ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, स्तंभलेखक, हितेश शंकर » शब्दच ब्रह्मलीन झाला!

शब्दच ब्रह्मलीन झाला!

॥ रोखठोक : हितेश शंकर |

त्यांच्या शब्दांप्रमाणेच अटलजीदेखील शाश्‍वत आहेत. भारतमाता आपल्या अशा सुपुत्रांना नेहमी स्मरणात ठेवते. अटलजी साक्षात् शब्द होते. कवित्वाचा शब्द, हुंकाराचा शब्द, राष्ट्राचा शब्द, आशेचा शब्द, भारतीयतेचा शब्द, विश्‍वासाचा शब्द, प्रेमाचा शब्द… असे म्हणतात, शब्द ब्रह्म आहे. तो शब्दच आता ब्रह्मलीन झाला आहे. त्या महामानवाची हीच तर अमिट-अटल स्मृती आम्हा सर्वांच्या मनात अंकित आहे…

Atal Bihari Vajpayee2

Atal Bihari Vajpayee2

देशाच्या ७२व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांची उत्सवी चमक दु:खात परिणत करणारी पहिली बातमी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतून (एम्स) आली.
अटलजींची प्रकृती गंभीर… संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी अटलजींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी एम्सला पोहोचले.
देशाचे माजी पंतप्रधान, पाञ्चजन्यचे पहिले संपादक आणि लोकप्रिय नेते अटलबिहारी वाजपेयी, ११ जूनपासून श्‍वास घेण्यास त्रास आणि किडनीच्या इन्फेक्शनवर उपचार घेण्यासाठी एम्समध्ये होते. १६ ऑगस्टच्या दुपारपर्यंत शंका-कुशंकांच्या ढगांनी सार्‍या देशाला आणि विशेषत: दिल्लीला झाकोळून टाकले.
भारतीय जनता पार्टी कार्यकारिणीची बैठक स्थगित करण्यात आली. दिल्लीतील अटलजींच्या घराबाहेर तैनात सुरक्षारक्षकांची संख्या वाढविण्यात आली.
कुठल्याही औपचारिक घोषणेआधी एका टीव्ही वृत्तवाहिनीने अटलजींच्या निधनाची बातमी दिली. सोशल मीडियावर अस्पष्ट बातम्यांच्या आधीच सुरू असलेल्या पुरात, व्हॉट्सअ‍ॅपवर या चॅनलचा स्क्रीनशॉट वेगाने फिरू लागला.
एकाएकी ज्या घाईगडबडीत बातमी फिरली, त्याच्या दुप्पट वेगाने तिला थांबविण्यात आले.
अटलजी आहेत, खबरदार! उगीचच अनावश्यक उतावीळपणा नको! न्यूजरूममधील संपादकांचा सज्जड दम, औपचारिक घोषणेपूर्वीच सीमा पार करण्याच्या मर्यादेपर्यंत गेलेल्या त्या वार्ताहरांना एक धडा होता.
या क्षणभराच्या ‘ब्रेकिंग न्यूज’मध्ये कोट्यवधी मनांना विदीर्ण करणार्‍या तीव्र भावनांचे कढ ऐकू येण्याची शक्यता होती.
अटलबिहारी वाजपेयी असण्याचा काय अर्थ असेल! आणि त्यांच्या नसण्याने काय फरक पडतो! काही वर्षांपासून निश्‍चेष्ट पडलेले अटलजी काहीच तर करत नव्हते! तरीही त्यांच्याबाबत इतकी संवेदनशीलता…
गेल्या लोकसभा निवडणुकीत मतदान करून चुकलेल्या आणि २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानासाठी कंबर कसलेल्या युवा भारताच्या पिढीने कदाचित प्रथमच हे अनुभवले असेल. या संवेदनशीलतेतच कुणाच्या ‘अटलजी’ असण्याचा अर्थ दडलेला आहे.
जर प्रांत, भाषा, जातींचा पलिता आणि सामाजिक भेगांना अधिक खोल करणारा राजकीय फलक क्रूरता, कपट आणि उथळपणाच्या उंच लाटांनी मदमत्त होताना दिसत असेल, तर अटलजींचे सदन-संदर्भ दिले जातात. सत्ताकारणाच्या समुद्रात मार्ग दाखविणारे अविचल दीपगृह!
