ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी » शिकागोची सर्वधर्मपरिषद

शिकागोची सर्वधर्मपरिषद

॥ विशेष : स्वामी निखिलानंद |

१८९३ साली शिकागो येथे भरलेल्या सर्वधर्मपरिषदेत स्वामी विवेकानंदांनी भाग घेतला होता, हे सर्वविदित आहेच. तथापि, त्या व्याख्यानांतील नेमका आशय तसेच त्यांचा भारत व युरोप-अमेरिकेवर झालेला परिणाम, हे जनसामान्यांना अपरिचितच राहतात. २०१८-१९ या वर्षी शिकागो परिषदेला १२५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने, स्वामी विवेकानंदांच्या शिकागो व्याख्यानांतील मौलिक विचारांचा धांडोळा घेण्यासाठी रामकृष्ण संघातर्फे जगभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

Swami Vivekanand

Swami Vivekanand

सोमवार, दिनांक ११ सप्टेंबर १९९३ रोजी जागतिक सर्वधर्मपरिषदेचे उद्घाटन अगदी विधिवत आणि गांभीर्याने करण्यात आले. क्रिस्तोफर कोलंबस याने अमेरिका खंडाचा शोध लावला, या घटनेला ४०० वर्षे पूर्ण झाली म्हणून आयोजित केलेल्या जागतिक कोलंबिया प्रदर्शनाच्या महोत्सवाचा एक भाग म्हणून या भव्य सर्वधर्मपरिषदेचे आयोजन केले गेले होते. पाश्‍चिमात्य जगताने जी प्रगती- विशेषत: भौतिक शास्त्रे आणि तंत्रविज्ञान यांमध्ये साध्य केली होती, तसेच जो ज्ञानविस्तार साधला होता, त्यांची महिती संपूर्ण जगताला करून देणे, हाच या प्रदर्शनाच्या आयोजनामागचा मुख्य हेतू होता. तथापि, धर्म हे मानवी जीवनाचे एक महत्त्वपूर्ण असे अंग असल्याने, या जागतिक प्रदर्शनाला जोडून एका सर्वधर्मपरिषदेचेही आयोजन केले जावे, असे ठरविण्यात आले होते. आपल्या ‘हिस्ट्री ऑफ दी पार्लमेंट ऑफ रिलिजन्स’ या ग्रंथात डॉ. बॅरोज लिहितात,
जगातील सर्व मानवसमाज ईश्‍वरी सत्तेची पूजा आणि सेवा करतात. त्यांची ईश्‍वरी सत्तेवरील श्रद्धा, ज्याप्रमाणे सूर्य जीवनदायी आणि फलदायी असतो तशीच मानवाच्या बौद्धिक व नैतिक विकासासाठी जीवनदायी आणि फलदायी असते. आपण असे पाहतो की, हिंदू वाङ्मय आणि त्यांच्या आश्‍चर्यकारक आध्यात्मिक प्रगतीच्या पार्श्‍वभागी धर्म आहे; युरोपातल्या कलांच्या पार्श्‍वभागी- मग ती ग्रीकांची मूर्तिकला असो किंवा कॅथेड्रल्सच्या बांधकामांमध्ये दिसून येणारी मंदिर-शिल्पांची कला असो- धर्म आहे; अमेरिकनांच्या स्वतंत्रतेच्या संकल्पनेच्या पार्श्‍वभागी आणि तेथील नागरिकांनी अधिक न्यायपूर्ण सामाजिक स्थितीसंबंधाने अलीकडेच उभारलेल्या चळवळीच्या देखील पार्श्‍वभागी धर्मच आहे. याशिवाय हेही सूर्यप्रकाशाइतकेच स्वच्छ नि स्पष्ट आहे की, ख्रिश्‍चन धर्मानेच आपल्या अर्वाचीन संस्कृतीमधील महत्त्वपूर्ण आणि उदात्त असा विकास घडवून आणण्याचा मार्ग दाखविलेला आहे. त्यामुळे शिक्षण, कला आणि विद्युत्शक्ती यांच्याप्रमाणेच धर्म हा विषयही कोलंबिया प्रदर्शनाच्या कक्षेबाहेर ठेवू नये, असे आम्हास वाटते.
