ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी » संघातही ग्लासनॉस्त

संघातही ग्लासनॉस्त

॥ प्रासंगिक : राममाधव |

भागवतांनी आपल्या या ग्लासनॉस्तने बहुतांशी टीकाकारांना नि:शस्त्र केले आहे, यात शंकाच नाही. परंतु, घरात म्हणजे संघटनेत हा नवा विचार सर्व स्तरावरच्या कार्यकर्त्यांमध्ये, स्वयंसेवकांमध्ये पाझरविणे यासाठी नवरचना-नवबांधणी (पेरेस्त्रोइका) करावी लागणार आहे. भागवतांपुढील आव्हान असलेच तर हे आहे. सर्व कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याप्रति प्रचंड आदर आहे. त्यांच्यातील स्पष्टता, पारदर्शिता आणि निर्धार यामुळे, ते या संघटनेला त्यांची इच्छित दिशा प्रदान करण्यास समर्थ आहेत.

Dr Mohanji Bhagwat4

Dr Mohanji Bhagwat4

१९८०च्या दशकाच्या मध्यात मिखाईल गार्बोचेव्ह यांनी सोव्हिएट रशियात (युएसएसआर) कम्युनिस्ट शासकांच्या विचारांमध्ये आणि कृतीत नवा ‘मोकळेपणा’ आणला. त्यांनी कम्युनिझलला नाकारले नाही. आम्हाला अधिक मोकळेपणा आणि अधिक समावेशीवृत्ती आवश्यक आहे, यावर त्यांनी भर दिला. याला रशियन भाषेत ‘ग्लासनॉस्त’ म्हटले गेले. त्यांच्या या कृतीने पूर्व युरोपातील राजकारणात एक नवी क्रांती आली. एवढेच नाही तर, या भागातील भूगोलही बदलून गेला. रा. स्व. संघातही सध्या ग्लासनॉस्तचे वारे वाहू लागले आहेत.
१७ ते १९ सप्टेंबर या काळात देशाच्या राजधानीत रा. स्व. संघाच्या सरसंघचालकांनी आपल्या तीन दिवसीय व्याख्यानमालेत जे सांगितले, हे कमी लक्षणीय नाही. अतिशय सुस्पष्ट व संशयातीत प्रामाणिकपणे त्यांनी जे सांगितले त्यामुळे दिल्लीतील विचारविश्‍वाला त्यांनी निश्‍चितच जिंकून घेतले आहे. त्यांची व्याख्याने आणि त्यानंतर झालेली प्रदीर्घ, परंतु तितकीच मनमोकळी प्रश्‍नोत्तरे यामुळे संघाला समजून घेण्यात एक नवा ताजेपणा आला. टीकाकार अवाक् झालेत आणि जे संघविचारांबाबत संशयी होते त्यांनीदेखील सरसंघचालकांच्या भाषणातील काही मन:पूर्वक विधानांवर मान डोलावली.
तीन दशकांपूर्वी एका निराश झालेल्या बुद्धिवंताने म्हटले होते- ‘‘संघ समजणे अवघड आहे आणि त्याच्याबाबत गैरसमजूत करून घ्यायला तो सोपा आहे.’’ ही निराशा संघाला बाहेरून बघणार्‍यांमध्येच होती असे नाही तर, संघाचे आतून निरीक्षण करणार्‍यांमध्येही होती. ही अडचण बहुतांशी संघाने स्वत:च निर्माण केली होती. डॉ. भागवत यांनी भाषणात सांगितल्याप्रमाणे, १९३६ सालीच डॉ. हेडगेवार यांना संघात प्रचार विभाग सुरू करण्याची इच्छा होती, असे असतानाही संघ जवळजवळ अत्यंत अबोल आणि भिडस्त संघटना राहिली. अगदी आजही ‘प्रसिद्धिपराङ्मुखता’ हे संघाचे स्वीकृत पथ्य आहे. पहिल्या सहा दशकात हे पथ्य अधिक काटेकारपणे पाळले गेले. परंतु, १९८५ साली आपल्या षष्ट्यब्दीनिमित्त संघाने जनसंपर्क अभियान आयोजित केले होते. तेव्हा संघाच्या नेतृत्वाच्या लक्षात आले की, आपली संघटना अखिल भारतीय स्तराची झाली असली तरी, लोकांना संघाच्या विचारांची माहितीच नाही. संघावर टीका झाली, विरोध झाला आणि हा बहुतेक गैरसमजावर आधारित किंवा दुष्ट हेतूने प्रेरित असला तरी, संघाने त्याची कधी पर्वा केली नाही. एका मान्यवर नेत्याने संघाची तुलना कासवाशी केली होती : संघावर हल्ला झाला की, तो आपले अवयव कवचाखाली ओढून घेतो आणि हल्लेखोर निघून गेल्यावर आपले हातपाय पुन्हा बाहेर काढून मार्गक्रमण सुरू करतो. याचा परिणाम संघाची एक विशिष्ट प्रतिमा तयार होण्यात आणि त्याला कलंकित करण्यात झाला.