भारताच्या मातीत जन्म घेणार्‍या सौभाग्यशाली राजकीय नेत्यांमध्ये असे विरळेच असतील, जे आपली कला, संस्कृती आणि साहित्याशी सतत जोडले राहूनही आपल्या राजकारणाच्या चक्रव्यूहांतही स्वत:च्या लेखणीला विराम देत नाहीत. उदारमनस्क आणि कर्मठ राजकीय नेत्याच्या रूपात अटलबिहारी वाजपेयी यांची प्रतिमा एक कुशल राजकीय नेता, दूरद्रष्टा आणि कालजयी कवी अशीच राहिली. त्यांचे विशाल व्यक्तित्व विश्‍वव्यापी आणि सर्वसमावेशक होते. असे म्हटले की, त्यांच्या अद्भुत वक्तृत्व शैलीची मोहिनी सार्‍या देशभर होती, तर ते तिळमात्रही अतिशयोक्त होणार नाही. सोबतच, जागतिक मुद्यांवर भारताच्या मुत्सद्देगिरीची दृढता रेखांकितकरणारे पहिले भारतीय राजनेतादेखील अटलजीच होते, हे मान्य केले पाहिजे.
गंभीरातील गंभीर विषयाला हलक्या-फुलक्या आणि विनोदी पद्धतीने प्रतिपादित केल्यावरही त्याची भेदकता आणि गंभीरता कायम राखण्याची त्यांची अनोखी शैली अतुलनीयच होती. स्वातंत्र्यानंतर भारताच्या इतिहासात कदाचित असा नेता एकमेवच असावा की, जो प्रदीर्घ काळ राजकारणाच्या केंद्रस्थानी सन्मान आणि प्रतिष्ठेसह कायम राहिला. त्यांच्या साध्या साध्या गोष्टीदेखील बातम्या व्हायच्या, याला अटलजींच्या संवाद-कौशल्याची कमालच म्हटली पाहिजे. ते जेव्हाही बोलायचे, जनसमुदायाच्या हृदयांना जिंकायचे. त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे आणि कुशल संवादांमुळे संसदेतील चर्चेचा गौरव वाढला आणि त्याचा स्तर उंचावला गेला. लाखोंच्या गर्दीला संबोधित करतानाही जनतेची नाडी पकडणे आणि त्यांना बांधून ठेवणे, याचा जणूकाही एखादा मंत्रच त्यांच्याकडे असावा!
लेखनापासून आपली जीवनयात्रा सुरू करणार्‍या अटलजींच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्ष आणि चढउतार दिसून येतात. अटलजींना कुशल वक्तृत्वाची कला तसेच काव्याची कला त्यांचे वडील पं. कृष्णबिहारी वाजपेयी यांच्याकडून वारशात मिळाली. त्यांचे वडील तत्कालीन ग्वाल्हेर संस्थानात विख्यात कवी आणि कुशल वक्ते होते. अटलजींचे आजोबादेखील संस्कृतचे मूर्धन्य विद्वान होते, परंतु अटलजींच्या वाणीवर ज्याप्रकारे साक्षात् सरस्वती विराजमान होती, ती प्रयत्नांती अर्जित केल्यापेक्षा एक ईश्‍वरप्रदत्त कृपा असल्याचे अनुभवास येते.
कोण होते अटलजी? एकदा एका पत्रकाराने उत्सुकतेपोटी विचारले होते- अटलजी, हे असे शब्द तुमच्या जिभेवर कसे येतात? काय एखादी दिव्य प्रेरणा?
उत्तर देताना अटलजी एखाद्या लहान मुलासारखे लाजले, संकोचले आणि विषय बदलण्याची वाट बघू लागले.
संवादकौशल्य आणि आपल्या भाषणाच्या कलेसाठी अटलजी विख्यात होते. श्रोत्यांमध्ये अतिशय लोकप्रिय होते. गूढ राजनीती, कठीण अर्थशास्त्र आणि जटिल सामाजिक विषयांचे जे सरळ, साधे विवेचन अटलजींच्या शब्दावलीत झाले, ते तसे त्या विषयांच्या पंडितांनाही कठीण आहे.
