ads
ads
दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

•अजित डोवाल यांचे प्रतिपादन •पुलवामा हल्ला कधीच विसरणार नाही,…

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

•टेरर फंडिंगप्रकरणी ईडीची धडक कारवाई, नवी दिल्ली, १९ मार्च…

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

•सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, नवी दिल्ली, १९ मार्च – इमारतीच्या…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

•फेसबूकला होती संपूर्ण माहिती, लंडन, १८ मार्च – कॅम्ब्रिज…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

•शरद पवार यांची मागणी •कुणीच अर्ज भरू नये, मुंबई,…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:31 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:

शिक्षण कसे असायला हवे?

॥ अभिप्राय : डॉ.वाय.मोहितकुमार राव |

एकीकडे अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांचे पीक आले असताना दुसरीकडे मात्र कारकून तयार करणारेच शिक्षण दिले जात आहे. नोकरी-व्यवसाय करता येईल अशा शिक्षणापासून बहुतांश विद्यार्थी आणि तरुण वंचित राहात आहेत आणि महाराष्ट्रात सुशिक्षित बेरोजगारांची मोठी फौज तयार होत आहे. बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी. अशा पदवीधरांची मोठी फौज नोकरी मिळविण्यासाठी वणवण भटकत आहे. सरकारी नोकर्‍यांची मर्यादित उपलब्धता आणि खाजगीक्षेत्रात काम करण्यासाठी लागणार्‍या व्यावसायिक कौशल्याचा अभाव, यामुळे बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली होती. पण, केंद्रात मोदी सरकार सत्तेत आले आणि कौशल्यविकास कार्यक्रमावर या सरकारने भर दिल्याने परिस्थिती बदलत चालली आहे. संपूर्ण चित्र बदलण्यासाठी मोदी सरकारलाही आणखी पाच वर्षांची संधी देणे गरजेचे आहे.

