ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी » शेअर बाजारातील पडझड

शेअर बाजारातील पडझड

॥ विशेष : अजय तिवारी |

अमेरिकेतल्या शेअर मार्केटमधील पडझडीचे पडसाद आशियातल्या शेअर बाजारावरही उमटले. सार्‍या जगासह भारताच्या शेअर बाजारात भूकंप आला. बीएसईचा वर्षारंभापासून हिशेब करता तो १९ टक्क्यांनी गडगडला आहे. गेल्या महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारातून १०,८२५ कोटी रुपये काढून घेतले आहेत. विदेशी गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारातून पाय काढून घेतल्यामुळे म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापकांना गुंतवणुकीची संधी मिळाल्याचं मानलं जातं. किरकोळ गुंतवणूकदारांमार्फत नियोजनबद्ध गुंतवणूक योजनेतला ओघ फंड व्यवस्थापकांसाठीही प्रोत्साहन देणारा ठरला आहे.

Share Market

Share Market

जागतिक नाणेनिधीनं भारताचा आर्थिक विकासदर जगात सर्वाधिक राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केल्यानंतर लगेचच भारतीय शेअर बाजार कोसळला. गेल्या महिन्याभरात त्याचं कोसळणं, उसळणं सुरूच होतं. चार हजारांची उसळण घेतल्यानंतर करेक्शन अपेक्षितच होतं. परंतु एकदम एक हजार अंशाची पडझड लोकांना चक्रावून टाकणारी आहे. भारताच्या आर्थिक परिस्थितीपेक्षाही जागतिक बाजारातील घडामोडी त्याला कारणीभूत आहेत.
एकदा भूकंपाचे धक्के बसायला लागले, की ते दीर्घकाळ जाणवत राहतात. भारतातील शेअर बाजारात गेल्या महिन्याभरात घडलेल्या घटनांचं अवलोकन केलं, तरी हे लक्षात येतं. शेअर बाजारात कधी कधी धक्क्यामागून धक्के बसत असतात. त्यात नावीन्य काहीच नाही. त्यापूर्वी सातत्यानं शेअर बाजार उसळी घेत होता. ३३ हजारांपासून ३९ हजारांपर्यंतचा त्याचा प्रवास अल्पावधीत झाला. आपल्याकडे सेलमध्ये खरेदी करणं आणि शेअर बाजारात व्यवहार करणं यातील मानसिकता अगदी परस्परविरोधी राहिली आहे. खरं तर ती तशी राहायला नको. त्याचं कारण कोणतीही गोष्ट स्वस्त असतानाच खरेदी करणं केव्हाही चांगलं; परंतु शेअर बाजारात पडझड होते, तेव्हा धीरानं खरेदी करण्याऐवजी आपण विकून टाकण्यावर भर देतो. त्यामुळे नुकसान होतं. आतापर्यंत शेअर बाजारानं अनेक ब्लॅक फ्रायडे पाहिले आहेत. गेला गुरुवार ब्लॅक थर्सडे ठरला. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे वाढते भाव, जागतिक विनिमय दरात होत असलेली घसरण, रुपयाची घसरगुंडी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शेअर बाजाराविषयी केलेलं भाष्य या सर्वांचा एकत्रित परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झाला. त्यातच देशातल्या मोसमी पावसानं लवकर एक्झिट घेतली. त्यामुळे देशातल्या बर्‍याच राज्यांवर दुष्काळाचं सावट आहे. त्यामुळे शेतीमालाचं उत्पादन घटून महागाईवाढीची शक्यता व्यक्त होत आहे. या बाबींचा परिणाम झाला नसता, तरच नवल.
अमेरिकेसह जगभरातल्या प्रमुख भांडवली बाजारांच्या पडझडीचं सावट म्हणून सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांक गेल्या आठवड्यातल्या गुरुवारी एकाच व्यवहारात तब्बल दोन टक्क्यांहून अधिक गडगडले. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या नव्या तळानंही निर्देशांकातील घसरणीत भर टाकली. विशेष म्हणजे मंगळवारी शेअर बाजार सावरला होता. त्यातून अनेकांना बर्‍यापैकी नफाही मिळाला; मात्र तो दिलासा औट घटकेचा ठरला. गुरुवार सकाळच्या सत्रातच बुधवारच्या तुलनेत तब्बल एक हजार अंशांची आपटी नोंदवणार्‍या सेन्सेक्सनं ३४ हजारांचा स्तरही सोडला होता. दिवसअखेरही तो ३४ हजारांच्या उंबरठयावरच राहिला. गुरुवारच्या व्यवहाराअखेर ७५९.