ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी » शिकागोचे विश्‍व हिंदू संमेलन

शिकागोचे विश्‍व हिंदू संमेलन

॥ विशेष : डॉ. राम वैद्य, सह संयोजक, हिंदू स्वयंसेवक संघ |

स्वामी विज्ञानानंद विश्‍व हिंदू परिषदेचे विदेशातील काम बघतात. जगभर होत असलेल्या निरंतर प्रवासातून त्यांना असे वाटले की, हिंदू हा समाज म्हणून एकत्र येत नाही. त्याच्याकडे जग अजूनही धर्म- कर्मकांडादी रूपातच बघतो. हिंदूंचे समाज म्हणून आधुनिक जगात काय योगदान आहे, याची हिंदूंनाच जाणीव नाही. हिंदूंनी समाज म्हणून एकत्र आले पाहिजे व आपली अस्मिता जागविली पाहिजे, या हेतूने त्यांनी विविध संमेलने आयोजित केलीत. या सर्व संमेलनांचा संगम म्हणून विश्‍व हिंदू संमेलनाची कल्पना पुढे आली.

Vishwa Hindu Sammelan

Vishwa Hindu Sammelan

जेव्हा आपण ‘हिंदू’ म्हणतो तेव्हा त्याची अनेक अर्थवलये असतात. कधी हिंदू समाज असतो, तर कधी विशिष्ट पूजापद्धती असते. हिंदू संस्कृती म्हणतो, तर कधी सभ्यतासूचकदेखील असतो. कधी हिंदू शब्द मनात स्मरून आपण समाजभयापोटी वा अन्य कारणास्तव सनातन शब्दाचा उपयोग करतो. तसेच हिंदू ही भारताची राष्ट्रीय ओळख असल्याने भारतीय व हिंदू हे समानार्थी शब्द होतात. वरील सर्व अर्थ एकमेकांशी जोडलेले आहेत, हे तर निश्‍चित! एका वाक्यात सांगायचे, तर भारताचा आत्मा हिंदुपणा आहे. त्याला हिंदुत्व असेही नाव आहे. अशा हिंदुत्वाला मानणार्‍या हिंदू समाजाचे ‘विश्‍व हिंदू संमेलन’ नुकतेच अमेरिकेत शिकागो येथे आयोजित केले होते. निमित्त होते स्वामी विवेकानंदांच्या ऐतिहासिक भाषणाचे १२५ वर्षस्मरण.
जगात जवळपास सर्व देशांमध्ये हिंदू समाज वास्तव्यास आहे. अगदी प्राचीन काळी पराक्रमाने आग्नेय देशांमध्ये आपल्या संस्कृतीची पताका फडकावणारा समाज आजही विद्यमान आहे. ऊसमळ्याच्या कामात मजूर म्हणून नेण्यात आलेला गिरमिटिया समाजही फिजी, मॉरिशस, दक्षिण आफ्रिका व कॅरिबियन देशांमध्ये प्रधानतेने राहतो.
व्यापारास्तव भिन्न देशी गेलेला समाज, आफ्रिका व युरोप खंड तसेच आशियातील हाँगकाँग, चीन येथे प्राधान्याने राहतो. नजीकच्या काळात विज्ञान, आरोग्य, संगणक क्षेत्रातील तज्ज्ञ अमेरिका-युरोप येथे निवासी आहेत, तर निर्मितिक्षेत्रात मजुरी व व्यवस्थापनासाठी आजही असंख्य भारतीय आफ्रिका व अरब देशांमध्ये जात आहेत. ब्रह्मदेश, नेपाळ, श्रीलंका, इंडोनेशिया येथील हिंदू तिथला मूळ नागरिकच आहे. मागील शतकात स्वामी विवेकानंदांनंतर अनेक धर्मप्रसारक भारताबाहेर गेलेत. त्यांनी मोक्षधर्म व योगक्षेत्रात एक अभूतपूर्व क्रांती आणली. त्यांच्या अथक, अलौकिक परिश्रमाने स्थानिक विभिन्न वंशांचे हिंदू आज मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. असा हिंदू समाजाचा जागतिक व्याप आहे. अशा वैश्‍विक हिंदू समाजाचे हे संमेलन होते.
