ads
ads
एम. जे. अकबर यांनी दाखल केला मानहानीचा खटला

एम. जे. अकबर यांनी दाखल केला मानहानीचा खटला

►‘मी टू’ प्रकरण, नवी दिल्ली, १५ ऑक्टोबर – परराष्ट्र…

म्हणे, सच्च्या हिंदूला नको राममंदिर

म्हणे, सच्च्या हिंदूला नको राममंदिर

►थरुर यांच्या विधानापासून काँग्रेसची फारकत ►थरूर नीच माणूस; स्वामी…

प्रत्येकाने आत्मसंवाद साधावा

प्रत्येकाने आत्मसंवाद साधावा

►सुविचार प्रेषित करणारे साहित्य प्रकाशित व्हावे : सरसंघचालक, नागपूर,…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

►महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर, मुंबई, १० ऑक्टोबर…

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, ९ ऑक्टोबर – नामवंत लेखक आणि व्याख्याते डॉ.सच्चिदानंद…

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

लातूर, ७ ऑक्टोबर – निसर्ग आमची परीक्षा घेत आहे.…

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…

न्यायपालिका संकटमुक्त

न्यायपालिका संकटमुक्त

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…

सभेत सोडलेला उंदीर

सभेत सोडलेला उंदीर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:20 | सूर्यास्त: 18:02
अयनांश:

