ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:

वाजपेयी आणि मोदी

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी |

Atalji Modiji

Atalji Modiji

दोन व्यक्तींची तुलना होऊ शकत नाही आणि कुणी तसे करण्याचा प्रयत्न केला तर ते चुकीचेच नव्हे तर हास्पास्पदही ठरते असे माझे ठाम मत आहे व त्याची ठोस कारणेही आहेत. पण आपल्या देशातील राजकीय नेते आणि राजकीय झापडा बांधलेले विचारवंत त्यांच्या सोयीनुसार दोन व्यक्तींची तुलना करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. नव्हे ती त्यांची गरजच असते. त्यामुळेच अटलजींच्या निधनानंतर उमटलेल्या अनेक प्रतिक्रियांमध्ये अप्रत्यक्ष पण सूचकपणे अटलजी आणि मोदी यांची तुलना करण्याचा प्रयत्न दिसून येतो. खरे तर या सगळ्या प्रतिक्रिया ‘अटलजींना नाकारता येत नाही व मोदींना स्वीकारता येत नाही’ या मजबुरीतून प्रकट झाल्या आहेत. आपण लोकशाही स्वीकारल्यामुळे येथे मतभिन्नता गृहितच धरावी लागेल आणि त्यामुळे अशा प्रतिक्रिया त्याज्यही मानता येणार नाहीत. पण प्रश्‍न एवढाच आहे की, एखाद्या व्यक्तीच्या व त्यातही अटलजींसारख्या नेत्याच्या मृत्युच्या वेळी त्या तशा पध्दतीने प्रकट व्हाव्यात काय? कारण अशा वेळी निर्मळ शोकसंवेदना प्रकट करणे हा एक अपरिहार्य असा उपचार असतो. जेव्हा तुम्ही तो उपचार पार पाडता तेव्हा त्याचा अर्थ मुळीही असा नसतो की, त्या महाभागाची विचारसरणी तुम्ही जशीच्या तशी स्वीकारली आहे. मतभिन्नता कायम ठेवूनच असे उपचार पार पाडायचे असतात. सभ्य समाजाची तशीच अपेक्षा असते. राजकीय आणि वैचारिक मतभिन्नता, व्यक्तिद्वेष तर आपण एरवी प्रकट करीत असतोच. पण ‘मरणान्तानि वैराणी’ असे ज्या संस्कृतीत सांगितले जाते व जी प्रथा सर्वमान्यही झाली आहे त्या परंपरेत हे घडावे काय हा प्रश्‍न आहे. ममता बॅनर्जीपासून तर सोनिया गांधींपर्यंत आणि कुत्सित गरळकुबेरापर्यंत आणि गुलाम नबी आझादांपासून तर राजीव गांधी सदभावना पुरस्कारप्रदान कार्यक्रमातील गोपाल गांधी यांच्या भाषणापर्यंत मोदीद्वेषाचेच प्रतिबिंब उमटत होते.
अर्थात या विकृतीचा जन्म अटलजींच्या निधनानंतरच झाला असे मानण्याचे कारण नाही. एके काळी अटलजींनाही त्या प्रकाराचे शिकार व्हावे लागलेच होते. आता त्यांची जागा मोदींना देण्यात आली एवढाच काय तो फरक. त्याचे मूळ २००२ मधील गोध्रा हत्याकांडानंतर गुजरातमध्ये पसरलेल्या दंगलींच्या काळापर्यंत मागे जाते. इतके की, त्या दंगलींना दंगली मानायलाही ही विकृत मंडळी तयार नाहीत. खरे तर त्या हिंसाचाराला गोध्राहत्याकांडाची पार्श्‍वभूमी होती. त्यामुळे तो हिंसाचार समर्थनीय ठरत नाही हे खरेच. मात्र त्या दोन्ही घटनांची रीतसर चौकशी झाली, न्यायालयात खटले चालले, आरोपींना शिक्षाही झाल्या तरीही ‘मुस्लिमांचे हत्याकांड’ हाच शब्द त्यासाठी वापरला जातो. मात्र त्याच वेळी इंदिराजींच्या हत्येनंतर खरोखरच झालेले शिखांचे हत्याकांड मात्र सोयीस्करपणे विसरले जाते. एवढेच नाही तर ‘एखादा महावृक्ष कोसळला तर काही विध्वंस अपरिहार्यच