ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, भाऊ तोरसेकर, स्तंभलेखक » ‘वाघ’मारे होण्याची गरज नाही

‘वाघ’मारे होण्याची गरज नाही

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर |

पाच वर्षापुर्वी एक जाहिरात काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आलेली होती. लोकशाही व विवेकवादाचा तितका अपमान या देशात कोणी केलेला नव्हता. सोनियांची भक्ती इतक्या टोकाला गेलेली होती की, ‘द हिंदू’ नावाच्या दैनिकात पहिल्या पानावर पुर्ण जाहिरात देऊन सोनियाजींच्या चरणी आपल्या निष्ठा, श्रद्धा वाहिल्याचे त्यात म्हटलेले होते. त्या जाहिरातीचा अर्थ काय होता? तेव्हा कितीशा चर्चा झाल्या होत्या आणि त्याच दरम्यान केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी सोनियांना देशाची माताही जाहीर करून टाकले होते. अशा अवतारी सोनियांची महत्ता संपुष्टात आल्याने असे माध्यमवीर विचलीत झाले आहेत काय?

Sonia Ad In Thehindu

Sonia Ad In Thehindu

पाच वर्षापुर्वीची गोष्ट आहे. तेव्हा सुप्रिम कोर्टाने एक निकाल दिला होता आणि त्यात फौजदारी गुन्ह्यात दोन वर्षापेक्षा अधिक शिक्षा झालेल्या कुणालाही अपील केलेले असले, तरी निवडून आलेल्या पदावर रहाता येणार नाही, असा निर्वाळा दिलेला होता. त्यामुळे युपीएचे घटक असलेल्या लालूप्रसाद यादव यांच्यासह काँग्रेसचे राज्यसभा सदस्य रशीद मसूद यांचे सदस्यत्व धोक्यात आलेले होते. सभापतींना त्यांची खासदारकी रद्द करावी लागणार होती. तर तो निकालच रद्दबातल करण्यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एक अध्यादेश मंत्रिमंडळात संमत करून राष्ट्रपतींकडे पाठवला होता. त्यावरून मोठे वादळ उठलेले होते. मग काँग्रेस पक्षाला त्याची सारवासारव करावी लागत होती. त्यासाठीच काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अजय माकन यांनी दिल्ली प्रेस क्लबमध्ये एक पत्रकार परिषद घेतलेली होती. त्यात काँग्रेसची भूमिका ते अतिशय स्पष्ट शब्दात मांडून तो अध्यादेश किती महान आहे त्याचे विवरण देत होते. जमलेले पत्रकार त्यांच्यावर प्रश्‍नांचा भडीमार करीत होते आणि माकन मोठ्या धैर्याने त्यांना तोंड देत होते. अशावेळी अकस्मात त्या पत्रकार परिषदेला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी येत असल्याची खबर लागली आणि माकन यांनी प्रश्‍नोत्तरे थांबवली. राहुलजींचे स्वागत करण्याचे पत्रकारांना आवाहन केले. मग राहुल तिथे अवतीर्ण झाले आणि क्षणार्धात अवघा विषय बदलून गेला होता. प्रवक्ते माकन ज्या अध्यादेशाचे गुणगान करीत होते, तो तद्दन मुर्खपणा असल्याचे सांगायची वेळ त्यांच्यावरच अवघ्या २० मिनीटात आलेली होती. कारण राहुलजी आले आणि त्यांनी तो अध्यादेश फाडून कचर्‍याच्या टोपलीत फेकून देण्याइतका मुर्खपणा असल्याची ग्वाही देऊन टाकली होती. सहाजिकच २० मिनीटापुर्वीचा घटनात्मक निर्णय नंतर भयंकर मुर्खपणा असल्याचे खुलासे माकन यांना द्यावे लागत होते.