संगीतकार बाप बेटे

॥ चित्रपटल : रत्नाकर पिळणकर |

Sd Burman Rd Burman

Sd Burman Rd Burman

बर्‍या-वाईट सवयी, आवडी-निवडी, स्वभाव आणि कलेची जोपासना तसेच संवर्धनाचे संस्कार स्वगृहातूनच लाभत असतात. जे कानावर पडतं तेच वाणीतून प्रकट होतं, म्हणून ज्या ‘घराण्यात’ संगीताचे सूर दिवस-रात्र दरवळत असतात, त्या घरात ‘रात्र’ ही सुरेलच वाटते. संगीत दैवी देणगी आहे, त्याचा ‘पूर्णांश’ ज्याला प्राप्त होतो, तो भाग्यवान. म्हणून त्या गाण्याला देवाघरचे गाणे असे म्हटले जाते. संगीताच्या अमर्याद आनंदाचे मोजमाप गणिताच्या भाषेत करता येत नाही. आणि संगीताचा वारसा एकाकडून दुसर्‍याला ‘स्वराभिषेक’ करून द्यावा,
असं करता येत असेल म्हणाल तर तेही करता येत नाही. कारण सरस्वतीला प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्‍चर्येची आवश्यकता असते. साधनेत खंडही पडू नये तसेच परंपरेने लाभलेल्या या देणगीचा ‘उपमर्द’ होणारा नाही, याची जाणीवही त्या ‘घराण्याने’ ठेवायला हवी तरंच ती ‘स्वरसत्ता’ अबाधित राहते. हिंदी सिनेसंगीताच्या अशा किती निर्मात्यांना आपली घराणेशाही टिकविता आली आहे? आणि ज्या संगीतकारांच्या मुलांना किंवा मुलींना आपला वडिलोपार्जित वारसा टिकविता आला नसेल त्यामागील कारण काय असेल?
एखादी रंगतदार मैफिल अर्धवट सोडून द्यावी तसे काहीसे त्या संगीतकारांना वाटत असावे. शंकर जयकिशन नंतर दोन्ही संगीतकारांपैकी कुणीही संगीतक्षेत्रात आपली योग्यता सिद्ध करू शकला नाही ‘एस जे’ दोन हिरे होते. हिंदी चित्रपट संगीताचा पाया खर्‍या अर्थाने ‘अवीट’ रसाळ संगीताच्या कर्तृत्वाने गाजविणार्‍या या जोडीच्या आदर्शावर नंतर अनेक संगीतकारांनी कळस रचला असेल. परंतु, त्यामध्ये या मित्राापैकी कुणीही त्यांच्या नात्यातीलही नव्हतं. ‘मदन मोहन’ यांचे पुत्र संजीव व समीर कोहली यांनी त्यांचे संगीत जतन केलं. परंतु ते स्वत: मात्र पुढे कांहीच करू शकले नाहीत. ओपी नय्यर यांना तीन कन्या आणि एक पुत्र होता ओपीं सोबत ते राहत असते किंवा त्यांनी आपल्या मुलाला जरी आपल्या ‘संगीतसौंदर्याचा’ टीळा लावला असता तर कुणी एक आगळा वेगळा नावीण्यपूर्ण ओपी उदयाला आला असता जसा राहलदेव बर्मन नावाचा एक वलयांगित तारा होऊन गेला त्यामागे होती पुण्याई सचिनदेव बर्मन यांची. आपल्या, सुराशी खेळणार्‍या अल्लड मस्तीखोर सुपुत्राच्या चाली त्याच्या नकळत वापरणार्‍या संगीतकार पित्याला हे असलं ‘चौर्यकर्म’ करताना कधीच कमीपणा वाटला नव्हता उलट अभिमानच त्याने त्यात मानला, त्याच्या बदल्यात त्यांना आपल्यापेक्षा ‘सवाई’ ठरावा असा पुत्र लाभला. सचिनदेव बर्मन आणि राहूलदेव बर्मन ही हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात यशस्वी संगीतकार जोडी. काहीजण गंमतीने ‘पंचम’ला सचिनदा यांचा ‘बाप संगीतकार’ म्हणायचे कारण पंचमने काही काळ तरुण पीढीला ‘आधुनिक’ नव्या दमाच्या संगीतावर अक्षरश: नाच नाचवलं होतं. या दोन्ही संगीतकारांच्या निर्गमानंतर आजही मार्केटिंगच्या भाषेत मानायचं तर ‘आर डी बर्मन’ चच संगीत सर्वाधिक विकलं जात आहे.
१९३२ ते १९७५ अशा कालावधित सचिनदांनी हिंदी चित्रपटसंगीत स्वत:च्या शैलीनं सजवलं. ३१ ऑक्टोबर १९७५ ला वयाच्या अवघ्या ६९ व्या वर्षी सचिनदांनी संगीत सृष्टीतून परलोकात गमन केलं आणि त्याच वर्षी ‘शोले’ प्रदर्शित झाला होता. राहुलदेवच्या रक्तातच संगीताचा रंग भिनला होता, त्यामुळे कोणतंही वाद्य म्हणजे तो तबला असो किंवा ‘हार्मोनियम’ दोन्हीवर त्याचं प्रभुत्व हेातं. १९६१ ते १९९४ या कालावधित पंचमने हिंदी सिनेसंगीतात भारतीय व पाश्‍चात्य अशा संगीताची धुंदी निर्माण केली.
