भाजपाच्या ‘मिशन २०१९’चा श्रीगणेशा

भाजपाच्या ‘मिशन २०१९’चा श्रीगणेशा

•►अमित शाह यांनी दिले ३५० जागांचे लक्ष्य, नवी दिल्ली,…

उषाताई चाटी कालवश

उषाताई चाटी कालवश

►आज मोक्षधाम येथे होणार अंत्यसंस्कार, नागपूर, १७ ऑगस्ट –…

राहुल गांधी भाषण करत नाहीत, केवळ रडतात: रविशंकरप्रसाद

राहुल गांधी भाषण करत नाहीत, केवळ रडतात: रविशंकरप्रसाद

►भाजपा, संघावरील आरोपांचा घेतला खरपूस समाचार, नवी दिल्ली, १७…

६५० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला पहिला पशू

६५० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला पहिला पशू

►•वैज्ञानिकांच्या अभ्यासातील निष्कर्ष, मेलबर्न, १७ ऑगस्ट – आपल्या भूतलावर…

भारताची विस्तारवादी वृत्तीच द्विपक्षीय संबंधात अडसर

भारताची विस्तारवादी वृत्तीच द्विपक्षीय संबंधात अडसर

►स्वातंत्र्यदिनी पाकच्या उलट्या बोंबा, इस्लामाबाद, १४ ऑगस्ट – काश्मीरसह…

अमेरिकेवर अणुबॉम्ब टाकून बेचिराख करू

अमेरिकेवर अणुबॉम्ब टाकून बेचिराख करू

►कोरियाच्या जनतेचे धमकावणारे प्रत्युत्तर, प्यॉंगयॉंग, १० ऑगस्ट – आमच्या…

राज्याच्या मुख्यमंत्रिपदी मीच राहणार

राज्याच्या मुख्यमंत्रिपदी मीच राहणार

►मुख्यमंत्री फडणवीस यांचे सूतोवाच,• प्रदेशाध्यक्षपदी रावसाहेब दानवेच, मुंबई, १७…

राज्य मंत्रिमंडळात कोरे, शेलार यांची वर्णी शक्य

राज्य मंत्रिमंडळात कोरे, शेलार यांची वर्णी शक्य

मुंबई, १३ ऑगस्ट – राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले…

पं. दीनदयालजींच्या विचारातूनच शाश्‍वत विकासाकडे वाटचाल: मुख्यमंत्री

पं. दीनदयालजींच्या विचारातूनच शाश्‍वत विकासाकडे वाटचाल: मुख्यमंत्री

►विधानसभेत उपाध्याय यांच्या कार्याचा गौरव, मुंबई, १० ऑगस्ट –…

स्वातंत्र्यदिन,काश्मिरी जनता आणि दहशतवाद…!

स्वातंत्र्यदिन,काश्मिरी जनता आणि दहशतवाद…!

मकरंद कुळकर्णी | काश्मिरी जनतेने भारतीय लष्कराच्या क्षमतेवर विश्‍वास…

निर्गुणाचा शोध निर्गुणात हरपला…

निर्गुणाचा शोध निर्गुणात हरपला…

•तरंग : दीपक कलढोणे | २० एप्रिल १९३९ रोजी…

३७० कलम संपले तर?

३७० कलम संपले तर?

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | नाक दाबले की…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:11 | सूर्यास्त: 18:49
अयनांश:
Home » आसमंत, डॉ. भीमराव गस्ती, स्तंभलेखक » वृक्षवल्ली आम्हां सगेसोयरे!: आदिवासींचे जीवन गाणे

