भाजपाच्या ‘मिशन २०१९’चा श्रीगणेशा

भाजपाच्या ‘मिशन २०१९’चा श्रीगणेशा

•►अमित शाह यांनी दिले ३५० जागांचे लक्ष्य, नवी दिल्ली,…

उषाताई चाटी कालवश

उषाताई चाटी कालवश

►आज मोक्षधाम येथे होणार अंत्यसंस्कार, नागपूर, १७ ऑगस्ट –…

राहुल गांधी भाषण करत नाहीत, केवळ रडतात: रविशंकरप्रसाद

राहुल गांधी भाषण करत नाहीत, केवळ रडतात: रविशंकरप्रसाद

►भाजपा, संघावरील आरोपांचा घेतला खरपूस समाचार, नवी दिल्ली, १७…

६५० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला पहिला पशू

६५० दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आला पहिला पशू

►•वैज्ञानिकांच्या अभ्यासातील निष्कर्ष, मेलबर्न, १७ ऑगस्ट – आपल्या भूतलावर…

भारताची विस्तारवादी वृत्तीच द्विपक्षीय संबंधात अडसर

भारताची विस्तारवादी वृत्तीच द्विपक्षीय संबंधात अडसर

►स्वातंत्र्यदिनी पाकच्या उलट्या बोंबा, इस्लामाबाद, १४ ऑगस्ट – काश्मीरसह…

अमेरिकेवर अणुबॉम्ब टाकून बेचिराख करू

अमेरिकेवर अणुबॉम्ब टाकून बेचिराख करू

►कोरियाच्या जनतेचे धमकावणारे प्रत्युत्तर, प्यॉंगयॉंग, १० ऑगस्ट – आमच्या…

राज्याच्या मुख्यमंत्रिपदी मीच राहणार

राज्याच्या मुख्यमंत्रिपदी मीच राहणार

►मुख्यमंत्री फडणवीस यांचे सूतोवाच,• प्रदेशाध्यक्षपदी रावसाहेब दानवेच, मुंबई, १७…

राज्य मंत्रिमंडळात कोरे, शेलार यांची वर्णी शक्य

राज्य मंत्रिमंडळात कोरे, शेलार यांची वर्णी शक्य

मुंबई, १३ ऑगस्ट – राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले…

पं. दीनदयालजींच्या विचारातूनच शाश्‍वत विकासाकडे वाटचाल: मुख्यमंत्री

पं. दीनदयालजींच्या विचारातूनच शाश्‍वत विकासाकडे वाटचाल: मुख्यमंत्री

►विधानसभेत उपाध्याय यांच्या कार्याचा गौरव, मुंबई, १० ऑगस्ट –…

स्वातंत्र्यदिन,काश्मिरी जनता आणि दहशतवाद…!

स्वातंत्र्यदिन,काश्मिरी जनता आणि दहशतवाद…!

मकरंद कुळकर्णी | काश्मिरी जनतेने भारतीय लष्कराच्या क्षमतेवर विश्‍वास…

निर्गुणाचा शोध निर्गुणात हरपला…

निर्गुणाचा शोध निर्गुणात हरपला…

•तरंग : दीपक कलढोणे | २० एप्रिल १९३९ रोजी…

३७० कलम संपले तर?

३७० कलम संपले तर?

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | नाक दाबले की…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

प्रियांका ठरली जगातील दुसरी सुंदर महिला!

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियांका…

रितेश बनला ‘बँक चोर’

रितेश बनला ‘बँक चोर’

यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या चित्रपटाद्वारे मराठमोळा अभिनेता रितेश…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:11 | सूर्यास्त: 18:49
अयनांश:
Home » आसमंत, भाऊ तोरसेकर, स्तंभलेखक » वॉशिंग्टन डीसीचा पराभव