विश्‍व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय संयुक्त महामंत्री स्वामी विज्ञानानंद हे या संमेलनाचे सूत्रधार होते, असे आपण म्हणू शकतो. स्वामी विज्ञानानंद विश्‍व हिंदू परिषदेचे विदेशातील काम बघतात. जगभर होत असलेल्या निरंतर प्रवासातून त्यांना असे वाटले की, हिंदू हा समाज म्हणून एकत्र येत नाही. त्याच्याकडे जग अजूनही धर्म- कर्मकांडादी रूपातच बघतो. हिंदूंचे समाज म्हणून आधुनिक जगात काय योगदान आहे याची हिंदूंनाच जाणीव नाही. हिंदूंनी समाज म्हणून एकत्र आले पाहिजे व आपली अस्मिता जागविली पाहिजे, या हेतूने त्यांनी विविध संमेलने आयोजित केलीत. प्रारंभी वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम, नंतर वर्ल्ड हिंदू एज्युकेशनल फोरम, वर्ल्ड हिंदू वूमन फोरम, वर्ल्ड हिंदू डेमोक्रॅटिक फोरम, वर्ल्ड हिंदू युथ फोरम, वर्ल्ड हिंदू मीडिया फोरम आणि हिंदू ऑर्गनायझेशन अँड टेम्पल असोसिएशन अशा सात प्रकारची संमेलने आयोजित केलीत. या संमेलनांच्या शीर्षकातच त्यांची त्यांची व्याप्ती कळते. या सर्व संमेलनांचा संगम म्हणून विश्‍व हिंदू संमेलनाची कल्पना पुढे आली. पहिले संमेलन चार वर्षांपूर्वी भारतात दिल्लीला झाले होते. त्याला ५५ देशांमधून २००० प्रतिनिधी आले होते. त्यानंतरचे संमेलन हे शिकागोचे होते.
अमेरिकाच का? स्वामी विवेकानंदांच्या ऐतिहासिक भाषणाची पृष्ठभूमी तर होतीच; पण आजही अमेरिका हे भौतिक जगाचे केंद्रस्थान आहे. नवनवीन शोध व नावीन्यपूर्ण विचार याला जगन्मान्यता करून देण्याची क्षमता आजही अमेरिकेत आहे. शोध किंवा विचार हे केवळ भौतिकच नसतात. ते आध्यात्मिकदेखील असू शकतात. स्वामी विवेकानंद हे पहिले धर्मप्रसारक असतील, पण एकमेव नव्हते. स्वामी योगानंद, प्रभुपाद, महेश योगी यांसारख्या आजच्या जागतिक आध्यात्मिक प्रसारकांना आपापले विचारसमर्थनक्षेत्र फुलवण्यास अमेरिका साह्यभूत ठरली. आजच्या पुनरुत्थानाच्या काळात अमेरिकेत असे संमेलन होणे हे सुसंगत होते. ते यशस्वी होणे स्वाभाविक होते.
संमेलनाची सुरवात ७ सप्टेंबरला शंखध्वनीने झाली. ज्याने भगवद्गीतेचा पहिला अध्याय वाचला असेल त्याला शंखध्वनीचे महत्त्व लक्षात येईल. त्यानंतर स्थानिक महापौरसदृश नेत्रीने स्वागतपर भाषण केले. प्रख्यात चित्रनायक अनुपम खेर यांनी आपले संक्षिप्त मनोगत व्यक्त केले. उद्घाटनाचे बाकी सोपस्कार पार पडत होते, पण काही विशेषतः होती. हिंदू धर्माच्या विविध अंगांचे प्रतिनिधित्व उद्घाटनाला होते. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे चार आध्यात्मिक चळवळींचा सन्मान केला गेला. मी चळवळी म्हणतो; कारण त्यांनी वर्तमान जग ढवळून काढले आहे.
