ads
ads
विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

►जावडेकर यांची घोषणा, नवी दिल्ली, १५ जानेवारी – आगामी…

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

•पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्ला, बालनगिर, १५ जानेवारी –…

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

•ख्रिश्‍चनांच्या कार्यक्रमातच राजनाथसिंह यांनी सुनावले, नवी दिल्ली, १५ जानेवारी…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:10
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी » शब्दातीत शब्दप्रभू…

शब्दातीत शब्दप्रभू…

॥ आदरांजली : पद्मजा फेणाणी-जोगळेकर, ज्येष्ठ गायिका |

अटलजी अजातशत्रू होते. त्यांना विरोधक होते पण त्यांच्याशी कोणाचं शत्रुत्व नव्हतं. सगळ्या पक्षांमधील नेते, कार्यकर्ते त्यांच्यावर प्रेम करत असत. कवितांमधूनच त्यांचं मन किती संवेदनशील, कोमल होतं हे समजतं. त्यांच्या कवितांमध्ये अनेक सौंदर्यस्थळं आढळतात. तुमचं सर्वात आवडतं प्रेक्षणीय स्थळ कोणतं, असं विचारता ते ‘मनाली’चा नामनिर्देश करायचे. हे सर्वात सुंदर आणि मला प्रिय असणारं ठिकाण आहे असं ते सांगायचे. इतकंच नव्हे तर मनाली नामक स्थळाला ते आपली सखी, मित्र मानत असत. म्हणजेच एखाद्या निसर्गस्थळालाही इतक्या जिवंतपणे पाहण्याची दृष्टी त्यांना लाभली होती.