असतो’ असे म्हणून त्याचे समर्थन करण्याचाही प्रयत्न होतो. मोदींच्या बाबतीत तर या मंडळींकडून सातत्याने भ्रम पसरविण्याचाच प्रयत्न केला जातो. अटलजी मोदींना चाहत नव्हते, त्यांना त्यांचे राजकारण फारसे आवडत नव्हते हे जनमानसावर बिंबविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. खरे तर अटलजींच्या पाठिंब्याशिवाय मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झालेच नसते आणि त्या पदावर टिकलेही नसते. अटलजींच्या काळातच मोदी भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री झाले. त्यांचे ‘गोविंदाचार्य’ झाले नाहीत. पण या वस्तुस्थितीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते व एकच भासमान पुरावा तेवढा तोंडावर फेकला जातो. कारण त्या दंगलीच्या वेळी पंतप्रधान असलेल्या अटलजींनी गुजरातला भेट दिली होती. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेचा समारोप करतांना ‘राजधर्म का पालन होना चाहिये’ असे उद्गार त्यांनी काढले. त्या एकाच वाक्यावरुन या मंडळींनी अटलजी आणि मोदींमधील काल्पनिक द्वैत उभे केले. आताही त्याचीच पुनरावृत्ती केली जात आहे. कारण एकच. अटलजींना नाकारता येत नाही आणि मोदींना स्वीकारता येत नाही ही मजबुरी. अटलजींच्या निधनाने निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या वातावरणापासून मोदींना कसे वंचित ठेवता येईल किंबहुना त्यांचे उलटे चित्र कसे रेखाटता येईल यासाठीच सारा खटाटोप. त्या नादात याच मंडळींनी अटलजी हयात असतांना त्यांचा केलेला उपहास मात्र सोयीस्करपणे नजरेआड केला जातो. या मंडळीपेक्षा निधनानंतरही अटलजींचे गुणगान करायला नकार देणारे मार्क्सवादी अधिक प्रामाणिक वाटतात. या संदर्भात मार्क्सवाद्यांचे सहप्रवासी असलेले एक अभ्यासक राहुल वैद्य यांचा या मंडळींच्या दांभिकपणावर कोरडे ओढणारा लेख उल्लेखनीय ठरतो. त्यांनी तर स्पष्टपणे नमूद केले आहे की, ‘वाजपेयींनी सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध ठेवले वगैरे तर्क देऊन एकंदर संघपरिवाराचा एकाधिकारशाही, दंडेलशाही हिंदुत्व विचार व वाजपेयी यांमध्ये रेघ ओढण्याचा प्रयत्न काही उदारमतवादी व काही डावे करतांना दिसतात’. खरे तर अटलजींनी त्या दौर्‍याच्या समारोपप्रसंगी त्यापेक्षा वेगळे काय म्हणायला हवे होते? तसे म्हणणे स्वाभाविकच होते. फक्त अटलजी कविमनाचे असल्याने त्यांनी थोड्या काव्यमय भाषेत गुजरात सरकारला सल्ला दिला. दुसरे एखादे गद्य पंतप्रधान असते तर त्यांनी ‘कायदा आणि सुव्यवस्था कायम राहिली पाहिजे’ असा अभिप्राय व्यक्त केला असता व विषय संपविला असता. पण माध्यमांनी ‘राजधर्म का पालन’चे शुक्लकाष्ठ मोदींच्या मागे एवढे लावून ठेवले की, आताही त्याचा पुनरुच्चार झाला तर ते आश्‍चर्य ठरणार नाही. खरे तर अटलजींच्या त्या वाक्यानंतर बाजूलाच उभे असलेले गुजरातचे त्यावेळचे मुख्यमंत्री मोदी यांनी तात्काळ ‘वोही तो कर रहे है साहाब’ असे उदगार काढले होते. पण त्याकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात येते.
