ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:

वैज्ञानिक अंधश्रद्धा

॥ टेहळणी : डॉ.परीक्षित स. शेवडे |

Chandra Grahan Lunar Eclipse

Chandra Grahan Lunar Eclipse

पुराणमित्येव न साधु सर्वं न चापि काव्यं नवमित्यवद्यम्।
सन्तः परीक्ष्यान्यतरत् भजन्ते मूढः परप्रत्ययनेय बुद्धिः॥
एखादी गोष्ट केवळ जुनी आहे म्हणून चांगली ठरवता येत नाही; तसेच एखादी गोष्ट नवीन म्हणून वाईटदेखील ठरत नाही. खरा हुशार तोच, जो आपल्या अनुभवावरून आणि संपूर्ण परीक्षण करूनच चांगले किंवा वाईट ठरवतो. मूर्ख माणूस मात्र इतर काय बोलतात त्यानुसार आपले मत बनवत असतो. महाकवी कालिदासाच्या ‘मालविकाग्निमित्रम्’मधील हा श्‍लोक आठवण्याचे कारण म्हणजे आषाढ पौर्णिमा- २७ जुलै २०१८ रोजी झालेले खग्रास चंद्रग्रहण. या ग्रहणाचे वैशिष्ट्य म्हणजे हे या शतकातील सर्वात मोठे खग्रास चंद्रग्रहण होते. या निमित्ताने वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या यांच्यावर बर्‍याच चर्चा झाल्या. मी स्वतः यातील काही चर्चांचा भाग होतो. मात्र, बहुतांशी चर्चांमध्ये ग्रहणकाळात पाळायची बंधने हा विषय कसा अयोग्य आहे, यावरच भर दिसला. जणूकाही हा पैलू वगळता या घटनेला अन्य काहीच महत्त्व नसावे!
ग्रहणकाळात काही खाऊ नये, असे धर्मशास्त्र सांगते; हे धर्मशास्त्राचा काहीही अभ्यास नसलेल्यांकडून सरसकट सांगितले जाते. ग्रहण पाळल्यास गरोदर महिला, लहान मुले यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होईल, असा कांगावा केला जातो. या संदर्भात धर्मशास्त्र नेमके काय सांगते, याची विचारणा वेंगुर्ला येथील वे. भूषण जोशी यांना केली. त्यांनी सांगितल्यानुसार; बाल, वृद्ध व स्त्रिया यांना ग्रहण नियमात शास्त्रकारांनी मुभा दिलेली आहे. सूर्योदय ते सूर्यास्त असे दिनमानाचे समान पाच भाग केले असता पूर्वान्ह, संगव, मध्यान्ह, अपरान्ह, सायान्ह असे पाच भाग होतात. ज्या प्रहरी ग्रहण असेल त्या प्रहरापूर्वी एक प्रहर निषिद्ध आहे. उदा. सायंकाळी ग्रहण असेल, तर अपरान्हकाळी भोजन करू नये. (मार्कंडेय वचन) थोडक्यात, ग्रहणाच्या संपूर्ण कालावधीत काहीही खाऊ-पिऊ नये हा नियम बालके, स्त्रिया, वृद्ध यांना लागू नाही. रुग्णांना तर कोणताच नियम लागू केला जात नाही. ग्रहणकाळात अन्न दूषित होते, असे समजले जाते. मात्र, याही विषयात अपवाद सांगितले आहेत. आरनाल (कांजिक), दूध, ताक, दही, तेल व तुपात तळलेले वडे, पुरी, माठातले पाणी यावरून जरी ग्रहण गेले तरी ते खराब होत नाहीत. (भार्गवार्चनदीपिका व ज्योतिर्निबंध मेधातिथी) थोडक्यात, अन्नाचा नियमही सरसकट नाही. मग यापैकी कसलाही अभ्यास नसणारे लोक हे नियम कठोर आणि सरसकट असल्याचे बिनधास्तपणे खोटे का बोलत आहेत?
असाही युक्तिवाद मांडला जातो की, ग्रहणकाळात अन्नपदार्थांवर कोणताही परिणाम होत नसतो. मात्र, ग्रहणकाळात अन्न-पाणी-मनुष्य इत्यादींवर काहीही परिणाम होत नाही, असे प्रयोगाअंती निःसंदिग्धपणे सिद्ध करणारी नेमकी किती संशोधने झाली आहेत? त्यांचे रीसर्च पेपर उपलब्ध आहेत का? ते वाचायला मिळतील का? या प्रश्‍नांची थेट उत्तरे मात्र टाळली जातात. १९८० साली एस. के. बॅनर्जी यांनी केलेले संशोधन आज उपलब्ध आहे. सूर्यग्रहणाच्या कालावधीतील अतीनील किरणांची वाढीव मात्रा आणि अन्य काही बाबींमुळे या काळात काही सूक्ष्मजीवांची वाढ होणे थांबते, असे हे संशोधन सांगते. म्हणजेच सकारात्मक असो वा नकारात्मक, मात्र अन्नावर परिणाम हा घडतो. मागच्याच वर्षी नासाने मंगळावरील वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी सूर्यग्रहणाच्या कालावधीत काही सूक्ष्मजीवांचे लेपन केलेले फुगे अवकाशात सोडले. ग्रहणाचा कोणताही परिणाम होत नाही असे सिद्ध झाले असते, तर नासाने वेळ जात नाही म्हणून मनोरंजनासाठी असा प्रकल्प हातात घेतला असेल का?
