ads
ads
दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

दहशतवादाचा पाडाव करण्यास भारतीय नेतृत्व सक्षम

•अजित डोवाल यांचे प्रतिपादन •पुलवामा हल्ला कधीच विसरणार नाही,…

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

सात अतिरेक्यांच्या १३ मालमत्ता जप्त

•टेरर फंडिंगप्रकरणी ईडीची धडक कारवाई, नवी दिल्ली, १९ मार्च…

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

इतरांना त्रास होत असल्यास पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे चूकच

•सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, नवी दिल्ली, १९ मार्च – इमारतीच्या…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

डेटा चोरी प्रकरणी झुकेरबर्ग यांचा खोटारडेपणा उघड

•फेसबूकला होती संपूर्ण माहिती, लंडन, १८ मार्च – कॅम्ब्रिज…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

काटोलमध्ये पोटनिवडणूक नको

•शरद पवार यांची मागणी •कुणीच अर्ज भरू नये, मुंबई,…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:31 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, भाऊ तोरसेकर, स्तंभलेखक » सनातनी आणि नक्षलवादी

सनातनी आणि नक्षलवादी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर |

सोनिया गांधींच्या सल्लागार मंडळात बसून दहा वर्षे विविध अनुदान योजना आखण्यात आल्या व राबवण्यात आल्या. त्यातून कोट्यवधीची रक्कम नक्षली व दहशतवादी कारवायांकडे अलगद वळवली जात होती. मोदी सरकार आल्यावर हे सल्लागार मंडळ संपले आणि त्यातून येणारा मलिदाही आटोपला आहे. तेही कमी म्हणून की काय, जंगल भागात सर्व यंत्रणांचे सुसुत्रीकरण करून नक्षली हिंसाचार मोडीत काढला गेला आहे. मागल्या चार वर्षात देशात कुठेही मोठा नक्षली वा जिहादी घातपात झालेला नाही. त्यातून सावरण्यासाठी शहरात या लोकांनी आश्रय घ्यायला आरंभ केला आहे आणि या सर्वांच्या मुळाशी असलेला नरेंद्र मोदी नावाचा काटा काढायचा बेत शिजला होता. त्याचेच धागेदोरे शोधताना ही ताजी धरपकड झालेली आहे.