वयाच्या केवळ ५४ व्या वर्षी जगाला ‘गुड बाय’ करणार्‍या पंचमची सर्वच गाणी आज दिवस रात्र कुठल्या न कुठल्या बहाण्याने सर्वत्र गाजत असतात. म्हणजेच या जोडीने संयुक्तरित्या १९३२ ते १९९४ असे जवळ जवळ ६२ वर्षे ‘बर्मनशाही’ निर्माण केली. असे हे ‘संगीतकार बाप बेटे’ ज्यांच्या संगीताची मोहिनी यापुढे कधीही पुसली जाणार नाही, असे हे ‘सिनियर बर्मन व ज्युनियर बर्मन’ संगीत शौकिनांनेच नव्हे तर नंतर अनेक भावी तरुण संगीतकारांसाठी आदर्श ठरले आहेत. आणि याचा संगीतकारांच्या शैलीवर पुढे अनेकांनी आपलं ‘करिअर’ घडवलं. यामध्ये संगीतकार वडिलांची मुलंही होती व आहेत.
संगीतकार रोशन (रोशन नागरथ) सर्वोत्तम संगीतकारांपैकी एक. त्यांचा चाहता कुणी ऐरागैरा सामान्य श्रोता नसायचा. कुणीही उठावं आणि रोशनची गाणी ‘मुखी’ लावावीत असा त्या गाण्याचा ‘आब’ नव्हता तर त्याआधी ती गाणी समजून घ्यावी आणि नंतरच, जमल्यास गुणगुणावीत असा त्या गाण्यांचा दर्जा होता. आपल्याला आज रोशनजींकडे गायला जायचं आहे म्हणजे परीक्षेलाच जायचं आहे, अशी जरब प्रत्येक गायकाला वाटत असे. मदनमोहनजी आणि रोशनजी असे दोन संगीतकार होते, ज्यांच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगला वातावरणात एक ‘गांभीर्य’ असायचं त्याचं कारण त्या चालीचं भारलेपण असावं. ‘ना तो कारवाँ की तलाश है’ एकच कव्वाली रोशनजींच्या कल्पनेची भरारी दर्शवते. हलकी फुलकी, उडती, गचाळगाणी त्यांना कधीच सुचली नाहीत. ‘बरसातकी रात’मधील ‘जिंदगी भर नही भूलेंगे वो बरसातकी रात’ या गाण्यातील ‘पाऊसात’ वर्षानुवर्ष आपल्याला भिजवून सोडण्याचं सामर्थ्य आहे. ‘कभी तो मिलोगी, कहीं तो मिलोगी’ चित्रपट ‘आरती’ ‘जो वादा किया वो ‘ चित्रपट ‘ताज महल’, ‘निगाहें मिलानेको जी चाहता हैं’ आणि जागतिक संगीताच्या बाजारपेठेत, हिंदुसथानी संगीताला गौरव प्राप्त करून देणारं एकमेव चित्रपटगीत ‘लागा चुनरीमें दाग’ (चित्रपट‘दिल ही तो है) या तोडीचं गीत आज जरी कुणी निर्माण करण्याचं आव्हान स्वीकारीत असेल तर ते त्यानी बेशक स्वीकारावं आणि जिंकून दाखवावं. रोशनजींचे सुपुत्र राजेश रोशन यांचे एकही गीत रोशनजींच्या गीताशी स्पर्धा करू शकेल असे नाही.
‘संगीतकार बाप बेटे’ यांच्या चढाओढीत बर्‍यापैकी टिकून असलेला आणि आपल्या पित्याच्या कर्तृत्वाची जाण ठेवून प्रामाणिकपणे चांगल्या दर्जाची गाणी देण्याचा प्रयत्न करणारा संगीतकार म्हणजे ‘राजेश रोशन’. आज ६२ वर्षे वय असलेल्या राजेश रोशनची हिंदी सिनेसंगीताची सुरुवात झाली १९७४ पासून. मेहमूदने त्याला पहिला ‘ब्रेक’ दिला तो ‘कुंवारा बाप’ या सिनेमासाठी. ‘कुंवारा बाप’ची गाणी ऐकणारा त्या काळातील श्रोता या गाण्यांवर खूश झाला होता. त्यानंतर आलेल्या ज्युलीतील इंग्लीश गाणे आणि ‘दिल क्या करे’, या किशोरकुमारच्या गाण्यांमुळे तर त्यावेळची तरुण पिढी धुंदावली होती आणि ज्यांना ‘रोशन’ कळला होता, त्यांना मात्र या गाण्यांना नाकं मुरडली होती. कुठे रोशन आणि कुठे राजेश रोशन? पण राजेश रोशनला आपली मर्यादा नक्कीच ठाऊक असणार आणि तरीही आपल्या वयाच्या तरुण तरुणींना भुलवेल, असं संगीत देण्याचा प्रयत्न राजेश रोशन करतच होता म्हणून ‘इन्कार’ मधील ‘मुंगडा मुंगडा’ गाण्याला श्रोत्यांनी डोक्यावर घेतलं होतं. ते गाणं त्याच्या