Education Scholarship

Education Scholarship

स्थापनेपासूनच महाराष्ट्र राज्य अन्य राज्यांच्या तुलनेत शिक्षणाच्या बाबतीत प्रगत राज्य होते व आजही आहे. परंतु, परिस्थितीनुसार जे बदल आपण स्वीकारायला हवे होते, ते दुर्दैवाने आपण केले नाहीत. त्यामुळे शिक्षणक्षेत्राची दुर्गती होती. शिक्षणक्षेत्राचे बाजारीकरण झाल्याने गुणवत्ता आणि दर्जा या दोन्ही बाबतीत घसरण झाल्याचे निराशाजनक चित्र पाहायला मिळत होते. पण, सुदैवाने राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फाडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार सत्तेत आले आणि बदल होण्यास सुरुवात झाली. आणखी बरेच काही करायचे बाकी आहे आणि फडणवीस सरकारला आणखी एक संधी मिळाली, तर चित्र शंभर टक्के सकारात्मक दिसेल, यात शंका नाही.
एकीकडे अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांचे पीक आले असताना दुसरीकडे मात्र कारकून तयार करणारेच शिक्षण दिले जात आहे. नोकरी-व्यवसाय करता येईल अशा शिक्षणापासून बहुतांश विद्यार्थी आणि तरुण वंचित राहात आहेत आणि महाराष्ट्रात सुशिक्षित बेरोजगारांची मोठी फौज तयार होत आहे. बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी. अशा पदवीधरांची मोठी फौज नोकरी मिळविण्यासाठी वणवण भटकत आहे. सरकारी नोकर्‍यांची मर्यादित उपलब्धता आणि खाजगीक्षेत्रात काम करण्यासाठी लागणार्‍या व्यावसायिक कौशल्याचा अभाव, यामुळे बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली होती. पण, केंद्रात मोदी सरकार सत्तेत आले आणि कौशल्यविकास कार्यक्रमावर या सरकारने भर दिल्याने परिस्थिती बदलत चालली आहे. संपूर्ण चित्र बदलण्यासाठी मोदी सरकारलाही आणखी पाच वर्षांची संधी देणे गरजेचे आहे.
एकीकडे बेरोजगारांची संख्या वाढत चालली असताना दुसरीकडे पैशांअभावी शिक्षण अर्धवट सोडून मोलमजुरी करणार्‍यांची संख्याही चिंताजनक पातळीवर चालली आहे. मूल्यशिक्षणाच्या अभावी तरुण पिढी भरकटत चालली आहे आणि त्याचे वाईट परिणाम रेव्ह पार्ट्यांच्या रूपात आणि पब्ज व क्लब्सच्या रूपात दिसत आहेत. रोजगाराभिुमख आणि व्यवसायाभिमुख शिक्षण पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे गुन्हेगारी वाढली होती. पण, गृहमंत्रीही असलेल्या फडणवीसांनी बर्‍यापैकी नियंत्रण मिळविले आहे.
तरीही या पातळीवर आता ठोस उपाय करण्याची गरज आहे. सामाजिक जाणिवेचा जाणूनबुजून विसर पडलेल्या समाजात आता जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. कारण, शिक्षणक्षेत्राच्या बाजारीकरणामुळे अनैतिकता आली आहे. पुढची पिढी हा देशाचा आधार आहे असे जर आपण मानत असू, तर शिक्षणात नैतिकता आणि मूल्यं जोपासणेही आवश्यक ठरणार आहे. एकीकडे विनाअनुदानित शिक्षण संस्थांचे दाट जाळे विणले गेले आहे, तर दुसरीकडे अनुदानित शिक्षण संस्थांकडे पुरेशा संसाधनांचा अभाव आहे. अशा विचित्र कैचीत शिक्षणक्षेत्र सापडले आहे. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाला, असे मात्र मुळीच म्हणता येणार नाही. शिक्षणाचा विस्तार, सर्वसमावेशकता, दर्जा आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न करता येऊ शकतात. राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेत आले, तर खाली नमूद विविध उपाययोजना करून शिक्षणक्षेत्राचे पावित्र्य कायम राखले जाईल आणि बेरोजगारांची फौजही तयार होणार नाही.
प्राथमिक शिक्षण सक्तीचे
प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची १०० टक्के नोंदणी होईल, याची पूर्ण काळजी घेतली गेली पाहिजे. राईट टू एज्युकेशनच्या माध्यमातून अशी काळजी घेतली जात आहे, ही आनंदाची बाब म्हटली पाहिजे. त्याचप्रमाणे विद्यार्थी शिक्षण अर्धवट सोडणार नाहीत अशीच अभ्यासक्रमाची रचना केली जावी आणि शिक्षणात विद्यार्थ्यांची रुची राहिली पाहिजे, अशी शिकविण्याची पद्धत विकसित केली जावी. गळती थांबविल्यानंतर प्राथमिक शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता राखण्यासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत. हसतखेळत शिक्षणावर भर दिला जावा. दप्तराचे ओझेही कमी केले जावे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणातही सुधारणा