कोण होते अटलजी? इकडेतिकडे बघून परिभाषित करणे कठीण आहे. उत्तराखंड, छत्तीसगड आणि झारखंड राज्यांचे निर्माते अटलजी. ऑपरेशन शक्ती (पोखरण-२) परमाणू परीक्षण करून जगात भारताला नव्याने प्रतिष्ठित करणारे अटलजी. चांद्रयान-१ परियोजनेला मंजुरी देणारे अटलजी. देशाला जमिनीत, हवेत, तरंगांमध्ये, नद्यांमध्ये, रस्त्यांमध्ये जोडणारे, एकजुटता देणारे अटलजी. राष्ट्रीय महामार्ग विकास योजना सुरू करणारे अटलजी. देशाला स्वर्णिम चतुर्भुज देणारे अटलजी. उत्तर-दक्षिण आणि पूर्व-पश्‍चिम कॉरिडॉर साकार करणारे अटलजी. प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनावाले अटलजी. दिल्ली मेट्रो योजना आणणारे अटलजी. डॉ. भूपेन हजारिका सेतू निर्माण करणारे अटलजी. जम्मू आणि बारामुल्ला रेल्वेलिंक आणि ‘चिनाब ब्रिज’ देणारे अटलजी. संरक्षण गुप्तचर विभाग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारसारख्या संस्थांचे सृजन करणारे अटलजी. माहिती तंत्रज्ञानात भारताला उत्कर्षावर नेणारे अटलजी. सर्व शिक्षा अभियान देणारे अटलजी. प्रवासी भारतीय सन्मान सुरू करणारे अटलजी. कारगिल युद्धाच्या काळात देशाला विजयी नेतृत्व देणारे अटलजी. किती स्मरणात ठेवायचे…?
आणि या आधीही किती जणांना स्मरण आहे अटलजींची परराष्ट्र व्यवहार मंत्रिपदाची कारकीर्द? जिमी कार्टर यांचा भारत दौरा अनेकांना स्मरत असेल; परंतु मोशे दायनही भारतात आले होते. ती कदाचित इस्रायलच्या कुठल्या वरिष्ठ नेत्याची पहिलीच भारतयात्रा असावी. भारत इराणचाही मित्र होता आणि इस्रायलचाही. चिन्यांचा हेकडपणा तेव्हाही होताच आणि ते अटलजीच होते जे व्हिएतनामवर चिनी हल्ल्याचा निषेध म्हणून दौरा अर्धा सोडून परत आले होते.
अटलजींचे व्यक्तित्व इतके व्यापक आहे की, त्यांच्यावर अनेक पुस्तके लिहिता येतील, लिहिली गेलीही आहेत. परंतु, त्यांच्यावर लिहिल्या गेलेल्या लेखात, त्यांच्यात विद्यमान कालजयी कवीची चर्चा न करणे, त्यांच्या व्यक्तित्वावर अन्याय होईल. त्यांच्या कविता वाचून विश्‍वासच बसत नाही की, एखादा राजकीय नेता इतका उत्कृष्ट कवी असू शकतो. त्यांच्या कवितेत राष्ट्रप्रेम, जीवनसंघर्ष, विश्‍वशांती आणि राजकीय नेता म्हणून त्यांच्या मनातील खळबळ, याचे चपखल वर्णन आहे. जेव्हा त्यांनी लिहिले-
खड़े देहली पर हो किसने पौरूष को ललकारा,
किसने पापी हाथ बढ़ाकर मां का मुकुट उतारा?
तेव्हा ते राजकीय व्यक्तीऐवजी एका योद्ध्याप्रमाणे राष्ट्राच्या शत्रूंना आव्हान देत ललकारत होते. एका दुसर्‍या कवितेत, संघर्षानंतर मिळालेल्या स्वातंत्र्याच्या सुरक्षेसाठी सल्ला देताना त्यांनी म्हटले होते-
उस स्वर्ण दिवस के लिए आज से कमर कसें, बलिदान करें।
जो पाया उसमें खो न जायें, जो खोया उसका ध्यान करें।
भारताचा आत्मसन्मान अक्षुण्ण ठेवण्यासाठी त्यांनी लिहिले-
दांव पर सब कुछ लगा है,
रुक नहीं सकते हैं,
टूट सकते हैं, मगर
हम झुक नहीं सकते हैं।
अटलजींच्या या कविता बघून वाटते की, जणूकाही ते वीररसाचे कवी आहेत. परंतु, आम्ही त्यांची एक अन्य कविता ‘अपने ही मन से कुछ बोलें’वर नजर टाकतो तर असे वाटते की, जणू कोणी दार्शनिक लिहीत आहे आणि कवितेच्या माध्यमातून सांस्कृतिक राष्ट्रवादाचा संदेश देत आहे. ही कविता खूपच मर्मस्पर्शी आहे आणि मानवी जीवनाच्या यात्रेचा वृत्तान्त यात वर्णिलेला आहे. आपल्या आत्मचेतनेत डोकावण्याचा तसेच त्याचे आत्मविलोकन करण्याचा सुंदर संदेशही त्यात निहित आहे. संपूर्ण जीवनचक्राचे सार या कवितेत कशा प्रकारे संमीलित आहे, हे कवितेच्या खालील ओळींतून लक्षात येईल-
