हज सबसिडी बंद

हज सबसिडी बंद

►मुस्लिमांना प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार देणार ►नकवी यांची घोषणा, नवी…

चकमकीत मला ठार करण्याचा कट : तोगडिया

चकमकीत मला ठार करण्याचा कट : तोगडिया

►लवकरच पुराव्यांसह समोर येणार, अहमदाबाद, १६ जानेवारी – १०…

न्या. लोयांच्या मृत्यूसंबंधी दस्तावेज याचिकाकर्त्याला द्या

न्या. लोयांच्या मृत्यूसंबंधी दस्तावेज याचिकाकर्त्याला द्या

►सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश, नवी दिल्ली, १६ जानेवारी…

क्षेपणास्त्र डागल्याच्या संदेशामुळे गोंधळ

क्षेपणास्त्र डागल्याच्या संदेशामुळे गोंधळ

वॉशिंग्टन, १४ जानेवारी – अमेरिकेच्या हवाईक्षेत्रातील हवाई बेटावर क्षेपणास्त्र…

‘जम्मू-काश्मीरला जाणे टाळा’

‘जम्मू-काश्मीरला जाणे टाळा’

►अमेरिकेची पर्यटकांना सूचना, वॉशिंग्टन, ११ जानेवारी – अमेरिकेने भारतात…

ममतांच्या दौर्‍यातील संपादक ‘चमचे-चोर’?

ममतांच्या दौर्‍यातील संपादक ‘चमचे-चोर’?

लंडन, १० जानेवारी – पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी…

भाजपाची तिरंगा रॅली

भाजपाची तिरंगा रॅली

►संविधान बचाव रॅलीला प्रत्युत्तर ►•रावसाहेब दानवे यांची घोषणा, मुंबई,…

ना. स. फरांदे कालवश

ना. स. फरांदे कालवश

पुणे, १६ जानेवारी – भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि विधान…

बापू बिरू वाटेगावकर यांचे निधन

बापू बिरू वाटेगावकर यांचे निधन

सांगली, १६ जानेवारी – पश्‍चिम महाराष्ट्रात ‘रॉबिनहूड’ प्रमाणे आयुष्य…

श्री सिद्धरामेश्‍वर यात्रा : सामाजिक सप्तरंगांचे एक आकाश

श्री सिद्धरामेश्‍वर यात्रा : सामाजिक सप्तरंगांचे एक आकाश

॥ तरंग : दीपक कलढोणे | ‘हर्र बोला हर्र’…

विवेकानंदांचे परखड हिंदुत्व!

विवेकानंदांचे परखड हिंदुत्व!

॥ विशेष : मुकुल कानिटकर | एकीकडे जग भारताकडे…

संभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा

संभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | हा वारस…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:12
अयनांश:
Home » आसमंत » शिवरायांचे किल्ले

शिवरायांचे किल्ले

प्रा.डॉ. श्रीकांत पारखी

महाराष्ट्राचे आणि भारताचे प्रवासवर्णन लिहीत असताना, शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांविषयी माहिती लिहिणे गरजेचेच आहे. कारण शिवरायांच्या किल्ल्यांशिवाय भारताचा इतिहास व भौगोलिक माहितीच पूर्ण होत नाही. महाराष्ट्रदर्शन करीत असताना शिवरायांचे ‘शिवनेरी’, ‘सिंहगड’, ‘प्रतापगड’, ‘सज्जनगड’, ‘सिंधुदुर्ग’ व ‘रायगड’ हे किल्ले बघितले.