Atalji2

Atalji2

अटलबिहारी वाजपेयी यांचं निधन ही मनात वेदनेची कळ उमटवणारी घटना आहे. संपूर्ण भारतवर्षावर गारुड घालणारं हे नावं होतं. राजकारणाच्या क्षेत्रात पाच दशकांपेक्षा अधिक काळ घालवूनही आदर्शांच्या कित्येक कसोट्यांवर खरं उतरलेलं हे एक हुशार व्यक्तिमत्त्व होतंच, त्याचबरोबरच प्रखर वणव्यातही अंतरीचा काव्यमोहोर जपणारं एक हळवं कलासक्त मन त्या देहात होतं. म्हणूनच अटलजी राजकारणीच नव्हे, तर संवेदनशील कवी म्हणूनही चिरंतन स्मरणात राहतील. त्यांना विनम्र आदरांजली.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाची बातमी देशाच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजवणारी आणि पोकळी निर्माण करणारी आहेच, त्याचबरोबर त्यांच्या जाण्याने काव्यभान जपणारा एक संवेदनशील कवी हरपल्याचं दु:खही खूप मोठं आहे. ‘भारतरत्न’ अटलबिहारी वाजपेयी या नावाभोवती अनेक कंगोरे होते. त्यांच्यासारख्या व्यक्तीच्या रुपाने भारताला एक रत्नच मिळालं होतं, जे आता हारातून गळून पडलं आहे. त्यांच्या निधनाने भारतमातेचा एक मानबिंदू काळाने पुसून टाकल्याची सार्वत्रिक भावना आहे.
अत्यंत मृदू स्वभाव आणि संवेदनशील मन ही अटलजींकडील खरी संपत्ती… एका प्रचंड क्षेत्रफळ असणार्‍या देशाचं नेतृत्व करणार्‍या या नेत्याने स्वप्न पाहिलं ते युद्धविहीन विेशाचं… अगदी कुरापतखोर शत्रूंचा निकटचा सहवास असतानाही त्यांची भाषा आणि कृती युद्धज्वर वाढवणारी नव्हे, तर शमवणारीच होती. दुबळ्याच्या तोंडी शांतीची भाषा असेल तर त्याचा योग्य परिणाम होत नाही, हे जाणत असणार्‍या या द्रष्ट्या नेत्याने देशाला अण्वस्त्रसिद्ध केलं पण, तो विखार आणि उन्माद उक्ती आणि कृतीतून कधी दाखवून दिला नाही.
उलटपक्षी ‘जंग न होने देंगे।’ हा निर्धार कायम ठेवला. त्यांच्यावर प्रेम करणार्‍या, त्यांची भक्ती करणार्‍या, त्यांच्याविषयी आदर असणार्‍या प्रत्येकाने या सद्भावनेचा सन्मान केला आणि त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे सत्तेतूनच नव्हे, तर राजकारणाच्या पटलावरून बाजूला झाल्यानंतरही देश अटलजींना विसरला नाही. अशा या प्रगल्भ आणि लाघवी व्यक्तिमत्त्वाचा परिचय होणं, त्यांच्या कवितांवर स्वरसाज चढवण्याचं भाग्य मिळणं माझ्यासाठी गौरवास्पद आहे. अटलजींच्या ‘मेरी इक्क्यावन्न कविताएं’ मधील कवितांचं गायन मी केलं, जे कारकिर्दीतील एक महत्त्वपूर्ण काम होतं असं मी म्हणेन. यातील ‘गीत नया गाता हूं’ या कवितेतील शब्दांनी तर मला वेड लावलं, त्या शब्दांनी माझ्यावर मोहिनी घातली. ते शब्द असे आहेत…
हार नही मानुंगा
रार नही ठानुंगा
काल के कपालपर
लिखता मिटाता हूँ
गीत नया गाता हूँ
त्यांचे हे शब्द पुढच्या पिढीला विेशास आणि खंबीर प्रेरणा देणारे आहेत. अशा शब्दांमुळे पुढच्या पिढीमध्ये आशावाद निर्माण होत असतो. काहीही झालं तरी मी हार मानणार नाही, असं या कवितेच्या ओळींमधून वाजपेयींनी सुचवलं होतं. त्यांच्यातील हा आशावाद, ती असीम ऊर्जा, तडफदारपणा देशाचं भविष्य घडवेल यात शंका नाही. आणखी एका कवितेत वाजपेयी म्हणतात,
जंग न होने देंगे
रुसी बम हो या अमेरिकी
खुन एक बहना है
जो हम पर गुजरी
बच्चो के संग न होने देंगे
अशा ओळींमधून हा माणूस किती मानवतावादी दृष्टिकोन ठेवणारा होता हे दिसून येतं. अशा माणसाला भारतरत्न पुरस्कार मिळाला तेव्हा खरंतर त्या पुरस्काराचाच सन्मान झाला होता. वाजपेयी हे उत्तुंग उंची गाठलेले वक्ते होते. कुशल राजकारणी होते. त्यांचे विचार, त्यांची कृती, त्यांचा आचार वंदनीय होता. अशा या मनस्वी कवीच्या अनेक कविता गाण्याचं भाग्य मला लाभलं याचा अभिमान वाटतो. संगीत, साहित्य यांची उत्तम जाण असणार्‍या या व्यक्तीबरोबर छान गप्पा मारण्याचाही योग अनेकदा आला. मला त्यांचं प्रेम, आशीर्वाद लाभले ही फार भाग्याची गोष्ट म्हणावी लागेल. त्यांची आणि माझी अनेकदा भेट झाली. भेटल्यानंतर आमच्यामध्ये खूप छान गप्पा व्हायच्या. त्यांचा प्रसन्न चेहरा पाहूनच माझ्यावरील ताण दूर व्हायचा. त्यांच्याशी होणारी प्रत्येक भेट हा माझ्यासाठी आनंदी योग असायचा. भेटल्यावर त्यांच्या चेहर्‍यावर, त्यांच्या डोळ्यांमध्ये आनंद दिसायचा. त्यामुळे मला भरून यायचं. मी त्यांना त्यांच्याच कविता संगीतबद्ध करून ऐकवायचे तेव्हा तेव्हा त्यांच्या जवळ असणारे लोक म्हणायचे, ‘आज हमारे साब खुश हुए।’ मलाही ते ऐकून खूप बरं वाटायचं.
