ads
ads
नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:

सत्यनारायणाची कथा

॥ टेहळणी : डॉ.परीक्षित स. शेवडे |

अधूनमधून अशी काही कलमे आपल्या कानावर पडत असतात खरी. निमित्त होते ते फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी कार्यालयात दरवर्षीप्रमाणे आयोजित केलेल्या सत्यनारायणपूजेचे. घटनेच्या २८ व्या कलमानुसार हे पूजन अयोग्य असल्याचे सांगत प्रचंड गदारोळ घातला गेला. मात्र, तसे करताना हे कलम नेमके काय आहे, याचा कोणीही साधा उल्लेखही केला नाही. असत्याचा जयघोष करायचा असतो तेव्हा संदर्भ देणे टाळले जाते.

Fergusson College

Fergusson College

पुण्यनगरी नामक एका गावात फर्ग्युसन नामक एक महाविद्यालय आहे. महाविद्यालय तसे प्रसिद्धच. टिळक-आगरकरादी प्रभृतींनी स्थापन केलेल्या महाविद्यालयात सावरकरादी शिष्योत्तम होऊन गेले, असा एकंदर गौरवशाली इतिहास. कलियुगी यौवनाने बहरलेल्या समोरील मार्गालाही ‘एफसी रोड’ नामे ओळखले जात असे, असा एकंदर महिमा. महाविद्यालयात भक्तिभावाने आणि श्रद्धेने सत्यनारायण पूजायला घेतला आणि काय आश्‍चर्य! पुरोगामी माओवादासुर नामक राक्षस अचानक जागृत झाला. हिंदू उत्सव सुरू झाले की, हा राक्षस असाच जागृत होतो, असा आजवरचा इतिहास. भरतखंड हा संवैधानिक लोकशाही मानणारा देश असून, या देशी वंद्य अशा संविधानाच्या विरोधात हे कृत्य असल्याचे माओवादासुर बेंबीच्या देठापासून ओरडून सांगू लागला. या असुराचे सैन्य तसे मोठेच. जळी-स्थळी- शिक्षणसंस्थेत-कॅमेरासमोर अशा विविध आघाड्यांवर या सैन्याने मोठीच लढाई उभी केली. सत्यनारायणाच्या आशीर्वादाने माओवादासुर आणि पुरोगाम्यासुर या दोन्ही राक्षस भावांचा हिंदुजनैक्याने दारुण पराभव केला. अशा तर्‍हेने सत्यनारायणाच्या श्रावणमास कथेचा एक अध्याय संपला.
घटनेचे कलम २८ हे गेल्या आठवड्यात सारखे कानी पडत होते. अधूनमधून अशी काही कलमे आपल्या कानावर पडत असतात खरी. निमित्त होते ते फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी कार्यालयात दरवर्षीप्रमाणे आयोजित केलेल्या सत्यनारायणपूजेचे. घटनेच्या २८ व्या कलमानुसार हे पूजन अयोग्य असल्याचे सांगत प्रचंड गदारोळ घातला गेला. मात्र, तसे करताना हे कलम नेमके काय आहे, याचा कोणीही साधा उल्लेखही केला नाही. असत्याचा जयघोष करायचा असतो तेव्हा संदर्भ देणे टाळले जाते. घटनेचे कलम २८ पाहा;
विवक्षित शैक्षणिक संस्थांत धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य.
२८ १. पूर्णतः राज्याच्या पैशातून चालवल्या जाणार्‍या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही.
२. जी शैक्षणिक संस्था राज्याकडून प्रशासली जात असेल, परंतु धार्मिक शिक्षण देणे आवश्यक करणारा कोणताही दाननिधी किंवा न्यास याखाली ती स्थापन झालेली असेल तिला खंड (१) मधील कोणतीही गोष्ट लागू होणार नाही .
३. राज्याने मान्यता दिलेल्या किंवा राज्याच्या पैशातून साहाय्य मिळत असणार्‍या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत जे काही धार्मिक शिक्षण दिले जाईल, त्यात भाग घेण्यास अथवा अशा संस्थेत किंवा तिच्याशी संलग्न असलेल्या कोणत्याही जागेत, जी काही धार्मिक उपासना चालविली जाईल, तिला उपस्थित राहण्यास, अशा संस्थेत जाणार्‍या कोणत्याही व्यक्तीने, किंवा अशी व्यक्ती अज्ञान असल्यास तिच्या पालकाने, आपली संमती दिली असल्याखेरीज अशा व्यक्तीस तसे करणे आवश्यक केले जाणार नाही.