वॉशिंग्टन डीसीचा पराभव

•उलट तपासणी : भाऊ तोरसेकर |

वॉशिंग्टन डीसी आणि नवी दिल्ली यात फरक नाही. लंडन, पॅरीस वा कुठल्याही युरोपियन राजधानीत बसलेला एक प्रस्थापित वर्ग; अनेक गोष्टी सामान्य माणसाच्या गळी मारत असतो. आपल्या विचार व मतांशी सहमत नसलेल्यांचा विविध मोहिमातून काटा काढणे वा त्याला बदनाम करून संपवणे; ही अशा वर्गाची रणनीती होऊन बसली आहे. त्या मस्तवालपणाला किंवा जबरदस्तीला आव्हान देणार्‍याला असहिष्णू ठरवणे, हुकूमशहा, फॅसिस्ट ठरवून अपप्रचार करणे, ही हत्यारे झालेली आहेत. अशा लोकांना देश, देशाभिमान, देशभक्ती हे धोके वाटत असतात. आपल्याकडे पुरस्कारवापसी किंवा मोदी निवडून आल्यास देश सोडून पळावे लागेल, अशी झालेली भाषा आठवून बघा.

hillary-clinton-sसामान्य माणसाच्या जीवनात राजकारणाचे स्थान प्रतिकात्मक असते आणि तथाकथित अभिजनांच्या जीवनात प्रतिकांना वास्तवाचे स्थान असते. त्यामुळेच अमेरिकन राजकारणात डोनाल्ड ट्रम्प यांचा झालेला विजय, किंवा हिलरी क्लिटंन यांचा झालेला पराभव; हा प्रतिकात्मक आहे. त्यात एका प्रतिकासाठी दुसर्‍या प्रतिकाचा मतदाराने पराभव केला आहे. हिलरी ही एका पक्षाची उमेदवार नव्हती, तर ती एका मुजोर अशा प्रस्थापित वर्गाची प्रतीक वा उमेदवार होती. हिलरी म्हणजे १९९२ ते २००० पर्यंत अमेरिकेचे अध्यक्ष असलेल्या बिल क्लिटंन यांची पत्नी होय. तेव्हापासूनच अध्यक्षपदाची महत्त्वाकांक्षा हिलरी बाळगून होत्या. मात्र तात्काळ त्यांना ती निवडणूक लढवणे शक्य नसल्याने, त्यांना थोडे थांबावे लागले. मग बुश यांच्या जमान्यात त्यांनी सिनेटर होऊन आपली स्वतंत्र वाटचाल सुरू केली, तरी त्यांची राजकीय पुंजी बिल क्लिटंन यांची पत्नी इतकीच होती.  २००८ मध्ये त्यांनी अध्यक्षीय उमेदवारी आरंभली, तेव्हा अखेरच्या क्षणी त्यात बराक ओबामा या तरुण कृष्णवर्णिय नेत्याने उडी घेतली. त्यामुळे हिलरींना पक्षातच मोठे आव्हान उभे राहिले. मात्र त्यावर मात करता आली नाही, म्हणून त्यांना आणखी आठ वर्षे प्रतीक्षा करावी लागली. २००८ सालात ओबामा अध्यक्ष झाले आणि पुढल्या वेळी त्यांनाच उमेदवारी निश्‍चित असल्याने, २०१६ पर्यंत हिलरींना कळ काढावी लागली होती. मात्र त्यात हिलरींनी उडी घेतल्यापासून पतिदेव क्लिटंन यांच्यासह तमाम वॉशिंग्टन गोटाने त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलेले होते. ही अमेरिकन राजधानी सर्व ताकदीनिशी हिलरींना अध्यक्ष म्हणून निवडून आणायला सज्ज झालेली होती. आपल्या तालावर अमेरिकेला नाचवणार्‍या याच वर्गाला अमेरिकन नागरिकाने धडा शिकवलेला आहे. हिलरी त्या राजकीय मस्तीचे प्रतीक होते. उलट डोनाल्ड ट्रम्प हे दुर्लक्षित, वंचित अमेरिकनांचे प्रतीक होते.
आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे बघूया. हा माणूस कधीच राजकारणात नव्हता. त्याने कधी कुठल्याही राजकीयपद वा सत्तापदासाठी निवडणूक लढवली नाही किंवा राजकीय आखाड्यात उडी घेतली नव्हती. राजकारणाची सुत्रे जिथून हलवली जातात, त्या राजधानी वॉशिंग्टन डीसी या महानगराशी ट्रम्प यांचा कधी संबंध आला नाही. त्यामुळेच अमेरिकन राजकीय वर्तुळात वा त्यातल्या कुठल्याही गोटात, ट्रम्प हा उपरा होता. अमेरिकनांचे मत आम्ही ठरवतो आणि अमेरिकन अभिमान वा संस्कृती आम्ही निश्‍चित करतो, अशा मस्तीत जगणार्‍या, वागणार्‍या लोकांपासून पूर्णपणे अलिप्त असलेला डोनाल्ड ट्रम्प; म्हणूनच सामान्य माणसाचे प्रतीक होता. अर्थात सामान्य म्हणजे वंचित, गरीब वा बेकार वगैरे असा नव्हे, तर देशाचे व समाजाचे भवितव्य खेळण्यासारखे वापरणार्‍या वर्गाकडून नाडला पिळला गेलेला, असा सुखवस्तू माणूस; इतकेच ट्रम्प यांचे सामान्य अमेरिकनांशी साधर्म्य असू शकते. पण म्हणूनच तो त्या सामान्य अमेरिकनांच्या भावना विकारांचेही प्रतीक होता. अशा मस्तवाल राजकीय मक्तेदारांना लोक कंटाळलेले होते आणि त्यांच्या सर्वप्रकारे लादल्या जाणार्‍या मतांचे विरोधक होते. पण साधनसंपत्ती वंचित असलेल्या त्या सामान्य अमेरिकनांकडे अशा मस्तवाल राजकीय वर्गाशी लढण्याची क्षमता नव्हती. ती साधने व जिद्द असलेल्या माणसाची त्यांना नेता म्हणून गरज वाटत होती. ट्रम्प यांच्या रूपाने तोच उमेदवार अशा निराश, वंचित अमेरिकनांसमोर आला. मग हिलरी विरोधातले प्रतीक होऊन गेला. कशासाठी लोकांना हिलरी नको होती वा ट्रम्प कशासाठी लोकांना हवाच होता? पुरोगामी, उदारमतवादी म्हणून ज्या कल्पना दीर्घकाळ सामान्य अमेरिकनांच्या माथी मारल्या गेलेल्या आहेत, त्या झुगारून लावण्यासाठी त्यांना ट्रम्पसारखा दांडगा सेनापती हवा होता. म्हणून तो या लढतीचा सेनापती होऊन गेला.
वॉशिंग्टन डीसी आणि नवी दिल्ली यात फरक नाही. लंडन, पॅरीस वा कुठल्याही युरोपियन राजधानीत बसलेला एक प्रस्थापित वर्ग; अनेक गोष्टी सामान्य माणसाच्या गळी मारत असतो. आपल्या विचार व मतांशी सहमत नसलेल्यांचा विविध मोहिमातून काटा काढणे वा त्याला बदनाम करून संपवणे; ही अशा वर्गाची रणनीती होऊन बसली आहे. त्या मस्तवालपणाला किंवा जबरदस्तीला आव्हान देणार्‍याला असहिष्णू ठरवणे, हुकूमशहा, फॅसिस्ट ठरवून अपप्रचार करणे, ही हत्यारे झालेली आहेत. अशा लोकांना देश, देशाभिमान, देशभक्ती हे धोके वाटत असतात. आपल्याकडे पुरस्कारवापसी किंवा मोदी निवडून आल्यास देश सोडून पळावे लागेल, अशी झालेली भाषा आठवून बघा. आपल्या उच्चभ्रू वर्चस्ववादाला समता व सहिष्णूता ठरवून, इतरांना सतत दुय्यम लेखणारा हा वैचारिक मस्तवालपणा, आजकाल जगभर उदारमतवादी डावेपणा म्हणून ओळखला जातो. त्याला देशाच्या भौगोलिक सीमा मान्य नाहीत, की त्या त्या देशाच्या प्रतिष्ठा व अभिमानाची प्रतिकेही अमान्य आहेत. त्यातूनच मग अशा प्रतिकांची हेटाळणी व विध्वंस आरंभला जातो आणि त्यालाच सहिष्णुता असे लेबल लावले जाते. नेहरू विद्यापीठातील देशविरोधी घोषणा किंवा काश्मिरातील हिंसेचे समर्थन करणारा इथला वर्ग आणि अमेरिकेत जिहादविरोधात बोलण्याला वंशवादाचे लावलेले लेबल तपासून बघा. तरच लक्षात