ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, ल.त्र्यं. जोशी, स्तंभलेखक » शरद पवार नव्या वळणावर?

शरद पवार नव्या वळणावर?

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी |

शरद पवारांचे राजकारण हे कात्रजच्या घाटाचे राजकारण आहे असे म्हटले जाते. त्यांच्या मनात काय चालले आहे ते कुणालाही कळू शकत नाही. फक्त अंदाज तेवढा बांधता येतो पण तो बरोबरच ठरेल याची शाश्‍वती कुणीही देऊ शकत नाही. गेल्या आठवड्यात हल्ली गाजत असलेल्या राफेल विवादावर त्यांनी एक वक्तव्य दिले. आयबीएन १८ या वाहिनीचे समूह संपादक डॉ. उदय निर्गुडकर यांना मुलाखत देतांना त्यांनी मोदी सरकारला अनुकूल असे वाटू शकेल असे ते वक्तव्य होते. त्यामुळे त्यावर भरपूर चर्चा झाली. मी ती मुलाखत पाहिली. खरे तर मोदी सरकारची भलावण करणारे त्यात काहीही नव्हते. पण राहुल गांधी ज्या त्वेषाने मोदींवर तुटून पडण्याचा आव आणतात तसेही काही त्यात नव्हते.

Sharad Pawar

Sharad Pawar

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राष्ट्रीय राजकारणातील हालचाली व स्थिती पाहता ते पुन्हा एकदा नव्या वळणावर येऊन उभे आहेत असे म्हणावेसे वाटते. त्यांचा पक्ष तसा महाराष्ट्राच्या बाहेर फोफावणे तर दूरच राहिले, मूळही धरु शकला नाही. महाराष्ट्रातही एकहाती सत्ता मिळविण्याच्या लायकीचा राहिलेला नाही. महाराष्ट्राव्यतिरिक्त बिहारमधून अन्वर तारिक यांच्या रुपाने मिळालेला एक खासदारही आता पक्ष सोडून गेला आहे. अमर, अकबर, अ‍ॅन्थनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या त्रिकुटापैकी पी.ए. संगमा यांनी पूर्वीच त्यांची साथ सोडली. आता राष्ट्रवादीच्या संस्थापकांपैकी फक्त अमर म्हणजे शरद पवार हे एकटेच त्या पक्षात उरले आहेत. सोनिया गांधींच्या विदेशी जन्माच्या मुद्यावर काँग्रेस सोडून ते बाहेर पडले असले तरी त्याच सोनिया गांधींचे नेतृत्व स्वीकारुन त्यांनी दहा वर्षे संपुआमध्ये सत्ता उपभोगली. त्यामुळे तो मुद्दाही निकालात निघाला आहे. २०१४ नंतर त्यांनी अल्पकाळ मोदींशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. पण मोदींचे व त्यांचे आकडे जुळले नाहीत म्हणून की, काय त्यांनी मोदीविरोधकांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. राहुल गांधींच्या अपरिपक्व नेतृत्वामुळे आपल्याला काँग्रेससहीत मोदीविरोधकांचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल या अपेक्षेने त्यांनी पुन्हा एकदा कंबर कसली होती. पण एक तर सगळे मोदीविरोधक राष्ट्रीय पातळीवरुन एकत्र येण्याची शक्यता जवळपास संपली आहे. राहुल गांधीही चार पावले पुढे सरकले आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे वेगळे राहण्याचे प्रयोजन काय, असा प्रश्‍न जर त्यांच्यासमोर उभा राहिला असेल तर ते स्वाभाविकच आहे. त्यांची अशीच स्थिती १९८६ मध्ये राजीव गांधींच्या काळातही झाली होती. त्यावेळी त्यांनी सन्मानपूर्वक काँग्रेसप्रवेशही केला होता. पण ते त्या पक्षात टिकले नाहीत. म्हणून त्यांनी सोनियाजींच्या विदेशातील जन्माचा मुद्दा बनवून राष्ट्रवादीची स्थापना केली. पण त्या पक्षाची स्थितीही १९८६ पेक्षा वाईट झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर नव्या वळणावर उभे राहण्याची पाळी आली असेल तर त्यासाठी तेच जबाबदार आहेत असे म्हणावे लागेल.
