ads
ads
काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:52 | सूर्यास्त: 17:54
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, श्रीनिवास वैद्य, स्तंभलेखक » शबरीमलै मंदिरात महिलांना प्रवेश

शबरीमलै मंदिरात महिलांना प्रवेश

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य |

हिंदू धर्मातील कुठल्याही रीतिरिवाजाला न मानणारे, या अशा बाबतीत फारच उत्साही दिसत असतात. त्यांचा हा उत्साह परदेशी ख्रिश्‍चन संस्थांकडून येत असलेल्या भरघोस देणग्यांमुळेच तर नसेल ना? हिंदू समाजाने या सर्व गोष्टींचा अतिशय गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. एखाद्या मंदिरातील प्रथा किंवा सामाजिक परंपरा बदलायच्या असतील तर त्या मंदिराला, त्या समाजाला अधिकार दिले पाहिजे. त्यात नाक खुपसता कामा नये.

Sabarimala Ayyappa Swami Mandir

Sabarimala Ayyappa Swami Mandir

केरळमधील शबरीमलै मंदिरात महिलांना प्रवेश मिळावा म्हणून काही स्त्रीवादी संघटनांनी चळवळ सुरू केली आहे. ती आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे. सर्वोच्च न्यायालयात सध्या यावर सुनावणी सुरू आहे. आता सर्वोच्च न्यायालय या मंदिराच्या परंपरेविषयी आपला ‘ज्ञान’युक्त निर्णय देईल. या सर्व घडामोडींमुळे केवळ केरळमधील हिंदुमानसच क्षुब्ध नाही आहे तर, संपूर्ण भारतातही हिंदूंमध्ये अस्वस्थता आहे. महिलांना समान अधिकार या गोंडस नावाखाली, हिंदू धर्माला, हिंदू परंपरांना, रीतिरिवाजांना बदनाम करण्याचे जे कारस्थान सुरू आहे, त्यातीलच हा एक प्रकार आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. काँग्रेसच्या निधर्मी राजवटीमुळे आपल्या भारतात, मानवी अधिकारवाद्यांची जी पिलावळी, गाजर गवतासारखी सर्वत्र उगवली आहे, ती संविधानाचा आधार घेत, या देशातील राष्ट्रीय (म्हणजे हिंदू) समाजाला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे प्रत्येक हिंदूने आपल्या मध्यमवर्गीय चौकटीत मश्गुल न राहता, थोडा डोळसपणे विचार करण्याची गरज आहे.
शबरीमलै मंदिर
केरळ राज्यातील नीलगिरीवर शबरीमलै नावाचे शैव पीठ आहे. तिथे शास्ता किंवा अय्यप्पा देवतेची मूर्ती आहे. हेच ते शबरीमलै मंदिर. हे एक तांत्रिक पीठ आहे. याच्या तांत्रिक स्वरूपामुळे अय्यप्पांच्या भक्तांना आयुष्यात अनेकविध नियम पाळावे लागतात. शबरीमलैची यात्रा देखील खडतरच असते. असे असतानाही देशभरातून आणि विशेषत: केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश व तामिळनाडूतून लाखो भक्त दरवर्षी यात्रा करीत असतात.
भगवान परशुरामाने समुद्रातून केरळची भूमी वर काढल्यावर तिच्या रक्षणासाठी पहाडांवर १००८ शास्त्यांची प्रतिष्ठापना केली, असे केरलोत्पत्ती या ग्रंथात सांगितले आहे. (भारतीय संस्कृतिकोश) त्यापैकी शबरीमलैचे अय्यप्पा एक शास्ते आहेत. यांना धर्मशास्ता, आर्य तात, अय्यनार, भूतनाथ, हरिहरपुत्र, अय्यप्पा व अय्यप्पन असेही म्हणतात. अय्यप्पाने केरळमध्येच अवतार घेतला आणि आपले अवतारकार्य पूर्ण केले, असे सांगतात.
प्राचीन प्रथा
शबरीमलैच्या मंदिरात मासिक पाळी येणार्‍या महिलांना प्रवेशबंदी आहे. ही प्रथा प्राचीन काळापासून सुरू असल्याचे सांगतात. ही प्रथा महिलांवर अन्याय करणारी असून, पुरुष व महिला हे समान असल्याने, पुरुषांच्या बरोबरीने महिलांनाही या मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून, काही नास्तिक मंडळींनी एक चळवळ सुरू केली आहे. आपल्या महाराष्ट्रात ज्याप्रमाणे शनी शिंगणापूर येथील शनी मंदिरात महिलांना प्रवेश मिळावा म्हणून मागे आंदोलन झाले होते, तसेच.