७४ अंश घसरणीसह मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३४,००१.१५ वर स्थिरावला तर २२५.४५ अंशांनी खाली येत निफ्टी १०,२३४.६५ पर्यंत थांबला. बुधवारी ४५० अंशांहून अधिक तेजी नोंदवल्यानंतर निर्देशांकानं गुरुवारच्या सत्राची सुरुवातच घसरणीसह केली. बाजारातले व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स एक हजार अंशांहून अधिक प्रमाणात खाली आला. या सत्रात निर्देशांक ३३,७२३.५३ पर्यंत घसरला तर व्यवहारातला त्याचा सर्वोच्च टप्पा ३४,३२५.०९ राहिला. निफ्टीचा या दरम्यानचा प्रवास १०,३३५.९५ ते १०,१३८.६० असा राहिला. दोन्ही प्रमुख निर्देशांक त्यांच्या ११ एप्रिलनंतरच्या टप्प्यापर्यंत येऊन ठेपले.
सेन्सेक्समधील घसरणीत स्टेट बँकेचा समभाग सर्वाधिक, ५.७४ टक्क्यांनी आपटला. तसंच टाटा स्टील, टीसीएस, वेदांता, महिंद्र अँड महिंद्र, इन्फोसिस, अदानी पोर्टस, भारती एअरटेल, टाटा मोटर्स, एचडीएफसी, इंडसइंड बँक, सन फार्मा, बजाज ऑटो, आयसीआयसीआय बँक, लार्सन अँड टुब्रो आदी शेअरही घसरले. माहिती-तंत्रज्ञान, वाहन, स्थावर मालमत्ता, बँक, आरोग्य निगा, भांडवली वस्तू आदी क्षेत्रातले शेअर्सही घसरले. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक २.८१ टक्क्यांपर्यंत खाली आले. सरकारने हवाई इंधनावरील उत्पादन शुल्क कमी केल्यानं तसंच खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती सावरल्यानं बाजारात सूचिबद्ध अनुक्रमे नागरी हवाई कंपन्या (१५ टक्क्यांपर्यंत) व तेल आणि वायू कंपन्यांचे समभाग वाढले. प्रमुख निर्देशांकांनी मोठी घसरण नोंदवूनही संबंधित क्षेत्रातल्या समभागांना मात्र गुंतवणूकदारांकडून मागणी राहिली. बुधवारी कमावलेले तीन लाख कोटी रुपये त्या गुरुवारी मात्र पाण्यात गेले. भांडवली बाजारातून पाय काढून घेण्याचं विदेशी गुंतवणूकदार संस्थांचं धोरण गुरुवारीही कायम राहिल्यानं मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचं बाजार भांडवल २.६९ लाख कोटी रुपयांनी कमी होत १३५ लाख कोटी रुपयांवर येऊन ठेपलं.
जागतिक व्यापार युद्धाच्या गहन वळणाच्या चिंतेतून अमेरिकेच्या प्रमुख निर्देशांकांमध्ये बुधवारी मोठी आपटी नोंदली गेली. तिथल्या डाऊ जोन्स, एस अँड पी ५००, नॅसडॅक, रसेल २००० आदी प्रमुख निर्देशांक एकाच व्यवहारात प्रत्येकी तीन टक्के घसरणीसह गेल्या आठ महिन्यांच्या तळात पोहोचले होते. त्याचबरोबर भारतातील परकीय चलन विनिमय मंचावर डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य सकाळच्या सत्रातच ७४ पासून आणखी दुरावत ७४.४८ पर्यंत रोडावलं. दिवसअखेर स्थानिक चलन बुधवारच्या तुलनेत ९ पैशांनी उंचावलं असलं, तरी व्यवहारातील घसरणीमुळे त्यानं भांडवली बाजारातली चिंता अधिक वाढवली. गुरुवारच्या व्यवहारात डॉलरच्या तुलनेत रुपयातली घसरण ७४ च्या खाली जात असताना ७४.४८ पर्यंत रोडावल्याची चिंता भांडवली बाजारात व्यक्त केली गेली. अमेरिकेचा विकासदर आणि रोखे परताव्याबाबतची चिंता जागतिक महासत्तेतल्या प्रमुख निर्देशांकांवर बुधवारीच व्यक्त झाली होती. अमेरिकेचा विकासदर अर्धा टक्क्यानं घसरण्याची भीती जागतिक नाणेनिधीनं व्यक्त केली होती. भारताच्या आर्थिक विकासाचा दर घसरणार असला तरी तो फार घसरणार नाही, तसंच जगात सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हा लौकिक कायम राहणार आहे. वित्तीय तूट आणि चालू खात्यातील तूट यावर अजून तरी सरकारचं बर्‍यापैकी नियंत्रण असल्यानं सरकार कुणाचंही असलं तरी शेअर बाजारावर फारसा परिणाम संभवत नाही; परंतु जागतिक घडामोडींपासून भारतीय शेअर बाजार अलिप्त राहू शकत नसल्यानं तसंच विदेशी गुंतवणूकदार सातत्यानं धरसोडपणा करत असल्यानं त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होत असतो.