वस्तुत: शरद पवार हे अतिशय मुरब्बी राजकारणी म्हणून देशात ओळखले जातात. सर्व पक्षांमध्ये त्यांचे मित्र आहेत असे म्हटले जाते व ते खरेही आहे. साधनसामुग्री गोळा करण्याच्या त्यांच्या क्षमतेबद्दलही प्रश्‍न नाही. अशा नेत्यावर अशी पाळी यावी ही त्यांची शोकांतिकाच म्हणावी लागेल. एखाद्या मुरब्बी नेत्याचा एक निर्णय चुकला व तरीही त्याने तीच चूक पुन्हा केली तर त्याची कशी स्थिती होते, हे सांगण्यासाठी आता शरद पवारांचेच नाव घ्यावे लागेल. १९६९ पर्यंत ते काँग्रेस पक्षात घट्ट पाय रोवून उभे होते. महाराष्ट्र काँग्रेसचे नेतृत्व करण्यासाठी त्यांच्याएवढा समर्थ नेता कुणीही नव्हता. पण यशवंतराव चव्हाण यांचे नेतृत्व त्यांनी स्वीकारल्यामुळे १९६९ च्या काँग्रेसफुटीच्या वेळी त्यांना त्यांच्याबरोबरच राहावे लागले. पुढे इंदिराजींनी यशवंतरावांच्या केलेल्या अवहेलनेचे चटके त्यांनाही बसले अन्यथा वसंतराव नाईकांनंतर तेच शंकररावांऐवजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकले असते. पुढे आणिबाणीनंतर त्यांनी अर्स काँग्रेस, रेड्डी काँग्रेस असा प्रवास करीत १९७८ मध्ये महाराष्ट्रात पुलोदची स्थापना करुन मुख्यमंत्रिपद मिळविले. पण त्या पक्षांबरोबरही ते टिकले नाहीत. १९८६ नंतरचा प्रवास वर दिलाच आहे. आता त्यांची स्थिती १९८६ पेक्षाही वाईट झाली आहे. त्यामुळे आता ते कोणते वळण घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शरद पवारांचे राजकारण हे कात्रजच्या घाटाचे राजकारण आहे असे म्हटले जाते. त्यांच्या मनात काय चालले आहे ते कुणालाही कळू शकत नाही. फक्त अंदाज तेवढा बांधता येतो पण तो बरोबरच ठरेल याची शाश्‍वती कुणीही देऊ शकत नाही. गेल्या आठवड्यात हल्ली गाजत असलेल्या राफेल विवादावर त्यांनी एक वक्तव्य दिले. आयबीएन १८ या वाहिनीचे समूह संपादक डॉ. उदय निर्गुडकर यांना मुलाखत देतांना त्यांनी मोदी सरकारला अनुकूल असे वाटू शकेल असे ते वक्तव्य होते. त्यामुळे त्यावर भरपूर चर्चा झाली. मी ती मुलाखत पाहिली. खरे तर मोदी सरकारची भलावण करणारे त्यात काहीही नव्हते. पण राहुल गांधी ज्या त्वेषाने मोदींवर तुटून पडण्याचा आव आणतात तसेही काही त्यात नव्हते. उलट बोटचेपी भूमिकाच सूचित होत होती. देशाच्या संरक्षणाबाबत व विशेषत: शस्त्रास्त्र खरेदीच्या बाबतीत आपल्या प्रतिस्पर्धी देशाला फायदेशीर होईल अशी चर्चा व्हायला नको, असे ते स्पष्टपणे म्हणाले. राफेल प्रकरणी काही काळेबेरे आहे असे म्हणण्याचा मोह त्यांनी आवरला व तुमचे सगळे बरोबर आहे तर जेपीसी कां नाकारता, असा प्रश्‍न त्यांनी विचारला. जेपीसीची स्पष्ट मागणी करणे मात्र त्यांनी टाळले. ही मोदींना त्यांची क्लीनचिट आहे असे कुणाला वाटले असेल तर त्याला खूप दोष देता येणार नाही.
शरद पवार एवढ्यावरच थांबले असते तर फार बिघडले नसते. पण पुढे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दलही बोलले. एका प्रश्‍नाच्या उत्तरात ते म्हणाले, ‘मी सध्या स्व. गोळवलकर गुरुजी यांचे ‘विचारधन’ हे पुस्तक वाचत आहे. ते पुस्तक वाचता यावे म्हणून त्याच्या चार प्रती आपण बारामती, पुणे, मुंबई व दिल्ली येथील निवासस्थानी ठेवल्या असून जेथेजेथे मुक्काम असतो तेथे तेथे आपण ते वाचत असतो, असा तपशीलही जोडला. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी संघ स्वयंसेवक लोकांच्या मदतीला तत्परतेने धावून जातात या अनुभवाची जोडही त्याला दिली. हे सगळे त्यांनी निर्हेतुकपणे केले असेलही पण ‘कात्रजच्या घाटा’चे त्यांचे राजकारण इथे त्यांना नडले आणि म्हणूनच खुलासाही करावा लागला. अर्थात त्यांनी तोही अर्धाच केला. संघाबद्दल खुलाशात एक शब्दही बोलले नाहीत. आता त्यांना आपली विश्‍वसनीयता प्रस्थापित करायला काही काळ लागेलही पण त्यामुळे राष्ट्रवादीची स्थिती सुधारेल याची मात्र शक्यता नाही. त्यांची प्रतिमा जरी राष्ट्रीय नेत्यासारखी दिसत असली तरी आज फॉर ऑल प्रॅक्टिकल परपजेस ते महाराष्ट्रापुरते प्रादेशिक विरोधी नेते बनले आहेत. त्यामुळे असेच राहायचे की, राहुल सोनिया यांचे नेतृत्व स्वीकारुन पुन्हा आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करायचा या प्रश्‍नाचा त्यांना विचार करावा लागणार आहे.