Urban Naxals

Urban Naxals

जगात वा आपसास घडणार्‍या अनेक घटना वरकरणी आपोआप वा सहज घडून गेलेल्या वाटतात. त्याची आपण गंभीर दखल घेत नाही. पण म्हणून सगळ्याच घटना नैसर्गिक वा कालक्रमाने घडलेल्या असतात, असेही नसते. त्यामागे काही योजना असते आणि त्या घडवून आणलेल्याही असू शकतात. अनेकदा तर समोरून काय प्रतिक्रीया वा प्रतिसाद हवा, त्यासाठी आधीची घटना घडवून आणलेलीही असू शकते. नंतरच्या घडामोडीची पुर्वतयारी म्हणूनही काही वेगळ्या घटना घडवून आणल्या जात असतात. मागल्या दोन आठवड्यात सनातन व नंतर माओवादी नक्षली संदर्भात झालेल्या अटका, छापे व धरपकड, काहीशी परस्पर संबंधित असावी काय? याची म्हणूनच शंका येते. कुठेही कसली चाहूल नसताना आधी सनातनच्या काही लोकांच्या घरी छापे पडले. नंतर त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे आणखी काही अटका व छापे झाले. त्यातील निवडक तपशील माध्यमातून प्रसारित झाला आणि त्यावर धुरळाही उडवला गेला. अर्थात असा धुरळा उडवणारा एक वर्ग किंवा ठराविक घटक आहे. त्याची भूक अशा छापे व अटकांमधून भागवली गेली. तेव्हा त्यांच्याकडून पोलिस व तपास यंत्रणांची पाठ थोपटून घेण्यात आली, त्या तपासाविषयी शंका व संशय घेणारे आक्षेपही असे पुरोगामी घटक स्वत:च खोडून काढण्यात पुढे होते. यात एक आठवडा गेला आणि मग त्यांच्याच गोटातल्या अनेकांवर छापे घातले गेले व अटकाही झाल्या. आता त्यांनी आपल्यावर अन्याय होतो असे कसे म्हणावे? कारण आठवडाभर आधी त्यांनीच सनातनवरच्या कारवाईसाठी तपास यंत्रणांची पाठ थोपटली आहे ना? मग पहिली कारवाई योग्य निष्पक्ष असेल, तर दुसरी कारवाई पक्षपाती कशी ठरवता येईल? की अशा पोपटांची वाचा बंद करण्यासाठी आधी सनातनवर छापे घालून पुरोगाम्यांना जाळ्यात ओढले गेलेले होते?
वैभव राऊत नावाच्या कुणा सनातन साधकाला नालासोपार्‍यातून अटक झाली. त्याच्या घरावर छापे घालून कागदपत्रे स्फोटके जप्त करण्यात आल्याच्या बातम्या आल्या. मग त्याच्या जबानीच्या आधारे आणखी काहींना इतरत्र छापे घालून पकडले गेले. त्यांच्यावर दाभोळकर, लंकेश वा अन्य हत्याकांडाचे आरोप ठेवले गेले. मात्र त्यातले सज्जड पुरावे अजून समोर आलेले नाहीत. कारण कुठलाही गुन्हा सिद्ध होण्यासाठी कायद्याला मान्य होऊ शकणारे पुरावे असावे लागतात. तसे कोणते पुरावे राऊत वा अन्य कोणापाशी सापडले असतील, तर ते अजून कोर्टात आलेले नाहीत. पण सनातनला किंवा त्यांच्यासहीत हिंदूत्ववादी गटाला कोंडीत पकडण्यासाठी उतावळे असलेल्यांना तशा भक्कम पुराव्याशी कुठे गरज असते? सहाजिकच त्यांनी विनाविलंब सनातनच्या अटकेचे समर्थन केले आणि यंत्रणांची पाठ थोपटून घेतली. कारणही स्पष्ट आहे. त्यांनाही सत्य पुरावे अशा गोष्टींशी कर्तव्य नसते की दाभोळकरांच्या हत्येशी कर्तव्य नसते. त्यांना अशा अर्धवट वा अपुर्‍या माहितीचे राजकीय भांडवलच करायचे असते. तो मसाला कोणीही पुरवला तरी चालतो. सहाजिकच एटीएसच्या नालासोपारा धाडीचे पुरोगाम्यांनी टाळ्या पिटून स्वागत केले. माध्यमातून खुप धुरळा उडवून झाला. त्यानंतर त्याच तपास यंत्रणांनी आपला मोर्चा पुरोगाम्यांचे अतिरेकी नक्षली व माओवादी यांच्यासह सहानुभूतीदारांकडे वळवला आहे. मंगळवारी मध्यरात्री व दुसर्‍या दिवशी पहाटे अनेक संशयित नक्षली व माओवादी बुद्धीमंत, लेखक पत्रकार व सहानुभूतीदार यांच्या घरावर ‘नालासोपार्‍या’सारख्याच धाडी पडल्या. एकाचवेळी पाच राज्यात ह्या धाडी घालण्यात आल्या आणि त्यात एकाहून एक नामांकित व ख्यतनाम पुरोगामी चेहर्‍यांना पोलिस यंत्रणांनी ताब्यात घेतले. इतके होऊनही कुणा पुरोगामी नेत्याला वा बुद्धीमंताला प्रोत्साहक प्रतिक्रीया देण्यासाठी पुढे यावेसे वाटलेले नाही. याचा अर्थ काय होतो?