स्वामी प्रभुपाद यांनी सुरू केलेली, कृष्णभक्तीने जवळपास सर्व देशांमध्ये स्थानिक जनतेला अक्षरशः वेडी केलेली इस्कॉन चळवळ. मृदंग-मंजिर्‍यांच्या निनादात सर्व वर्णीय समाज, धोतर व साडी नेसून नाचत नाचत ‘हरे रामा हरे कृष्णा’ असा गजर करीत सात्त्विकतेचा सुगंध पसरवणारी जगन्नाथ रथयात्रा ही आता जगातली प्रमुख शहरांमध्ये सामान्य बाब झाली आहे. स्वामीनारायण संप्रदायातील इअझड संप्रदाय हा विशेष प्रसिद्ध आहे. शास्त्रीजी महाराज यांनी आरंभ केलेला आणि योगीजी महाराज व नुकतेच दिवंगत झालेले प्रमुख स्वामी महाराज यांनी अथक परिश्रम करून वाढविलेला हा संप्रदाय मंदिरउभारणीसाठी सुप्रसिद्ध आहे. जगातील जवळपास सर्व प्रमुख शहरांमध्ये अत्यंत भव्य विशालकाय भारतीय स्थापत्यशास्त्रानुसार मंदिरांची उभारणी करून हिंदू धर्माला तेथे आगळे स्थान प्राप्त करून देण्यात या संप्रदायाचा प्रमुख वाटा आहे.
गोरखपूर येथील गीता प्रेसचे, गीता व सर्व हिंदू धर्म साहित्यप्रसाराचे कार्य आपल्या सर्वांना परिचित आहेच. आतापर्यंत त्यांनी प्रसिद्ध केलेल्या भगवद्गीतेच्या प्रतींची संख्या ३७ कोटीपर्यंत जाईल. १९२३ साली जयनारायणजी गोयनका यांनी सुरू केलेली ही अद्भुत साहित्यचळवळ हनुमानप्रसादजी पोद्दार यांच्या अथक परिश्रमासाठीही लोकप्रिय आहे. वेद, उपनिषद, गीता, रामायण, महाभारत तसेच संतसाहित्य अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याचे महत्कार्य गीता प्रेसने केले आहे.
चिन्मय मिशन ही स्वामी चिन्मयानंद यांनी सुरू केलेली, सध्या पाश्‍चात्त्य जगात मुख्यतः अमेरिकेत अत्यंत प्रसिद्ध चळवळ आहे. अमेरिकेतील शालेय वयातील मुला-मुलींसाठी ‘बालविहार’ सुरू करण्यात चिन्मय मिशनचा मोठा हातभार आहे. या चार संस्थांनी आपल्या वैशिष्ट्यांनी हिंदू धर्म जगाच्या पाठीवर रुजवला आहे. या चारही संस्थांना विश्‍व हिंदू संमेलनात पूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवतांच्या हस्ते सन्मानित केले गेले.
उद्घाटनसत्रात सुरिनाम या छोटेखानी देशाचे उपराष्ट्रपती अश्‍विन अधीन यांचे उद्बोधन झाले. मुख्य भाषण पूजनीय सरसंघचालक मोहनजींचे होते. त्यांनी संमेलनाच्या ‘सुमंत्रिते सुविक्रांते’ या बोधवाक्यावर प्रकाश टाकला. हे वचन महाभारतातून घेतले आहे. आपण धैर्यपूर्वक व सामूहिकतेने मार्गक्रमण केले पाहिजे, हे याचे गर्भित आहे. मोहनजींच्या या भाषणाची चर्चा सर्वत्र झाली.