जगातील प्रगतिशील राष्ट्रांच्या बहुसंख्य लोकांनी इतर धर्मांऐवजी ख्रिस्ती धर्मच स्वीकारला होता. त्यामुळे ही सर्वधर्मपरिषद आपल्या ख्रिश्‍चन धर्माचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी एक सुसंधीच उपलब्ध करून देणारी आहे, असे सर्वधर्मपरिषदेच्या आयोजकांपैकी काही उत्साही धर्मवेत्त्यांना वाटले असणार, ही संभवनीयता पूर्णपणे नाकारता येणारी नव्हती. बर्‍याच दिवसांनंतर स्वत: स्वामी विवेकानंद थट्टामस्करीच्या मन:स्थितीत असताना असे म्हणाले होते की, ‘‘मला स्वत:ला हिंदूंचा सनातन शाश्‍वत धर्म अखिल विश्‍वासमोर मांडता यावा आणि त्या दृष्टीने माझी महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी एखादे व्यासपीठ मला मिळावे, याकरिताच एक सर्वधर्मपरिषद आयोजित केली जावी, ही स्वत: जगदंबेचीच इच्छा होती. बाकी सर्व बाबी केवळ प्रासंगिक होत्या.’’ कारण सर्वधर्मपरिषदेत इतर सर्व विषयांसंबंधाने जे जे बोलले आणि चर्चिले गेले, ते ते पूर्णपणे विस्मृतीच्या कप्प्यात गेलेले आहे, पण विवेकानंदांनी जे जे सांगितले ते ते सर्व अद्यापिही अमेरिकन लोकांच्या मनात रुंजी घालीत राहिलेले आहे आणि विवेकानंदांनी ‘आत्मनो मोक्षार्थं जगद्धिताय च’ अशी जी एक चळवळ सुरू केलेली आहे, तिचीही मोहिनी अमेरिकन मनाला पडलेली आहे. यावरून स्वामी विवेकानंदांनी केवळ थट्टेत काढलेल्या यथार्थ उद्गाराचे मोल आज सुदीर्घ काळ लोटल्यानंतरही चांगलेच लक्षात येते.
या संदर्भात धर्मपरिषदेतील विज्ञानविषयक उपसत्राचे अध्यक्ष माननीय मेर्विन-मेरी स्नेल यांचा अभिप्राय येथे मुद्दाम पाहावा. ते म्हणाले, ‘‘या परिषदेचा सर्वांत मोठा लाभ म्हणजे यातून ख्रिस्ती विचारविश्‍वाला आणि विशेषेकरून अमेरिकेला एक फार मोठा धडाच मिळालेला आहे. तो धडा म्हणजे ख्रिश्‍चन धर्मापेक्षाही पवित्र व पूज्य असे आणखी काही धर्म आहेत; ते धर्म तत्त्वज्ञानाची सखोलता, आध्यात्मिकतेची आंतरिकता, स्वतंत्र विचारांची तेजस्विता आणि मानवी सहानुभावाची व्यापकता व प्रांजळपणा यांबाबतीत ख्रिश्‍चन धर्मालाही मागे टाकणारे आहेत आणि तेही पुन्हा त्या धर्माला नीतिसौंदर्य आणि कार्यसिद्धी यांबाबतीत रेसभरही धक्का लागू न देता!’’
सकाळी १० वाजता सर्वधर्मपरिषदेचा शुभारंभ झाला. जगभरच्या १२० कोटी लोकांनी स्वीकारलेल्या प्रत्येक संघटित धर्ममताला त्यात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. ख्रिस्ती धर्माव्यतिरिक्त हिंदुधर्म, जैनधर्म, बौद्धधर्म, कन्फ्युशियसचा धर्म, शिंतोधर्म, इस्लामधर्म आणि अहुर मझ्द (म्हणजे पारशी लोकांचा) धर्म यांचा त्यात समावेश होता.