एकूण देशातील विविध पक्ष प्रवक्त्यांची ही अशी अलिकडे वाहिन्यांच्या जमान्यात तारांबळ उडत असते. त्यातून कोणी सुटलेला नाही. पण प्रवक्त्यावर इतके हास्यास्पद होण्याची वेळ क्वचितच अन्य कुणावर आलेली असेल. म्हणून असेल आता पाच वर्षे हा तद्दन मुर्खपणा अशक्य झाल्याने माकन यांनी पक्षाच्या सर्व जबाबदार्‍यातून मुक्ती घेतली आहे. ते अंतर्धान पावलेले आहेत. वाहिन्यांवरील वा माध्यमातील अशा विषयांच्या चर्चाही हास्यास्पद होऊन गेलेल्या आहेत. काँग्रेससारखा शतायुषी पक्ष वा भाजपासारखा सत्ताधारी पक्ष, यांच्या कुठल्या महत्वाच्या प्रवक्त्याने धोरणात्मक विधान केले तर समजू शकते. पण त्यांच्या प्रत्येक विधानाचा कीस पाडत बसण्यात कुठली बातमी असते, याचाही हल्ली विचार होत नाही. कोणी काही बरळले तरी त्यावरून तावातावाने चर्चा रंगवल्या जात असतात. अलिकडेच भाजपाचे महाराष्ट्रातील प्रवक्ते अवधूत वाघ यांच्या अशाच एका विधानावरून कल्लोळ माजवला गेला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विष्णूचा अकरावा अवतार म्हटल्याने चर्चा झाल्या, टीकाही झाली. पण असली चर्चा लोकहितास्तव कितीशी उपयुक्त आहे, याचा साधा विचार कुठल्या संपादकाला पत्रकाराला करावा असे वाटले नाही, याचे खरे नवल वाटते. वाघ भाजपाचे प्रवक्ते आहेत, आपल्या नेत्यविषयी भाबडे भक्त आहेत. तर त्यांना तसे वाटणारच. शिवाय ते पक्ष व नेत्याच्या कौतुकाचे बोलणार आणि त्यात थोडीफार तरी अतिशयोक्ती असणार ना? हे ज्यांना समजत नाही, त्यांनी आपला पत्रकार विश्‍लेषक म्हणून अवतार कशासाठी आहे, त्याचाही थोडा फेरविचार करणे शहाणपण ठरेल. कारण अवधूत वाघ किंवा तत्सम कोणाही मोदी चहात्याला अशाच टीकाकारांनी भक्त अशी उपाधी दिलेली आहे. मग ज्याचे भक्त म्हणून हे लोक गणले जातात, त्याला अवतार कोणी बनवले आहे? अशा टीकाकारांनीच मोदींना अवतार केलेले नाही काय?
मोदी यांना वाघ किंवा तत्सम कोणी अवतार आज म्हटले आहे. पण त्याच नेत्याच्या चहात्यांना भक्त अशी उपाधी देणार्‍यांनीच नकळत मोदींना अवतार घोषित केलेले आहे ना? कारण अवतार घेणार्‍या विभूतीचे भक्त असतात. यापुर्वीही इंदिराजी, नेहरू वा वाजपेयी, महात्मा गांधी असे एकाहून एक लोकप्रिय नेते होऊन गेले आहेत. त्यांच्या पाठीराख्यांना निष्ठावंत वा चहाते मानले गेले, भक्त अशी त्यांची संभावना कोणी केलेली नव्हती. मग तशी संभावना करणार्‍यांनीच मोदींना देवपण बहाल केलेले असेल, तर त्याला होकार भरण्यात अवधूत वाघ यांचे काय चुकले? म्हणजे मुळातच ज्यांनी मोदींना अवतार पुरूष बनवले, तेच आता अवधूतला जाब विचारत आहेत. मोदींना अवतार संबोधणारा तू कोण? मग सवाल असा येतो, की कोणालाही अवतार घोषित करण्याचा अधिकार या शहाण्यांना दिला कोणी? माध्यमात बसलेले शहाणे धर्माचार्य कधीपासून झाले? मदर तेरेसा किंवा अन्य कोणाला संत ठरवण्याचे अधिकार पोप व त्यांच्या व्हॅटीकन सत्तेला आहेत, तसा कुठला घटनात्मक अधिकार माध्यमातल्या शहाण्यांना राज्यघटनेने दिलेला आहे काय? नसेल तर त्यांनी मुळात मोदींच्या चहात्यांना भक्त कशाला घोषित करून टाकले? आणि तसे केलेले असेल तर मोदींना अवतारही