सनातनच्या कुणाला पकडले, मग तो हिंदू दहशतवाद असतो. तर नक्षली वा पुरोगामी लोकांना अशाच कारणासाठी पकडले गेल्यास तो पुरोगामी दहशतवाद का होणार नाही? कारण जी प्रारंभिक माहिती उघडकीस आलेली आहे, ती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घातपाती हत्याकांडाची पुर्वतयारी असल्याचे सांगते. खरे तर या संदर्भात खुप आधी म्हणजे गेल्या जुन महिन्यात पहिली कारवाई झालेली होती. दिर्घकाळ तुरूंगात असलेले नेहरू विद्यापीठाचे प्राध्यापक साईबाबा यांच्या उपदव्यापांचे धागेदोरे शोधताना पोलिसांना खुप काही माहिती मिळालेली होती. त्यातच वर्षारंभी पुण्यात एल्गार परिषद झाली आणि त्यानंतर भीमा कोरेगाव येथे भयंकर हिंसाचार माजवला गेला. त्याचेही धागेदोरे शोधताना अनेक दुवे तपास यंत्रणांच्या हाती लागले. त्याचा मागोवा घेताना थेट पंतप्रधानांच्या हत्येविषयी झालेल्या चर्चा विचारविनिमयाचे काही कागदपत्र पोलिसांना मिळालेले होते. पण त्यात गुंतलेली नावे खुप मोठी होती. म्हणजे उदाहरणार्थ गौतम नवलाखा हे नाव मोठे आहे, युपीएच्या कारकिर्दीत सोनियांच्या नेतृत्वाखाली जे राष्ट्रीय सल्लागार मंडळ कार्यरत होते, ते मनमोहन सरकारला सल्ला देत होते आणि नवलाखा त्याचे सदस्य होते. मानवाधिकार वा समाजसेवा म्हणून जे थोतांड मागल्या दोनतीन दशकात बोकाळले, त्यातून घातपाती संघटनांनी पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी हा मुखवटा धारण केला. त्यांनी हळुहळू आपल्या दोन शाखा केल्या. त्यापैकी एक शाखा भूमीगत राहून हिंसाचार माजवणार आणि दुसरी उजळमाथ्याने समाजात सेवाव्रती म्हणून मुखवटा लावणार. घातपातासाठी पैसा व निधी उभारण्याचे काम करणार. पकडल्या जाणार्‍या घातपाती अतिरेक्यांसाठी कायदेशीर पळवाटांची सुविधा उभी करणार. त्याखेरीज क्रांतीच्या स्वप्नांनी भारावलेल्या सुखवस्तु व सुशिक्षितांना बेसावधपणे आपल्या सापळ्यात ओढायचे काम या पांढरपेशी गटाने करायचे असते. मंगळवारी त्यांच्यावरच धाडी पडल्या आहेत.
इथे सनातन आणि माओवादी नक्षली यांची तुलना करून बघण्यासारखी आहे. सनातनच्या अर्धा डझन लोकांना पकडल्यानंतरही कुठल्या मोठ्या राजकीय पक्ष किंवा राजकीय संघटनेशी त्यांच्या संबंध असल्याचा पुरावा समोर आलेला नाही. आणखी एक गोष्ट अशी, की कुठला राजकीय पक्ष सनातनवरील कारवाईच्या विरोधात आवाज उठवायला पुढे सरसावला नाही. पण नक्षली अटकसत्रानंतर अनेकांचे पुरोगामी मुखवटे फाटणार आहेत. अटकेला काही तास होण्यापुर्वीच अनेक पुरोगामी अटकेमागे काही काळेबेरे असल्याचा कांगावा करायला पुढे आलेले आहेत. माओवादी जर घातपाती म्हणून पकडले गेले असतील, तर त्यांनाही सनातन प्रमाणेच वागवा, असे पुरोगामी का म्हणत नाहीत? दहशतवादाला धर्म नसेल वा विचार नसेल, तर पुरोगामी शहाण्यांच्या युक्तीवादामध्ये पक्षपात कशाला होतो? हेच नेहमी होत आलेले आहे. नक्षलवादी पकडला गेल्यावर झाडून सगळे मानवाधिकारवादी मैदानात उडी घेऊन त्यांना वाचवायला पुढे येतात. पण सनातनवाल्यांना माणसे असूनही कुठले मानवाधिकार नाहीत, अशी पुरोगाम्यांची धारणा आहे. इथे सगळी गफलत