आर्ट पॅलेस नावाचा भव्य हॉल आणि त्याची गॅलरी सात हजार लोकांनी तुडुंब भरून गेलेली होती. तिथे जमलेले सर्व स्त्री-पुरुष अमेरिकेची संस्कृती प्रदर्शित करीत होते. परिषदेचे सर्व अधिकृत प्रतिनिधी एका भव्य मिरवणुकीने व्यासपीठावर येऊन स्थानापन्न झाले. पाश्‍चिमात्य वर्तुळातील रोमन कॅथॉलिक चर्चचे प्रमुख आर्च बिशप कार्डिनल गिबन्स आपला शेंदरी रंगाचा लांब झगा परिधान करून मध्यभागी विराजमान झाले होते. त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले आणि प्रार्थना करून ते सत्र सुरू झाल्याचे उद्घोषित केले. त्यांच्या डाव्या-उजव्या बाजूंना पौर्वात्य प्रतिनिधींचा गट होता. त्यांमध्ये कोलकात्यातील ब्राह्मो समाजाचे प्रतापचंद्र मजुमदार, मुंबईचे नगरकर, श्रीलंकेतील बौद्धधर्माचे प्रतिनिधित्व करणारे धर्मपाल, जैन प्रतिनिधी गांधी, थिऑसॉफिकल सोसायटीचे चक्रवर्ती आणि अ‍ॅनी बेझंट या मंडळींमध्येच स्वामी विवेकानंद बसलेले होते. स्वामीजी कोणत्याही एका विशिष्ट धर्माचे नव्हे, तर ‘वेदांच्या सार्वजनीन धर्मा’चे प्रतिनिधित्व करीत होते आणि त्याप्रमाणे ते समग्र मानवी समाजाच्या धर्मविषयक आकांक्षेसंबंधानेच कसे बोलले हे आपण येथे पाहणारच आहोत. त्यांचा झळझळीत भगव्या रंगाचा लांब अंगरखा, भगवा फेटा, ब्राँझ धातूसारखा वर्ण आणि त्यांची सुडौल, रेखीव देहाकृती हे सर्वच व्यासपीठावर अगदी उठून दिसत होते व सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. संख्येच्या भाषेत सांगायचे झाले, तर स्वामी विवेकानंद एकतिसाव्या क्रमांकाच्या आसनावर स्थानापन्न झालेले होते.
एकामागोमाग एक याप्रमाणे इतर प्रतिनिधी आपापली तयार करून आणलेली भाषणे वाचून दाखवीत होते; परंतु या हिंदू संन्याशाने मात्र भाषणाची तयारी अशी काहीच केलेली नव्हती. एवढ्या प्रचंड लोकसमुदायासमोर स्वामीजी यापूर्वी कधी बोललेलेही नव्हते. जेव्हा त्यांना भाषण करण्यास पाचारण करण्यात आले, तेव्हा त्यांच्या मनात काहीसे भय दाटून आले आणि त्यांनी अध्यक्षांना आपणास काही वेळानंतर भाषण करू द्यावे, अशी विनंती केली. त्यांनी भाषणाचे निमंत्रण अनेकदा पुढे ढकलले. याबाबत ते स्वत:च नंतर म्हणाले आहेत, ‘‘खरे आहे की माझे हृदय धडधडत होते, जीभ जवळजवळ कोरडीच पडली होती. मी इतका नाउमेद झालो होतो की, सकाळच्या सत्रात बोलण्याचे मी धाडसच करू शकलो नाही.’’