त्यांनीच जाहीर केलेले आहे. त्याचे खापर अवधूत वाघच्या माथी कशाला? त्यांनी फक्त त्यांच्यावर होणार्‍या मोदीभक्त शब्दाचा खुलासा मोजक्या शब्दात करून टाकलेला आहे. त्यांनी मोदींना अवतार संबोधण्यासाठी माफी मागण्यापेक्षा, मोदी चहात्यांना भक्त संबोधणार्‍यांनी आधी माफी मागायची गरज नाही काय? यातले काही होणार नाही. कारण सगळाच कांगावा असतो. शिवाय जे असे कोणी पुरोगामी वा विवेकवादी आहेत, त्यांना असल्या अंधश्रद्धेची फिकीर कशाला? त्यांच्यासाठी कोणी अवतार ही विभूती कधीपासून झाली? यातून असल्या भोंगळ विवेकवादाचेही पितळ उघडे पडून गेले आहे.
पाच वर्षापुर्वी अशीच एक जाहिरात काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आलेली होती. लोकशाही व विवेकवादाचा तितका अपमान या देशात कोणी केलेला नव्हता. सोनियांची भक्ती इतक्या टोकाला गेलेली होती की, ‘द हिंदू’ नावाच्या दैनिकात पहिल्या पानावर पुर्ण जाहिरात देऊन सोनियाजींच्या चरणी आपल्या निष्ठा श्रद्धा वाहिल्याचे त्यात म्हटलेले होते. ती जाहिरात छापायची हिंदू सारख्या ख्यातनाम वर्तमानपत्राला शरम वाटली नव्हती. त्या जाहिरातीचा अर्थ काय होता? तेव्हा कितीशा चर्चा झाल्या होत्या आणि त्याच दरम्यान केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी सोनियांना देशाची माताही जाहीर करून टाकले होते. अशा अवतारी सोनियांची महत्ता संपुष्टात आल्याने असे माध्यमवीर विचलीत झाले आहेत काय? कारण त्यांच्या तुलनेत अवधूत वाघ यांनी व्यक्तीगत पातळीवर आपली मोदीभक्ती व्यक्त केलेली आहे. पक्षातर्फे त्यांनी कुठे जाहिरात दिलेली नाही, की मोदींच्या पायाशी आपल्या निष्ठा वाहून टाकत असल्याचा डंका पिटलेला नाही. त्याच्याही पलिकडे जाऊन अजय माकनप्रमाणे आपलेच शब्द गिळण्याची नामुष्की त्यांच्यावर आलेली नाही. कोणी सचिन तेंडूलकरला देव मानतो तर कोणी अमिताभ बच्चनची भक्ती करतो. ते त्यांना घटनेने व कायद्याने बहाल केलेले स्वातंत्र्य आहे. त्यात बाधा आणण्याचा अधिकार माध्यमांना कोणी दिला आहे? मानला तर देव, अशी उक्ती आहे आणि जग तसेच चालत आलेले आहे. अवधूत वाघना मोदी हा अकरावा अवतार वाटला असेल, तर तो त्यांचा प्रश्‍न आहे. त्यांनी वाहिन्या वा अन्य कोणावर ते मान्य करण्याची सक्ती केलेली नाही. म्हणूनच असल्या विषयावर बाष्कळ बकवास करण्यापेक्षा आपल्या रोज चुकणार्‍या बातम्या किंवा अर्थाचा अनर्थ करणारी भाषा सुधारण्यासाठी अशा उचापतखोरांनी वेळ कारणी लावला, तर त्यांच्यासह पत्रकारितेचेही कोटकल्याण होईल. वाघाला वाघ राहू द्यावे आणि ‘वाघ’मारे व्हायच्या फंदात पडण्याची गरज नाही.

Posted by : | on : 28 Oct 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, भाऊ तोरसेकर, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, भाऊ तोरसेकर, स्तंभलेखक (369 of 1288 articles)

Jammukashmir
सारांश : ल.त्र्यं. जोशी | या पार्श्‍वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी पार पडणे अतिेशय महत्वाचे ठरते. आज मोदींनी काश्मीर समस्या ...

×