हिंदूंनी जगाच्या कल्याणासाठी एकत्र येऊन आपापले वैशिष्ट्य कायम ठेवून कार्य करायला हवे, असे त्यांच्या भाषणाचे मर्म होते. सकाळचे हे उदघाटनसत्र झाल्यावर दुपारपासून दुसर्‍या दिवसापर्यंत ६ सत्रे विषयशः होती. विश्‍व हिंदू आर्थिक संमेलन संख्येने सर्वात मोठे होते. समाज समृद्ध करण्याचा संकल्प केलेल्या या संमेलनात, भारताचे आर्थिक भवितव्य, अमेरिका- भारत आर्थिक संबंध, आयात-निर्यात, उदयशील तरुणांसाठी उपलब्ध संधी आदी विषयांवर चर्चा झाली. हिंदू म्हणून आपण एकमेकांना मदत करू शकतो का? जगात हिंदू आर्थिक शक्ती निर्माण करू शकतो का? अशीही चर्चा येथे झाली.
‘सर्वांना गुणात्मक शिक्षण’ ही विश्‍व हिंदू शैक्षणिक संमेलनाची मध्यवर्ती कल्पना होती. वर्तमान काळात शिक्षणाची गुणवत्ता टिकवणे, हिंदू धर्मसंबंधित विषयांत सर्वसाधनपूर्ण विद्वान निर्माण करणे, हिंदू धर्म अध्ययनासाठी अनुकूल वातावरण करणे, त्यासाठी आवश्यक शिष्यवृत्ती प्रदान करणे, पाश्‍चात्त्य विचारप्रवाहांना सामायिक उत्तर देणे आदी विषयांवर चर्चा झाली. आजच्या जगाला ज्ञात असलेले राजीव मल्होत्रा, कोर्नाल्ड एलस्ट, डेव्हिड फ्रोउले, फ्रांस्वा गोतिए आदी विद्वान या संमेलनात वक्ते होते. विेश हिंदू प्रचारमाध्यम (मीडिया) संमेलन हे सर्वात जीवमान व नवीनतम विषयांमुळे रोचक होते. ‘सत्य हे सर्वोच्च’ हे या संमेलनाचे बोधवाक्य होते. तंत्रज्ञान व भविष्यकालीन कल, सोशल मीडिया व हिंदुप्रभाव, करमणूक क्षेत्रात हिंदू मूल्यांचे प्रतिपादन, हिंदू मीडियामधील वाणिज्य पक्ष आदी विषयांवर चर्चा झाली. काही प्रमुख नावांमध्ये मधुर भांडारकर, विवेक अग्निहोत्री, शेफाली वैद्य, सुरेश चव्हणके (सुदर्शन टीव्ही) ही नावे या संमेलनाचे आकर्षण होते. विवेक अग्निहोत्री हा त्याच्या ‘बुद्ध इन ट्राफिक जॅम’ या चित्रपटामुळे व अर्बन नक्सल या पुस्तकामुळे प्रसिद्ध पावला आहे. त्याने ‘द ताश्कंद फाइल्स’ या त्याच्या नवीन चित्रपटाचा नमुना (ट्रेलर) दाखविला.
‘महिलांचा उच्चतम सन्मान’ या भूमिकेभोवती विश्‍व हिंदू महिला संमेलन आयोजित केले होते. आर्थिक व शैक्षणिक जगतात महिलांचे अद्वितीय योगदान, प्रसारमाध्यम व कला, विविध क्षेत्रातील आदर्श महिला, समाजबांधणीत महिलांचे योगदान आदी विषयांवर सखोल चर्चा या संमेलनात झाली. कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. उमा वैद्य, राष्ट्र सेविका समितीच्या सहकार्यवाहिका अलकाताई इनामदार, विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्ष निवेदिता भिडे या काही कर्तृत्वशाली व्यक्तींनी या संमेलनात मार्गदर्शन केले.
विश्‍व हिंदू युवा संमेलनाचे बोधवाक्य होते ठळीश, जीसरपळीश, ङशरव रपव एाशीसश. युवा संमेलनामुळे संपूर्ण परिसरात चैतन्य होते. जवळपास २०० तरुणांनी या संमेलनात भाग घेतला. हिंदू समाजाची ज्ञानशक्ती व क्रियाशक्ती, हिंदू ओळखेची आवश्यकता, प्रसारमाध्यम, मानवाधिकार, राजकारण व आर्थिक क्षेत्रामंधील युवकांचे योगदान व आवश्यकता यांवर विविध युवकांनी अनुभवाच्या आधारावर आपापली मते मांडली.
