ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, स्तंभलेखक, हितेश शंकर » विश्‍वबंधुत्व आणि हिंदुत्व

विश्‍वबंधुत्व आणि हिंदुत्व

॥ रोखठोक : हितेश शंकर |

१२५ वर्षांपूर्वी शिकागोत ज्या धोक्यांबाबत स्वामी विवेकानंदांनी सचेत केले होते, तेव्हापासून आजपर्यंत मानवतेवर संपत्ती, वंश आणि अपूर्ण एकांगी विचारांचे अमानुष हल्ले अधिकच वेगाने झाले आहेत. सार्‍या जगाच्या कल्याणासाठी ‘भारताच्या सांस्कृतिक शिकवणी’नुसार जगभरातील लोक आजही चालले नाहीत, तर पुढे जाऊन ‘लिव्ह युनायटेड’ची ही एकदिवसीय चमक अर्थहीन ठरेल. कारण तोपर्यंत मानवता अंधरात बुडून गेली असेल.

Vivekanand Vishwabandhutva

Vivekanand Vishwabandhutva

रुचीनां वैचित्र्यादृजुकुटिलनानापथजुषाम्।
नृणामेको गम्यस्त्वमसि पयसामर्णव इव॥
-‘‘जशा विविध नद्या वेगवेगळ्या ठिकाणाहून उगम पावून समुद्राला मिळतात, त्याचप्रकारे हे प्रभो! वेगवेगळ्या आवडीनुसार विविध वाकड्या-तिकड्या अथवा सरळ मार्गाने जाणारे लोक शेवटी तुझ्यातच येऊन मिळतात.’’
(स्वामी विवेकानंद यांनी विश्‍व धर्म संमेलन १८९३ शिकागो येथे दिलेला शिवमहिम्नस्तोत्रातील श्‍लोकाचा संदर्भ)
स्वामी विवेकानंद यांनी १८९३ साली शिकागो येथे झालेल्या विश्‍व धर्म संमेलनात जे भाषण दिले ते अतिशय गाजले. ‘‘माझ्या अमेरिकावासी बंधूंनो आणि भगिनींनो,’’ या संबोधनाचा जादूसारखा प्रभाव पडला. त्यानंतर झालेला टाळ्यांचा कडकडाट, हिंदू धर्माप्रती सन्मान आणि भारतीय लोकांबाबत विशेष प्रेम, हे जर तुम्हाला आजही या शहरात अनुभवायला मिळाले, तर आश्‍चर्य वाटायला नको.
अशा या ऐतिहासिक उद्बोधनाच्या १२५ वर्षांनंतर त्याच दिवशी ‘वर्ल्ड हिंदू काँग्रेस २०१८’चे आयोजन शिकागोत होणे, लक्षणीय आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली की, सव्वाशे वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंदांनी सांगितलेला भारतीय विचार त्या काळात तर प्रासंगिक होताच; पण आताही तो त्याहूनही अधिक आवश्यक झाला आहे. शिकागोत ७ ते ९ सप्टेंबर दुसरे विश्‍व हिंदू संमेलन आयोजित झाले होते. यात सुमारे ६० देशांमधून २५० वक्ते आणि अडीच हजारांहून अधिक प्रतिनिधींनी भाग घेतला.
स्वामी विवेकानंदांनी शिकागोतून जगाला विश्‍वबंधुत्व आणि बंधुभावाचा संदेश दिला होता. त्यांनी वेदांमधली उदाहरणे देऊन सार्‍या जगाला भारताच्या महान संस्कृतीची ओळख करून दिली होती. जगभरातून आलेल्या लोकांना सनातन धर्म आणि भारतीयता यांची महती सांगितली होती. या संमेलनातूनही असाच काहीसा संदेश देण्यात आला. संमेलनाचे बीजवाक्य होते- ‘सुमंत्रिते, सुविक्रांते।’ म्हणजे, सामूहिकतेने चिंतन करू, वीरतापूर्वक प्राप्त करू. या कार्यक्रमात भारतीय संस्कृतीची उदारता, सहनशीलता तसेच ‘वसुधैव कुटुंबकम्’ची भावना यासारख्या वैशिष्ट्यांना अधोरेखित करण्यात आले.
या संमेलनात धर्म आणि तत्संबंधी विभिन्न पैलूंवरील चर्चेशिवाय आर्थिक, शैक्षणिक, मीडिया, सांघटनिक, राजनीतिक, महिला तसेच युवकांशी संबंधित मुद्यांवरदेखील विविध सत्रांमध्ये सखोल मंथन झाले. संमेलनात वैश्‍विक हिंदू समाजाची मूल्ये, रचनात्मकता आणि उद्यमी भावना यांचे प्रदर्शनही झाले.