त्यावेळेपासून डाव्यांचा आणि काँग्रेसचाही मोदीतिरस्काराचा निर्धार अद्यापही कमी झालेला नाही. उलट मोदी पंतप्रधान झाल्यानंतर तो अधिक वाढला. त्या तिरस्कारातूनच मोदींना गुजरात निवडणुकीच्या वेळी एकदा ‘मौत का सौदागर’ ठरविण्यात आले आणि एकदा त्यांना ‘नीच जातीका’ ठरविण्यात आले. त्या निवडणुकीच्या वेळी अडचणीचे ठरणार असल्यामुळे मोदींना ‘नीच’ ठरविणार्‍या त्या मणिशंकर अय्यर यांना तात्काळ निलंबित करण्यात आले पण आता ते बहुधा ताजेतवाने झाल्याने किंवा मोदीनिंदेसाठी त्यांची गरज भासल्याने २०१९साठी त्यांचे निलंबन रद्द करण्यात आले. २०१९च्या पार्श्‍वभूमीवर तर मोदी यांना प्राप्त होणारे जनसमर्थन त्यांच्या डोळ्यात खुपू लागले आहे. मोदींना जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पाहूनही त्यांच्या लोकप्रियतेला ओहोटी तर लागत नाहीच उलट ती वाढत असल्यामुळे तर त्यांची तळ पायाची आग मस्तकात जात आहे. काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी, त्यांचे रणजितसिंग सुरजेवाला आणि अखिलेशप्रतापसिंग यांच्यासारखे प्रवक्ते तशीच ‘द वायर’ सारखी डावी माध्यमे यांच्या वेळोवेळी प्रकट होणार्‍या अभिप्रायांमधून तोच तिरस्कार दिसूनही येतो. अविश्‍वास ठरावाच्या वेळी राहुल गांधींनी भर लोकसभेत मोदींच्या गळ्यात पडण्याचा केलेला प्रयत्न आणि त्यानंतरचा त्यांचा नेत्रविन्यास या संदर्भात बरेच काही सांगून जातो.
मोदींची कार्यशैली कदाचित कुणाला पटत नसेल तर ते समजले जाऊ शकते. पण लोकशाही पध्दतीने मोदींना मिळालेला जनादेश मान्यच करायचा नाही असा निर्धार जर कुणी करणार असेल व त्यांच्या चार वर्षांच्या कारभारानंतरही तोच दुराग्रह कायम ठेवणार असेल तर लोकशाहीचे पुरस्कर्ते कोण आहेत व मारेकरी कोण आहेत हे कळायला क्षणाचाही वेळ लागत नाही. मोदींच्या कारभाराबद्दल कुणाला टीकाच करायची असेल तर त्यालाही कुणाची हरकत असणार नाही. पण त्यासाठी किमान अभ्यास तर करायला हवा. वस्तुस्थिती तर मान्य करायला हवी. पण त्याबाबतीतही बोंबच. एकीकडे विविध क्षेत्रातील मापदंड सखोल अभ्यासाद्वारे निश्‍चित करणार्‍या आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त संस्था जेव्हा मोदींच्या कारभाराची प्रशंसा करण्यासारखे निष्कर्ष काढतात तेव्हा ते अमान्य करायचे, मोदींनी विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांच्यासारख्या पळपुट्या उद्योगपतींच्या मुसक्या बांधण्याची प्रक्रिया युध्दपातळीवरुन सुरु केली असतांना व तिचे अपेक्षित परिणाम दिसू लागत असले तरी त्याकडे डोळेझाक करायची आणि केवळ योगायोगाने असलेल्या नामसाधर्म्याची टिमकी वाजवत राहायची याला तिरस्काराच्या निर्धाराशिवाय कोणता अर्थ आहे? ‘राफेल विमाने खरेदी प्रकरण हे दुसरे बोफोर्स प्रकरण आहे’ असे म्हणतांना आपण आपल्याच पिताश्रींवरील भ्रष्टाचाराच्या आरोपाला दुजोरा देत आहोत याचेही भान राखले जात नसेल तर त्याला कोणत्या दर्जाचे राजकारण म्हणायचे? पण त्याचे काहीही नाही. मोदींबद्दल तिरस्कार निर्माण करायचा एवढे ठरल्यानंतर त्यासाठी अटलजींच्या दुर्दैवी निधनाचा उपयोग होत असेल तर तोही करायचा याला कुणी जर राजकारण म्हणत वा समजत असेल तर त्या शब्दाचा अर्थच बदलण्याची वेळ आली आहे असे मानावे लागेल.