pratapgadमहाराष्ट्राचे आणि भारताचे प्रवासवर्णन लिहीत असताना, शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांविषयी माहिती लिहिणे गरजेचेच आहे. कारण शिवरायांच्या किल्ल्यांशिवाय भारताचा इतिहास व भौगोलिक माहितीच पूर्ण होत नाही. महाराष्ट्रदर्शन करीत असताना शिवरायांचे ‘शिवनेरी’, ‘सिंहगड’, ‘प्रतापगड’, ‘सज्जनगड’, ‘सिंधुदुर्ग’ व ‘रायगड’ हे किल्ले बघितले.
शिवनेरी
अष्टविनायकातील लेण्याद्रीच्या गिरिजात्मजाचे दर्शन घेऊन, समोरच आम्हाला यायला खुणावत असलेल्या शिवरायांच्या जन्मस्थानाकडे- शिवनेरीकडे निघालो. जुन्नर गावाच्या समोरील डोंगरावर शिवनेरी किल्ला आहे. हा गिरिदुर्ग असून नाणेघाटाच्या डोंगररांगांमध्ये समुद्रसपाटीपासून ३५०० फूट उंचावर आहे. भारत सरकारने या किल्ल्याला महाराष्ट्रातील राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आहे.
शिवनेरी किल्ला सातवाहनकाळात बांधला गेला. सातवाहनांनंतर शिवनेरी चालुक्य, राष्ट्रकुट व यादवांच्या सत्तेेखाली होता. नंतर इ. स. १४४६ मध्ये हा किल्ला निजामशाहीत आला. यानंतर इ. स. १५९५ मध्ये शिवनेरी व जुन्नर प्रांत मालोजीराजे भोसले यांच्याकडे आला. अशा प्रकारे भोसल्यांच्या ताब्यात शिवनेरी असताना फाल्गुन वद्य तृतीया, शुक्रवार दि. १९ फेब्रुवारी १६३० ला सूर्यास्तानंतर जिजाऊंच्या पोटी शिवराय जन्माला आले. गडावर असलेल्या ‘शिवाई’ देवीच्या नावावरूनच जिजाऊंनी बाळाचे नाव ‘शिवाजी’ ठेवले.
आम्ही गडावर अर्ध्या अंतरापर्यंत बसने गेलो व पुढे पायर्‍या चढून संपूर्ण शिवनेरी किल्ला बघितला. गडावर पायी चढत असताना सात दगडी दरवाजे लागले. पाचवा म्हणजे शिवाई दरवाजा पार केल्यावर मुख्य वाट सोडून उजव्या बाजूने पुढे गेल्यावर शिवाई देवीचे मंदिर लागते. मंदिरात देवीचे दर्शन घेतले. मंदिराच्या मागे असणार्‍या कड्यात सहा गुहा आहेत. नंतर आम्ही पुढे सातव्या दरवाजातून गडावर प्रवेश केल्यावर समोरच अंबरखाना बघितला. आज या अंबरखान्याची पडझड झालेली आहे. पूर्वी या अंबरखान्याचा उपयोग धान्य साठविण्यासाठी केला जायचा. पुढे समोर गेल्यावर ईदगाह आहे. वाटेत थकलो म्हणून पाण्याच्या टाकीजवळ थांबलो. या  टाक्या गंगा व यमुना या नावाने प्रसिद्ध आहेत. पहाडात कोरूनच ती तयार केलेली आहे. संपूर्ण किल्ल्याला त्या काळात येथूनच पाणी पुरविले जात असे.
पुढे गेल्यावर आम्ही शिवकुंज बघितले. हे शिवनेरी किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचे स्मारक आहे. या ठिकाणी जिजाबाईंसमोर बालशिवाजी हातातील छोटी तलवार फिरवीत आईला आपली स्वराज्याची स्वप्ने सांगत आहे, अशा प्रकारचा जिजाऊ व शिवरायांचा पुतळा आहे. शिवकुंजासमोरच कमानी मशीद आणि हमामखाना आहे.
शिवकुंजापासून थोडे समोर शिवजन्मस्थानाची दोन मजली दगडी इमारत आहे. येथेच खालच्या खोलीत शिवरायांचा जन्म झाला. तेथे त्यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. आम्ही पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन शिवरायांचे स्मरण केले. त्यानंतर पुढे कडेलोट टोकावर गेलो. सुमारे दीड हजार फूट उंचीच्या या सरळसोट कड्याचा उपयोग गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी होत असे.