विश्‍व हिंदू लोकशाही संमेलन नावाप्रमाणे प्रभावशाली होते. विविध देशांमधील हिंदू राजनीतिज्ञ व तद्देशीय सरकारांमधील प्रतिनिधी या संमेलनात सहभागी झाले होते. ‘सर्वांसाठी जबाबदार लोकशाही’ अशी या संमेलनाची मध्यवर्ती भूमिका होती. हिंदू मानवाधिकार रक्षण, राजकारणामध्ये सक्रिय तरुण हिंदू समाज, प्रतिकूल वातावरणात हिंदूंची खंबीर भूमिका आदी विषयांवर सविस्तर चर्चा या संमेलनात झाली.
हिंदू संस्था व मंदिर परिषद ही विविध धार्मिक व आध्यात्मिक संस्थांच्या प्रतिनिधींची होती. ‘संघटना हीच शक्ती’ असे याचे बोधवाक्य होते. आफ्रिकेतील घानामधील हिंदू आश्रम, इस्कॉन, स्वामीनारायण संस्था, भारतातील धार्मिक जगतातील प्रमुख अशी आचार्य सभा, गीतानंद आश्रम इटली, दक्षिण अमेरिकेत कार्यरत असलेला वृन्दा समूह, चिन्मय मिशन आदी विविध संस्थांनी या परिषदेत भाग घेतला. हिंदू केवळ जन्माने असतो, हिंदू केवळ कर्मकांडापुरता असतो, हिंदू कधीही एकत्र येऊ शकत नाही. अशा सर्व कल्पनांना फाटा देत सर्वसमावेशक उदयमान हिंदूंचा उद्गार म्हणजे ही परिषद होती.
याशिवाय रोज सायंकाळी एकत्र चर्चासत्र होते. पहिल्या दिवशी संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रेयजी होसबळे यांच्या संचालनात धार्मिक क्षेत्रातील अधिकारी व्यक्तींचे प्रतिपादन होते. दुसर्‍या दिवशी पद्मविभूषण सोनल मानसिंग, पद्मभूषण नागास्वामी व पद्मश्री मोहनदास पै यांचे प्रतिपादन होते.
समारोपाच्या कार्यक्रमात सर्व संमेलनांमधील निष्कर्षांचे वाचन झाले व भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्याजी नायडूंचे मुख्य मार्गदर्शन झाले. व्यंकय्यांनी हिंदू धर्माच्या आवश्यकतेसंबंधी स्पष्ट विचार मांडले. भारताच्या उपराष्ट्रपतींकडून आलेल्या आश्‍वासक वचनांनी सहभागींमध्ये उत्साह संचारला.
असे हे तीन दिवस वर्षभराचे पाथेय देऊन गेले. पुढील संमेलन बँकॉकला २०२२ साली आहे. आपण सर्वांनी तेथे अवश्य यावे व हिंदू समाज हा आता विजयी रथावर आरूढ झाला आहे, त्याचे देदीप्यमान व व्यापक रूप पाहावे, याशिवाय या लेखाचे काय प्रयोजन असू शकते बरे!

Posted by : | on : 30 Sep 2018
Filed under : आसमंत, पुरवणी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी (254 of 835 articles)

I Am Hindusthani I Am Ashmed I Am Raped
भाग्य विधाता : प्रशांत आर्वे | काश्मीर खोर्‍यातील असंख्य काश्मिरी पंडितांना आपले घरदार सोडून जम्मू आणि दिल्लीच्या परिसरात निर्वासित म्हणून ...

×