१९९१ साली केरळ उच्च न्यायालयाच्या न्या. के. परिपूर्णन् आणि न्या. के. बालनारायण मरार यांच्या खंडपीठाने या मंदिरात वय वर्षे १० ते ५० यामधील महिलांना प्रवेश करण्यास बंदी घालणारा निर्णय जाहीर केला. यासाठी त्यांनी प्राचीन काळापासून चालत आलेल्या परंपरेचा दाखला दिला. एवढेच नाही तर न्यायालयाने केरळ सरकारला निर्देश दिलेत की, या मंदिरात १० ते ५० वयोगटातील महिला प्रवेश करणार नाहीत, याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. केरळ उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे नास्तिक, सेक्युलर, मानवाधिकारवाली तसेच स्त्रीवादी मंडळी खवळली आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. केरळ उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा फेरविचार करून, तो रद्द करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली. ऑक्टोबर २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण घटनापीठाकडे सोपविले. जुलै २०१८ पासून आता या घटनापीठाकडे याची सुनावणी सुरू आहे. या सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने आपले निरीक्षण नोंदविले की, पुरुषांप्रमाणे महिलांनाही या मंदिरात प्रवेश मिळाला पाहिजे. परंतु, अजून अंतिम निर्णय यायचा आहे. तो कसा असेल, हे काही आता गुपित राहिले नाही.
युक्तिवाद
सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणात वरिष्ठ अधिवक्ता के. परासरन्, नायर सर्व्हिस सोसायटीची बाजू मांडत आहेत. परासरन् हे इंदिरा व राजीव गांधी पंतप्रधान असताना भारताचे अ‍ॅव्होकेट जनरल होते. त्यांना त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यामुळे पद्मभूषण पुरस्कार देऊन सरकारने गौरविले आहे. परासरन् यांच्या बेजोड युक्तिवादामुळे सर्वोच्च न्यायालय, केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय कायम राखील, अशी अनेकांना आशा आहे.
भारतात जी प्राचीन काळापासून समाजव्यवस्था चालत आली आहे, त्या पितृसत्ताक व्यवस्थेमुळे इथे नेहमीच महिलांवर अन्याय झाला आहे. तो अन्याय दूर करण्यासाठी या पितृसत्ताक व्यवस्थेला नष्ट करावे लागेल, अशी मानसिकता आणि दृढ धारणा असलेली बरीच सुशिक्षित मंडळी भारतात आहे. त्याला कम्युनिस्टांची साथ आहे. कारण कम्युनिस्टांना त्यांच्या लाल क्रांतीची बीजे पेरण्यासाठी भारतातील समाजव्यवस्था उद्ध्वस्त करायची आहे.
श्री. परासरन् यांनी आपल्या युक्तिवादात सांगितले की, केरळचा समाज शिक्षित आहे. केरळातील ९५ टक्के महिला शिक्षित आहेत. त्या स्वतंत्र आहेत. केरळमध्ये मातृसत्ताक पद्धती आहे. त्यामुळे शबरीमलै मंदिरातील ही प्रथा पितृसत्ताक पद्धतीवर आधारित आहे, असे समजणे मुळातच चूक आहे. शबरीमलै येथील महिलांना प्रवेशबंदीच्या प्रथेची तुलना सती प्रथेशी करणेही चूक आहे. खरे म्हणजे सती प्रथेला हिंदू धर्मात कुठेही स्थान नाही. त्यामुळे पितृसत्ताक पद्धतीच्या भावनेतून या प्रश्‍नाकडे आपल्याला बघता येणार नाही.
श्री. परासरन् म्हणाले की, योग्य प्रश्‍नाने योग्य उत्तर मिळते आणि चुकीच्या प्रश्‍नाने चूक उत्तर मिळत असते. त्यासाठी परासरन् यांनी एक दृष्टांत दिला. एखाद्याने विचारले की, ‘‘मी पूजा करताना धूम्रपान करू शकतो का?’’ यावर त्याच्या थोबाडित बसेल. परंतु, त्याने जर विचारले की, ‘‘मला धूम्रपानाचे व्यसन असतानाही मी पूजा करू शकतो काय?’’ तर त्याची विनंती आनंदाने मान्य होईल. त्यामुळे या प्रकरणात योग्य उत्तर मिळण्यासाठी योग्य प्रश्‍न विचारणे न्यायालयाला गरजेचे आहे. न्यायालयाने स्त्रीवादी चळवळ्यांचे म्हणणे ऐकणे जसे गरजेचे आहे तसेच, ही प्राचीन परंपरा टिकवून ठेवणार्‍या लोकांचेही म्हणणे ऐकून घेणे आवश्यक आहे. आमच्या पूर्वजांना काहीही समजत नव्हते आणि जीवनाच्या सर्व पैलूंचे ज्ञान फक्त आम्हालाच झाले आहे, या गृहीतावर आपण पुढे जाणे योग्य नाही. याचिकाकर्त्यांनी (म्हणजे तथाकथित स्त्रीवाद्यांनी) म्हटले की, एखादी स्त्री ५० वर्षे वय होण्याआधीच मरण पावली तर मग तिने मंदिर प्रवेश केव्हा करायचा? श्री. परासरन् म्हणाले की, प्रत्येक व्यक्ती त्याचे नशीब स्वत:सोबत नेत असतो. त्यामुळे ही परंपरा बंद करण्यासाठी हे कारण लागू होत नाही.