वृक्षवल्ली आम्हां सगेसोयरे!: आदिवासींचे जीवन गाणे

समाजकारण : डॉ. भीमराव गस्ती |

vrukshavalli‘वृक्षवल्ली आम्हां सोयरे’ असे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी म्हटले आहे, याचा अर्थ अरण्यात असलेल्या आदिवासींना शंभर टक्के समजला आहे. पटला आहे. ते वृक्षवल्लींना आपले सगेसोयरेच मानतात.
साठ-सत्तर वर्षांपूर्वी बहुतेक सगळयाच ठिकाणी अरण्ये घनदाट वनराईने व्यापलेली होती. या अरण्यात केवळ वृक्षच नव्हते. तेथे वेगवेगळया प्रकारच्या विपुल वनौषधी, जडीबुटी होत्या. वृक्ष म्हणजे केवळ इमारतीला लागणारे लाकूड अथवा फर्निचरसाठी लागणारे लाकूड, तसेच जळणासाठी लागणारे लाकूड असा अनेकांचा सर्रास समज. यासाठीच जंगलातील वृक्षांची बेसुमार कत्तल करण्यात आली. पुन्हा शिकारीच्या नावाखाली अरण्यातील प्राणी-पक्ष्यांचादेखील संहार करण्यात आला. यामुळे सगळी अरण्ये बोडकी होऊन गेली. तिथे राहिलीत फक्त काटेरी झुडपे. तसेच माणसांनी अरण्यातील दगडधोंडेही विकून खाल्ले. यामुळे अरण्यातील आदिवासींनी जगायचे कसे? हे आदिवासी जंगलातील कंदमुळांवर जगायचे. आता तेही राहिले नाहीत. घनदाट वनराईने व्यापलेली ही अरण्ये म्हणजे भरपूर ऑक्सिजन देणारे साठेच होते. यामुळे पूर्वीच्या काळी माणूस आरोग्यसंपन्न असायचा. आता जंगलसंपत्ती नष्ट होऊन गेली आहे. तसेच सर्वत्र वाहने, कारखाने वाढले. यामुळे हवेत सर्वत्र मोठया प्रमाणात कार्बन डायऑक्साइड पसरतो आहे. याचा परिणाम म्हणजे प्रदूषण वाढते आहे आणि निसर्गाचा समतोल ढासळतो आहे, याचे साधे भान माणसाला राहिलेले नाही.
अरण्यात असणार्‍या आदिवासींचे वृक्षांशी वेगळे नाते आहे. ते वृक्षांना वाढवितात आणि त्यांचे रक्षणही करतात. यामुळे पूर्वी अरण्ये विपुल वनराईने व्यापलेली असायची. आता या अरण्यात वृक्षच राहिलेले नाहीत. याला वृक्ष तोडून विकणारे, काळे धंदेवाले तसेच जंगल खात्याचे भ्रष्ट अधिकारीही तितकेच जबाबदार आहेत. अनेकांचा गैरसमज असा की, वनात असणार्‍या आदिवासींनीच जंगलसंपत्ती नष्ट केली. हे साफ चुकीचे आहे. हे आदिवासी आताच नव्हे, तर शेकडो वर्षांपासून अरण्यात वास्तव्य करून आहेत. त्या वेळी ते वृक्ष तोडत होते का? इंग्रजांचे या वृक्षांवर खूप प्रेम होते. त्यांनीच ही जंगलसंपत्ती सुरक्षित ठेवली. ते या देशातून गेल्यानंतर या सर्व गोष्टी घडत गेल्या आहेत. हल्ली गुंड, पुढारी, काळे धंदे करणार्‍यांचा राजकारणात वावर वाढत चाललेला आहे. यामुळेच समाजात असमतोल वाढतो आहे.
बिनवृक्षांच्या उघडयाबोडक्या डोंगरावर दर वर्षी सामाजिक वनीकरणाच्या नावाखाली जंगल खात्यातर्फे हजारो नव्हे, लाखो रोपटी लावली जातात. एकदा रोपटे लावले की नंतर तिकडेही वळूनही पाहत नाहीत. या रोपटयांची योग्य रितीने निगा राखली जात नाही, रक्षण करणे तर दूरच राहिले. अशाने जंगलसंपत्ती कशी वाढणार? आणि इकडे शासनाच्या या उपक्रमासाठी दर वर्षी कोटयवधी रुपये खर्च होत असतात. अर्थात ही सगळी रक्कम अधिकार्‍यांच्या आणि कंत्राटदाराच्या खिशात जात असते. जंगल खात्याचा साधा शिपाईदेखील बंगल्यात राहतो आणि चार चाकाच्या गाडीतून दिमाखाने फिरताना दिसत असतो आणि शासन दर वर्षी असे हे वनीकरणाचे काम राबवीत असते. ‘आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते’ असा हा जंगल खात्याचा अजब कारभार आहे.