संघटनेत मोकळपणा आणणारे पहिले नेते होते संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस. त्यांच्या नेतृत्वात संघाने समाजाच्या विविध क्षेत्रात संपर्क वाढवून कार्य करणे सुरू केले. याच काळात सेवा, संपर्क आणि प्रचार हे विभाग संघात सुरू करण्यात आले.
भागवत त्यांच्याही पुढे गेले आहेत. या संघटनेशी संबंधित अनेक मूलभूत प्रश्‍नांवर त्यांनी आपल्या तीन दिवसांच्या व्याख्यानमालेत अत्यंत मोकळेपणे मतप्रदर्शन केले. संघाचा एक कार्यकर्ता म्हणून, गेल्या दशकात किंवा भागवत यांनी सरसंघचालकपदाचे दायित्व स्वीकारल्यानंतर, संघात झालेल्या या स्थित्यंतराचा मी साक्षीदार आहे. हेच स्थित्यंतर त्यांनी देशासमोर मांडले आहे.
सर्वात महत्त्वाचे आणि लक्षणीय विधान म्हणजे हिंदू राष्ट्र आणि मुस्लिमांबद्दलचे आहे. हा महत्त्वाचा बदल स्पष्ट करताना भागवत यांनी ‘दोन नकार म्हणजे होकार’ सूत्र वापरले. ‘‘मुस्लिमांशिवाय हिंदू राष्ट्र होऊ शकत नाही,’’ असे त्यांनी जवळजवळ घोषितच केले. ‘दोन नकार म्हणजे होकार’मुळे त्याचे अनेक प्रकारे प्रतिपादन करणे सुरू झाले. असे असले तरी, हे स्थित्यंतर लक्षणीय आहे, हेही तेवढेच सत्य आहे. १९८० साली संघाच्या एका महत्त्वाच्या अधिकार्‍याला विचारलेला प्रश्‍न माझ्या स्मरणात आहे.
‘‘संघात मुस्लिम व ख्रिश्‍चनांना येण्याची परवानगी का नाही?’’ त्या अधिकार्‍याने प्रतिप्रश्‍न केला- ‘‘मुलींच्या शाळेत मुलांना प्रवेश मिळतो का? संघाचे ध्येय हिंदूंना संघटित करण्याचे आहे. त्यामुळे जे हिंदू नाहीत, धर्माने म्हणा किंवा संस्कृतीने, त्यांना प्रवेश देण्याचा प्रश्‍नच कुठे येतो?’’ या वक्तव्यापासून ते भागवतांच्या उपरोल्लेखित विधानापर्यंतचा संघाचा प्रवास लक्षणीय आहे.
‘बंच ऑफ थॉट्स’ व संघाच्या अन्य प्रकाशनांमधील गोळवलकर गुरुजींच्या नावे असलेल्या काही विचारांना त्या त्या काळाच्या संदर्भात बघितले पाहिजे, याचा भागवतांनी जो निर्वाळा दिला त्याकडेही याच दृष्टीने पाहिले पाहिजे. दुसर्‍या शब्दात सांगायचे तर, त्यांनी मान्य केले की, गोळवलकरांची काही विधाने कालबाह्य आणि आज संदर्भहीन झाली आहेत. हा ताजा मोकळेपणा आणि बौद्धिक प्रामाणिकपणा आहे. गांधीजींच्या समग्र वाङ्मयात एक तळटीप असते की, वाचकांना गांधीजींच्या विचारांत विरोधाभास आढळला तर त्यांचे ताजे विधान ग्राह्य मानावे. काळानुरूप, गांधीजींसमोर नवी माहिती आली असावी आणि त्यांनी विचारशोधन केले असावे. हाच तर्क संघालाही लागू केला पाहिजे, असेच भागवतांना सुचवायचे आहे.