भगवान अय्यप्पांचे स्वरूप ब्रह्मचारी आहे; स्त्रीद्वेष्टा नाही. जे भक्त शबरीमलैला भेट देतात त्यांनाही ब्रह्मचर्य व्रताचे परिपूर्ण पालन करावे लागते. त्यामुळे यात्रेच्या दरम्यान त्यांना स्त्रीसंग पूर्णत: त्याज्य असतो. त्यामुळे स्त्रीद्वेष म्हणून ही प्रथा सुरू झाली नाही तर, या देवतेचे नैष्ठिक ब्रह्मचारी स्वरूप लक्षात घेता ती सुरू झाली आहे.
नाक खुपसणे
अशा रीतीने सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद सुरू आहे. त्याचा काय निकाल लागायचा तो लागेल. परंतु, प्रश्‍न हा आहे की, या प्रकरणात न्यायालयाला नाक खुपसण्याचे कारणच काय? जर संपूर्ण भारतातील यच्चयावत् नागरिकांच्या संविधानप्रदत्त अधिकारांचे रक्षण करण्याची जबाबदारी न्यायालयावर आहे, असे मानले तर, मग मुस्लिमांच्या बाबतीत न्यायालय आपल्या डोळ्यांवर पट्टी का बांधते? याचे उत्तर न्यायालयाने दिले पाहिजे. समाजात वेळोवेळी सुधारणा केल्याच पाहिजेत, यात वादच नाही. परंतु, त्यासाठी केवळ आणि केवळ हिंदू धर्मीयांनाच का म्हणून धरायचे? जर भारतातील मुसलमान व ख्रिश्‍चन संविधानाने दिलेल्या प्रत्येक अधिकाराचे आणि विशेष अधिकाराचेही लाभ प्राप्त करीत असतील तर न्यायालयाने त्यांच्याही सामाजिक कुप्रथा बंद करण्यास पुढाकार घ्यायला हवा. दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. हा अन्याय गेली ७० वर्षे भारतातील हिंदू समाजाने मूकपणे सोसला आहे. आता मात्र तो पुरेसा जागृत झाला आहे. त्यामुळे न्यायालयाचा हा पक्षपात तो किती सहन करतो, माहीत नाही.
आज भारतात लाखो मंदिरे आहेत. त्यातील दहा-पाच मंदिरांमध्ये स्थानिक प्रथेप्रमाणे काही नियम असतील, तर त्या नियमांविरुद्ध एवढी आरडाओरड का म्हणून? कुठल्याही गुरुद्वारात जाताना डोके झाकून जावे लागते. मंदिरात पादत्राणे काढून जावे लागते. काही मंदिरात पुरुषांना कंबरेवर उघड्याने जावे लागते (परंतु, महिलांना हा नियम लागू नाही) अशा प्रकारे विविध मंदिरांचे वेगवेगळे नियम आहेत. ते स्वच्छ मनाने पाळण्यातच खरी मौज आहे. ते पाळल्याने कुणाच्या आयुष्यात काही न्यून आल्याचे ऐकिवात नाही.
मग हा अट्टहास का? भारतातील सर्वच मंदिरे ही धार्मिक नाहीत. काही तांत्रिक आहेत. तांत्रिक मंदिरात काही रीतिरिवाज अतिशय कट्टरतेने पाळले जातात. उपासनेच्या बाबतीतही हेच आहे. काही देवतांची उपासना फारच सोपी असते. राम, कृष्ण, विठ्ठल, विष्णू इत्यादी. परंतु, काही देवता अशा आहेत, जसे दत्तात्रेय, नाग, दुर्गा व कालीमाता इत्यादी, त्यांची उपासना विशिष्ट नियमांनीच करावी लागते. हे मान्य करण्याने अशा कुठल्या मानवाधिकारांची हानी होते, समजत नाही. बाकी हिंदू धर्मातील कुठल्याही रीतिरिवाजाला न मानणारे, या अशा बाबतीत फारच उत्साही दिसत असतात. त्यांचा हा उत्साह परदेशी ख्रिश्‍चन संस्थांकडून येत असलेल्या भरघोस देणग्यांमुळेच तर नसेल ना? हिंदू समाजाने या सर्व गोष्टींचा अतिशय गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. एखाद्या मंदिरातील प्रथा किंवा सामाजिक परंपरा बदलायच्या असतील तर त्या मंदिराला, त्या समाजाला अधिकार दिले पाहिजे. त्यात न्यायालयाने नाक खुपसता कामा नये, हे आता ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे. ती संधी हिंदू समाजाने आता गमवू नये, एवढीच माफक अपेक्षा आहे.

Posted by : | on : 5 Aug 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, श्रीनिवास वैद्य, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, श्रीनिवास वैद्य, स्तंभलेखक (367 of 1226 articles)

Chandra Grahan Lunar Eclipse
टेहळणी : डॉ.परीक्षित स. शेवडे | पुराणमित्येव न साधु सर्वं न चापि काव्यं नवमित्यवद्यम्। सन्तः परीक्ष्यान्यतरत् भजन्ते मूढः परप्रत्ययनेय बुद्धिः॥ ...

×