अरण्यात असणार्‍या लोकांना रोजगार देऊन त्यांच्याकडेच वनीकरणाचे काम सोपविण्यात यावे, अशी मागणी शासनाकडे आमची अखिल भारतीय बेरड रामोशी सेवा समिती १९७८पासून करत आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांपर्यंत भेटून निवेदनेही देण्यात आली आहेत. परंतु हे सगळे काही प्रयत्न वायफळ गेले. दिलेली निवेदने कचर्‍याच्या डब्यात धूळ खात पडली.
२००१ साली हेडगेवार स्मारक सेवा निधीने मला डॉ. हेडगेवार सेवा पुरस्कार देऊन माझा सन्मान केला. या पुरस्कारापोटी एक लाख रुपयांची थैली मिळाली, तसेच त्या दरम्यान ‘आक्रोश’ वाचून प्रभावित झालेल्या अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनने पाच लाखाची मदत पाठवून दिली. उत्थानच्या कार्याला आर्थिक मदतीची आवश्यकता होती. परंतु दुष्ट प्रवृत्तीच्या मंडळींनी अनेक गुंडांकरवी कार्वे (ता. चंदगड) येथील उत्थानच्या केंद्राचे इतके नुकसान करून ठेवले होते की, हे पाहून मला वाटायला लागले की गुंड मंडळी भविष्यकाळात हे केंद्र टिकू देणार नाहीत. त्यामुळे ही मिळालेली मदत बेळगाव हुकेरी तालुक्यातील डोंगरात असणार्‍या लोकांच्या हितासाठी खर्च करायची, असा मी निर्णय घेतला. येथील लोकांना पूर्वी जमिनी मिळवून दिल्या होत्या. परंतु या जमिनी पड पडलेल्या होत्या आणि हे लोक दारू धंद्यात गुंतलेले होते. पोलीस खात्याकडून त्यांचा खूप छळ होत असायचा. पोलिसांनी पकडून नेले की त्यांना सोडविण्याचे काम आमची संघटनाच करायची. या त्रासापासून सुटका व्हावी आणि ते स्वाभिमानाने जगावेत, यासाठी त्यांच्यासमोर वनशेतीची कल्पना मांडली. त्याला लागणारा सर्व खर्च संघटना करील, तुम्ही फक्त त्या लावलेल्या रोपटयांचे तीन-चार वर्षे रक्षण करायचे आणि वाढवायचे, असे त्यांना पुन्हा पुन्हा सांगितले. झाडांना जी फळे येतील, त्याचे उत्पन्न तुम्हीच घ्या, त्या उत्पन्नावर तुमच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटू शकेल असे त्यांना पटवून सांगितले. त्यांना ते पटले.
प्रत्येकाच्या जागेत दोनशेपर्यंत आंबा, चिकू, काजू, पेरू, सीताफळ, आवळा ही रोपटी लावली. ही रोपटी मिळविण्यासाठी अनेक नर्सरी पालथ्या घालाव्या लागल्या. त्यांच्या जागेत त्यांनीच खड्डे खणले. नंतर तिथे रोपटी लावली. वेळोवेळी खतपाणी घालण्याचे, तसेच रोपटयाचे रक्षण करण्याचे काम त्यांनी मनापासून केले. अशी एक शंभर कुटुंबे सुरुवातीला निवडली होती. हा प्रयोग यशस्वी झाला की नंतर दुसर्‍या ठिकाणी रोपटी लावायची, असे ठरले. सुरुवातीला त्या रोपटयांची निगा राखण्याचे काम त्यांनी केले. तीन-साडेतीन वर्षांनी रोपटी मोठी झाली. चौथ्या वर्षापासून त्या रोपटयांना फळे धरू लागली. सुरुवातीला तसे उत्पन्न खूपच कमी होते. नंतर मात्र उत्पन्न वाढत गेले. पाच-सहा वर्षांत फळाचे उत्पन्न बर्‍यापैकी मिळायला लागले. दारू विकणारी, चोरी करणारी कुटुंबे आता बुरटयामध्ये फळे भरून शहराच्या ठिकाणी जाऊन फळे विकायला लागली. त्यावर त्यांची