क्या खोया, क्या पाया जग में,
मिलते और बिछड़ते मग में,
मुझे किसी से नहीं शिकायत,
यद्यपि छला गया पग-पग में,
एक दृष्टि बीती पर डालें,
यादों की पोटली टटोलें।
पृथ्वी लाखों वर्ष पुरानी,
जीवन एक अनन्त कहानी,
पर तन की अपनी सीमाएँ,
यद्यपि सौ शरदों की वाणी,
इतना काफी है अंतिम दस्तक पर
खुद दरवाजा खोलें।
जन्म-मरण का अविरत फेरा,
जीवन बंजारों का डेरा,
आज यहाँ, कल कहाँ कूच है,
कौन जानता, किधर सवेरा,
अँधियारा आकाश असीमित, प्राणों के पंखों को तौले।
अपने ही मन से कुछ बोले!
एकूणच काय की, कुशल संघटकाची अथवा मुरब्बी राजकीय नेत्याची भूमिका असो, सहृदयी कालजयी कवी अथवा आंतरराष्ट्रीय विश्‍लेषकाची, अटलजींसारखा दुसरा कुणी नाही. हा अटलजींच्या अभूतपूर्व बुद्धिमत्तेचाच परिणाम आहे की, त्यांना विरोधी आणि दुसर्‍या पक्षांतही तोच सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त आहे, जो त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेता असल्यामुळे त्यांच्या पक्षात आहे. जागतिक स्तरावर दूरद्रष्टा, दृढ निश्‍चयी, अविचल आणि तेजस्वी प्रतिभेचे धनी असलेल्या अटलजींच्या व्यक्तित्वाला आम्ही पारखले असता, त्यांचे व्यक्तित्व सर्वात उंचीवरील व्यक्तित्वाच्या सीमेला स्पर्श करताना दिसते. आजकालच्या चारित्र्यहनन आणि चिखल उडविणार्‍या राजकारणापासून दूर स्वच्छ-शुभ्र छबीचे तसेच व्यापक व्यक्तित्व आणि राष्ट्राच्या गौरवाला शिखरावर नेण्यासाठी समर्पित राहण्यास सदैव तत्पर राहणार्‍या विरळ्या राजकीय नेत्यांमध्ये त्यांना सर्वोच्च स्थान प्राप्त आहे. अटलजी सत्तेसाठी सिद्धान्तांशी तडजोड न करणारे तसेच वैचारिक स्वातंत्र्याच्या परंपरेचे संवाहक होते. त्यांच्या संपूर्ण व्यक्तित्वाचे मूल्यांकन केल्यावर हा विश्‍वास अधिकच दृढ होतो की, संस्कारित व्यक्ती कितीही उच्च पदावर गेली, तरी ती आपल्या सद्गुणांना कधीही सोडत नाही.
त्यांनी लिहिले होते-
हिन्दू तन मन, हिन्दू जीवन, रग-रग हिन्दू मेरा परिचय।
त्यांच्या शब्दांप्रमाणेच अटलजीदेखील शाश्‍वत आहेत. भारतमाता आपल्या अशा सुपुत्रांना नेहमी स्मरणात ठेवते. अटलजी साक्षात् शब्द होते. कवित्वाचा शब्द, हुंकाराचा शब्द, राष्ट्राचा शब्द, आशेचा शब्द, भारतीयतेचा शब्द, विश्‍वासाचा शब्द, प्रेमाचा शब्द…
असे म्हणतात, शब्द ब्रह्म आहे. तो शब्दच आता ब्रह्मलीन झाला आहे. त्या महामानवाची हीच तर अमिट-अटल स्मृती आम्हा सर्वांच्या मनात अंकित आहे… •••

Posted by : | on : 2 Sep 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, स्तंभलेखक, हितेश शंकर.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, स्तंभलेखक, हितेश शंकर (528 of 1288 articles)

Atal Bihari Vajpayee1
प्रासंगिक : डॉ.अ‍ॅड. विलास सावजी | वरील शब्दांचा अर्थ सर्वांनाच माहिती असणार. येथील संदर्भ वेगळा असल्यामुळे थोडा विस्तार करतो. तीर्थरूप ...

×