शिवनेरी किल्ला बघितल्यावर, त्या काळात हा किल्ला जिंकायला किती अवघड होता, याची कल्पना येते. आजही किल्ला जपला असल्याने चांगल्या स्थितीत असून, दरवर्षी महाराष्ट्र सरकारकडून १९ फेब्रुवारीला या ठिकाणी शिवजन्म धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो.
सिंहगड
छत्रपती शिवाजीराजेंच्या स्वराज्यातील एक महत्त्वपूर्ण गड सिंहगड! पुण्यापासून साधारण २५ किमी. अंतरावर, हवेली तालुक्यात सह्याद्री पर्वतरांगांमध्ये ४३०४ फूट उंचीवर हा किल्ला साधारणत: २००० वर्षांपूर्वी बांधला. आज गडापर्यंत रस्ता आहे. खाजगी वाहनाने आपल्याला गडावरील पुणे दरवाजात जाता येते. पायवाटेने गड चढत असताना जंगलात थोड्या-थोड्या अंतरावर ताक, लिंबुपाणी, चिंच, उकडलेली बोरं विकणारे मावळे आम्हाला दिसले. आम्ही या गावरान मेव्याचा आनंद लुटला.
गडावर पुणे दरवाजातून प्रवेश करताच डाव्या बाजूला घोड्यांची पागा आहे. थोडे समोर जाताच गावातील स्थानिक रहिवासी बाजरीची भाकर, झुणका, कांद्याची भजी व गोड दही पर्यटकांना उपलब्ध करून देतात. गडावर कौंडिण्येश्‍वराचे मंदिर  आहे. कौंडिण्येश्‍वराच्या मंदिरावरूनच या किल्ल्याला कोंडाणा हे नाव होते. परंतु, १६७० मध्ये नरवीर तानाजी मालुसरेंनी घोरपडीच्या साहाय्याने दोणगिरीचा अवघड कडा रात्रीला चढून किल्ल्यात प्रवेश केला व स्वत:चे बलिदान देऊन हा किल्ला स्वराज्यात आणला. तेव्हापासून गडाचे नाव शिवरायांनी सिंहगड ठेवले. गडावर तानाजी मालुसरेंचा अर्धपुतळा बसविला आहे तसेच राजाराम महाराजांची समाधीसुद्धा आहे. गडाच्या दुसर्‍या बाजूने कल्याण दरवाजा आहे. सिंहगडावरून पुरंदर, तोरणा इत्यादी किल्लेसुद्धा सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये दूरवर दिसतात. आज किल्ला पुरातत्त्व विभागाच्या अंतर्गत आहे.
प्रतापगड
छत्रपती शिवाजीराजे १६५६ मध्ये जावळी परिसरातून जात असता राजांचे लक्ष एका डोंगराने वेधले- ढोरप्या डोंगर. दोन्ही बाजूंनी खोलच खोल दर्‍या. जेथून चढू शकतील फक्त वार्‍याचे झोत आणि उतरू शकतील पाण्याचे प्रवाह. अशा जागी गड हवाच, कोकण मार्ग रोखणारा. राजांचे निर्णय झटपट. पंतप्रधान मोरोपंत पिंगळे यांना त्वरीत आज्ञा होऊन हिरोजी इंदूलकर, या राजांच्या विश्‍वासू स्थापत्य विशारदाच्या हस्ते गडाच्या बांधकामास सुरुवात. १६५८ च्या उत्तरार्धात गड बांधून पूर्णही झाला. धन्य ते कारागीर.
दोन मैल तटबंदीच्या परिसराचा, काहीसा फुलपाखरासारखा आकार असलेला भक्कम गड प्रतापगड. प्रतापगडावर पोहोचल्यावर दुरून गडाकडे बघितल्यावर, गडाचा दरवाजा कुठे असावा? ही शंका निर्माण करणारा एकमेव दरवाजा! गडावर एकूण चार तलाव. तलाव खोदून त्यातून निघालेल्या प्रचंड दगडांनी गडाची तटबंदी उभारली. शिवकालीन पायर्‍या- छत्रपतींची पदकमले उमटण्याचे भाग्य लाभलेल्या.