होऊन जाते. कर्नल पुरोहित यांनी नुकताच सुप्रिम कोर्टाकडे अर्ज केला असून, आपली अनेक वर्षे तुरूंगात छळणूक झाली त्याच्या चौकशीची मागणी केली आहे. पण त्यांच्या मानवाधिकारासाठी यापैकी कुठला पुरोगामी नामवंत वकील पुढे सरसावलेला नाही. मात्र तेच लोक अफजल गुरू वा याकुबच्या फाशीसाठी मध्यरात्रीही सुप्रिम कोर्टाला कामाला लावत असतात. आताही त्याचेच प्रत्यंतर येईल. पण नक्षली असे शहरात का येऊ लागले आहेत? त्यांना मोदी सरकारची इतकी दहशत कशाला वाटू लागली आहे? त्यांना युपीए वा मनमोहन सरकारची भिती कशाला नव्हती? आमचे सरकार सत्तेत आल्यावर एकेकाला बघून घेऊ, असे प्रकाश आंबेडकर कशाला म्हणत होते? अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे या ताज्या अटकांमध्ये दडलेली आहेत.
प्रकाश आंबेडकरांपाशी इतकी शक्ती नाही, की ते देशात आपल्या पक्षाचे सरकार आणू शकतील. पण काँग्रेस वा युपीए सरकार आले तर पुन्हा नक्षली नवलाखा किंवा तत्सम मानवाधिकारी सल्लागार मंडळाच्या तालावर ते सरकार नाचेल, याची त्यांना खात्री आहे. असे सरकार सत्तेत असले मग कर्नल पुरोहित वा साध्वी प्रज्ञासिंह यांचे मानवाधिकार पायदळी तुडवले जाणार, याविषयी सर्वाना खात्री आहे. त्याच्या उलट नक्षली माओवादी किंवा जिहादी घातपात्यांना कायद्यासह सरकारने संरक्षण मिळणार याचीही हमी आहे. ती हमी मोदी सरकार सत्तेत आल्यापासून संपली, ही खरी अडचण आहे. मागल्या चार वर्षात पुर्वेकडील अनेक राज्यात बोकाळलेला जंगली प्रदेशातला नक्षलवाद अस्ताला लागलेला आहे. जंगल कपारीत लपून बसलेल्या नक्षल्यांना शोधून व त्यासाठी स्थानिकांची मदत घेऊन मोदी सरकारने मोठी मोहिम चालवली. त्यामुळे या लोकांना जंगलात लपून बसणे अशक्य झाले आहे. त्यांची संख्या पुर्णपणे घटली आहे आणि त्यासाठी मिळणारा पैसाही ओहोटीला लागलेला आहे. सोनिया गांधींच्या सल्लागार मंडळात बसून दहा वर्षे विविध अनुदान योजना आखण्यात आल्या व राबवण्यात आल्या. त्यातून कोट्यवधीची रक्कम नक्षली व दहशतवादी कारवायांकडे अलगद वळवली जात होती. मोदी सरकार आल्यावर हे सल्लागार मंडळ संपले आणि त्यातून येणारा मलिदाही आटोपला आहे. तेही कमी म्हणून की काय, जंगल भागात सर्व यंत्रणांचे सुसुत्रीकरण करून नक्षली हिंसाचार मोडीत काढला गेला आहे. मागल्या चार वर्षात देशात कुठेही मोठा नक्षली वा जिहादी घातपात झालेला नाही. त्यातून सावरण्यासाठी शहरात या लोकांनी आश्रय घ्यायला आरंभ केला आहे आणि या सर्वांच्या मुळाशी असलेला नरेंद्र मोदी नावाचा काटा काढायचा बेत शिजला होता. त्याचेच धागेदोरे शोधताना ही ताजी धरपकड झालेली आहे.
मार्क्सवाद किंवा कम्युनिस्ट तत्वज्ञान कधीच लोकशाही मानत नाही. सर्वहारा वर्गाची हुकूमशाही म्हणजे गरिब वंचितांचे नेतृत्व करणार्‍यांची हुकूमशाही, असे कम्युनिस्टांचे तत्वज्ञान आहे. ते शक्य नसल्याने सहा दशकापुर्वी मुख्यप्रवाहातील कम्युनिस्टांनी लोकशाही मार्गाने निवडणूकांनी सत्ता मिळवण्याचा मार्ग पत्करला. तशी सत्ता मिळाली तरी पक्षाची व नेत्याची हुकूमशाही प्रस्थापित करता येत नाही. म्हणून चारू मुजूमदार वा कनु सन्याल अशा मुठभरांनी सशस्त्र क्रांतीचा भूमीगत मार्ग पत्करला. त्यांनी वेगळी चुल मांडून त्याला मार्क्सवादी लेनिनवादी कम्युनिस्ट पक्ष असे नाव दिले. त्याच्याच विभिन्न गटांना आपण आज नक्षली म्हणतो. या लोकांनी १९७० च्या सुमारास बंगालच्या नक्षलबाडी गावात