शेवटी ते व्याख्यानासाठी उभे राहिले. डॉ. बॅरोज यांनी त्यांचा परिचय करून दिला. भाषण सुरू करण्याआधी स्वामी विवेकानंदांनी विद्येची देवता असणार्‍या सरस्वतीला मनोमन प्रणाम केला आणि ते श्रोतृवृंदाला उद्देशून उद्गारले, ‘‘अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो!’’ तत्क्षणी हजारो श्रोते आपापल्या आसनावरून उठले आणि टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांनी स्वामीजींना अभिवादन केले. अभिवादनाचे औपचारिक शब्द टाळून कोणीतरी एकजण का होईना, सरळ मनाने आणि अगदी स्वाभाविकपणे बंधुत्वभावाने बोलला, हे पाहून श्रोते अगदी अंत:करणापासून भारावून गेले होते.
ही लाट ओसरण्यास पुर्‍या दोन मिनिटांचा कालावधी जावा लागला. मग स्वामीजींनी जगातल्या सर्वात प्राचीनतम अशा वैदिक संन्यासी समाजाच्या वतीने अमेरिका नामक जगातील सर्वाधिक तरुण अशा राष्ट्रास अभिवादन करून आपल्या भाषणाला सुरुवात केली. सार्वजनीन सहिष्णुता आणि परस्परांचा स्वीकार हे स्वामीजींच्या भाषणाचे सूत्र होते. अन्य देशांतून निराश्रित झालेल्या धर्मांच्या अनुयायांना- उदाहरणार्थ यहुदी आणि पारशी लोकांना- भारताने कसा आश्रय दिला, हे त्यांनी श्रोत्यांच्या मनावर बिंबविले आणि त्यांनी भारतीयांच्या परधर्मसहिष्णुतेसंबंधाने हिंदूंच्या शास्त्रग्रंथातील- शिवमहिम्नस्तोत्र आणि श्रीभगवद्गीता यांमधील पुढील दोन श्‍लोकांचा उल्लेख केला-
‘‘रुचीनां वैचित्र्यात् ऋजुकुटिलनानापथजुषाम्।
नृणां एको नम्य: त्वमसि पयसां अर्णव इव॥’’
‘‘भिन्न भिन्न उगमांतून निघणारे विभिन्न जलप्रवाह ज्याप्रमाणे अंती सागरास मिळून एक होऊन जातात, त्याचप्रमाणे रुचिवैचित्र्यानुसार सरळ वा वक्र अशा वेगवेगळ्या मार्गांनी जाणारे पथिक, हे प्रभो, अंती तुलाच येऊन मिळतात.’’
‘‘ये यथा मां प्रपद्यन्ते तान् तथैव भजाम्यहम्।
मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या: पार्थ सर्वश:॥’’
‘‘कुणी कोणत्याही भावाचा आश्रय घेऊन मजप्रत येईना का, मी त्याच भावाने त्याच्यावर अनुग्रह करीत असतो. अर्जुना, लोक चोखाळीत असलेले निरनिराळे मार्ग अखेर मलाच येऊन मिळतात.’’