जागतिक बाजारातील घसरण ही भारतच नव्हे, तर सर्वच उदयोन्मुख अर्थव्यवस्थांना हादरे देणारी आहे. रोख्यांवरील वाढता परतावा दर आणि चलनातील घसरण यामुळे विदेशी गुंतवणूकदारांनी इथल्या बाजाराकडे पाठ फिरवली. अमेरिकेतल्या प्रमुख निर्देशांकांच्या पडझडीनं आशियाई बाजारातल्या अनेक बाजारांना कवेत घेतलं. जपान, शांघाय, चीन, दक्षिण कोरिया, भारत आदी देशांमध्ये सरासरी तीन ते चार टक्क्यांची पडझड नोंदली गेली. भांडवली बाजार तसंच स्थानिक चलनातली आपटी जागतिक घडामोडींमुळे नोंदली गेल्याचं केंद्रीय अर्थ खात्यानं म्हटलं आहे. रुपयाच्या घसरणीबाबत, चालू खात्यातली तूट सावरण्यासाठी उपाय करण्याचं आता केंद्र सरकारनं जाहीर केलं आहे. त्याचा योग्य तो परिणाम गेल्या आठवड्यातल्या शुक्रवारी सकाळच्या सावरासावरीत दिसला. फायनान्शियल सेवा आणि बँकिंग सेक्टरमध्ये तेजीनं घसरण झाली. अमेरिकेतल्या शेअर बाजारातल्या पडझडीचा फटका भारताच्या शेअर बाजाराला बसला. शेअर बाजारातील पडझडीमुळे गुंतणूकदारांच्या चार लाख कोटी रुपयांची पाच मिनिटांमध्ये राख झाली.
अमेरिकेतल्या शेअर मार्केटमधील पडझडीचे पडसाद आशियातल्या शेअर बाजारावरही उमटले. जपान, चीन, हाँगकाँग, सिंगापूरसह भारताच्या शेअर बाजारात भूकंप आला. सप्टेंबरमध्ये बीएसई मिड कॅप निर्देशांकात १३ टक्के घसरण झाली. वर्षारंभापासूनचा हिशेब करता तो १९ टक्क्यांनी गडगडला आहे. गेल्या महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारातून १०,८२५ कोटी रुपये काढून घेतले आहेत. विदेशी गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारातून पाय काढून घेतल्यामुळे म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापकांना गुंतवणुकीची संधी मिळाल्याचं मानलं जात आहे. किरकोळ गुंतवणूकदारांमार्फत नियोजनबद्ध गुंतवणूक योजनेतला (एसआयपी) ओघ फंड व्यवस्थापकांसाठीही प्रोत्साहन देणारा ठरला आहे. तीव्र पडझडीनंतरचं मूल्यांकन आणि वाजवी पातळीवर आलेली मिड कॅप समभागातील गुंतवणूक दीर्घावधीत चांगला परतावा देणारी ठरेल, अशी या फंड घराण्याची धारणा आहे. इन्व्हेस्को मिड कॅप फंडाचा पाच वर्षांमधील परतावा २९.७५ टक्के इतका असून, याच काळात निफ्टी मिडकॅप (टीआरआय) चा परतावा २६.१६ टक्के असा आहे. सात वर्षं आणि दहा वर्षं कालावधीसाठी फंडाचा परतावा अनुक्रमे १९.३८ टक्के आणि १८.३४ टक्के असा आहे तर संदर्भ निर्देशांकाचा याच काळातला परतावा अनुक्रमे १६.८९ टक्के आणि १४.८० टक्के असा आहे. फंडाच्या विद्यमान गुंतवणुकीत सर्वात मोठा वाटा हा बँका, वाहन तसंच वाहनपूरक उद्योगातील कंपन्यामध्ये असून तो प्रत्येकी १० टक्क्यांपेक्षा अधिक आहे.
या सर्व घडामोडींमध्ये एक चांगली घटना घडली. जागतिक बाजारपेठेला प्रभावित करणार्‍या कच्च्या तेलाच्या किमती ८६ डॉलर्स प्रतिपिंपावरून ८२ डॉलर्स प्रतिपिंपापर्यंत खाली आल्या आहेत. त्यामुळे शुक्रवारी बाजार पुन्हा सावरला. कच्च्या तेलाचे दर घसरल्याचाही हा परिणाम असू शकतो. शुक्रवारी कच्च्या तेलाचे दर प्रति पिंप ८०.३० डॉलर्सवर पोहोचले आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यातही वाढ झाली.

Posted by : | on : 28 Oct 2018
Filed under : आसमंत, पुरवणी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी (246 of 875 articles)

Mahashay Dharampal
अभिप्राय : डॉ.वाय.मोहितकुमार राव | महाशय धरमपाल हे खरोखरच आजच्या काळातील एक प्रेरणास्रोत आहेत. बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेल्या धरमपाल यांची ...

×