खरे तर पंतप्रधानपदावर दावा सांगण्यासाठी त्यांना यावेळी चांगली संधी मिळाली होती. नितीशकुमार भाजपासोबत गेल्यानंतर आणि राहुलने स्वत:ची उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेस भाजपा वगळून बनू शकणार्‍या तिसर्‍या आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार त्यांच्याशिवाय कुणीही नव्हते. प्रादेशिक पक्षांच्या फेडरल फ्रंटच्या प्रयत्नाना त्यांनी बळ दिले असते तर तिसरी आघाडी मोठ्या संख्येने लोकसभेत पोचू शकली असती व कदाचित काँग्रेसच्या बाहेरुन पाठिंब्याच्या आधारे सरकार स्थापन करण्याचा प्रयत्नही करु शकली असती. पण बहुधा वय, प्रकृतीच्या मर्यादा आणि अनिश्‍चितता यामुळे ते योग्य निर्णय घेऊ शकले नसतील. पण आता त्याबद्दल पश्‍चात्ताप करण्याशिवाय त्यांच्याजवळ काहीही उरलेले दिसत नाही. खासदार तारिक अन्वर यांच्या लक्षात ही स्थिती आली असेल व त्यामुळेच त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला असेल हे सहज शक्य आहे. शरदरावांचे ते वक्तव्य हे त्यांच्या राजीनाम्याचे कारण असूच शकत नाही. पळत्याने त्याचा आधार घेतला एवढेच.
आज त्यांची महाराष्ट्राच्या राजकारणात काय स्थिती आहे? काँग्रेस पक्ष त्यांचे नेतृत्व मान्य करायला तयार नाही. शिवसेना आपल्या सोबत असावी असे त्यांना जरुर वाटले असेल. त्यादृष्टीने मध्यंतरी त्यांनी प्रयत्नही केले. पण उध्दव ठाकरे यांनी आदरपूर्वक नकार दिलेला दिसतो. त्यानंतर मनसे नेते राज ठाकरे यांना जाहीर मुलाखत देऊन स्वत:बरोबरच राजचेही रिलाँचिंग करण्याचा प्रयत्न त्यांनी करुन पाहिला. पण ती तीन पायांची शर्यत तेवढी ठरली. एक तर राजसारख्या पार्टटाईम नेत्याबरोबर जाण्याचा प्रयत्नच त्यांनी केला कसा हा प्रश्‍न. कारण त्यांनी स्वत:च ‘राजकारणात काम करायचे म्हणजे सकाळी लवकर उठावे लागते’ असा अनाहूत सल्ला राजला दिला होता. आजही ते आघाडीसाठी मनसेला सोबत घेण्याचा आग्रह करीत आहेत व काँग्रेस तो निर्दयी होऊन फेटाळत आहे. प्रकाश आंबेडकर एमआयएमशी युती करुन मोकळे झाले आहेत. शेकापही त्यांच्यासोबत जाण्याच्या तयारीत आहे. डाव्यांना तर तिकडे जाण्याशिवाय पर्यायच नाही. यावरुन सद्यस्थितीत शरदरावांची महाराष्ट्राच्या राजकारणात काय स्थिती झाली हे स्पष्ट व्हावे. अशा वेळी ते नव्या वळणावर उभे आहेत असे नाही तर काय म्हणावे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायम ठेवून काँग्रेसच्या ताटाखालचे मांजर बनायचे की, स्वत:हून आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा सन्मानपूर्ण मार्ग निवडायचा हे दोनच पर्याय त्यांच्याकडे आहेत. त्यातला ते कोणता निवडतात हे भविष्यकाळच सांगू शकेल.

Posted by : | on : 7 Oct 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, ल.त्र्यं. जोशी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, ल.त्र्यं. जोशी, स्तंभलेखक (429 of 1288 articles)

Dnyaneshwari
विशेष : विशाखा पाठक| जयंत्या-पुण्यतिथ्या या व्यक्तीच्या साजर्‍या केल्या जातात, त्यांचे गुण आठवण्याचे निमित्ताने. पण, जगात दोनच ग्रंथ असे असतील ...

×