पुढे गेल्यावर श्री भवानी मातेचे मंदिर आहे. महाराजांनी नेपाळमधील गंडकी नदीमधून आणलेल्या शाळीग्रामाची ही मूर्ती बनवून घेतली व १६६१ मध्ये प्रतिष्ठापना केली. तेथेच स्फटिकाचे भव्य शिवलिंग असून हे शिवलिंग चांदीच्या पेटीत विराजमान आहे. तेथेच बाहेरच्या बाजूस शिवकालीन मोठमोठे नगारे ठेवले आहेत. सोबतच शिवरायांनी अफजल खानाच्या भेटीच्या वेळी घातलेली वाघनखे, चिलखत, शिरस्त्राण तसेच तलवार आणि बिचवासुद्धा ठेवलेला आहे.
गडावर शिवरायांचा भव्य अश्‍वारूढ पुतळा असून, त्याचे अनावरण ३० नोव्हेंबर १९५७ रोजी जवाहरलाल नेहरूंनी केले होते. खानाचा कोथळा शिवरायांनी आपल्या वाघनखांनी बाहेर काढला तेथेच खानाची कबर आहे.
सज्जनगड
समर्थ रामदासस्वामींच्या वास्तव्याने पावन झालेले ठिकाण म्हणजे सज्जनगड! तेथे समर्थांची समाधी आहे. आम्ही समाधीचे दर्शन घेतले. समर्थांच्या पादुका आणि त्यांनी वापरलेल्या वस्तू- ज्यामध्ये काठी, कमंडलू आणि भांडी येथे ठेवलेली आहेत. या किल्ल्याचे पूर्वीचे नाव परळी होते. शिवरायांनी १६७३ मध्ये हा किल्ला मोगलांकडून जिंकून स्वराज्यात आणला. समर्थांच्या वास्तव्यामुळे परळीचे नाव सज्जनगड झाले. गडाभोवती तटबंदी असून दगडी प्रवेशद्वार आहे. गडावर निवासाची व प्रसादाची व्यवस्था आहे. समोरच ‘अजिंक्यतारा’ नावाचा भव्य किल्ला समोरच्या डोंगरावर आहे. येथून सातारा शहर १२ कि.मी. अंतरावर आहे.
सिंधुदुर्ग
अरबी समुद्रात किनार्‍यावरून साधारण २ किमी आत शिवरायांनी हा दुर्ग बांधायला २५ नोव्हेंबर १६६४ रोजी सुरुवात केली. महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते. किल्ल्याचे क्षेत्र कुरटे बेटावर ४८ एकरावर पसरलेले आहे. तटबंदीची लांबी साधारण ३ कि.मी. आहे. तट ३० फूट उंच असून १२ फूट रुंद आहे. बुरुजांची संख्या ५२ असून ४५ दगडी जिने आहेत. या किल्ल्यात गोड्या पाण्याच्या तीन विहिरी असून त्यांची नावे ‘दूध विहीर’, ‘साखर विहीर’ आणि ‘दही विहीर’ अशी आहेत. या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचे मंदिर आहे. हे मंदिर इ. स. १६९५ मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराजांनी बांधले.
या किल्ल्याच्या उभारणीसाठी तीन वर्षांचा कालावधी लागून एक कोटी होन खर्च आला. ऐतिहासिक सौंदर्य लाभलेला सिंधुदुर्ग, कुरटे बेटावरील काळ्या खडकावर साडेतीनशे वर्षांपासून उभा आहे. शिवकालीन चित्रगुप्त याने लिहिलेल्या बखरीत या दुर्गाबाबत खालील मजकूर आहे-
‘चौर्‍याऐंशी बंदरात हा जंजिरा|
अठरा टोपीकरांचे उतरावर शिवलंका|
अजिंक्य जागी निर्माण केला॥
सिंधुदुर्ग जंजिरा, जगी अस्मान तारा|
जैसे मंदिराचे मंडन, श्री तुलसी वृंदावन|
राज्याचा भूषण अलंकार|
चतुर्दश महारत्नापैकीच पंधरावे रत्न|
महाराजांस प्राप्त जाहले॥
सिंधुदुर्गाचे प्रवेशद्वार पूर्वेस आहे. त्या जागी प्रवेशद्वार आहे हे प्रथमदर्शनी लक्षातच येत नाही! प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश करताच उजव्या बाजूला नारळाचे वैशिष्ट्यपूर्ण झाड आहे. ज्याला अर्ध्या उंचीवरून फांदी फुटून वर दोन भागात होते. पुढे मारुतीचे मंदिर आहेे. किल्ल्याच्या बांधणीसाठी वापरण्यात आलेला चुना आजही दिसतो. किल्ल्यावर आजही भगवा ध्वज डौलाने फडकत आहे. गडावर ठिकठिकाणी तोफा ठेवण्याच्या जागा आहेत. बंदुका शत्रूवर रोखण्यासाठी तटाला भोके आहेत. सैनिकांसाठी पायखाने आहेत. यावरून महाराजांनी साडेतीनशे वर्षांपासून सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश दाखविला आहे. असंख्य मावळ्यांच्या साक्षीने आणि परिश्रमाने समुद्रात हा किल्ला उभा केला आहे. तो आजही पर्यटकांना आकर्षित करतोे.