मुळात, ‘बंच ऑफ थॉट्स’ हे गोळवलकरांनी सरसंघचालकपदाच्या ३३ वर्षांच्या काळात दिलेल्या विविध भाषणांचे संकलन आहे. त्यांनी याचे लेखन केलेले नाही किंवा मथळेही दिले नाहीत. काही वर्षांपूर्वी त्यांचे समग्र वाङ्मय प्रकाशित झाले आहे, ते आपण नीट वाचले तर लक्षात येईल की, हा जो वाद निर्माण केला जात आहे, त्यातील पुष्कळसा तर निरर्थक आहे. तरीही, भागवतांनी हे मान्य करणे, याने बर्‍याच गैरसमजुती दूर होण्यास मदत होईल.
याशिवायही अनेक मुद्यांवर भागवतांनी अगदी ताजी, नवी आणि मनमोकळी भूमिका घेतली आहे. त्याने अगदी संघातल्याही अनेकांना आश्‍चर्यचकित केले आहे. त्यांनी संविधानाचे जोरदार समर्थन केले आहे. एवढेच नाही तर त्यांनी संविधानाच्या संपूर्ण प्रस्थापनेचे वाचन करून, संघाला याबद्दल पूर्ण आदर असल्याचे ठामपणे सांगितले. अगदी, आणिबाणीच्या काळात त्यात घुसडलेल्या सेक्युलॅरिझम आणि सोशॅलिझम शब्दांबाबतही. तसेच महिलांच्या दर्जाबाबत त्यांनी जी भूमिका विशद केली ती, संघाच्या यथादर्शनरूपावरून ऐतिहासिकच म्हणावी लागेल. संघाच्या महिलांवरील दृष्टिकोणासाठी त्यांनी ‘सन्मान व स्वातंत्र्य’ हे दोन शब्द वापरले. ‘सर्व संप्रदाय (रिलिजन्स) समान आहेत’ हे स्वीकारायला संघ तयार आहे, असेही ते म्हणाले. आतापर्यंत संघातील अनेकजण ‘सर्वपंथसमादर’ (सर्व संप्रदायांप्रति समान आदर) यावरच जोर देत होते; ‘सर्वपंथसंभव’ (सर्व संप्रदाय समभाव) यावर नाही.
संघातील काही जण म्हणू शकतात की, भागवत यांनी जे काही सांगितले ते काही नवे नव्हते. या मूल्यांच्या पाठीशी संघ नेहमीच उभा राहिला आहे. परंतु, संघटनेत नेहमीच दोन समांतर विचार-छटा राहिल्या आहेत. त्याच्या विचारांभोवती नेहमीच एक गूढ घेरून राहिले आहे. भागवतांनी हे गूढ दूर करण्याचे ठरविले.
असे स्थित्यंतर सोपे नसते. भागवतांनी आपल्या या ग्लासनॉस्तने बहुतांशी टीकाकारांना नि:शस्त्र केले आहे, यात शंकाच नाही. परंतु, घरात म्हणजे संघटनेत हा नवा विचार सर्व स्तरावरच्या कार्यकर्त्यांमध्ये, स्वयंसेवकांमध्ये पाझरविणे यासाठी नवरचना-नवबांधणी (पेरेस्त्रोइका) करावी लागणार आहे. भागवतांपुढील आव्हान असलेच तर हे आहे.
येणारी बरीच वर्षे भागवत या संघटनेचे नेतृत्व करणार आहेत. सर्व कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याप्रति प्रचंड आदर आहे. त्यांच्यातील स्पष्टता, पारदर्शिता आणि निर्धार यामुळे, ते या संघटनेला त्यांची इच्छित दिशा प्रदान करण्यास समर्थ आहेत.
सुधारणेबाबत एवढी कळकळ का असे गार्बोचेव्ह यांना विचारले असता, ते म्हणाले होते- ‘‘मी नाही तर कोण (करणर)? आणि आता नाही तर केव्हा?’’ भागवतांचा निर्धारही असाच असल्याचे दिसून येते.
– राष्ट्रीय सरचिटणीस, भाजपा व संचालक, इंडिया फाऊंडेशन.
(इंडियन एक्सप्रेसच्या २५ सप्टेंबर २०१८च्या अंकात प्रकाशित लेखाचा अनुवाद) •••

Posted by : | on : 7 Oct 2018
Filed under : आसमंत, पुरवणी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी (239 of 835 articles)

Bjp Karyakarta Mahakumbh
जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाने आघाडीचे सरकार बनवलेही. पण पक्षाचे उद्दीष्ट तितकेच नव्हते. कशीही सत्ता मिळवणे हे ध्येय ...

×