ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:

विनोबा.इन

॥ भारत भाग्य विधाता : प्रशांत आर्वे |

विनोबांना समजून घ्यायचे, तर त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यातील एका प्रसंगाला समजून घ्यावे लागेल. वयाच्या अठराव्या वर्षी विनोबा ध्यानधारणा आणि ज्ञानसाधना या दोन्ही उद्देशाने देशाटनासाठी घराबाहेर पडले. फिरत फिरत ते वाराणसी या विद्वानांच्या नगरीत दाखल झाले. तिथे द्वैतवादी आणि अद्वैतवादी यांच्यात सतत वादविवाद व्हायचे. त्या वादविवादात अर्थात अद्वैतवादी जिंकले. ते आनंद साजरा करणार तोच हा अठरा वर्षांचा तरुण उभा राहिला आणि म्हणाला, आपण द्वैताशी वाद घातला याचाच अर्थ आपण द्वैत स्वीकारले आहे. त्यामुळे खरा पराभव तर अद्वैतवाद्यांचा झाला आहे. विनोबांनी हे अद्वैत आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या उराशी कवटाळून ठेवले. द्वैताशी वाद घालणेदेखील त्यांनी नाकारले.

Vinoba

Vinoba

काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे मुख्य कार्यकारी संचालक असलेले विवेक सावंत यांच्याशी एका कार्यक्रमादरम्यान भेट झाली. त्यांच्याशी जुना स्नेह असल्याने वर्षातून एकदातरी ही भेट ठरलेली असते. सावंत सर म्हणजे एन्सायक्लोपीडिया! प्रचंड व्यासंग, दांडगा जनसंपर्क आणि शिक्षणात नवनवे प्रयोग अविरत करत राहणे, हेच त्यांचे आवडते काम. नुकतेच त्यांच्या महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने विनोबा भावे यांचे समग्र साहित्य संगणकाच्या एका क्लिकवर आणले. स्वखर्चाने त्याची एक वेबसाईट तयार केली आणि उपेक्षित राहिलेला हा संत पुन्हा एकदा प्रकट झाला! माझ्या पिढीला विनोबा माहीत असण्याचे कारण नाही. आणि विनोबांच्या नावाभोवती कुठलेही राजकीय वलय नाही. मग विनोबा लक्षात तरी का म्हणून ठेवायचे? कुठेतरी कानावर यायचे, विनोबा म्हणजे तेच ना? ज्यांनी इंदिरा गांधींच्या आणिबाणीला ‘अनुशासन पर्व’ म्हणून मान्यता दिली. झाले. त्या पुण्यात्म्याच्या संपूर्ण कारकीर्दीवर आम्ही बोळा फिरवायला मोकळे. दुर्दैवाने आम्ही आपल्या सामान्य कुवतीच्या बुद्धीने जे मापदंड विनोबांना लावू पाहतो त्यात ते बसणारे नाही. विनोबांना वानरोबा म्हणणार्‍या अत्र्यांनादेखील हा माणूस कळला नाही. मनाच्या ज्या उन्नतावस्थेत वा अद्वैतात विनोबा होते; मनाच्या त्या उंचीवर जाणे ना त्या वेळी लोकांना जमले, ना आज जमणारे आहे. त्यामुळे आपण आपल्या लायकीप्रमाणे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विश्‍लेषण करतो आणि सोडून देतो. विनोबा मात्र या सर्व प्रकरणात अलिप्त राहतात. महाराष्ट्र ज्ञान मंडळाने वरील वेबसाईटचे उद्घाटन, प्रसिद्ध समाजसेवी डॉ. अभय बंग यांच्या हस्ते केले. या प्रसंगी डॉ. बंग यांनी विनोबांच्या संदर्भात मांडलेली भूमिका आणि त्यातून बाहेर आलेली विचारमौक्तिके वर्तमानात अनेकांना मार्गदर्शक ठरणारी आहे. त्यांच्या भाषणातील काही अंश इथे मांडण्याचा प्रयत्न करतोय्. एका अर्थाने विवेक सावंत आणि त्यांच्या ज्ञान मंडळाने या उपेक्षित संताला पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न केलाय्, तो कौतुकास पात्र ठरतो.
