ads
ads
नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, स्तंभलेखक, हितेश शंकर » संघाचे विजयादशमी उद्बोधन

संघाचे विजयादशमी उद्बोधन

॥ रोखठोक : हितेश शंकर |

तात्कालिक प्रश्‍नांना एकेक करून उचलणारे, समस्यांची अंतर्निहित कारणे सांगणारे आणि समाजाला राष्ट्रहित समोर ठेवून तोडगा काढण्यासाठी प्रेरित करणारे हे उद्बोधन, भविष्यातील भारताचा मार्ग अधिक प्रशस्त करणारे आहे, हे नि:संशय! काही लोकांना भविष्यातील भारतात, ‘राजकारणा’शिवाय बाकी काहीही दिसत नसेल, तर त्यांची तेवढीच अक्कल आहे, असेच समजावे लागेल!

Mohan Bhagwat1

Mohan Bhagwat1

विजयादशमीला सरसंघचालकांच्या भाषणाची जी ओळख आहे तसेच डॉ. मोहनजी भागवत यांचे भाषण झाले.
तात्कालिक मुद्यांना समग्रतेने स्पर्श करणारे, अस्पष्ट व गुंतागुंतीच्या मुद्यांना पुरेसे स्पष्ट करणारे आणि एक महान प्रेरक आवाहन करणारे हे भाषण होते.
देशाची सुरक्षा केवळ सीमांच्या रक्षणाने होत नाही, त्यासाठी अंतर्गत स्थिती आणि उपद्रव करणार्‍यांचीही दखल घेणे आवश्यक आहे, हे किती खरे आहे, नाही!
कुटुंबात संस्कार असावेत, समाज समरस असावा, आम्हा सर्वांच्या चिंतनात समग्रता असावी, यावर कुणाला आक्षेप असू शकतो? संघ ज्या वेळी या मुद्यांवर स्वत:चे मत प्रकट करतो, तेव्हा जनता-जनार्दनाच्या मनात ती गोष्ट घर करते.
ज्यांना कसेही करून संघावर टीकाच करायची आहे, अशा टीकाकारांना बाजूला ठेवले, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अपुरी माहिती असणार्‍यांना, संघाकडे भ्रम व संशयाने बघणार्‍यांना, हा सत्यवादीपणा आणि स्पष्टता आवडते. कारण, यामुळे बुद्धीला झाकून टाकणारे धुके आणि नकारात्मकता दूर होत असते, विचार करण्यासाठी राष्ट्रीय दृष्टिकोन मिळत असतो.
रेशीमबाग मैदानावरील वार्षिक उद्बोधनाचे एक वेगळे महत्त्व असले, तरी ते एवढ्यातच दिल्लीतील विज्ञानभवनात झालेल्या व्याख्यानमालेशी मिळतेजुळते आहे. तेव्हा असे वाटले की, संघाला न जाणणार्‍या एका मोठ्या वर्गाने अचानक ‘संघाचे म्हणणे’ लक्षपूर्वक ऐकले आहे.
खरे म्हणजे, मीडिया किंवा सामाजिक विचारविनिमयाच्या इतर मंचांवर, संघाचे नाव येताच काही जण, एक प्रकारचा भ्रम, कोलाहल निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. परंतु, आता असे लक्षात येऊ लागले आहे की, संघाचा स्पष्टवक्तेपणा आणि त्याला लोकांनी लगेच स्वीकारणे, यामुळे या खास टोळक्यांचे पितळ उघडे पडू लागले आहे.
विज्ञानभवनातील व्याख्यानमालेनंतर, मीडियात आलेले अनेकानेक लेख, वाचक तसेच दर्शकांच्या प्रतिक्रियांचा ओघ, हेच दर्शवत आहे की, राष्ट्रीय विचारांचे तरंग विज्ञानभवनाच्या बाहेरही उमटत आहेत.