प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती थांबवीत दर्जा आणि गुणवत्ता सुधारण्यासाबेतच माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षणाचाही दर्जा सुधारला जावा आणि ‘नॉलेज सोसायटी’ विकसित करण्यावर भर देण्यात यावा. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये असे शिक्षण दिले जावे की, त्याद्वारे एक ज्ञानसंपन्न समाजनिर्मिती करणे शक्य होईल.
मुलींना मोफत शिक्षण
मुलींनी शेवटपर्यंत शिक्षण घ्यावे आणि स्वावलंबी व्हावे यासाठी राज्यातील मुलींना पदवीपर्यंतचे संपूर्ण शिक्षण मोफत द्यायला हवे. आईवडिलांना मुलींचा सांभाळ करणे अवघड होणार नाही आणि ते सहज आपल्या मुलींना शाळेत पाठवतील, यासाठी काही विशेष सवलती मुलींना दिल्या तर अधिक बरे. गरीब आणि गरजू मुलींना प्रसंगी मोफत शिक्षणासोबतच शैक्षणिक साहित्यही अल्पदरात आणि प्रसंगी मोफत उपलब्ध करून दिले जायला पाहिजे. त्यासाठी एक खास योजना तयार केली जावी. राज्यातील कन्याभ्रूणहत्येच्या दुर्दैवी घटना रोखण्यासाठीही या योजनेद्वारे मदत होईल आणि स्त्री-पुरुष प्रमाणातील विषमता दूर होण्यासही ही योजना साहाय्यभूत ठरेल.
शहरी व ग्रामीण शाळांमध्ये एकच अभ्यासक्रम
शिक्षणाच्या बाबतीत ग्रामीण आणि शहर असा कुठलाही भेद केला जाणार नाही. चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि आमगावपासून खामगावपर्यंत प्रत्येक इयत्तेसाठी एकसारखा अभ्यासक्रम असावा. चौथीत शिकणार्‍या मुंबईच्या विद्यार्थ्याला जे ज्ञान मिळेल, तेच ज्ञान चौथीत शिकणार्‍या ग्रामपंचायतीच्या शाळेतील विद्यार्थ्यालाही मिळेल, अशी व्यवस्था अंमलात आणली जावी. कुठेही भेद केला जाऊ नये. याद्वारे शिक्षणाच्या दर्जातील तफावत दूर होईल आणि ग्रामीण विद्यार्थ्यांचा शहरांकडे असलेला ओढा कमी होईल. एकच अभ्यासक्रम, एकच परीक्षा पद्धती, शिकविण्याची तर्‍हाही सारखी राहील, याची काळजी घेतली जावी. यासाठी ग्रामीण भागात अध्यापनाचे कार्य करणार्‍या शिक्षकांना वेळोवेळी प्रशिक्षण द्यावे लागेल. त्यासाठी रिफ्रेशर कोर्स सक्तीचे करावे लागतील.
अभ्यासक्रमांमध्ये व्यापक बदल
कारकून निर्माण करणारे शिक्षण संपुष्टात आणून रोजगारक्षम आणि व्यवसायाभिमुख शिक्षण मुलांना मिळावे आणि त्यातून एक सक्षम पिढी तयार व्हावी, या दृष्टीने शालेय अभ्यासक्रमापासून तर महाविद्यालयीन अभ्यासक्रमापर्यंत आवश्यकतेनुसार व्यापक बदल करण्याची नितान्त गरज आहे. जे विषय शिकवून मुलांना फायदा नाही असे विषय अभ्यासक्रमातून काढून टाकण्यासंबंधी शिक्षणतज्ज्ञांशी चर्चा करावी आणि जे विषय शिकल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल होऊ शकते अशा विषयांचा समावेश अभ्यासक्रमांमध्ये करावा. कालबाह्य झालेले विषय अभ्यासक्रमातून बाद करून विद्यार्थ्यांना जे शिकण्यात रुची आहे आणि जे विषय शिकल्याने कारकून निर्माण न होता स्वावलंबी पिढी तयार होईल, अशाच विषयांचा अंतर्भाव अभ्यासक्रमांमध्ये करून विद्यार्थ्यांची गोडी वाढविण्याचाही प्रयत्न करावा लागेल.
शिष्यवृत्ती
इयत्ता चौथी आणि इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी आज जी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते, त्या परीक्षेला बसणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या आज मर्यादित आहे. सर्वच विद्यार्थ्यांना या परीक्षा देता याव्यात आणि त्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास व्हावा, या दृष्टीने परीक्षेच्या स्वरूपात आवश्यक ते बदल करायला हवेत. तसेच परीक्षेच्या तयारीसाठी शाळांमध्येच अतिरिक्त तासिका घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे. शिवाय, आज शिष्यवृत्तीची जी रक्कम दिली जाते, ती वाढविली पाहिजे. या परीक्षांचा फायदा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी झाला पाहिजे, या दृष्टीने विचार करून अभ्यासक्रमातही आवश्यक ते बदल केले पाहिजेत.
राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा आणि तत्सम अन्य परीक्षांसाठीही शाळा-शाळांमधून मार्गदर्शन केंद्रे सुरू केले जावेत आणि गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना नि:शुल्क मार्गदर्शनाची सोय उपलब्ध करून दिली जावी. गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी विशेष शिष्यवृत्ती योजना सुरू केली पाहिजे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे.
करीअर मार्गदर्शन केंद्रे
जे विद्यार्थी नववी-दहावीत शिकत आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी करीअर मार्गदर्शन केंद्र सुरू केले पाहिजे. दहावी हा साधारणपणे आयुष्यातील टर्निंग पॉईंट मानला जातो. त्यामुळे दहावीनंतर कोणी काय केले पाहिजे, याचे सुयोग्य मार्गदर्शन या केंद्रांद्वारे केले जावे. एखाद्याला सीए व्हायचे असेल तर त्याने काय करावे, कंपनी सेक्रेटरी व्हायचे असेल तर काय करावे, वकील व्हायचे असेल तर कोणत्या विद्याशाखेत प्रवेश घ्यावा, डॉक्टर-इंजिनीअर व्हायचे असेल तर अकरावीत कुठे प्रवेश घ्यावा, एखाद्याला आयएएस अधिकारी व्हायचे असेल तर त्या दृष्टीने वाटचाल कशी करावी, सरकारी नोकर्‍यांमध्ये कारकुनापासून तर अधिकार्‍यापर्यंत विविध पदांवर नियुक्ती मिळावी यासाठी काय करावे; बँका, रेल्वे, एलआयसी, केंद्र सरकारची विविध कार्यालये यामध्ये नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न कसे करावेत, याचे उपयुक्त मार्गदर्शन या केंद्रांच्या माध्यमातून अनुभवी लोक करतील, अशी व्यवस्था अंमलात आणावी. थोडक्यात काय, तर ज्याला त्याला त्याच्या कुवतीनुसार पुढली वाटचाल करण्यासाठी सल्ला दिला जावा, दिशा दाखवली जावी. ही जबाबदारी शासनाने नि:शुल्क पार पाडावी.
भाषाप्रभुत्वासाठी विशेष योजना
विद्यार्थ्यांनी आपल्या मातृभाषेत शिक्षण घेतानाच अन्य भाषांवर प्रभुत्व मिळविणे आता गरजेचे झाले आहे. जागतिकीकरण आणि उदारीकणामुळे तसेच माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेल्या अफाट प्रगतीमुळे जग जवळ आले आहे. जग जवळ आल्याचा फायदा प्रत्येक विद्यार्थ्याला मिळावा यासाठी इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, जापनीज अशा विविध भाषा आत्मसात करणे आवश्यक झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक जिल्हास्थानी अशी भाषा प्रशिक्षण केंद्रे सुरू करायला हवीत. याचा लाभ अगदी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही घेता यावा यासाठी शनिवार आणि रविवार असे आठवड्यातून दोनच दिवस वर्ग घेतले तरी चालेल. ही योजना पूर्णपणे शासकीय स्तरावरच राबवायची असली, तरी योग्य ठिकाणी खाजगी संस्थांचीही मदत घ्यावी आणि नाममात्र शुल्कात विद्यार्थ्यांना परदेशी भाषा शिकण्याची संधी उपलब्ध करून द्यावी.
शारीरिक विकासावर भर
मुलांना नुसते उच्च शिक्षण देऊनच काम भागायचे नाही, तर त्यांच्या बौद्धिक विकासासोबतच शारीरिक विकासाकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन शाळांमध्ये मुलांच्या आवडीनुसार खेळांची योजना तयार केली जावी. ज्याला जो खेळ आवडतो, तो त्याने सहाध्यायांसोबत आवडीने खेळावा, असे वातावरण प्रत्येक शाळेत निर्माण केले जावे. क्रीडा साहित्य खरेदी करण्यासाठी प्रत्येक शाळेला पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा. त्याचप्रमाणे प्रत्येक शाळेत पूर्ण वेळ क्रीडा शिक्षकाची नेमणूकही करायला