शेवटी भाषणाचा समारोप करताना स्वामीजींनी सांप्रदायिकता, स्वमतांधता आणि धर्मवेड हे पृथ्वीवरून लवकरच नामशेष होतील, अशी आशा व्यक्त केली. स्वामीजींच्या या व्याख्यानाला श्रोत्यांनी कान बधिर करून टाकतील अशा टाळ्यांचा कडकडाट करून प्रतिसाद दिला. असे वाटले की, जणूकाही तो सर्वच्या सर्व श्रोतृसमुदाय धर्मसमन्वयाच्या याच एका संदेशाची धैर्यपूर्वक वाट पाहात होता. बर्‍याच वर्षांनंतर एका ज्यू पंडिताने प्रस्तुत लेखकाकडे आपला असा अभिप्राय व्यक्त केला की, ‘‘विवेकानंदांचे भाषण ऐकल्यानंतर माझा यहुदी धर्म हा सत्य आहे हे पहिल्या प्रथमच माझ्या लक्षात आले. शिवाय स्वामीजींनी धर्मासंबंधीचे उद्गार हे केवळ त्यांच्या स्वत:च्या धर्माच्याच वतीने नव्हे, तर अखिल जगतातल्या सर्व धर्मांच्याही वतीने काढलेले होते.’’ इतर प्रतिनिधींपैकी प्रत्येकच जण आपला आदर्श किंवा आपला धर्मपंथ याविषयीच तेवढे बोललेला होता; याउलट स्वामीजी मात्र प्रत्येक धर्माचे ईश्‍वरप्राप्ती हेच एकमेव ईस्पित आहे आणि तेच प्रत्येक धर्माचा आंतरिक गाभा आहे, असे सांगून फक्त ईश्‍वरासंबंधानेच बोलले होते. सर्व धर्म हे केवळ त्या एकाच ईश्‍वराकडे नेणारे वेगवेगळे मार्ग आहेत, हे ज्यांना स्वानुभूतीतून उमगले आणि जे सातत्याने हेच एक सत्य शिकवीत राहिले, त्या श्रीरामकृष्णांच्या चरणांशी बसून स्वामी विवेकानंद हे सत्य शिकलेले होते. धर्मांच्या, वर्णांच्या आणि वंशांच्या सर्व भिंती कोसळून जमीनदोस्त व्हाव्यात आणि सर्व लोकांना मानवतेच्या एकाच सूत्रात गुंफले जावे, ही जी आधुनिक जगताची तळमळ होती, तीच स्वामीजींनी शब्दबद्ध केली होती.
त्यांच्या मुखातून कुठल्याही अन्य धर्माबद्दल- मग तो कितीही रानटी वा कितीही बुद्धिहीन असो- एकही निषेधाचा शब्द निघालेला नव्हता. कोणत्याही एका कारणाने अमुक एक धर्मच काय तो खरा, असे स्वामीजी मानत नव्हते. त्यांच्या दृष्टीने भिन्न भिन्न अभिरुचींच्या आणि भिन्न भिन्न स्वभावांच्या अनुयायांना पूर्णतेच्या त्याच एका ध्येयाकडे नेण्याबाबतीत सर्व धर्म सारखेच यथाशक्ती समर्थ होते. काही वर्षांपूर्वी नरेन्द्रनाथांनी अत्युत्साहाच्या भरात प्रत्यक्ष आपल्या गुरुदेवांसमोरच धर्माच्या नावाखाली अनैतिक वाटाव्यात अशा साधनेत गुंतलेल्या एका विशिष्ट धर्मपंथाची (अघोरी तंत्रमार्गाची) खूप निर्भर्त्सना केली होती. त्या वेळी त्यांना सौम्य शब्दांमध्ये दटावीत श्रीरामकृष्ण म्हणाले होते, ‘‘त्या लोकांची निंदा तू का करतोस? त्यांचाही मार्ग अखेरत: परमेश्‍वराकडेच जाणारा आहे. एखाद्या मोठ्या घरात शिरण्यासाठी अनेक दरवाजे असतात. शौचकूप साफ करणारा माणूस मागील दाराने प्रवेश करतो. तुम्ही तो दरवाजा वापरायचा नसतो इतकेच.’’