विनोबांना समजून घ्यायचे, तर त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यातील एका प्रसंगाला समजून घ्यावे लागेल. वयाच्या अठराव्या वर्षी विनोबा ध्यानधारणा आणि ज्ञानसाधना या दोन्ही उद्देशाने देशाटनासाठी घराबाहेर पडले. फिरत फिरत ते वाराणसी या विद्वानांच्या नगरीत दाखल झाले. तिथे द्वैतवादी आणि अद्वैतवादी यांच्यात सतत वादविवाद व्हायचे. त्या वादविवादात अर्थात अद्वैतवादी जिंकले. ते आनंद साजरा करणार तोच हा अठरा वर्षांचा तरुण उभा राहिला आणि म्हणाला, आपण द्वैताशी वाद घातला याचाच अर्थ आपण द्वैत स्वीकारले आहे. त्यामुळे खरा पराभव तर अद्वैतवाद्यांचा झाला आहे. विनोबांनी हे अद्वैत आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या उराशी कवटाळून ठेवले. द्वैताशी वाद घालणेदेखील त्यांनी नाकारले. ही लक्षणे एखाद्या संताची असू शकतात.
विनोबांच्या चिंतनशीलतेचा पुरावा म्हणजे त्यांनी लिहिलेली पुस्तके. ज्ञानेश्‍वरीच्या प्रत्येक ओळीत जसा शांत आणि अद्भुत रसाचा गोडवा आहे. कुठेच कर्कशता नाही, अगदी तीच आणि तशीच लक्षणे विनोबांच्या समग्र साहित्यात आढळतात. गीताईबद्दल आपण सारे जाणतोच. गीतेवर विनोबांचे चिंतन अखंडपणे चालू होते. ते म्हणत, गीतेविषयी जेव्हा मी लोकांशी बोलत असतो तेव्हा गीतेच्या समुद्रावर तरंगत असतो आणि एकटा असतो त्यावेळेस त्या अमृतसमुद्रात खोल बुडी मारून बसतो. विनोबांची आई व्यंकटेशस्तोत्र आणि अन्य स्तोत्रे म्हणायची, पण मराठीत गीता वाचायची तिचीदेखील इच्छा राहून गेली होती. आईची इच्छा अपूर्ण राहिल्याची जखम त्यांच्या मनात खोलवर रुजली होती. याशिवाय ज्ञानेश्‍वरी हीच गीताईनिर्मितीमागची प्रेरणा होती. गीताईच्या निर्मितीच्या अनेक वर्षे आधी विनोबांचे त्यावर चिंतन चाललेले होते. त्यांचे चिंतन किती प्रगल्भ होते, याचा प्रत्यय त्यांच्याच एका व्याख्यानाच्या वेळी लोकांना आला. विनोबांची ओळख करून देताना निवेदकाने सांगितले की, महात्मा गांधी विनोबांना आध्यात्मिक बाबतीत गुरू मानतात, त्यांच्याशी सल्लामसलत करतात. यावर उत्तर देताना स्थितप्रज्ञ असलेले विनोबा म्हणतात, मी माझी योग्यता जाणून आहे, महात्मा गांधींची सत्संगती मला लाभली नसती, तर गीतेच्या अर्थाची आज जी प्रतीती मी अनुभवून राहिलो आहे ती मला आली नसती. बापूंच्या संगतीत जे मला मिळाले तीच माझी गीता. आधुनिक काळात योगी अरविंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्या तोडीचा आध्यात्मिक पुरुष चक्क १९८२ पर्यंत आमच्यासमवेत होता. मात्र, त्यांच्या उत्तरायुष्यात आम्ही त्यांच्यावर अन्याय केलेला आहे.
गीताईव्यतिरिक्त विनोबांनी ज्ञानोबामाउली, तुका आकाशाएवढा, ईशावास्य वृत्ती, गीताप्रवचने, संतांचा प्रसाद, भारतीय धर्मविचार, ऋग्वेदसार, कुराणसार, ख्रिस्तसार… ही सारी पुस्तके लिहिली. ही पुस्तके म्हणजे तुमच्या-माझ्यासाठी जीवनोपदेश आहे. विनोबांनी निर्माण केलेला अमृतकलश समाजाला चिरकाल प्रेरणा देणारा आहे. गरज आहे त्या अमृतकुंभातील काही थेंब धारण करण्याची. विनोबांचा सत्याग्रह विचार हे पुस्तक एका अर्थाने क्रांतिकारी आहे. १९४० ला महात्मा गांधींनी विनोबांची पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून निवड केली आणि पुढे जाऊन विनोबांनी सत्याग्रह या शब्दाला आक्षेप घेतला. हा गांधीवाद्यांसाठी धक्का होता. हा शब्द बापूंनी दिलेला. पण, विनोबा म्हणत, सत्याग्रह या शब्दात आग्रह आहे. दोन्ही बाजू जर आपापल्या आग्रहावर कायम राहतील तर शेवटी केवळ दुराग्रह शिल्लक राहील. म्हणून ‘सत्याग्रही’ऐवजी ‘सत्यग्राही’ असा शब्दप्रयोग ते करतात. शब्दांच्या अचूक आणि परिणामकारक वापराबद्दल ते सजग होते.
विनोबांच्या निरिच्छ वृत्तीबद्दल एक प्रसंग सांगितला जातो. जमनालाल बजाज यांनी आपल्या मुलांना विनोबांच्या आश्रमात ठेवले. त्यापैकी कमलनयन बजाज यांनी एक दिवस बघितले की; विनोबा, आलेल्या एका पत्राचे चिटोरे करून कचराकुंडीत टाकत आहेत. ते पत्र महात्मा गांधी यांचे होते. गांधींचे पत्र विनोबांनी फाडले. त्यात नक्की काय लिहिलंय, याचा शोध घेण्यासाठी कमलनयन यांनी सारे चिटोरे एका कागदावर चिकटवले आणि ते पत्र वाचले. त्यात लिहिले होते- ‘‘तुमसे बढकर उंची आत्मा मैने आज तक नही देखी.’’ खरंतर एखाद्याने ते पत्र आयुष्यभर मिरवले असते. पण, ते विनोबा होते. विनोबा जगाला कळलेच नाही. कारण त्यांनी स्वतःहून अज्ञातवास स्वीकारला होता. विनोबांचे आणखी एक अप्रतिम पुस्तक म्हणजे मधुकर! पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांनीच सांगून ठेवले आहे; म आणि ध म्हणजे महाराष्ट्र धर्म. महाराष्ट्र धर्मातून निवडलेले लिखाण म्हणजे मधुकर. विनोबांचे हे पुस्तक म्हणजे भाषाशैलीचा उत्कृष्ट नमुना होय. जुन्या पिढीत अभ्यासक्रमाला विनोबांचे विचारसार हमखास असायचेच, पण वर्तमानात साहित्याच्या सर्व प्रवाहांना जागा देण्याच्या भानगडीत जीवनाचे सार मागे पडत गेले.
भूदान यज्ञ आणि विनोबा
देशातील शेतकर्‍यांचा प्रश्‍न आज किती जटिल बनलाय् हे स्पष्ट आहे. त्यात भूमिहीन असेल तर विचारायलाच नको. रशिया, युरोप शेतीच्या वाटपाबाबत यशस्वी झाले असले, तरी त्यांना शेतकर्‍यांचा प्रश्‍न सोडवता आलेला नव्हता. गांधी आता त्यांच्यासोबत नव्हते. तेलंगाना प्रांतात साम्यवादी जमिनीचा प्रश्‍न हिंसक मार्गाने सोडवू पाहात होते. विनोबांनी माणसातल्या चांगुलपणाला साद घालण्याचे ठरविले आणि भूदान यज्ञाची सुरुवात झाली. तो दिवस होता ८ मार्च १९५१. त्यांनी संपूर्ण भारत पायी फिरण्याचे ठरविले. आधी ते गेले तेलंगाना या अस्वस्थ प्रांतात. तिथे त्यांनी तुरुंगातील साम्यवादी नेत्यांशी चर्चा केली. लोकशाहीत शस्त्राच्या मार्गाने जाता येणार नाही, हे आवर्जून सांगितले. आश्‍चर्य म्हणजे ‘ये हृदयीचे ते हृदयी’ या न्यायाने हिंसक आंदोलन करणार्‍या डाव्यांना त्यांनी आपल्या वृत्तीने जिंकले. केरळात नाम्बुद्रीपाद सत्तेवर होते. त्यांच्या सरकारने जाहीर केले- भारतात क्रांती करायची असल्यास विनोबांचा ग्रामदानाचा, हृदयपरिवर्तनाचा मार्गच सर्वोत्कृष्ट आहे. विनोबांच्या भूदान करण्याच्या आवाहनाला सर्वत्र प्रतिसाद मिळू लागला. आश्‍चर्य म्हणजे या जमिनी मंदिराकरिता नव्हे, तर आपल्याच समाजातील वंचित आणि दलित समाजाला दिल्या जात होत्या. या भूदान यज्ञात पहिली शंभर एकर जागेची समिधा टाकणारे होते पोचमपल्ली गावातील जमीनदार रामचंद्र रेड्डी! आता नियतीने या चळवळीची जबाबदारी विनोबांवर टाकली आणि त्यांनी ती ईश्‍वराचा आदेश म्हणून स्वीकारलीदेखील. या प्रवासात त्यांनी चंबळच्या खोर्‍यातील अट्टल डाकूंशीदेखील संवाद साधला. ‘सुमती कुमती सबके उर बसई…’ या ओळीवर त्यांचा प्रगाढ विश्‍वास होता.