आज अटलजींच्या अनेक आठवणी माझ्या मनात रेंगाळत आहेत. प्रत्येक आठवण माझ्यासाठी लाख मोलाची आहे. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात नऊ तारखेला क्रांतीदिन साजरा केला जातो. १९९७ मध्ये या दिवशी अटलजी मुंबईत आले होते. त्यावेळी ते तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निवासस्थानी राहिले होते. मी त्यांना तिथे भेटले. त्या भेटीदरम्यान त्यांच्या काही कविता ऐकवल्या. त्यांनी शांतपणे ऐकून घेतल्या. त्यांना अपार आनंद झाल्याचं स्पष्ट दिसत होतं. माझं संपल्यावर ते म्हणाले, ‘मैं मुक्तछंद में लिखता हूं। फीर भी तुमने वो गाया है। मैं बहुत खुश हुआ।’ असं म्हणून त्यांनी टाळ्या वाजवल्या. त्या नंतर ते
म्हणाले, ‘ये तालिया कविता के लिए नही, बल्की तुम्हारे सुरोें के लिए है।’ असा हा विनम्र स्वभावाचा, दुसर्‍यांना दाद देणारा माणूस होता. दिल्लीला कार्यक्रमाच्या किंवा इतर कोणत्याही निमित्ताने गेले तरी मी अटलजींची आवर्जून भेट घेत असे. त्यामुळे त्यांच्याशी अनेकदा भेटीचे योग आले. त्या प्रत्येक भेटीत त्यांच्यातील रसिक आणि संवेदनशील माणसाचा नव्याने परिचित होत गेला.
दरवर्षी मे महिन्याच्या एक तारखेला महाराष्ट्र दिन साजरा होतो. २००३ मध्ये या दिवसाच्या निमित्ताने अटलबिहारी वाजपेयी मुंबईत आले होते. त्यावेळी ते पंतप्रधानपदी होते. या निमित्ताने महाराष्ट्र दिनासाठी महाराष्ट्रात आलेले ते पहिलेच पंतप्रधान होते. देश-विदेशात इतका नावलौकिक मिळवूनही अखेरपर्यंत या माणसाचे पाय मातीचेच होते. एकेठिकाणी त्यांनीच म्हटलं आहे, ‘मेरे प्रभु, मुझे इतनी उँचाइं मत देना के गैरोंको गले लगा ना सकू, इतनी रुखाई कभी मत देना।’ सुमित्रा महाजन केंद्रीय मंत्रिपदावर होत्या तेव्हाची एक आठवण आहे. त्यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांना माझ्या गाण्याची सीडी ऐकवली होती. वाजपेयी यांनी ती ऐकली आणि म्हणाले, ‘ऐसी शरारत पद्मजाही कर सकती है।’ अटलजींच्या मनात अशी आपुलकी ओतप्रोत भरलेली होती. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने, रसिकतेने आणि गुणांनी मी नेहमीच भारावून जायचे.
स्वयंको दुसरोंकी दृष्टी से मै देख पाता हूं। असं म्हणणारा हा कवी, नेता, पंतप्रधान लाभला हे आपलं अहोभाग्य. त्यांना भारतरत्न मिळालं तेव्हा संपूर्ण देशात आनंदाची लहर पसरली होती कारण, ते अजातशत्रू होते. त्यांना विरोधक होते पण त्यांच्याशी कोणाचं शत्रुत्व नव्हतं. सगळ्या पक्षांमधील नेते, कार्यकर्ते त्यांच्यावर प्रेम करत असत. कवितांमधूनच त्यांचं मन किती संवेदनशील, कोमल होतं हे समजतं. त्यांच्या कवितांमध्ये अनेक सौंदर्यस्थळं आढळतात. तुमचं सर्वात आवडतं प्रेक्षणीय स्थळ कोणतं, असं विचारता ते ‘मनाली’चा नामनिर्देश करायचे. हे सर्वात सुंदर आणि मला प्रिय असणारं ठिकाण आहे असं ते सांगायचे. इतकंच नव्हे तर मनाली नामक स्थळाला ते आपली सखी, मित्र मानत असत. म्हणजेच एखाद्या निसर्गस्थळालाही इतक्या जिवंतपणे पाहण्याची दृष्टी त्यांना लाभली होती. ‘भारत जमीं का टुकडा नहीं, जिता जागता राष्ट्रपुरुष है।’ असं ते आपल्या एका कवितेत म्हणतात. यातूनही भारत त्यांच्यासाठी माती-दगडं-डोंगर आणि दर्‍यांनी व्यापलेला भूभाग नव्हता तर राष्ट्रपुरुष म्हणूनच ते याकडे पाहात असल्याचं कळतं. इथल्या प्रत्येक धुळीकणात ते ईश्‍वराचं अधिष्ठान शोधायचे. प्रत्येक थेंबात त्यांना गंगाजलाचं पावित्र्य सापडायचं. अशा या देशासाठीच जगणार आणि त्याच्यासाठीच मरणार, असा प्रखर राष्ट्रवाद त्यांच्या कवितांमधून आपल्याला दिसतो. त्याच्या नसानसात हाच राष्ट्रवाद भिनलेला होता. खरं तर त्यांच्याविषयी बोलावं तेवढं थोडंच आहे.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी, गुणांविषयी बोलायचं झालं तर शब्दही कमी पडतील अशी स्थिती आहे. या माणसानं आपल्या आयुष्यात जे केलं त्याला तोड नाही. केवळ स्वत:चा विचार न करता त्यांनी कायमच जनसामान्यांचा विचार केला. त्यामुळे त्यांच्या जाण्यानं केवळ राजकीय वर्तुळातच नव्हे, तर जनसामान्यांच्या भावविश्‍वात आंदोलनं निर्माण केली आहेत. अपेक्षित असला तरी हा धक्का सोसायला नक्कीच थोडा वेळ लागेल…अटलजींना विनम्र अभिवादन…

Posted by : | on : 26 Aug 2018
Filed under : आसमंत, पुरवणी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी (270 of 780 articles)

Ajit Wadekar2
आदरांजली : चंदू बोर्डे, ज्येष्ठ क्रिकेटपटू | इंजिनीअरिंगचं शिक्षण घेणारे अजित वाडेकर मित्राच्या सल्ल्यावरून क्रिकेटकडे वळले आणि नंतर त्यांचं अवघं ...

×