‘नरेन्द्र एक दिवस जग हालवून सोडेल,’ ही गुरुदेव श्रीरामकृष्णांची भविष्यवाणी किती खरी होती! ज्यांनी नंतर लॉस एंजेलसमध्ये स्वामीजींचे आतिथ्य केले त्या श्रीमती एस. के. ब्लॉजेट सर्वधर्मपरिषदेचा आपल्या स्वत:वर झालेला परिणाम सांगताना लिहितात, ‘‘१८९३ साली मी, शिकागो येथे भरलेल्या सर्वधर्मपरिषदेला उपस्थित होते. जेव्हा तो तरुण संन्यासी बोलायला उठला आणि ‘अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो’ असे म्हणाला त्या वेळी सात हजार माणसे आदराने उठून उभी राहिली. आपण कशासाठी आदर प्रदर्शित करीत आहोत, हेही त्यांना तेव्हा कळले नसेल. जेव्हा स्वामीजींचे भाषण संपले, तेव्हा मी असे बघितले की, असंख्य स्त्रिया आपली आसने सोडून विवेकानंदांजवळ जाण्यासाठी बाकांवरून मार्ग काढीत जाऊ लागल्या होत्या. ते पाहून मी स्वत:शीच म्हणाले, ‘हे तरुण मुला! तू जर या आक्रमणाचा सामना करू शकलास, तर तू खरोखरच देव आहेस असे मी मानीन!’ ’’
धर्मपरिषदेत स्वामीजी सुमारे बारा वेळा तरी बोलले असतील. त्यांतील त्यांचे सगळ्यांत उत्तम भाषण हिंदुधर्मासंबंधीचे होते. त्यामध्ये त्यांनी हिंदूंचे अध्यात्मशास्त्र, नीतिशास्त्र आणि धर्मशास्त्र यासंबंधाने ऊहापोह केला होता. आत्म्याचे दिव्यत्व, जीवांचे ऐक्य, अवतारांचे देवत्च आणि धर्माधर्मांमधील समन्वय ही विचारसूत्रे त्यांच्या व्याख्यानांमध्ये पुन:पुन्हा येत. मानवाचे अंतिम प्राप्तव्य म्हणजे ईश्‍वराची अनुभूती घेऊन स्वत: ईश्‍वरत्व प्राप्त करणे हेच होय आणि सर्व मानव हे अमृताचे अधिकारी होत, हेच त्यांच्या प्रतिपादनाचे कायमचे सूत्र असे.
धर्मपरिषदेच्या अखेरच्या सत्रात स्वामी विवेकानंद समारोपादाखलच्या भाषणात म्हणाले, ‘‘…ख्रिस्ती माणसाला हिंदू वा बौद्ध होण्याची गरज नाही अथवा हिंदू वा बौद्धालाही ख्रिस्ती बनण्याचे प्रयोजन नाही, तर प्रत्येकाने स्वत:चे वैशिष्ट्य कायम राखून इतर धर्मांतील सारभाग ग्रहण केला पाहिजे आणि त्याद्वारे समृद्ध होऊन स्वत:च्या प्रकृतीनुसार वृद्धिंगत होत गेले पाहिजे. या परिषदेमुळे जर जगाच्या काही निदर्शनास आले असेल तर ते हेच होय. या परिषदेने अत्यंत सुंदर रीतीने हे सिद्ध करून दाखविले आहे की पावित्र्य, चित्तशुद्धी, दयादाक्षिण्य वगैरे गुणांचा मक्ता जगातील कोणत्याही एका विशिष्ट धर्माने घेतलेला नाही, प्रत्येक धर्मात अति उदात्त चारित्र्याच्या नरनारींचा जन्म झालेला आहे. हा एवढा भरभक्कम पुरावा दृष्टीसमोर असूनही, आपलाच धर्म तेवढा जिवंत राहून इतर धर्म नष्ट होतील असे मनोराज्य जर कुणी रचीत असेल, तर त्या अभाग्याची आपण कीवच केली पाहिजे. त्या बापड्याला मी अगदी स्पष्ट शब्दांत बजावून सांगतो की, त्याच्यासारख्या लोकांनी कितीही अडथळे उभे केले तरी त्या सार्‍यांना तिळमात्र न जुमानता, धर्माधर्मांच्या ध्वजांवर लवकरच लिहिले जाईल- ‘संघर्ष नको, परस्परांना साहाय्य करा’, ‘विनाश नको, आत्मसात करा’, ‘कलह नको, मैत्री हवी, शांती हवी.’’