विज्ञानभवनात ज्या बिंदूवर गोष्ट समाप्त झाली होती, या विजयादशमीच्या भाषणाने अगदी त्याच बिंदूवर राष्ट्रीय विचारमंथनाचे सूत्र जोडले गेले. संघाचे निर्भीड प्रतिपादन राष्ट्रीय स्तरावरच्या वैचारिक गोंधळाला एक ‘स्वर’ देण्याचे काम करीत आहे, हे निश्‍चित!
विजयादशमीचे उद्बोधन प्रारंभ होण्यापूर्वीच वृत्तवाहिनींचे मंच सजले होते, हा संघाबद्दल वाढत्या जिज्ञासेचा संकेत आहे.
मीडियावरील चर्चेत सहभागी (संघाला समजून न घेणारे) काही सज्जन असेही निघाले की, त्यांना वाटत होते या भाषणात केंद्र सरकारच्या मोठ्या आणि चांगल्या योजनांची नावे घेऊन कौतुक केले जाईल. अशा महानुभावांना त्यांना हवे असलेले मुद्दे मिळाले नसतील. नव्या शैक्षणिक धोरणाला झालेल्या विलंबावर केलेल्या टीकेमुळे ते संभ्रमितही झाले असतील. परंतु, सत्ता (जी कुणाची असो) आणि परस्परसंबंध (जे शाश्‍वत आहेत) यांच्यातील संतुलनाला संघ कसे निर्देशित करतो, हे ज्यांना माहीत आहे, त्यांना या उद्बोधनाने जराही आश्‍चर्य वाटले नसेल. हाच तर संघ आहे!
तसेही, ज्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राजकीय स्वयंसेवक संघ आहे असे वाटते, त्यांना मात्र या भाषणाने चकित केले असेल. कारण, या संपूर्ण भाषणात जर कुठली एखादी गोष्ट नसेल तर ती म्हणजे राजकारण!
‘नोटा’ आणि निवडणुकीचा उल्लेख विज्ञानभवनानंतर येथेही झाला. या दोनही प्रश्‍नांकडे पक्षीय राजकारणाशी जोडून बघता येणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. लोकशाहीत जनतेच्या प्रतिक्रियांची धार ‘बोथट’ करणार्‍या या ‘बटना’चा दोष उघड करणे अतिशय आवश्यक होते. ही गोष्ट जनतेच्या मनात खोलवर जाण्यासाठी, अशाच उच्च मंचाची निवड आवश्यक होती. ‘नोटा’च्या बाजूने हवा तयार होणे आणि याच्या नकारात्मक पैलूची माहिती नसल्याने, लोकशाही कमकुवत आणि नाटकी राजकारण मजबूत होत होते. त्या अर्थाने, ‘नोटा’ किंवा निवडणूक हे मुद्दे पक्षीय राजकारणाचे नाही, तर मतदाराच्या शक्तीला उंचावण्याचे मुद्दे आहेत.
काहीही असो, तात्कालिक प्रश्‍नांना एकेक करून उचलणारे, समस्यांची अंतर्निहित कारणे सांगणारे आणि समाजाला राष्ट्रहित समोर ठेवून तोडगा काढण्यासाठी प्रेरित करणारे हे उद्बोधन, भविष्यातील भारताचा मार्ग अधिक प्रशस्त करणारे आहे, हे नि:संशय! काही लोकांना भविष्यातील भारतात, ‘राजकारणा’शिवाय बाकी काहीही दिसत नसेल, तर त्यांची तेवढीच अक्कल आहे, असेच समजावे लागेल!

Posted by : | on : 4 Nov 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, स्तंभलेखक, हितेश शंकर.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, स्तंभलेखक, हितेश शंकर (49 of 1153 articles)

1975 Emergency
विशेष : शोभा फडणवीस | (मागील अंकवरून) केंद्रातील मोदी सरकारच्या काळात देशात सगळ्यात जास्त सहिष्णुता अनुभवास येत असतानाही विरोधी पक्ष ...

×