सश्स्त्र उठाव केला व अनेक जमिनदारांचे मुडदे पडले होते. त्या उठावानंतर अशा सशस्त्र घातपाती कार्यशैलीला नक्षलवादी असे नाव पडले. आज त्या गावात कोणी कम्युनिस्टांचे नावही घेत नाही. पण तिथून सुरू झालेल्या कम्युनिस्ट उठावाला नक्षलवादी हे नाव कायमचे चिकटून गेले. हळुहळू त्याला अनेक बुद्धीमान अभ्यासू व पुस्तकी कम्युनिस्टांची साथ मिळत गेली आणि विद्यापीठात शिरकाव करून घेतलेल्या पढतमुर्ख कम्युनिस्टांनी सुशिक्षित तरूणाला त्यात ओढले. अनेक विद्यापीठाला त्यांनी त्यासाठी लक्ष्य केले. हळुहळू डाव्या पुरोगामी पक्षांनीही त्यांची तळी उचलून धरली आणि आता तर पुरोगामी आंबेडकरवादी व डाव्यांसह विवेकवादी म्हणवून घेणारे समाजवादीही नक्षलवादाच्या दावणीला बांधले गेले आहेत. त्यापैकी अनेकांना संघ, भाजपा वा हिंदूत्वाचे वावडे आहे. त्याचाच फायदा घेऊन शहरी भागात नक्षली व जिहादींनी आपले हातपाय पसरले आहेत. नक्षली व जिहादी दहशतवादाकडे संघाला वा हिंदूत्वाला पर्याय म्हणून बघण्यातून ही रोगराई देशाच्या अनेक शहरात व विद्यापीठात बोकाळत गेलेली आहे.
मग जेव्हा हिंदूत्वाला शिव्याशाप द्यायचे असतात, तेव्हा हेच पुरोगामी सनातनकडे बोट दाखवतात. पण हिंदूत्ववादी मानल्या जाणार्‍या संघटना वा राजकीय पक्ष कधीच सनातनच्या समर्थनाला उभे राहिलेले नाहीत. फार कशाला कालपरवा ज्यांना सनातनचे साधक म्हणून पकडले गेले, तेही आपले सदस्य नसल्याचे सांगून सनातन संस्थेने हात झटकले आहेत. पण तसेही सोवळेपण कोणी पुरोगामी दाखवणार नाही. आता ज्यांना अटक झाली आहे वा जिथे धाडी छापे पडले आहेत, त्यांना गुन्हेगार मानण्यापेक्षा निष्पाप व निरपराध ठरवण्यासाठी तात्काळ पुरोगामी लोकांनी हलकल्लोळ सुरू केला आहे. हा दोन्हीतला फरक आहे. एक दहशतवाद राजकीय आश्रयावर चालतो, त्याला जिहाद नक्षलवादी असे नाव आहे. तर दुसरा दहशतवाद काहीसा हौशी व भावनांच्या आहारी गेलेली उत्स्फुर्त प्रतिक्रीया आहे. त्याला टोळीबाजी म्हणता येईल. एका प्रवृत्तीचे जाळे देशाच्या विद्यापीठे, राजकीय संघटना व न्यायालये व थेट कलाक्षेत्रापर्यंत पसरलेले आहे आणि दुसर्‍या दहशतवादाला पाठीशी घालायला यापैकी एकाही क्षेत्रातला कोणी मान्यवर पुढे येत नाही. हा जमिन अस्मानाचा फरक आहे. म्हणूनच नक्षली व जिहादी दहशतवादाला हात लावणे कायद्यालाही भयभीत करते. त्याचे बोलविते धनी जीवनाच्या सर्व क्षेत्रात मोक्याच्या जागी बसलेले आहेत. दुसरा म्हणजे हिंदू दहशतवाद जवळपास नगण्य आहे. नालासोपार्यात मिळालेली स्फोटके व बंदुका वगैरे नक्षली वा जिहादी शस्त्रसाठ्याच्या तुलनेत दिवाळीचे फटाकेही म्हणता येणार नाही. पण त्यांना आधी पकडून पोलिसांनी व एटीएसने आपली पाठ पुरोगाम्यांकडूनच थोपटून घेतली. आता त्याच कर्तव्यदक्ष व कर्तबगार यंत्रणेने नक्षली व माओवादी पकडले असतील, तर पुरोगामी त्यांना खोटे कसे पाडणार? नक्षलीची धरपकड खोटी व बिनबुडाची असेल, तर सनातन्यांची धरपकड योग्य कशी म्हणता येईल?

Posted by : | on : 9 Sep 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, भाऊ तोरसेकर, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, भाऊ तोरसेकर, स्तंभलेखक (507 of 1287 articles)

Sangh
विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | प्रत्येक आव्हानाला संधी मानून त्यानुरूप प्रशिक्षण तसेच संघटनात्मक रचना उभी करण्याची संघाची परंपरा, आपल्या ...

×