सर्वधर्मपरिषदेने स्वामी विवेकानंदांना आपल्या आर्य पूर्वजांनी प्रतिपादिलेली शाश्‍वत आणि सार्वजनीन सत्ये पाश्‍चिमात्य जगतासमोर मांडण्याची सुसंधी दिली. अशा संधीची ते अगोदरपासूनच वाट पाहात होते आणि ती संधी मिळताच त्यांनी लगेच तिला न्याय दिला. ते ज्या वेळी आपला संदेश देण्यासाठी व्यासपीठावर आले, त्या वेळी ज्या दोन आदर्शांनी- पौर्वात्य आणि पाश्‍चिमात्य आदर्शांनी- मानवी संस्कृतीला आकार दिला होता, त्या दोन महत्तम विचारप्रवाहांचा त्यांनी जणू समन्वयच साधला होता. त्यांच्यासमोर जो प्रचंड श्रोतृसमुदाय होता तो पूर्णत: पाश्‍चिमात्य मनोवृत्तीचे प्रतिनिधित्व करणारा होता. तो श्रोतृसमुदाय तरुण, दक्ष, अस्वस्थ, जिज्ञासू, कमालीचा प्रामाणिक, अगदी शिस्तबद्ध असणारा, भौतिक जगताशी सहज जुळवून घेणारा, परंतु अतींद्रिय जगताच्या गहनतेविषयी संशयवादी असणारा आणि बुद्धिगम्य पुराव्यांशिवाय आध्यात्मिक सत्यांच्या स्वीकारास तयार नसणारा अशा खास पाश्‍चिमात्य मनोवृत्तीचा होता. आणि याच वेळी स्वामी विवेकानंदांच्या पाठीशी ऋषिमुनींचे प्राचीनतम भारतीय जगत होते. हे प्राचीन भारतीय जगत कसे होते? हे जगत तत्त्वज्ञानाविषयक चिंतनाच्या भिन्नभिन्न संप्रदायांचे होते; हे जगत आत्मसंयमन आणि ध्यानधारणेद्वारे शाश्‍वत सत्याची अनुभूती घेणार्‍या संतमहंतांचे होते; हे जगत क्षणभंगुर जीवनातील नित्य परिवर्तनशील वस्तुमात्रामुळे क्षुब्ध न होता एकमात्र शाश्‍वत सत्याच्याच ध्यानात बुडून जाणार्‍यांचे होते. स्वामी विवेकानंदांचे शिक्षण व संगोपन आणि वैयक्तिक अनुभूती व आधुनिक भारतातील ईश्‍वरावताराशी- श्रीरामकृष्णांशी- झालेला संपर्क यांमुळे ते पूर्व व पश्‍चिमेच्या वर उल्लेखिलेल्या दोन्ही आदर्शांचे प्रतिनिधित्व करण्यास आणि असे प्रतिनिधित्व करीत असतानाच प्रामुख्याने या दोन्ही जगतांतील विभेद दूर करण्यास सुयोग्य प्रतिनिधी ठरले होते.