खरे तर मी प्रारंभी नमूद केल्याप्रमाणे दोन व्यक्तींची तुलनाच होऊ शकत नाही. अटलजी आणि मोदीही त्याला अपवाद असू शकत नाही. त्याचे कारण त्यांची योग्यता हे नाही. योग्यता कमीजास्त असू शकते पण त्यांच्या कार्यकाळातील परिस्थितीत प्रचंड अंतर हे असते. अटलजींच्या काळातील परिस्थिती आणि मोदींच्या काळातील परिस्थिती यात फरक नाही असे कुणीही म्हणू शकणार नाही. मुळात कोणतीही परिस्थिती स्थिर नसते. ती कालमानानुसार सतत बदलत असते. त्यामुळे त्यावेळच्या परिस्थितीत अटलजींनी घेतलेला निर्णय वा कारभार जसाच्या तसा मोदी करु शकतील वा घेऊ शकतील असे म्हणण्याला काहीही अर्थ नाही. बरेचदा अटलजी, अडवाणी यांच्या काळाचा संदर्भ देऊन मोदींना दूषण देण्याचा प्रयत्न होतो. पण खरी पोटदुखी वेगळीच आहे. अटलजी अडवाणी भाजपाच्या भाषेत उत्तरे देत असत आता मोदी काँग्रेसच्या भंपक प्रश्‍नांची उत्तरे काँग्रेसला समजेल अशा भाषेत द्यायला लागल्याने खरी अडचण होत आहे. दोघांनी दोन वेगवेगळ्या परिस्थितीत घेतलेले निर्णय सारखेच असले पाहिजेत असा कुणी आग्रह धरणार असेल तर त्याला दुराग्रहच म्हणावे लागेल. मोदींना मिळालेला जनादेश आज ज्या त्वेषाने नाकारला जात आहे त्या त्वेषाने अटलजींना मिळालेला जनादेश नाकारला गेला नाही, ही वस्तुस्थितीही लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे त्या दोघांच्या प्रतिक्रियेत जर फरक दिसत असेल तर तो तरी किमान मान्य करायला हवा ना? पण तेवढेही सौजन्य दाखविले जाणार नसेल आणि मोदींना ‘नीच’, ‘मौतका सौदागर’ किंवा कथित सर्वसमावेशी राजकारणाला सुरुंग लावणारा नेता ठरविले जाणार असेल तर त्या प्रकारापासून आपला बचाव करण्याचा प्रयत्न करण्याचा अधिकार तरी आपण मोदींना देणार आहोत की, नाही?
वास्तविक अटलजींच्या महानिर्वाणानंतर मोदींनी जे धीरोदात्त वर्तन केले त्यातून त्यांची अटलजींविषयीची प्रगाढ आस्थाच प्रकट होते. या काळात प्रत्येक प्रसंगाला ते तेवढ्याच गांभीर्याने सामोरे गेले, जेवढ्या गांभीर्याने आपल्या कुटुंबातील ज्येष्ठाच्या मृत्युप्रसंगी जातो. अन्यथा पंतप्रधानपदाची अपरिहार्य सुरक्षा बाजूला ठेवून पाच किलोमीटर अंतर पायी चालण्याची त्यांना काय गरज होती? पण त्यांच्या त्या स्वाभाविक प्रामाणिक कृतीला जर कुणी कुत्सितपणे ‘प्रायश्‍चित्त’ म्हणत असेल तर त्यांच्यासारखे करंटे तेच एवढे फक्त म्हणता येईल.

Posted by : | on : 26 Aug 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, ल.त्र्यं. जोशी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, ल.त्र्यं. जोशी, स्तंभलेखक (636 of 1372 articles)

Atalbihari7
टेहळणी : डॉ.परीक्षित स. शेवडे | भारतीय राजकारणातील ‘भीष्मपितामह’ म्हणून ज्यांचं वर्णन करता येईल असे ‘अजातशत्रू’ नेते म्हणजे ‘भारतरत्न’ कै. ...

×