१२५ वर्षांपूर्वी पहिल्या धर्मसंसदेत एका युवा हिंदू संन्याशाच्या त्या शब्दांना जतन करण्याचे, तसेच त्यांचा भावार्थ जगासमोर ठेवण्यासाठी शिकागो शहराने चांगला प्रयत्न केला आहे. शिकागो कला संस्था किंवा आर्ट इन्स्टिट्यूट ऑफ शिकागोच्या त्या सभागृहाने आजदेखील त्या प्रेरणादायी भाषणाच्या स्मृती सांभाळून ठेवल्या आहेत.
अमेरिकी प्रांत इलिनोइसच्या गर्व्हनरांनी ११ सप्टेंबर २०१८ ला स्वामी विवेकानंद दिवस म्हणून साजरा करण्याची संमेलनात घोषणा केली.
संमेलनात वक्ता म्हणून सहभागी झाल्यावर मी जेव्हा शिकागो आर्ट इन्स्टिट्यूट येथे पोहोचलो, तर इमारतीच्या पायर्‍यांवर स्वामी विवेकानंदांचे ते पूर्ण भाषण अंकित करून ठेवल्याचे आढळून आले. पायर्‍या चढत चला, भाषण वाचत चला आणि विश्‍वबंधुत्वासाठी सांगितलेल्या भारतीय संस्कृतीचे सूत्र समजून घेत चला.
९/११च्या दहशतवादी हल्ल्याचे स्मरण करीत, अमेरिकेत ११ सप्टेंबरच्या रात्री अनेक इमारतींवर ‘लिव्ह युनायटेड’चा संदेश झळकत होता. (या संदेशात एक यमक लपलेले आहे- दहशतवाद्यांनी ज्या दोन विमानांनी ट्विन टॉवर्सला धडक दिली त्यातील एक ‘अमेरिकन’ व दुसरे ‘युनायटेड’ एअरलाइन्सचे होते).
‘लिव्ह युनायटेड’चा हाच संदेश तर स्वामी विवेकानंदांचा संदेश आहे. तेव्हाच जर हा संदेश पश्‍चिमेच्या भौतिकवादी विचारवंतांनी, मुस्लिम एकता म्हणजे ‘उम्मत’च्या समर्थकांनी, वामपंथी खुनी क्रांतीच्या हाकार्‍यांनी हृदयात धारण केला असता, तर आज जगाचे परिदृश्य वेगळेच असते.
संपत्तीसाठी मानव मानवाचा, एक देश दुसर्‍या देशाचा शत्रू झाला नसता. या संदेशाचे मूल्य समजून घेतले असते, तर वर्गसंघर्षातून निर्माण केलेल्या हुकूमशाहीकडून समाजवादी स्वप्न नष्ट झाले नसते. ९ सप्टेंबर २००१ सारख्या शोकांतिकेला, इसिससारखा रक्तरंजित संतापाला झेलावे लागले नसते.
स्वामी विवेकानंदांनी तेव्हा म्हटले होते- सांप्रदायिकता, कट्टरता आणि याच्या भयानक वंशजांच्या मजहबी अट्टहासाने प्रदीर्घ काळापासून या मनोरम पृथ्वीला जखडून ठेवले आहे. त्यांनी या संपूर्ण जगात हिंसाचाराचे थैमान घातले आहे आणि कितीतरी वेळा ही धरती रक्ताने न्हाऊन निघाली आहे. किती संस्कृती नष्ट झाल्यात, किती देश समाप्त झालेत, याची गणतीच नाही.
१२५ वर्षांपूर्वी शिकागोत ज्या धोक्यांबाबत स्वामी विवेकानंदांनी सचेत केले होते, तेव्हापासून आजपर्यंत मानवतेवर संपत्ती, वंश आणि अपूर्ण एकांगी विचारांचे अमानुष हल्ले अधिकच वेगाने झाले आहेत. सार्‍या जगाच्या कल्याणासाठी ‘भारताच्या सांस्कृतिक शिकवणी’नुसार जगभरातील लोक आजही चालले नाहीत, तर पुढे जाऊन ‘लिव्ह युनायटेड’ची ही एकदिवसीय चमक अर्थहीन ठरेल. कारण तोपर्यंत मानवता अंधरात बुडून गेली असेल.

Posted by : | on : 7 Oct 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, स्तंभलेखक, हितेश शंकर.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, स्तंभलेखक, हितेश शंकर (373 of 1224 articles)


तोरसेकर | चारपाच महिन्यांपूर्वी कर्नाटकातल्या निवडणुका ऐन रंगात आलेल्या होत्या आणि सगळेच प्रमुख पक्ष आवेशात प्रचाराला लागलेले होते. त्यात मग ...

×