या अत्यावश्यक अशा समन्वयासाठी विवेकानंदांच्या दृष्टीला वेदांच्या शिकवणींवर आधारलेला हिंदुधर्म सुयोग्य वाटला. वेद म्हणताना तो प्रेषिताची वचने असणारा एखादा विशिष्ट ग्रंथ किंवा एखादी अलौकिक अशी सत्ता ते गृहीत धरीत नव्हते. वेद म्हणताना प्राचीन भारतातील भिन्न भिन्न व्यक्तींनी भिन्न भिन्न समयी ज्या आध्यात्मिक सत्यांचा शोध लावला, त्याच्या चिर-संचित कोषाचाच ते निर्देश करीत होते. मानवजातीला ज्ञात होण्यापूर्वीही गुरुत्वाकर्षणाचा नियम आपले कार्य करीत होता, आणि संपूर्ण मानवजातीला त्याचा विसर पडला तरी तो आपले कार्य बजावीत राहीलच. आध्यात्मिक नियमांचेही असेच आहे. एका जीवात्म्याचे इतर जीवात्म्यांशी आणि सर्व जीवात्म्यांचे त्या परमपिता परमात्म्याशी जे सारे दिव्य नि विशुद्ध संबंध आहेत ते सर्व, त्यांचा शोध लागण्यापूर्वी विद्यमान होते आणि आपल्याला त्यांचा विसर पडला तरीही आहेत तसेच राहतील. हिंदुधर्माच्या वैश्‍विक स्वरूपासंबंधाने बोलताना स्वामीजी म्हणाले होते, ‘‘आधुनिक विज्ञानाचे नवीनातले नवीन शोधदेखील ज्यातील उच्च तत्त्वांचे केवळ मंद प्रतिध्वनीच वाटावेत, अशा त्या सर्वोत्कृष्ट वेदान्तापासून ते सामान्य मूर्तिपूजा आणि तत्संबंधीच्या पुराण वाङ्मयात असलेल्या कथांपर्यंतच्या सर्व बाबींना, इतकेच काय पण बौद्धांच्या अज्ञेयवादाला आणि जैनांच्या निरीश्‍वरवादालादेखील हिंदूंच्या धर्मात स्थान आहे.’’
भारतातील हा तरुण अज्ञात संन्यासी केवळ एका रात्रीतून आध्यात्मिक जगतातील एक असामान्य व्यक्तित्व म्हणून गणला जाऊ लागला. अज्ञाताच्या अंधारातून त्याने जणू प्रसिद्धीच्या प्रकाशात एकदम उडीच घेतली. त्यांच्या देहाएवढ्या उंचीच्या चित्रप्रतिमा त्याखाली छापलेल्या ‘संन्यासी विवेकानंद’ या शब्दांसह शिकागो शहरातील रस्त्यांवर झळकू लागल्या आणि जाणारे येणारे लोक त्यांच्या प्रतिमेला वाकून अभिवादन करण्यासाठी क्षणभर थांबू लागले. सर्वधर्मपरिषदेच्या सर्वसाधारण समितीचे अध्यक्ष असणारे डॉ.जे.एच. बॅरोज याबाबत म्हणतात, ‘‘स्वामी विवेकानंदांनी आपल्या श्रोत्यांवर विस्मय वाटावा असा प्रभाव पाडला होता.’’ मेर्विन-मेरी स्नेह यांनी अत्यंत उत्साहभरल्या शब्दांमध्ये याबाबत असे म्हटले आहे की,‘‘हिंदुधर्माचे सर्वांत महत्त्वाचे आणि खास प्रतिनिधी होते ते स्वामी विवेकानंद! ते खरोखरीच त्या परिषदेतील अत्यंत लोकप्रिय आणि प्रभावशाली व्यक्तित्व होते, यात वादच नाही. त्यांचे इतर कोणत्याही वक्त्यांपेक्षा- मग ते वक्ते ख्रिस्ती असोत वा मूर्तिपूजक असोत- अधिक उत्साहाने स्वागत होत असे. ते जेथे कुठे जात, तेथे लोक त्यांच्याभोवती गर्दी करून असत आणि त्यांचा प्रत्येक शब्द ऐकण्यास अत्यंत जिज्ञासेने तहानलेले असत. अगदी कट्टर आणि सनातनी ख्रिश्‍चन लोकदेखील ‘ते सर्वसामान्य मानवांमधील सम्राट होते,’ असेच त्यांच्याबद्दल म्हणत.’’ – (सौजन्य : रामकृष्ण मठ, नागपूर)

Posted by : | on : 16 Sep 2018
Filed under : आसमंत, पुरवणी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी (325 of 875 articles)

Urban Naxals T
विशेष : प्रवीण दीक्षित | गेल्या काही दिवसांत राज्यासह देशाच्या विविध भागात नक्षलसमर्थक लोकांच्या अटकसत्रानंतर ‘शहरी नक्षलवाद’ हा निरनिराळ्या ठिकाणांच्या ...

×