एखाद्या शिक्षणसंस्थेच्या शिक्षकेतर कर्मचारीवर्गाने आयोजित केलेला सत्यनारायण हा धार्मिक शिक्षण कसा काय ठरू शकतो? फर्ग्युसन महाविद्यालय ही शासन अनुदानित स्वायत्त शिक्षणसंस्था आहे, शासकीय शिक्षणसंस्था नव्हे. त्यामुळे त्यांना तर केवळ २८ (३) हे कलम लागू होते. त्यातही कोणालाही या पूजेस उपस्थित राहण्यास अनिवार्य केलेले नव्हते. म्हणजेच घटनेच्या कोणत्याच कलमाची पायमल्ली या प्रसंगात झालेली नाही. थोडक्यात, केवळ घटनेचे नाव पुढे करायचे आणि स्वतःचे अजेंडे राबवायचे, हे उद्योग नेहमीप्रमाणेच सुरू होते. खरेतर ही पूजा हा घटनेच्या कलम २५ नुसार त्या कर्मचार्‍यांचा मूलभूत स्वातंत्र्याचा अधिकार आहे! मात्र, माओवादासुर आणि पुरोगाम्यासुर यांनी उलट्या बोंबा ठोकत हा सारा अपसव्य घटनाक्रम थाटला.
या पूजेला विरोध करणार्‍या एका विद्यार्थ्याला एका वृत्तवाहिनीवर बोलताना ऐकले. तो म्हणाला, आम्ही लोकशाही मार्गाने या पूजेला विरोध केला. प्रत्यक्षात मात्र पूजेच्या ठिकाणी हीन घोषणाबाजी करण्यात आली, असे काही सूत्रांकडून कळले. ही घोषणाबाजी कोणत्या संवैधानिक मार्गात मोडते? खरेतर कोणताही सत्याग्रह वा मोर्चादेखील संवैधानिक मार्गात मोडत नसल्याचे मत खुद्द घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नमूद केले आहे. अशा गोष्टींकडे मात्र पुरोगाम्यांना सोयिस्करपणे दुर्लक्ष करायचे असते. हाच विद्यार्थी पुढे जाऊन म्हणाला, दसर्‍याला शस्त्रपूजा करणे ही एका संघटनेची प्रथा आहे. आमचा हा तरुण मित्र नेमका काय इतिहास शिकला आहे देव जाणे. पांडवांपासून चालत आलेली ही शस्त्रूपजा आजही सुरू आहे. पांडव कुठल्या विशिष्ट संघटनेचे होते का? या दिवशी शेतकरी बांधव नांगराची, सैनिक बंदुकांची, लेखक लेखणीची किंवा अगदी सर्जन्स आपल्या शस्त्रांची पूजा करतात. हे सगळे विशिष्ट संघटनेचे सदस्य असतात का? कृतज्ञता हा हिंदू जीवनाचा स्थायीभाव आहे. त्याचसाठी अशा पूजा होत असतात. सत्यनारायणासारख्या पूजांचाही उद्देश समाजातील सर्व घटकांना एकत्रित आणणे हा असतो. एकीकडे या पूजेच्या बहाण्याने पौरोहित्य करणार्‍या समाजाने स्वार्थापायी ही पूजा सुरू केल्याची कोल्हेकुई काही ठरावीक लोकांकडून केली जाते. मात्र, त्याच वेळी रवा, तूप, साखर वा फुले-फळे इत्यादी पूजेचे साहित्य विक्री करणार्‍या बर्‍याच मोठ्या समाजालाही या धार्मिक विधींतून आर्थिक लाभ होत असतो. किंबहुना तसा तो व्हावा, हाच विचार या व्रत-वैकल्यामागे असतो, याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. अशा निमित्ताने हिंदू समाज एकवटणे, हेच काही समाजविघातक प्रवृत्तींना नको असल्यानेच हे उद्योग सुरू असतात. यांनाच आम्ही माओवादासुर असे म्हणतो. याच राक्षसाचा धाकटा भाऊ पुरोगाम्यासुर, तेही सध्या सर्वत्र पसरले आहेत. या निमित्ताने एक पुरोगामी विद्वान म्हणाले, सावरकरांसारखे बुद्धिनिष्ठ जिथून शिकले त्या संस्थेत मुळात ही कर्मकांडे का करावीत? खरेतर यांना सावरकरदेखील सोयीनेच आठवतात. त्यातही विस्मरण इतके दांडगे आहे की, सावरकरांनी याच फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना छत्रपती शिवाजी महाराजांची आरती रचली होती आणि दर गुरुवारी भोजनापूर्वी शिवप्रभूंची आरती करण्याचा प्रघात होता, याबाबत मात्र या विद्वानांना सोयिस्कर विसर पडला होता! प्रत्यक्षात एका पूजेने समाजात काही वैर निर्माण होत होते का? प्राण्यांच्या कत्तली होत होत्या का? प्रदूषण निर्माण झाले का? या सार्‍याचे उत्तर नकारार्थी असूनही जाणीवपूर्वक हा गोंधळ घातला गेला. या ना त्या कारणावरून समाजात फूट पाडण्याचे मोठे कारस्थान सुरू आहे. जागे राहा, रात्र वैर्‍याची आहे!

Posted by : | on : 2 Sep 2018
Filed under : आसमंत, डॉ.परीक्षित स. शेवडे, पुरवणी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, डॉ.परीक्षित स. शेवडे, पुरवणी, स्तंभलेखक (221 of 1153 articles)


जागता पहारा : भाऊ तोरसेकर | परदेशात अनेक लोकांशी जाहीर संवाद करताना वा मुलाखती देताना राहुलनी आपल्या ज्ञानाची कवाडे इतकी ...

×