रायगड
अलिबाग जिल्ह्यात मुख्यालयापासून साधारण ८० किमी. अंतरावर सह्याद्री पर्वतरांगांमध्ये रायगड असून जिल्ह्याची ओळख रायगड नावानेच आहे. समुद्रसपाटीपासून २७०० फूट उंच हा गड असून, मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची खास ओळख आहे. शिवरायांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून ६ जून १६७४ मध्ये आपला राज्याभिषेक याच गडावर करून स्वराज्य राजधानी बनविली. येथूनच त्यांनी दक्षिण दिग्विजयास प्रारंभ केला.
रायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ होते. युरोपियन त्यास पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम! निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरताच होई. शिवरायांनी जावळीच्या मोर्‍यांकडून ६ एप्रिल १६५६ रोजी किल्ला ताब्यात घेतला. पुढे शिवरायांनी या गडाची राजधानीच्या दृष्टीने बांधणी करून गडावर राजवाडा, गंगासागर तलाव, जगदीश्‍वर मंदिर, बाजारपेठ, सैनिकांची राहण्याची घरे इत्यादी उभारली.
गडावर चढण्यास सुमारे १४५० पायर्‍या असून, त्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावापासून आहेत. आज गडावर रोप-वे नेसुद्धा जाता येते. गडाच्या पश्‍चिमेकडे हिरकणी बुरूज, उत्तरेकडे टकमक टोक, श्री शिरकाई मंदिर आणि मध्यभागी असलेला शिवरायांचा पुतळा आणि समाधी, वाघ्या कुत्र्याची समाधी आणि मेघडंबरी हे मुख्य आकर्षण आहे.
याशिवाय गडावर खुबलढा बुरूज, नाना दरवाजा, मशीदमोर्चा, महादरवाजा, चोरदिंडी, हत्तीतलाव, गंगासागर तलाव, स्तंभ, पालखी दरवाजा, मेणा दरवाजा, राजभवन, राजसभा, नगारखाना, बाजारपेठ, जगदीश्‍वर मंदिर, शिरकाई मंदिर, कुशावर्त तलाव, वाघ दरवाजा, टकमक टोक इ. प्रेक्षणीय स्थळे आहेत.
गडावर राहण्यासाठी धर्मशाळा असून तेथे विनाशुल्क सोय आहे तसेच जेवणाचीसुद्धा व्यवस्था आहे. अशा प्रकारे स्वराज्याच्या या राजधानीचे वर्णन करताना सभासद बखर म्हणते-
‘‘राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा,
चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच.
पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासिव एकच आहे.
दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका.
दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत
संतुष्ट झाले आणि बोलील, तक्तास जागा हाच गड करावा
॥ भवनी जय शिवाजी॥

शेअर करा

Posted by on Oct 30 2016. Filed under आसमंत. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

मागील बातम्या, लेख शोध

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आसमंत (988 of 1002 articles)


योगानंद काळे चीनमध्ये उत्पादित होणार्‍या वस्तूंवर भारतीय नागरिकांनी बहिष्कार घालावा आणि आपली राष्ट्रभावना अधिक प्रखर करावी, असे आवाहन तरुण भारत ...