एखादी गोष्ट वैज्ञानिक कसोटीवर सिद्ध न होताच आपल्याला वाटते म्हणून सांगणं ही तर वैज्ञानिक अंधश्रद्धा! सातत्याने प्रयोग करा आणि खोटं सिद्ध करा, जरूर स्वीकारू. पण, केवळ भारतीय शास्त्रांत सांगितले आहे म्हणून या सार्‍या गोष्टींना नाकारायचे असेल; किंबहुना त्याची खिल्ली उडवायची असेल, तर हा दृष्टिकोन नामंजूर. श्रीरामसेतू (नलसेतू)देखील मानवनिर्मित नसून नैसर्गिक आहे म्हणून आपल्याकडचे पुरोगामी आणि वैज्ञानिक कंठशोष करून सांगत होते. आता मात्र तो नैसर्गिक नसल्याचे सायन्स चॅनेलने सांगताच हे लोक कुठे दडून बसले बरे?
आपल्या पूर्वजांना ग्रहण म्हणजे नेमके काय हे माहितीच नव्हते, अशा थापा मारणार्‍या व्यक्तींंनी एकदातरी ‘सूर्यसिद्धान्त’ हा ग्रंथ वाचावा. पृथ्वी सपाट असल्याची भंपक बतावणी करणारे लोक आमचे बापजादे नव्हते. ती गोल असते, तिचा व्यास किती, सूर्य पृथ्वीभोवती नव्हे, ती स्वतःच सूर्याभोवती फिरते, ही आणि अशी अन्यही संपूर्ण वैज्ञानिक माहिती देणारे आमचे पूर्वज ग्रहणकाळाबद्दलच अचानक भरकटल्यासारखं बोलतील का? मात्र, आपणच खोटा पूर्वपक्ष मांडून आपणच उत्तरपक्ष मांडत खंडण करायचं आणि समोरच्यावर आरोप करत राहायचं, ही डावी कार्यपद्धती इथेही राबवली जात आहे. केवळ पूर्वजांनी सांगितले असल्यानेच ते स्वीकारावे, असे आमचे मुळीच मत नाही. मात्र, जे त्यांनी सांगितलेलेच नाही ते त्यांच्या माथी मारून त्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणे हे गैरच. शिवाय, अशा प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींच्या आडून सातत्याने हिंदू धर्म वा धर्मशास्त्र यांना नावे ठेवणारे लोक अन्य पंथीयांबाबत मात्र मूग गिळून गप्प असतात. हा कुठला दुटप्पीपणा? ग्रहणकाळात जेमतेम काही तास न खाल्ल्याने आरोग्याला अपाय होतो, असे सांगणारे लोक संपूर्ण महिना दिवसभर निर्जळी उपास करण्याबद्दल कधी काही बोलताना का बरे आढळत नाहीत? केवळ हिंदू धर्मियांच्याच धार्मिक बाबींत विज्ञानशिक्षणाचे तास घ्यावे असे पुरोगाम्यांना वाटते का?
विज्ञानाची कास धरायची असेल, तर ज्या ठिकाणी पुरेशी संशोधने झालेली नाहीत, तिथे अधिकाधिक संशोधने होणे गरजेचे आहे. तसे न करताच केवळ आरोप करायचे असल्यास ते अवैज्ञानिक ठरेल. शिवाय, ग्रहण पाळावे वा नाही हा घटनादत्त अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा विषय आहे, हेही सोयिस्करपणे विसरले जाऊ नये. विज्ञान नम्र व्हायला शिकवते, सध्या मात्र तथाकथित विज्ञानवादींचा प्रवास अधिकाधिक अहंगंडाकडे सुरू आहे हे दुर्दैव! येत्या पाच-दहा वर्षांत एखाद्या परदेशी संशोधकाने प्रयोगाअंती भारतीयांनी घालून दिलेले नियम योग्य होते, असा निष्कर्ष काढला तर हे लोक काय करतील? पुन्हा रामसेतूसारखीच दडी मारणार का?

Posted by : | on : 5 Aug 2018
Filed under : आसमंत, डॉ.परीक्षित स. शेवडे, पुरवणी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, डॉ.परीक्षित स. शेवडे, पुरवणी, स्तंभलेखक (524 of 1208 articles)

School
प्रासंगिक : वसंत गणेश काणे | अनेक खाजगी व विनाअनुदानित शाळांतील शुल्क आकारणीच्या विषयाने रौद्र रूप धारण केले असून त्याचे ...

×