गुजराण होऊ लागली. नंतर नंतर त्यांचा तो व्यवसायच होऊन गेला. अशा रितीने हा उपक्रम वनसंपत्ती वाढायला कारणीभूत ठरू लागला. लोक कष्ट करून स्वाभिमानाने जगायला लागले. यामुळे गुन्हेगारी वृत्तीही कमी झाली. तेही इतरांसारखे साधे जीवन जगायला लागले. हे झालेले परिवर्तन पाहून मलाही समाधान वाटले. परिवर्तनाच्या कामात अनेक अडथळे येत असतात. परंतु सातत्याने परिश्रम करीत गेले, तर त्यात यशही येत असते. परंतु ह्या कामाची प्रसिध्दी मात्र होऊ दिली नाही. प्रसिध्दीमुळे नाहक त्रास होत असतो. सहज होणारे कामही होत नाही, हेही अनुभवाने शिकता आले.
चंदगड तालुक्यातही शेती करणार्‍या शेकडो बेरड कुटुंबांना त्यांच्या शेतांच्या बांधावर व खुल्या जागेत काजूची रोपटी लावण्यास दिली. आपल्या देशात लावलेल्या काजूच्या झाडांमुळे त्या शेतकर्‍यांना दर वर्षी नाही म्हटले तरी तीस-पस्तीस हजार रुपयांचे उत्पन्न मिळायला लागले.
२००४पासून उत्तर कर्नाटकात देवदासींच्या पुनर्वसन कार्य वाढले. यामुळे तेथील शेतकर्‍यांशी संबंध येऊ लागला. शासन दरबारी अडलेली त्यांची कामे करून देण्याचे काम आमची संघटना करू लागली. तर हे शेतकरी मदत म्हणून आमच्या देवदासी मुलींच्या वसतिगृहासाठी धान्य देऊ लागले. आम्ही त्या शेतकर्‍यांना त्यांच्या शेतीच्या बांधावर व इतर मोकळया जागेत कडुलिंबाचे रोपटे लावण्यास देत गेलो. कडुलिंबाचे रोपटे पाणी कमी मिळाले तरी जगते आणि वाढते. यामुळे शेकडो शेतकर्‍यांच्या शेतांत कडुलिंबाचे हजारो वृक्ष तयार झाले. आंध्रातील अनंतपूर, नालगोंडा, पेनीकोंडा, चित्तूर या जिल्ह्यांत असाच प्रयोग चाललेला आहे. गेल्या चार वर्षांपासून हे काम संथ गतीने का होईना परंतु चिकाटीने चाललेले आहे. या वर्षी या लोकांच्या सहकार्याने लाखाहून जास्त कडुलिंबाची रोपटी लावली आहेत. आजवर अखिल भारतीय बेरड रामोशी सेवा समितीने लाखो रोपटी लावली आणि ती जगविलीही आहेत. परंतु याचा कोणत्याही प्रकारचा गाजावाजा करण्याचे हेतुपुरस्सर टाळले आहे. कारण कार्यकर्त्यांना एकदा प्रसिध्दीची सवय लागली की त्यांच्याकडून अपक्षेप्रमाणे काम होत नाही, हाही एक नेहमीचाच अनुभव.
वृक्ष हे मनुष्याला जीवनदान देणारे आहेत हे आदिवासींना चांगले माहीत आहे. परंतु शहरी भागात असणार्‍यांना याचे महत्त्व वाटत नाही. तसेच दर वर्षी एकाच ठिकाणी एकाच खड्डयात रोपटे लावून, गाजावाजा करून वनमहोत्सव साजरा करीत असतात. डोंगर-कपारीत राहणार्‍या, तसेच ग्रामीण भागात असणार्‍या अनपढ लोकांकडून वृक्ष वाढविणे आणि त्यांचे रक्षण करणे शिकण्यासारखे आहे. भले हे आदिवासी अनपढ व गरीब असतील, परंतु ते संस्कृतिसंपन्न आहेत. तसेच त्यांच्याकडे अनुभवाची शिदोरी इतकी मोठी आहे की, तिथे पैशाची श्रीमंती फिकी पडते.

शेअर करा

Posted by on Nov 13 2016. Filed under आसमंत, डॉ. भीमराव गस्ती, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आसमंत, डॉ. भीमराव गस्ती, स्तंभलेखक (860 of 923 articles)


श्रीकांत धुंडिराज जोशी | बँकिंग व्यवसायाची कवच कुंडले - (भाग २) बँकिंग व्यवसायातील धोक्यांची पूर्वतयारी म्हणून या संकल्पनेकडे पहायला हवे. ...