वयंसेवकांनी गाडाभर विलायती कपडे जमवले आणि होळी पेटवली. गंमत म्हणजे ही होळी पुण्यात झाली असली तरी तिचा प्रकाश पडला बंगाल प्रांतात आणि धग जाणवली ब्रिटनमध्ये… याच कारण म्हणजे होळीच्या रुपाने बंगाली लोकांना एक नवीन शस्त्र मिळालं. म्हणूनच पुण्यातील होळीच्या दुसर्‍या दिवसापासून बंगालमधील रस्तोरस्ती विलायती कपड्यांच्या होळ्या होऊ लागल्या आणि ब्रिटनमधील मँचेस्टरमधून येणार्‍या मालाची आयात ठप्प झाली. इंग्रजांसाठी ही धग खूप मोठी होती. याप्रसंगी सावरकरांचं एक वाक्य स्मरत. ते म्हणाले होते, आम्ही सशस्त्र क्रांतीची मूठ असलो तर त्यांचं पातं म्हणजे लोकमान्य होते. लोकमान्यांच्या प्रेरणेमुळेच बंगालमध्ये क्रांतिकारकांच्या अनेक समित्या स्थापन झाल्या. यावरूनच लोकमान्य बंगालमध्ये किती दूरवर पोहोचले होते हे ज्ञात होतं.
स्वकीय राज्यस्थापनेचं स्वप्न
लोकमान्यांनी स्वकीय राज्यस्थापनेचा विचार केला होता जो खूप थोड्या लोकांना माहीत आहे. त्यांचं द्रष्टेपण या विचारांमधून प्रकट होतं. त्यावेळी गोवाप्रांत पोर्तुगिजांच्या ताब्यात होता. त्यांच्याकडून तो काढून घेऊन तिथे आपलं राज्य स्थापन करण्याचा टिळकांचा विचार होता. त्यांनी तसा प्रयत्नही करून पाहिला. सगळी पूर्वतयारी झाली होती. ही बंगालमधील क्रांतिकारकांबरोबर ठरवलेली योजना होती. गोव्यामधला व्हाईसरॉय भ्रष्ट होता. त्याला भरपूर लाच देऊन आपल्या बाजूने फितुर करून घ्यायचं, मग क्रांतिकारकांच्या सेनेने गोव्यावर अचानक हल्ला केल्यासारखं दाखवायचं, लुटुपूटुची लढाई करायची, व्हाईसरॉयला पकडून आत टाकायचं, संपूर्ण गोवा ताब्यात घ्यायचा आणि काही काळानंतर व्हाईसरॉयची सुटका करायची असा सगळा बेत होता. गोव्याचा प्रमुख कोणाला करायचं इथपर्यंत सगळं ठरलेलं होतं. हा बेत पूर्णत्वास नेण्यासाठी टिळकांनी फ्रेंच आणि जर्मन वकिलातींशीही संपर्क साधला होता. पण त्यांच्याकडून नकार मिळाला. नंतर रशियाकडून मदत मागण्यात आली. रशियन आरमाराची मदत मिळाली असती तर टिळकांचा गोवा काबीज करण्याचा बेत कदाचित सफल झाला असता. पण जपानकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे आणि संपूर्ण आरमाराचं नुकसान झाल्यामुळे ही मदत मिळू शकली नाही आणि छोट्या का होईना स्वराज्यनिर्मितीचा टिळकांचा संकल्प अर्धवट राहिला.
उत्तम गणितज्ज्ञ
टिळकांची गणितातील गती विलक्षण होती. एकदा रँगलर परांजपे यांनी त्यांच्या मुलाला खूप अवघड गणित घातलं आणि घरून सोडवून आणण्यास सांगितलं. टिळकांनी हे गणित पाहिलं आणि त्याला थेट उत्तरच लिहून दिलं. तो म्हणाला, दादा… याला पायर्‍या तर हव्या ना! म्हणून मग त्यांनी पाच पायर्‍यांमध्ये तेे सोडवून दाखवलं. दुसर्‍या दिवशी रँगलर परांजपे यांनी गणिताचं उत्तर विचारलं तेव्हा बरीचशी मुलं निमुट राहिली. यावर ते किंचितसे हसले आणि २५ पायर्‍यांमध्ये गणित फळ्यावर सोडवून दाखवलं. त्यावर टिळकांचे चिरंजीव उठले आणि हे गणित पाच पायर्‍यात सोडवता येतं असं सांगितलं. गणित सोडवलेली ती वहीदेखील दाखवली. त्यावर दृष्टिक्षेप टाकून गुरुजींनी वही मिटली आणि म्हणाले, घरी जाऊन दादांना नमस्कार सांग!
विविध शास्त्रांचे अभ्यासक
टिळकांचा व्यासंग अफाट होता. वेगवेगळ्या शास्त्रांचं ज्ञान अफाट होतं. राजकारणात पडलो नसतो तर कीर्तनकार झालो असतो, असं त्यांनी एकदा म्हटलं होतं. कारण कीर्तनकार हा लोकशिक्षक असतो. तो रंजनातून समाजप्रबोधन करत असतो. एकदा पांगारकर आणि टिळकांचं व्याख्यान होतं. विषय होता भक्तीयोग. ल. रा. पांगारकर हे खूप मोठं नाव. त्यांनी अनेक संतांची चरित्र लिहिली. अनेक संतांच्या कवनांचा, अभंगांचा अर्थ विषद करणारं त्यांचं लिखाण प्रसिद्ध होतं. ते ‘मुमुक्षु’ नावाचं एक नियतकालीत चालवायचे. एवढा अधिकार असणार्‍या पांगारकरांचं ‘भक्तीयोग’ या विषयावरील व्याख्यान ऐकण्यास रसिक जमले होते. नेमकं त्यांचं व्याख्यान आधी झालं आणि नंतर टिळक उभे राहिले.
या क्षेत्रातील मान्यवर बोलल्यानंतर टिळक काय बोलणार, याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता होती. पण टिळक बोलायला उभे राहिले आणि पांगारकरांच्या बोलण्यात राहून गेलेल्या मुद्यांचा नेमकेपणाने परामर्श घेतला. त्यांचं हे विवेचन इतकं उत्तम होतं की खुद्द पांगारकरांनी त्यांना नमस्कार घातला. कार्यक्रम संपला. टिळक बाहेर आले आणि आपले जोडे गायब झाल्याचं त्यांना समजलं. त्यांना अनवाणी घरी परतायला लागलं. त्यानंतर तीन दिवसांनी त्यांच्या घरी एक पत्र आणि नव्याकोर्‍या जोड्यांचं एक पार्सल आलं. त्या पत्रात लिहिलं होतं, ‘आपले जोडे मी नेले असून ते पूजेत ठेवले आहेत. तुम्हाला अनवाणी जावं लागलं याबद्दल क्षमा मागत आहे आणि नवीन जोडे पाठवत आहे. कृपया स्वीकार करावा.’ लोकमान्यांची लोकप्रियता अशी अफाट होती.

Posted by : | on : Aug 5 2018
Filed under : आसमंत, डॉ.सच्चिदानंद शेवडे, पुरवणी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, डॉ.सच्चिदानंद शेवडे, पुरवणी, स्तंभलेखक (120 of 1368 articles)

Rahul Gandhi 6
॥ कटाक्ष : गजानन निमदेव | [caption id="attachment_56640" align="alignleft" width="300"] Rahul Gandhi 6[/caption] चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देशम पक्षाने लोकसभेत ...

×