वडिलांच्या स्वभावाशी फटकन वागणारं होतं, परंतु, काळाशी जुळवून घेणारं होतं. ‘स्वामी’, ‘खट्टा मीठ्ठा’, ‘देस परदेस’, ‘मि. नटवरलाल’, ‘काला पत्थर’, ‘आपके दिवाने’, ‘लूटमार’, ‘याराना’, ‘खुद्दार’, ‘कामचोर’, ‘जाग उठा इन्सान’, ‘खुदगर्ज’, ‘कोयला’ असे ‘बीग बॅनरचे’ चित्रपट त्याला त्याच्या कर्तबगारीमुळे मिळाले. राजेश रोशनच्या गाण्यांची तुलना रोशनजींच्या गाण्याशी कुणी करू नका कारण रोशनजींचं नाव घेताच, हिंदी सिनेसंगीताचा आदर करणार्‍या प्रत्येकाचे हात कानावर जातात आणि आपण रोशन सारख्या संगीतकाराची नकळत उपेक्षा केली या जाणिवेने त्याची क्षमा मागतात.
उपेक्षित, दुर्लक्षित संगीतकारांची शेकडो नावे आज घेता येतील, ज्या संगीतकारांनी हिंदी चित्रपटाच्या सुवर्णकाळात आपलं अमुल्य योगदान दिलं आहे. अशापैकी एक चित्रगुप्त. संगीतकाराचे हे नाव आहे मोठं विलिप्त पण तितकंच आकर्षक. रोशनजींसारखेच चित्रगुप्तही एक गुणी संगीतकार होते. ‘चित्रगुप्त श्रीवास्तव’ बिहारचे, १५० चित्रपटाला संगीत देणार्‍या या संगीतकाराची कांही गाणी जरा गुणगुणून बघा, ‘कोई बतादे दिले है जहाँ’, ‘एक रातमें दो दो चांद खिले’ ‘तडपाओगे तडपादो’, ‘लागी छुटे ना अब तो सनम’, ‘पायलवाली देख ना’, अशी भावगीताच्या ओढीने निर्माण झालेली शेकडो गीत सांगता येतील. या संगीतकाराची सुपुत्र जोडी ‘आनंद मिलिंद’ यांचा उल्लेख टाळता येणार नाही. कारण यांनीही २०० च्या आसपास चित्रपटांना संगीत दिलं आहे. ‘कयामतसे कयामत तक’ मधील ‘पापा कहते है’ आणि ‘अकेले है तो क्या गम है’ आणि ‘गजब का है दिन’ हे एक गीत १९८८ साली आल्याआल्याच चित्रगुप्तच्या मुलानी आपली करामत दाखवली. गोविंदा, डेविड धवन या जोडीला यशस्वी करण्यात यांचा वाटा खूप मोठा आहे. चित्रगुप्तच्या गाण्यातील सौम्य चालींची गुणवत्ता त्यांच्या मुलांचया संगीतात उतरत नसली तरीही ‘आनंद मिलिंद’ यांच्या संगीतात ‘लक्ष्मी प्यारे’च्या कांही गुणांची सरमिसळ होती आणि त्याचं यश त्यांना मिळालंही. परंतु हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘गुप्त राजकीय’ खेळींचा बळी ठरलेल्या आनंद मिलिंद यांना चार पावलं मागे जावं लागलं कारण त्यांच्यात तेवढी आक्रमकता नव्हती.
आक्रमक शैली आणि हिंदी फिल्म सृष्टीत कोणत्याही अनुकूल स्थितीत टिकून राहण्याची क्षमता असलेला एक संगीतकार आहे अनू मलीक ‘अनू मलीक’ म्हणजे जुन्या काळातील एक हळव्या मनाचा संगीतकार ‘सरदार मलीक’यांचा हा मुलगा. अत्यंत यशस्वी आणि तितकाच मुरलेला संगीतकार जो ‘बापसे बेटा सवाई’ ठरलेला आहे. तर दुसरीकडे विनू शहा’ला आपले पिता ‘कल्याणजी विरजी शहा’ यांच्या ‘धंदेवाईक संगीताला टक्कर देता आली नाही. परंतु कल्याणजी आनंदजी यांचा ‘ऑर्केस्ट्रा’ जगभरात नेण्याचं काम मात्र विजू शहा प्रामाणिकपणे करीत आहे. एक मात्र खरे की ‘संगीतकार बाप बेटे’ यांची तुलना केली तर नव्या युगाचे प्रतिनिधित्व करणारे संगीतकार बेटे यांची कामगिरी तुलनेने यथातथाच वाटते कारण ‘तांत्रिक’ करामतीत मूळ संगीत संपत चाललं आहे.

Posted by : | on : 30 Sep 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, रत्नाकर पिळणकर, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, रत्नाकर पिळणकर, स्तंभलेखक (47 of 1058 articles)

Outdated Career
मानसरंग : मयुरेश डंके | प्रगत होण्याच्या नादात आपल्यापैकी अनेकजण आयुष्यातूनच आऊटडेटेड होतायत, याकडे आपलं लक्ष कुठं आहे? आपला मुलगा ...

×