हवी. मुलांचा शारीरिक विकास करतानाच महाराष्ट्रातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये टिकाव धरतील, असे खेळाडू निर्माण केले जावे. यातून विद्यार्थ्यांच्या विकासासोबतच महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेतही भर पडेल. बौद्धिक आणि शारीरिक विकासाची सांगड घालून एक सशक्त व ज्ञानसंपन्न पिढी निर्माण करण्याचे उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवून शाळाशाळांमधून स्पोर्टस् अ‍ॅक्टिव्हिटीज् राबविण्यात याव्यात. योगाभ्यास आणि प्राणायाम याद्वारे विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम ठेवण्याचे उद्दिष्टही साध्य केले जावे. गरज भासल्यास क्रीडा विकासासाठी स्वतंत्र शाळा-महाविद्यालये निवडक ठिकाणी सुरू करायला हवीत. त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यापीठात एक स्वतंत्र अशी क्रीडा अकादमी स्थापन करायला पाहिजे. या अकादमीतून क्रीडा हा विषय घेऊनही पदवी प्राप्त करण्याची सोय इच्छुकांना उपलब्ध होईल.
वसतिगृहांचे जाळे
गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शहरात राहून आपल्या आवडीचे शिक्षण घेता यावे आणि ते सहज उपलब्ध व्हावे, हा दृष्टिकोन समोर ठेवून शहरी भागांत वसतिगृहांचे जाळे विणले जावे. काही ठिकाणी अगदीच नि:शुल्क तर काही ठिकाणी अल्पसे शुल्क घेऊन विद्यार्थ्यांना ही राहण्याची आणि जेवण्याची सोय उपलब्ध करून दिली गेली तर उत्तमच. या वसतिगृहांमधील सोयी-सुविधा दर्जेदार असतील याचीही काळजी घेतली जावी. वसतिगृहांमध्ये राहणार्‍या विद्यार्थ्यांची चारित्र्यसंपन्न पिढी तयार करण्याकडेही विशेष लक्ष दिले जावे. त्या दृष्टीने एक योजना आखली जावी आणि त्याबरहुकूम विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार केले जावे.
कमवा आणि शिका
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपल्या संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी कमवा आणि शिका ही अभिनव अशी योजना अंमलात आणली होती. तशीच योजना संपूर्ण राज्यभर अंमलात आणून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविण्याचा यशस्वी प्रयत्न केला जावा. एका विशिष्ट वयोगटातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना त्यांच्या आवडीप्रमाणे आणि अंगभूत कौशल्याप्रमाणे काम उपलब्ध करून द्यायचे आणि त्यासाठी त्यांना बाजारभावाप्रमाणे मोबदलाही द्यायचा, जेणेकरून गरजू विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च त्यांचा त्यांनाच भागविता येईल. यातून विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबनही विकसित होईल आणि त्यांना कमावलेल्या पैशांचे मोलही कळेल. त्याचप्रमाणे एक जबाबदार पिढी निर्माण होऊन समाजाच्या व राज्याच्या सर्वांगीण विकासाला हातभारही लावेल.
स्पेशलाइज्ड विद्यापीठांची स्थापना
राज्यातील तरुणांना विदेेशात शिक्षण घेण्यासाठी जाण्याची गरज भासणार नाही, असे क्रांतिकारी बदल शिक्षणाच्या धोरणात केले जातील आणि विषयांनुसार स्पेशलाइज्ड विद्यापीठांची स्थापना केली जावी. जागतिक पातळीवर ज्या विषयांना आज विशेष महत्त्व आहे, त्या विषयांना वाहिलेले किमान एक विद्यापीठ एका शहरात स्थापन केले जावे. अशा विद्यापीठांचे जाळे राज्यभर विणले जाईल. राज्याच्या अतिमागास भागातही अशी विद्यापीठे स्थापन करण्यावर भर दिला जावा आणि त्या भागाचे मागासलेपण दूर करण्याचा प्रयत्न केला जावा. •••

Posted by : | on : 26 Aug 2018
Filed under : आसमंत, डॉ.वाय.मोहितकुमार राव, पुरवणी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, डॉ.वाय.मोहितकुमार राव, पुरवणी, स्तंभलेखक (557 of 1287 articles)


अर्थपूर्ण : यमाजी मालकर | जागतिकीकरणापासून आपल्या देशात होणारे बदल योग्य आहेत की अयोग्य, हा प्रश्‍न अजूनही अनेक भारतीयांच्या मनात ...

×