येईल, ही निव्वळ बदमाशी आहे. कुठलाही देश त्या भौगोलिक तुकड्यावर वसलेल्या समाजाच्या अभिमानातून उभा राहिलेला असतो. त्याचा तोच अभिमान खच्ची करायचा आणि खच्चीकरणात देश समाजाचे हित असल्याचा डांगोरा पिटायचा; ही अशा वर्गाची शैली बनलेली आहे. त्याच वर्गाचे प्रतीक हिलरी झालेल्या होत्या. म्हणूनच त्यांनी अमेरिकेत स्थलांतरित होणार्‍या घुसखोरीला आव्हान देणार्‍या ट्रम्पना गुन्हेगार ठरवण्यापर्यंत मजल मारली होती.
एकूण ट्रम्प व हिलरी प्रचाराची रणधुमाळी बघितली, तर अमेरिकेविषयी अभिमान वा तिच्या भौगोलिक सीमांविषयी चिंता व्यक्त करण्यालाच, अमेरिकेसाठी धोका ठरवले जात होते. असा पवित्रा घेणार्‍यांचे प्रतीक म्हणून हिलरी पुढे आलेल्या होत्या. आपल्याकडे हा तमाशा नवीन राहिलेला नाही. जिहादी, दहशतवादी, नक्षली यांच्या सुखरुपतेसाठी आकांडतांडव करणार्‍यांना आपल्याकडे पुरोगामी म्हणून प्रतिष्ठित केले जाते. अशा हिंसाचारी व देशाला धोका असलेल्यांच्या विरोधात बोलणार्‍यांना संकुचित व घातक ठरवले जात असते. हाच दिल्लीतला वर्ग आणि अमेरिकेच्या वॉशिंग्टनमधला वर्ग सारखाच आहे. त्याला वास्तव देश व समाजाशी कर्तव्य उरलेले नसून, आपल्या कल्पनेतल्या समतावादी समाजाच्या निर्मितीसाठी त्यांनी अस्तित्वातल्या देश व समाजांना उध्वस्त करण्याच्या मोहिमा आखलेल्या आहेत. त्यातूनच मग त्यांना संपवण्याची आकांक्षा जगातल्या प्रत्येक समाजात उदभवली आहे. मात्र प्रत्येक समाज देशाला त्या लढाईसाठी आवश्यक नवा नेता शोधावा लागतो आहे. आज उपलब्ध असलेले पक्ष वा नेते त्यासाठी लायक उरलेले नाहीत. म्हणूनच प्रस्थापित राजकीय पक्ष, संस्था वा नेतृत्वाला बाजूला सारून, नव्या चेहरे व व्यक्तीना सामान्य जनताच हुडकून काढते आहे. घातक उदारमतवादाचे प्रतीक व म्होरके बनलेल्यांना संपवताना, बाकीच्या बर्‍यावाईट गोष्टींकडेही सामान्य जनता दुर्लक्ष करू लागली आहे. अन्यथा ट्रम्प यांच्यासारख्या धश्‍चोट व्यक्तीची अमेरिकन अध्यक्षपदी निवड होऊ शकली नसती. हिलरीपेक्षा हा माणूस उत्तम अध्यक्ष होऊ शकेल, असे कोणी म्हणणार नाही. पण हिलरी वा ती प्रतिनिधित्व करत असलेल्या विचारांपेक्षा अन्य कोणीही चालेल; अशा मानसिकतेचा हा निर्वाळा आहे. किंबहुना, उदारमतवादाला झुगारणे, हीच आता लोकांना आश्‍वासक गोष्ट वाटू लागल्याचा तो स्पष्ट संकेत आहे. अर्थात, संकेत समजून घेतला तर! म्हणूनच हा हिलरी क्लिटंन यांचा पराभव नाही, तो अमेरिकेच्या राजधानी वॉशिंग्टन डीसी या राजधानीत दीर्घकाळ वैचारिक दांडगाई करणार्‍या मुजोरपणाचा दारूण पराभव आहे.

शेअर करा

Posted by on Nov 20 2016. Filed under आसमंत, भाऊ तोरसेकर, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आसमंत, भाऊ तोरसेकर, स्तंभलेखक (834 of 923 articles)


•विश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले | निसर्गातली अन्नसाखळी हा फार मनोरंजक प्रकार आहे. वनस्पती प्राणवायू सोडतात, त्यावर माणूस जगतो. वनस्पती ...