भूदान याज्ञाबद्दल बोलताना ते म्हणत, भूदानाच्या यशाने देशाची नैतिक शक्ती, अहिंसक शक्ती वाढेल. भारताने शांतिवादी परराष्ट्र धोरण स्वीकारले, हे भारताच्या परंपरेला साजेसेच आहे. पण, जोवर देशात अहिंसक शक्ती निर्माण होत नाही तोपर्यंत भारताच्या शांतीच्या धोरणात शक्ती येणार नाही. पुढे ते एकतर्फी नि:शस्त्रीकरण करण्याचा सल्ला देतात. याला ते आक्रमणकारी अहिंसा म्हणायचे. आपण अहिंसेचे आक्रमण केले पाहिजे, असा त्यांचा आग्रह. अहिंसेकरिता देशाला तयार कारायचे असेल, तर त्याकरिता उत्तम मार्ग भूदान होय. विनोबा एकवेळ आपल्याला नेभळट वाटू शकतात, आजच्या हिंसक जागात या विचारांनी कसे चालायचे, असा प्रश्‍नदेखील पडू शकतो. मात्र, समोरच्याने आपले डोळे फोडले म्हणून आपण त्याचे डोळे फोडायला गेलो तर हे जग एकदिवस आंधळे होऊन जाईल.
विनोबांच्या उत्तरायुष्यात त्यांना टोकाच्या टीकेला सामोरे जावे लागले. पंतप्रधान इंदिरा गांधी विरुद्ध जयप्रकाश नारायण असा सामना रंगलेला असताना, विनोबा कोणत्या बाजूचे, असा प्रश्‍न सामन्य माणसांनी त्यांना केला. विनोबांच्या ठायी असलेल्या अद्वैताने, हा आपला तो परका, असा भेद कधीच केला नाही. त्यामुळे कुणा एकाची बाजू घेणे त्यांना शक्यच नव्हते. मात्र, जेपींची बाजू उचलून धरली नाही म्हणून आम्ही त्यांच्यावर अत्यंत शेलक्या भाषेत टीका केली. दुसरा आरोप त्यांच्यावर केला जातो, ज्यामुळे महाराष्ट्राचे भावविश्‍व त्यांच्याप्रती कलुषित झाले. विनोबांनी आणिबाणीला ‘अनुशासन पर्व संबोधले, हा तो आरोप. हा आरोप त्यांच्यावर अन्याय करणारा आहे. वसंत साठे विनोबांना भेटायला पवनारला आले आणि त्यांनीच नागपूरला जाऊन विनोबांनी आणिबाणीला अनुशासन पर्व संबोधल्याची खोटी बातमी पेरली. आता याचे सबळ पुरावे उपलब्ध आहेत. गंमत म्हणजे ज्या वेळी वसंत साठे विनोबांना भेटायला आले त्या वेळी विनोबा मौनात होते. आम्ही कुणीच साठेंना प्रश्‍न कसा विचारला नाही, याचेच आश्‍चर्य आहे. मात्र, विनोबांनीदेखील त्यांच्या स्वभावानुसार कधी त्याचे स्पष्टीकरण दिले नाही. हा संतात्मा आमच्यात बराच काळ होता. आजही त्यांच्या साहित्याच्या रूपाने आमच्यात आहे. गरज आहे पुन्हा एकदा हा महात्मा समजून घेण्याची आणि तद्नुसार समाजाक्जिओ दिशा ठरविण्याची. समाजाच्या बुद्धिजीवी घटकाला हे धनुष्य पुन्हा एकदा पेलावे लागेल. माणसे तोडण्याच्या या काळात माणसे जोडण्याचा मंत्र देणारे विनोबा कालातीत ठरतात…•••

Posted by : | on : 11 Nov 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, प्रशांत आर्वे, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, प्रशांत आर्वे, स्तंभलेखक (338 of 1288 articles)

Media
मानसरंग : मयुरेश डंके | पंजाबात घडलेल्या दुर्घटनेशी तसं पहायला गेल्यास प्रत्यक्षपणे महाराष्ट्राच्या मीडीयाचा काय संबंध? दुर्घटनेविषयी सहानुभूती असणं, वाईट ...

×